शेतकरी- THE FARMER
जगाचा पोशिंदा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, तो म्हणजे शेतकरी!!! जो प्रत्यक्ष संघर्ष संघर्ष करत असतो . प्रत्येक वेळेला तो एक प्रकारची पैंज लावत असतो पैंजमध्ये हरत असतो. जगामध्ये एकमेव असा हा शेतकरी निसर्गाच्या जीवावर , भरवशावर लाखो रुपये मातीखाली टाकत असतो . शाश्वती मात्र कोणतीच नाही. पण त्या शेतकऱ्याला कसली सुट नाही की, भविष्यातील संकटांना सामोरे कसे जायचे याची थोडीशी सुद्धा चिंता नसते . यश आलं तर कष्टाचा चीज झालं आणि अपयश आलं तर नशिबात नव्हतं! हे एक वाक्य त्याच्या जीवाला साथ घालून जाते. अपयशातही जीवन जगतो आणि यशामध्येही जीवन जगतो. जगत असताना यातना काय होतात? त्या शेतकऱ्यापेक्षा जास्त कोणी जानु शकत नाही. कारण आपण फक्त व्यासपीठावरून आणि एखाद्या पेपर संवादातून व्यथा मांडू शकतो पण त्या व्यथा आपण प्रत्यक्ष जगल्यानंतर त्याची दाहकता आणि दुःख किती असते याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही.
पूर्वीपासून शेतकऱ्याची हाल अपेष्टा होत असताना आपण सर्वजण पाहतो किंबहुना आपण त्यातला एक भागही असू शकतो. आधुनिक युगातील शेतीमध्ये क्रांती होत गेली . कमी क्षेत्रांमध्ये अधिकचे उत्पन्न होऊ लागले. धवल क्रांती आणि हरितक्रांती झाली . प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्याला याचा कितपत लाभ झाला हे कोणालाही अचूक सांगता येणार नाही . परंतु ज्या ठिकाणी जलसिंचन वाढले त्या ठिकाणी फळ बागायती शेतीचे क्षेत्रही विकसित झाले . विशिष्ट ठिकाणचा विकास झाला म्हणजे सर्व शेतकऱ्यांचे विकास झाला असं म्हणता येणार नाही. अज बहुतेक क्षेत्रामध्ये जलसिंचन योजना पोहोचलेल्या नाही. त्यामुळे तेथील शेतकरी आजही निसर्गावर आधारित शेती करत आहे . खास करून मराठवाडा, विदर्भ , खान्देश या ठिकाणी जलसिंचन नसल्यामुळे येथील शेतकरी निसर्गावर आधारित शेतकरी करतात आणि त्यांची शेती म्हणजे पूर्णतः एक प्रकारचा जादूचा आकडा असे म्हणावे लागेल .
शेतकरी शेती करत असताना त्या शेतीमध्ये त्याचा कुटुंबातील सर्व सदस्य शेतीमध्ये राब राब राबतात. शेती पिकवतात शंभर टक्के निसर्ग वर आधारित शेती करताना तर वर दगड आणि खाली माथा अशी परिस्थिती आहे . त्यामुळे शेतीमध्ये कुठल्याही उत्पादन जर चांगले आले तर त्याला बाजार भाव मिळत नाही . व्यापारी धोरण त्या शेतकऱ्यांच्या पदरात योग्य असा भाव पदरात पडू देत नाही. याच जर उदाहरण द्यायचं झालं तर, महाराष्ट्रातील कापूस पिक मोठ्या प्रमाणात पिकवले जाते. कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे या ठिकाणी शेतमजुरापासून शेतकऱ्याला चांगले दिवस आले आहेत. पण होतं काय, जर शेतकऱ्याने कापूस सुरुवातीला विकला तर त्या कापसाला शेवटी चांगला भाव असतो. हा झाला एका वर्षाचा अनुभव . म्हणून शेतकरी दुसऱ्या वर्षी आपल्या कापसाला शेवटी चांगला भाव येईल म्हणून कापसाचा साठा आपल्या घरी करून ठेवतो. त्यामध्ये मग अनेक अडचणी असतात अंगाला खाज सुटणे, लहान मुलाकडून किंवा इतर माणसाकडून नकळतपणे साठवलेल्या कापसाला आग देखील लागते. एवढा त्रास सहन करून शेतकरी त्या कापसाचे जतन करतो आणि शेवटी भाव योग्य मिळेल या आशेवरती तो जगत असतो. पण....होतं काय ज्या वर्षी शेतकरी मोठ्या प्रमाणात कापसाची साठवण करून ठेवतो नेमकं त्याच वर्षी कापसाचे भाव गडगडलेले असतात. तेव्हा, मात्र शेतकऱ्यांना काय करावे आणि काय करू नये असे होते. हा झाला पहिला भाग. नंतर कधी कधी तर असे होते शेतकऱ्याला सुरुवातीला चांगला भाव येतो तर कधीकधी मध्ये मध्यापर्यंत चांगला भाव येतो पुन्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची भारतीय बाजारपेठेवर परिणाम झालेला दिसून येतो . यामुळे शेतकरी आणि छोटे व्यापारी ही तोट्यात येतात. मग शेतकऱ्यांना प्रश्न पडतो आपण कापूस कधी विकायचा ? किती दिवस ठेवायचा? आणि कधी विक्रीला काढायचा ? याचा अंदाज सांगणार आज कोणीही नाही ,त्यामुळे आज शेतकरी मोठा तोट्यात जात आहे . परिणामी तो नको त्या मार्गावर जाऊन अपवादात्मक असेही प्रकार घडतात ते आपले जीवन यात्रा संपवतात.
ज्वलंत उदाहरण म्हणजे औरंगाबाद विभागाचे माजी आयुक्त माननीय केंद्रेकर साहेबांनी केलेला सर्वे याची बुलंद साक्ष आहे. हा सर्वे एक लाख लोक आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे असे स्पष्टपणे सांगून शासन दरबारी हा मुद्दा मांडला. शासनाने दखल न घेतल्यामुळे किंवा इतर कारणामुळे राजीनामा दिला. जेव्हा माझी आयुक्त साहेबांनी हा सर्वे केला तेव्हा त्यांनी काही विशिष्ट प्रश्नावली तयार केली होती . त्या प्रश्नावली मध्ये त्या शेतकऱ्याच्या दैनंदिन जीवनाचे चित्र स्पष्ट दिसत होते . त्यावर आधारित हा सर्वे अत्यंत तंतोतंत किंबहुना शंभर टक्के वास्तव म्हणावा लागेल. कारण आज पर्यंत एवढा ग्राउंड वर रिपोर्ट कधी झालाच नव्हता. आत्महत्येची कारणे समजतच नव्हती . ती समजण्यामध्ये अधिकारी कितपत यशस्वी झाला येणारा काळ सांगेल. तेव्हा मात्र शासनाने या अहवालाची आणि अहवालावरून केलेल्या शिफारशीची दखल घेतली असती तर बरे झाले असते. असे आत्मपरीक्षणाची वेळ या शासनावर येऊ नये.
आजच्या काळामध्ये सर्व सेवाभावी संस्था ,सामाजिक संघटना, शेतकरी संघटना , मजूर संघटना व सामाजिक चळवळीत काम करणारे ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक या सर्वांनी मिळून शेतकऱ्यांचे उद्बोधन वर्ग आयोजित करून शेतकऱ्यांचे मन घट्ट करून त्यांच्यामध्ये नवचेतना निर्माण करण्यासाठी,"एक होता कार्व्हर" सारखी पुस्तके त्यांच्या वाचनात आणून द्यावी . त्याचबरोबर शेती उद्योगांमध्ये यशस्वी महान व्यक्तींची चरित्रे त्यांना प्रेरणादायी होतील अशा स्वरूपात त्यांच्यासमोर मांडण्यात यावी की , ज्यामुळे त्यांच्यामध्ये नवचेतना निर्माण होणे, सर्वसाधारण शेती न पाहता ती शेती उद्योग म्हणून पहावी व यशस्वी शेती उद्योजक निर्माण व्हावेत. यासाठीचे प्रयत्न करणे आवश्यक आहे. असं जर झालं तर शेतकऱ्यांना मानसिक आधार मिळाल्यामुळे रडण्याऐवजी ते लढायला शिकतील. आशि त्यांची मानसिकता घट्ट करणे केवळ वरील लोकांची जिम्मेदारी नसून त्यात शासनाचा सिंहाचा वाटा असावा. शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव , त्याचबरोबर घरामध्ये होणाऱ्या नुकसान भरपाईची सोय सुद्धा शासनाकडून करण्यात आली तर, शेतकरी हतबल न होता मोठ्या उमेदीने जगायला शकेल. शेती व्यवसाय हा सर्व व्यवसायांना पुढे पुढे घेऊन जातो मग इतर व्यवसाय धारकांनी सुद्धा शेतकरी व शेती व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे. किमान बी बियाणे विक्रेते यांनी शेतकऱ्यांची अडवणूक न करता त्यांना योग्य त्या किमतीत बी बियाणे, खत यांची विक्री केली जावी. एवढी माफक अपेक्षा करायला काय हरकत आहे. वर उल्लेख केलेल्या सर्व घटक सामान्य जरी वाटत असले तरी, ते इतके मोलाचे आहे. ज्यामुळे एखादा शेतकरी निश्चितच शेवटच्या टोकापासून किंबहुना आत्महत्येपासून दूर जाईल आपल्या कुटुंबाचा आधार बनेल.
।।जय जवान जय किसान।।
📝#Rahul Dongardive