मन
मनाच्या संवेदना जेवढ्या स्थिर आणि चंचल आहेत, तेवढ्या गंभीरही आहेत. 'व्यक्ती तितक्या प्रकृति!' संवेदनाची चंचलता एक सारखी नाही. प्रत्येक वाद -विवाद , संवाद , वार्तालाप आणी तात्कालिक घटना होण्यामागे चक्रव्यूह आसते. भेदक मारा करून अचूकपणे बाहेर येणे, 'सत्य' सिद्धता करणे , परंतु त्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी माणसाकडे इच्छाशक्ती हवी असते. इच्छाशक्ती फक्त आपले मनच देऊ शकते त्यासाठी हवे असते एक् सदृढ मन!
निसर्ग नियमानुसार याप्रमाणे शरीर थकते . त्याला जखमाही होतात. शरीरावरील जखमा या आठ-दहा दिवसानंतर किंवा एक महिन्यानंतर भरूनही निघतात. अगदी त्याचप्रमाणे मानवी मनाला ही जखमा होतात, मन घायाळ होते . मनाला झालेली जखम कधी कधी सहज भरून येते. परंतु ,खोल झालेल्या जखमा मात्र आयुष्य भर भरून येत नाहीत. एखाद्या गोष्टीवर मात करण्याची क्षमता मनामध्ये आहे . त्याची क्षमता ,'स्वतःला नष्ट करण्यामध्ये सुद्धा आहे'. त्या मनाला योग्य हाताळल्यास त्याला योग्य दिशा देता येईल.
या सर्वांग सुंदर मनामध्ये सकारात्मक दृष्टिकोनाचे बीज पेरणी केल्यास ,त्यातून नवनिर्माण अंकुर उदयाला येतील . ते अंकुर निश्चितच कणखर, दणकट आणि संयमी असतील .मग प्रश्न पडतो, या मनाला तंदुरुस्त कसं बनवायचं ? बरोबर ना! या मनाला तंदुरुस्त बनवण्यासाठी, जसे या मानवी देहाला व्यायामाची आवश्यकता आहे . तशीच या मनाला सुधा सुद्धा व्यायामाची आवश्यकता आहे. मन जर नियंत्रणात असेल तर जगातील 'अशक्य' ते 'शक्य' करण्याची ताकद शेवटी या मनातूनच निर्माण होते. हे विसरता कामा नये. या मनाला नियंत्रणात ठेवायचे असेल, तर त्यासाठी विपश्यना,'विपश्यना' हे एक प्रभावी तंत्र आहे . या तंत्राचा दैनंदिन वापर जर केला, तर तुमचे मन निश्चितच तुमच्या नियंत्रणात असेल. यात कसलीच शंका नाही. संत रविदास सुद्धा सांगतात, "मन चंंगा तो , कटौती मे गंगा." याउपरही संत तुकाराम सुद्धा सांगतात ,"मन नाही रे निर्मळ काय करील साबण "प्रत्येक धर्माचे अध्यात्म सुद्धा तेच सांगते ,"चित्त की शुद्धता" यही मन है !