Demonetisation 2.0 लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Demonetisation 2.0 लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २० मे, २०२३

नोटबंदी - Demonetisation 2.0

 

8नोव्हेंबर 2016 रोजी रात्री ठीक आठ वाजता सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला संबोधत असताना रात्री बाराच्या नंतर 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा बंद होणार..अशी घोषणा केली आणि पाचशे रुपयांच्या एक हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्या. भारतामध्ये पंतप्रधानाच्या संबोधनानंतर प्रत्येकाची धावपळ आणि धांदल उडाली. नोटबंदी करत असताना, पंतप्रधानांनी काळा पैसा याविषयी सविस्तर विवेचन केले होते. काळ्या पैशाचे दुष्परिणाम किती भारतासाठी घातक आहेत ? याची बाजू मांडत असताना लोकांच्या अशा पल्लवीत केल्या गेल्या. लोकांना भविष्यासाठी पारदर्शक भारत तर दाखवला. त्याचबरोबर सामान्य कुटुंबापासून मध्यमवर्ग व व्यापार उद्योगातील वर्ग राष्ट्रीय कर प्रणाली मध्ये आणण्यात आला . कोणतीही वस्तू खरेदी पासून ते मोठमोठ्या वस्तूंपर्यंत राष्ट्रीय  कर प्रणाली द्वारे देशाची आर्थिक सुबत्तता आणण्याचा प्रयत्न केला गेला. त्याचे योग्य असे मार्गदर्शन  देशाल परिस्थितीनुसार  देण्यात आले.


पंतप्रधानाच्या उद्घोषनेनंतर दुसऱ्या दिवसापासून बँकांमध्ये रांगाची रांगा लागल्या. सामान्य माणसापासून श्रीमंत माणसापर्यंत प्रत्येकजण बँकेच्या दारामध्ये असणारी पुंजी बदलण्यासाठी बँकेमध्ये  खेट्या मारू लागला. अनेक लोकांना आपले प्राणही गमवावे लागले ,ही  दाहकता मनाला संवेदनशील बनवते. नोटबंदी झाली आणि कमिशन एजंट चा भस्मासुर प्रत्येक बँकेच्या दारामध्ये पाहायला मिळाला. नोटबंदी मध्ये मोठा बदलण्यासाठी काही बंधन होती. त्यामुळे सामान्य माणसाचे हाल झाले . ही वस्तुस्थिती जरी असली, तरीही गडगंज संपत्ती वाले माणसं कोणी बँकेच्या दारात उभा राहिलेला आपण पाहिला नाही. घरपोहोच नवीन नोटा त्यांना मिळाल्या प्राप्त झाल्या.  पण सामान्य माणूस रांगांमध्ये उभा राहून व्याकुळ झाला होता. हे चित्र सर्व भारताने पाहिले अनुभवले.

नोटबंदी मधील प्रमुख दावा.... 

पंतप्रधानाच्या उद्घोषनेनंतर नोटबंदी झाली नोटबंदी का करण्यात आली ? याचे स्पष्टीकरण स्वतः महोदयांनी दिले होते . त्यामध्ये प्रथम कॅशलेस इकॉनॉमिचा प्रचार व प्रसार करण्यासाठी डिजिटायझेशन किती महत्त्वाचे आहे हे सांगण्यात आले. त्याचा परिणाम आज आपल्याला दिसत आहे. खेडोपाडी डिजिटायझेशन झाले की, वस्तुस्थिती आहे. त्यानंतर दुसरा दावा करण्यात आला होता. नकली चलनावर लगाम घालण्यात येईल शासनाची भूमिका ठाम आणि कौतुकास्पद होती.परंतु, डिजिटायझेशनच्या  जमान्यामध्ये झेरॉक्स मारलेल्या नोटा सुद्धा जनतेने अनुभवल्या . रियल इस्टेट मध्ये पारदर्शकता येईल असे सर्वांनाच वाटले होते . काही ठिकाणी यशही आले असेल . पण.....बहुतेक ठिकाणी पारदर्शकता ही फक्त कागदपत्रेच राहिली. प्रत्यक्ष व्यवहार होत असताना कसा होतो? कसा केला जातो? त्याची प्रत्यक्ष अनुभूती ही प्रत्येकाची वेगळीच आहे. त्यामुळे रियल इस्टेट पारदर्शक झाले असे म्हणता येणार नाही.



सर्वात महत्त्वाचा शासनाद्वारे प्रकाश झोतामध्ये येणारा मुद्दा म्हणजे, 'काळे धन', 'व्हाईट  कॉलर ' पेक्षा ब्लॅक मनी भारतात सर्वात जास्त आहे . हे खुद्द पंतप्रधानांनी सांगितले होते . हा काळा पैसा जर वापरात आला तर भारत हा विकसित राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही . त्याचबरोबर भारतातील प्रमुख समस्या असलेल्या सर्व गोष्टी या पैशाने सोडवता येतील . एवढेच काय तर प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये सुद्धा येऊ शकतात. निवडणुकी साठी अपप्रचार ही करण्यात आला परंतु जेव्हा नोटबंदी झाली तेव्हा हा काळा पैसा गेला कोठे ?  कारण आरबीआयच्या सर्वेनुसार आणि आकडेवारीनुसार जवळपास 99% च्या वर बँकेमध्ये पैसा जमा झाला . मग हा काळा पैसा गेला  कोठे ? या प्रश्नाचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही. नोटबंदीमुळे टॅक्स प्रणाली वाढणार यामध्ये वाढ सुद्धा झाली . परंतु शासनाचे दावे केले होते ते पूर्णपणे फलप्राप्तिस उतरले का ?याची शाश्वती देता येत नाही.

आरबीआय ने दोन हजार रुपयाच्या नोटा वितरणातून काढून घेतल्या... नोटबंदी नाही! 

19 मे 2023 रोजी आरबीआय ने केलेल्या घोषणेनुसार दोन हजार रुपयाच्या नोटा वितरण व्यवस्थेतून काढून घेण्यात आल्या आहेत,असे सांगण्यात आले . त्यानुसार दोन हजार रुपयाची नोट वितरण व्यवस्थेतून संपुष्टात आली. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत प्रत्येकाला ह्या नोटा बँकेत जमा करता येतील. परंतु, एका व्यक्तीला फक्त दहा नोटा बदलता येतील, त्यापेक्षा जास्त नोटा एक व्यक्ती बदलू शकत नाही. आरबीआय ने हे नियम घालून दिले.

आरबीआय या ठिकाणी स्पष्ट करते की, ही नोटबंदी नसून दोन हजार रुपयांच्या नोटा फक्त वितरण व्यवस्थेतून काढून घेण्यात आल्या आहेत. त्याची कारण  समोर करत असताना पुढील काही मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊयात. कारण गुलाबी नोटांची छपाई 2019 पासूनच बंद केली गेली होती.

1. दोन हजार रुपये नोटा छापण्याचा उद्देश वेगळा

सदरील मुद्द्यांचे स्पष्टीकरण असताना आरबीआय सांगते . दोन हजार रुपयाच्या नोटा छापण्याचा उद्देश हा वेगळा होता. नोटबंदीनंतर व्यवहारातील प्रमुख मोठा असणाऱ्या पाचशे रुपये व एक हजार रुपये यांची तूट भरून काढण्यासाठी मोठ्या रकमेची नोट छापण्यात आली होती. त्याचबरोबर पाचशे रुपयांच्या एक हजार रुपयाचे नोटा अचानक व्यवहारातून बंद झाल्यास त्याचा खूप मोठा परिणाम जनतेला सोसावा लागला असता. परिणाम कमी होण्यासाठी म्हणून गुलाबी नोट छाटण्यात आली होती.

2. गुलाबी नोटांचे आयुष्य संपले

आरबीआय पुढे जाऊन हेही स्पष्ट करते की दोन हजार रुपयांच्या  नोटांचे आयुष्य हे फक्त चार ते पाच वर्षांचे होते आरबीआयने 89 टक्के नोटा वितरित केल्या होत्या. गुलाबी नोटाचे आयुष्य संपल्यामुळे त्या वितरण व्यवस्थेमध्ये जास्त दिवस ठेवता येणार नाही.त्यामुळे गुलाबी नोट वितरण व्यवस्थेतून  काढून घेण्यात आली आहे . 

3. चलनामध्ये गुलाबी नोटांची संख्या कमी झाली.. 

वितरण व्यवस्थेतील वितरणानुसार दोन हजार रुपयांच्या नोटा ज्या पद्धतीने वितरित केल्या होत्या त्या प्रमाणात त्या चलनामध्ये राहिल्या नव्हत्या याचा अर्थ त्याचा कुठेतरी साठा केला गेला असावा 31 मार्च 2018 रोजी 6.73 लाख करोड रुपयाच्या नोटा वितरीत केल्या होत्या एकूण नोटांच्या तुलनेत त्याची हिस्सेदारी 37.3% होती वितरित हिसेधारीनुसार प्रत्यक्ष त्याचा व्यवहारातील उपयोग खूपच कमी झाला होता तो फक्त 10.8 % राहिला होता.

4. गुलाबी नोटांचा उद्देश पूर्ण झाला

नोटबंदी नंतर ज्या उद्देशासाठी गुलाबी नोटा छापण्यात आल्या होत्या अर्थात दोन हजार रुपयाची नोट तो उद्देश पूर्ण झाला . पाचशे रुपये आणि 1000 रुपयाच्या नोटा यांच्या वितरण व्यवस्थेतील नोटबंदीमुळे जनतेला जो नाहक त्रास होणार होता . तो त्रास दूर करण्यासाठी आरबीआय ने 2000 च्या नोटा छापून वितरित केल्या होत्या. त्यामुळे भारतातील आर्थिक तूट निर्माण झाली नाही नोटबंदी यशस्वी झाली.

5. दोन हजार रुपयाची नोट चलनात कमी झाली

आज पाचशे रुपयांच्या आणि इतर नोटांचा मुबलक प्रमाणात असणारा उपयोग हा योग्य पद्धतीने होतो आहे . दोन हजार रुपयांच्या नोटा चलनामध्ये कमी जरी असल्या तरी त्याचा परिणाम हा कुठेही दिसून येत नाही. त्यामुळे इथून पुढे दोन हजार रुपये नोटांची गुलाबी नोटांची गरज नाही असे या ठिकाणी आरबीआय स्पष्ट करते.

आरबीआय ने दिलेल्या स्पष्टीकरणातून सत्यता जरी समोर येत असली तरीही, गुलाबी नोटा वाल्यांचे धाबे दणाणले आहेत. बँकेच्या वर्किंग डे मध्ये पुन्हा आपल्याला एकदा नोटबंदीचे चित्र पाहायला मिळेल . बँकेच्या दारासमोर रांगाची रांगा लागलेल्या दिसतील . ह्या रांगा नोटबंदी इतक्या नसतील. हे तितकेच खरे . ह्या नोटा सुद्धा सामान्य लोकांकडूनच बदलून घेतले जातील . कोणतेही  धनिक लोक बँकेच्या दारात दिसणार नाहीत . गुलाबी नोट वितरणातून काढून घेतल्यानंतर गुलाबी नोटांचा साठा कमी होईल . असे असले तरीही, त्या रिकाम्या झालेल्या जागेची जागा पुन्हा दुसऱ्या नोट घेतील ही मानसिकता कधी बदलेल कोणीही सांगू शकत नाही.

#📝Dongardive Rahul.