नकारात्मक दृष्टीकोनातून जगलेले जीवन म्हणजे ,नुसते एक दिवास्वप्नच ! वास्तविक त्याने विचार केला असता ,किंवा मी विचार केला असता, अशा भ्रामक कल्पनेत न रमता ,सकारात्मक दृष्टिकोनातून जगले गेलेले जीवन .एक सार्थ पर्याय ठरू शकते. मानवी मनाच्या उत्कट भावना ही तितक्याच सहज असतात.जितक्या समुद्रातील प्रचंड लाटा! या महाकाय रूप धारण करतात आणि शेवटी मात्र किनाऱ्यावरती,शांत होतात.तसेच मानवी जीवनामध्ये सुद्धा अनंत समुद्र रुपी लाटा संकट म्हणून येतात .त्या दिसायला कितीही गंभीर असले तरी, त्या क्षणार्धात संपणार हे वास्तव नाकारून चालणार नाही.
वास्तव आणि वस्तुस्थिती यात भेद करणे जितके अवघड, तितकेच माणसाच्या आयुष्यातील समाधान शोधणे! देवाचे महात्म्य समजवण्यासाठी दुधाचे उदाहरण दिले जाते आणि यातून श्रद्धा आणि परम श्रद्धा याचा अर्थ बोध केला जातो. परंतु , जोपर्यंत आपला दृष्टिकोन बदलत नाही तोपर्यंत आपली दृष्टी बदलणार नाही ही वास्तवता नाकारून चालणार नाही .त्यानुरूप पावले उचलली नाही तर वस्तुस्थितीही कळणार नाही.
WRITER #RAHUL DONGARDIVE