निगमानंद माऊली : दि अनटोल्ड स्टोरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
निगमानंद माऊली : दि अनटोल्ड स्टोरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०२१

तुम्ही संत मायबाप !!!

                                    तुम्ही संत मायबाप

     

   " यह तन विष की बेलरी, गुरु अमृत की खान |

           शिष दियो जो गुरु मिले, तो भी सस्ता जान |"

भारतीय संस्कृती वारसा आणि गुरु-शिष्य परंपरा  लक्षणीय आहे. जागतिक स्तरावरील अध्यात्मिक ठसा हा जगा वेगळा. एखाद्या शिष्याला अस्सल ज्ञान मिळवायचे असेल , तर त्यासाठी त्याला एका उत्तम गुरुची आवश्यकता आहे. गुरू-शिष्य संबंध संबंधी अनेक व्यथा आपण ऐकलेल्या आहेत, आणि वाचलेल्या सुद्धा आहेत. योग्य गुरु मिळाला नाही तर त्या शिष्याचे जीवन शुद्ध ज्ञानाने परिपूर्ण होणार नाही. ज्ञानाची भूक त्याची कधी पूर्ण होऊ शकत नाही. कारण, पंचेंद्रिया वर काबू मिळवण्यासाठी एक सच्चा गुरु असावा लागतो. विषाने भरलेले हे पूर्ण शरीर शुद्ध करायचे झाल्यास त्यासाठी अमृतासमान गुरु असायला हवा आणि असा चांगला जर गुरू मिळत असेल तर त्यासाठी आपले सर कलम करावे लागले तरीही चालेल. अशी उपासना करणारा शिष्य ही असावा लागतो.  गुरू-शिष्याची पवित्र संवेदना आणि अवलंबिता सच्चा गुरू शिष्या संबंधी प्रेरित करत असते. असाच अमृताचा कलश ब्रह्मलीन स्वामी निगमानंद महाराजांच्या स्वरूपामध्ये मच्छिंद्रनाथ गडावर अवतरले आणि परिसरातील अज्ञानाला दूर करण्यासाठी साक्षी ठरले. 

ब्रह्मलीन स्वामी निगमानंद महाराज यांनी परिसरांमध्ये ही शिष्यपरंपरा हयात असतांना आयुष्यभर राबवली न्याय हा न्याय असला पाहिजे, कोणावरही अन्याय नाही झाला पाहिजे, त्याचबरोबर सर्वांचा उद्धार कसा करता येईल? साक्षात प्रयत्न  संवादातून त्यांनी सिद्धही केले. "संघर्षाशिवाय जीवन नाही, जीवनात हा संघर्ष असलाच पाहिजे, तरच आपण जिवंत आहोत हे त्याचे लक्षण" ही त्यांची वाणी सर्वांना प्रेरित करत असते. समाज प्रवाहाच्या विरोधात जाऊन काम करायचे असल्यास, मग ते आध्यात्मिक असो किंबहुना समाज उद्धाराचे असो हे कठीणच -

            " असाध्य ते साध्य करि सायास, 

               कारण अभ्यास, तुका म्हणे |"

ही तुकाराम महाराजांची शिकवण बाबांनी स्वतःमध्ये अंगीकारली होती. म्हणूनच त्यांनी समाज उद्धाराचे कार्य अविरतपणे सुरू ठेवले. आज त्यांच्या पश्चात हजारो भक्तगण त्यांच्या वाणीतून निघालेल्या शब्दांना प्रमाण मानत आहेत. शब्दरत्न प्रमाणे माणसातील रत्न आणि त्याची जाण बाबांनी करून घेतली. त्याचे बीजारोपण आशी केले की, त्यातून निघणारा अर्थ हा समाजाचे भान ठेवणारा निघावा व तो या समाजाचा सुधारक ठरावा.  बाबांची दूरदृष्टीता आपणास आज पाहावयास मिळत आहे. त्यांच्या जाण्याने परिसरावर शोककळा पसरली होती, तरी तो परिसर आज अजरामर झालेल्या त्यांच्या वाणीतून ओथंबून वाहतांना दिसत आहे. निगमानंद बाबाची आपल्यात आज नसले तरी त्यांच्या  कीर्तीरूपाने प्रत्येकाच्या हृदयात वसलेली आहेत परंतु बाबांची मूर्ती गावोगावी बसविण्याचे काम सुद्धा सुरू आहे प्रथम मूर्ती प्राणप्रतिष्ठा गावकऱ्यांच्या वतीने बसविण्याचे काम नांदेवाली या गावापासून सुरू होते.

शिरूर तालुक्यातील नांदेवाली येथे बाबांचा जन्म झाला. नांदेवाली च्या भूमीत अध्यात्मातील रत्न  जन्मावा आणि त्या भूमीचा त्याचबरोबर परिसराचा नगर जिल्ह्याचा अध्यात्मातील मानबिंदू ठरावा ही नांदेवाली करांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणून त्यांच्या कार्याची उत्तरदायित्व सिद्ध करण्यासाठी मनातील उत्कंठा आणि भाविक भक्ती यांचा संयोग म्हणून बाबा हयात असताना जन्मभूमीत अगोदर मंदिर उभारून आज दिनांक 27 ऑक्टोबर 20 21 रोजी बाबांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होत आहे बाबांवर असणारे भक्तीचे स्वरूप व अस्मिता गावकऱ्यांच्या हृदयामध्ये स्पंदना प्रमाणे धडपडते आहे. 

     "ऐसी वाणी बोलिये मन का आप  खोये |

      औरन को शीतल करे,आपहुं शीतल होए |"

बाबांच्या जीवनातील सगळ्यात मोठी उपलब्धी कोणती असेल ? असा जर प्रश्न पडला तर, त्याचे उत्तर सहाजिकच आहे.बाबांचे बोल, बाबांची संवाद क्षमता एवढी जबरदस्त होती की, ऐकणार्‍यांना ते  सारखे ऐकावे वाटत असे. कोणाचा द्वेष नाही, ना मत्सर ! सर्वांप्रती असणारी आदरयुक्त भावना आणि प्रेम ही बाबांची विशेषता. गडावर येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्तांची विचारपूस करणे, त्यांच्याशी आत्मीयतेने संवाद साधणे व त्यांच्या समस्या जाणून घेणे. त्या ऊपर मार्गदर्शन करणे. ही बाबांची खासियत , "जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले" हे बाबांच्या नसानसात सारखे खेळायचे. बाबांचे ते शब्द प्रत्येक भक्तगणांना आपलेसे वाटायचे. त्यातून त्यांच्या समस्या तर कुठे दूर व्हायच्या आणि भक्तिमार्ग मध्ये ते नाहुन निघायचे. कळत सुद्धा नव्हते. प्रत्येक भक्ताला बाबा म्हणजे संत मायबाप वाटायचे. कारण, आईप्रमाणे दया आणि बाबांनी प्रमाणे पालकत्व स्वीकारण्याची जबाबदारी बाबा स्वतः कधी घेत असत हे समोरच्याला कळत पण नव्हते. त्यांची वाणी एवढी मधुर होती की, ती प्रत्येकाला आपल्या दुःखातून मुक्त झाल्यासारखे वाटायचे. सन्मार्गाने जीवन जगण्यासाठीचा मार्ग लोकांना आवडू लागायचा. भक्तांच्या बाबतीत हे जरी खरे असलेही. परंतु ,माझा भक्त अडचणींवर मात करतोय त्याच्या समस्यांची उकल होते, भक्ताचे समाधान जेव्हा भक्तांच्या चेहऱ्यावर दिसायचे , तेव्हा बाबा मात्र सद्गदित होत असायचे. ती शीतलता व प्रसन्नता प्रत्येकाच्या आठवणीत आजही आहे. 

निस्सीम भक्ती आणि अर्थपूर्ण श्रद्धा असल्यावर परमेश्वराचे साक्षात रूप या नयनी उतरल्याशिवाय राहत नाही, ही परम श्रद्धा होय. निगमानंद महाराजांनी आपल्या हयातीमध्ये दीनदुबळ्यांची सेवा, अध्यात्म त्याचबरोबर शैक्षणिक गरज लक्षात घेता, या तीनही क्षेत्रावर काम केले. एवढेच नाही तर त्यासाठी पावले देखील उचलली. याचे प्रत्यक्ष उदाहरण अथवा अनुभव घ्यायचा असेल, मच्छिंद्र गड निमगाव आपले स्वागत करत आहे. प्रत्येक भक्तांना या गडाला भेट द्यावी असे नंदनवन बाबांनी साक्षात उभे केले आहे. बाबा आपल्यात आज नाहीयेत परंतु, त्यांचे कार्य, विचार, श्रद्धा आजही लोकांच्या ओठावरती आणि हृदय यावरती कोरली गेली आहे. नांदेवाली या त्यांच्या जन्मभूमी मध्ये बाबांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होत आआहे. वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार अगदी अंतर्मनातून बाबांनी केला. अशा महान विभूतींच्या चरणी नतमस्तक व्हावे, यापेक्षा दुसरे परमभाग्य कोणते असु शकत नाही. 

      " बुरा जो देखन मै चला बुरा न मिलिया कोय |

        जो मन देखा अपना, मुझसे बुरा न कोय |"


📝📝

WRITER : RAHUL R DONGARDIVE