अध्यात्मातील शिरोमणी निगमानंद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अध्यात्मातील शिरोमणी निगमानंद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १० ऑक्टोबर, २०२१

अध्यात्मातील शिरोमणी निगमानंद

 अध्यात्मातील शिरोमणी निगमानंद!!! 

 

Nigmanand Maharaj

प्राचीन काळापासून मनाची स्थिरता, अस्थिर होते . अस्थिर झालेल्या मनाला किंबहुना बेलगाम मनाला संतुलित करण्यासाठी औषधांची गरज न

लागता त्या मनाला शांत, संयमी, मजबूत निर्णय क्षमता, कार्यक्षम करण्यासाठीचा एकमेव मार्ग म्हणजे अध्यात्म होय. मानवी देहाला कोणतीच  वनौषधी किंवा आता चे विज्ञान दुरुस्त करू शकत नाही, तेव्हा मात्र अध्यात्म आणि त्या आध्यात्माची अचूक हातोटी वापरून बाधित झालेल्या मनाला योग्य मार्गाने ज्ञान देण्याचे कार्य वैकुंठवासी ह भ प निगमानंद महाराज यांनी केले होते. अध्यात्मिक अभ्यासातून भविष्याचा वेध घेत. वेद, उपनिषदे, शास्त्र, त्याहून पुढे जाऊन योगसाधने द्वारे समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे काम, समाजातील रूढ, प्रथा योग्य की अयोग्य याची कारणमीमांसा करून योग्य पथ् दाखवण्याचे कार्य महाराजांनी केले. 

तिथीप्रमाणे आज वैकुंठवासी स्वामी निगमानंद महाराज  यांचे द्वितीय पुण्यस्मरण आहे. 4 ऑक्टोबर 2019 रोजी अध्यात्मातील शिरोमणी आपल्यातून निखळला. शिरूर तालुक्यातील नव्हे, महाराष्ट्र या थोर महात्म्याला पोरका झाला.  बाबांचे कार्य हीच त्यांची आगळीवेगळी ओळख आहे. मायंबाचे मच्छिंद्रनाथ वास्तव स्वीकारून प्रत्यक्षात अवलंब करणे हे अग्निदिव्य होते. या अग्निदिव्यातून बाबांनी सरळ मार्ग काढत समाज उद्धाराचा व त्या भरकटलेल्या समाजाला योग्य दिशा देण्याचा मार्ग स्वीकारला. मार्ग स्वीकारणे सोपे होते. परंतु, त्या मार्गावर अगणित असणारे काटे व त्याचे चावे फक्त बाबांनी जाणले. त्यांच्या मनाला व त्यांच्या देहाला समाजातील क्रूर वृत्तीचा खूप मोठा आघात होत होता. बाबांच्या आठवणी सांगत असतांना, बाबा स्वतःहून सांगायचे, "या समाजाला सुधारणे पाहिजे तेवढे सोपे नाही. अध्यात्माची गोडी लावणेही तेवढे सोपे नव्हते." परंतु बाबाची अध्यात्मातील गोडी, वारकरी संप्रदाय, संतांचे आशीर्वाद आणि बाबांची प्रबळ इच्छाशक्ती पुढे त्या क्रूर प्रथा टिकल्या नाहीत. बाबांनी  शेवटी त्या क्रूर प्रथा मोडून काढल्या. कबीरांच्या एकतारी भजन यापासून ते आजच्या टाळ-मृदंगाच्या घोषाने परिसर दुमदुमून जात आहे. ही दाहक वास्तवता पाहिजे तेवढी सोपी नव्हती. बाबांनी त्यासाठी जिवाचे रान केले. मन परिवर्तनासाठी समाजाला अध्यात्म पटवून दिले. तुमचा उद्धार करत आहे,ते अध्यात्मच आहे. शुद्ध अंतकरणाने श्रद्धा ठेवली तर, आपली स्वप्ने साकार करता येतात, त्याची परिस्थिती सर्व परिसराला आहे. 

बाबांनी अध्यात्मा बरोबर सामाजिक प्रश्नांना सुद्धा वाचा फोडली. अध्यात्माची गोडी ही संसारीक जीवन सुखरूप व जगण्यासाठी योग्य आहे. परंतु ती गोडी अविरतपणे टिकवून ठेवायची असेल तर, त्यासाठी संसाराचे अर्थ बळकट करावे लागेल, ते अर्थ बळकट करण्यासाठी शेती व्यवसाय टिकवावा लागेल. सिंदफणा खळखळून वाहते, ते पाणी बाबांना खुणावत होते. म्हणून परिसरातील सर्व लोकांना विहीर खोदण्याचे आव्हान केले. परिसरातील लोकांना ते पटले. प्रत्येकाने आपापल्या शेतामध्ये विहिरी खोदल्या. काळानुरूप बदल करत बोर घेतले. निसर्गावर आधारित वाचणारी शेती कृत्रिम पाण्याच्या स्रोतावर उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांसाठी फलदायी आहे. शेतकऱ्यांनीसुद्धा ओळखले आणि बाबांचे स्वप्न साक्षात उतरु लागले. यातून बाबांचा भविष्यातील द्रष्टेपणा व समाजाची आर्थिक परिस्थिती कशी भक्कम करावी, हे त्यांचे उदारमतवादी विचार मनाला हेलावून सोडतात. सिंचन क्षेत्रासाठी बाबांनी दिलेला नारळ कधीही फेल गेले नाही. अंधश्रद्धेचा भाग नाही, पूर्णपणे श्रद्धा असल्यावर हवी कार्य फळास येतात याची अनुभूती सर्व भक्त गणाला आहे. परिस्थितीनुरूप बदल करणे, हे प्रत्येक माणसाचे निसर्गतः बदलणारे चक्र आहे.  परिस्थितीनुरूप बदल करून स्वतः  अंगीकार करणे आणि समाजामध्ये तो रुजवणे हे सामान्य माणसाचे काम नाही त्यासाठी एका युगंधराचा जन्म होणे अपेक्षित होते आणि तेही संताच्या स्वरूपात ! स्वामी निगमानंद जन्मास आले!!!. समाजात परिवर्तन केले. सर्वोच्च शिखर गाठण्यासाठी अहोरात्र झटले, नको त्या वाईट प्रसंगाला तोंड दिले. परंतू, जिद्द सोडली नाही. वारकरी संप्रदायाची पताका अविरतपणे फडकवण्यासाठी सदोदित झटत राहिले. 

एका ओसाड माळरानावर  नंदनवन फुलवणारे महामेरू आपल्यातून आज निघून गेले आहेत. आज त्यांचे द्वितीय पुण्यस्मरण सोहळा श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड निमगाव मायंबा येथे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. कोविड नाईन्टीन परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नियमांचे पालन केले जात आहे. वैकुंठवासी निगमानंद महाराजांची वारकरी संप्रदायाची पताका अविरतपणे तेवत ठेवण्यासाठी गडाचे मठाधिपती श्री ह भ प स्वामी जनार्दन महाराज गुरु निगमानंद महाराज हे बाबांनी दिलेल्या अध्यात्माचा वसा पुढे घेऊन जात आहेत. अध्यात्मातून केलेले परिसरातील परिवर्तन हे कायमस्वरूपी असते.  वै. ह भ प स्वामी निगमानंद महाराज यांनी सिद्ध केले होते. तोच वारसा आज पुढे कायम ठेवत आहे. अशा असणार्‍या आधुनिक युगातील थोर महात्मे यास द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन! 

Writer : 

डोंगरदिवे राहुल रामकिसन 

श्री निगमानंद विद्यालय  निमगाव (मा)

तालुका शिरूर जिल्हा बीड, 

महाराष्ट्र