प्राचीन कालखंडापासून ते आजतागायत पर्यंत जगाच्या पाठीवर , अनेक थोर वीरपुरुष , राजे-महाराजे, सम्राट होऊन गेले . प्रत्येकाने आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले . कोणी आपल्या सार्वभौमत्वाला तडा जाऊ नये म्हणून कसोशीने प्रयत्न केले . प्रयत्न करत असताना , युद्ध - महायुद्ध ही झाले . युद्धांमध्ये याच् पृथ्वीवरील हजारो सैनिकांच्या जीवांचा नायनाट सुद्धा झाला . तत्कालीन राजेशाही, राजघराने नष्ट झाली . नवीन राजे- महाराजेे, सम्राट , उदयास आले. अशी इतिहासाची पुनरावृत्ती सदैव होत गेली . साम्राज्यवाद , भांडवलशाही ,श्रमिक अशी व्यवस्था निर्माण झाली . यातूनच पुढे ,'आहे रे ' व 'नाही रे ' अशीही ' वर्ग् ' निर्माण झाले . या सत्ता संघर्षातून जगभर साम्राज्यवादाची वारे वाहू लागले . पाश्चिमात्य देश आपला भूखंड वाढवण्यासाठी जगभर सैरावैरा भ्रमंती करू लागले . भ्रमंतीतून अनेक नवीन भूखंडांचा आणि देशाचा शोधही लागला. या शोधातून साम्राज्यवादाची मुहूर्तमेढ रोवली गेली.हे सर्वश्रुत आहे.
अशा या सत्ता संघर्ष आणि स्पर्धेच्या काळात गुलामीची प्रथाही आली. युरोपीय देश सर्व जगावर सत्ता प्रस्थापित करण्याचा अधिकार - हा आमचा आहे , असा दावा करू लागले . युरोपमधील काही राज्य , देश -आमचा वंश , धर्म , विचारसरणी , श्रेष्ठ कशी आहे ? हे दाखवण्यासाठी आगेकूच करू लागले . येथे संघर्ष पेटला . युरोपियन राष्ट्र आपापल्या वसाहती स्थापन करण्यासाठी राष्ट्र राष्ट्रात भांडू लागले . युरोपीय भूमी कमी पडू लागली. म्हणून, ज्या ठिकाणी दिसेल , त्या ठिकाणी व्यापारी तत्त्वाचा वापर करून , आपल्या वसाहती स्थापन करू लागले . यातूनच स्वामित्वाची भूमिका उदयास आली . या स्वामित्वा तून श्रेष्ठ कोण ? हा प्रश्न उदयास आला आणि त्याचे उत्तरही त्यांनाच मिळाले तो म्हणजे 'मी! '
अशा प्रकारची व्यवस्था जगभर असताना , पूर्वेकडील राष्ट्र सुद्धा काही कमी नव्हते . या ठिकाणी सुद्धा सत्तासंघर्ष चालू होता .परंतु , हा सत्ता संघर्ष हा ज्या- त्या देशापुरता मर्यादित होता. पश्चिमेकडील राष्ट्र हे आपल्या साम्राज्य बरोबर धर्माचाही विस्तार करत होते . पौर्वात्य राष्ट्र मात्र धर्मापेक्षा धर्मातील असणाऱ्या जातीनुसार व्यवहार करत होते . खास करून भारताचा जर विचार केला, तर धर्म श्रेष्ठ होता. 'काळे' आणि 'गोरे' या वर्णव्यवस्था पेक्षा येथील वर्ग व्यवस्था खूप भयंकर होती . ती अवर्णनीय आहे .असे म्हटल्यास, वावगे ठरू नये . त्यातच 'मी' हा खच्चून भरलेला होता . पाशिमात्य राष्ट्रांनी पौर्वात्य राष्ट्रांचा मानबिंदू ओळखला . "फोडा आणि राज्य करा '' या तत्त्वाचा अवलंब करत पूर्ण अखंड भारतावर साम्राज्य प्रस्थापित केले . सर्वोच्च् वसाहती स्थापन करण्यात इंग्लंड अग्रेसर ठरला . दीडशे वर्षे अधिकृत राज्य केले किंबहुना अडीचशे वर्षे राज्य केले यालाही कारणीभूत ठरला , तो म्हणजे ' मी '.
एवढा ऐतिहासिक प्रपंच मांडण्या पाठीमागच कारण एवढंच माणसाच्या नसानसामध्ये 'मी' हा ठासून भरलेला आहे. त्या 'मी' साठी आजही अनेक प्रपंच राजघराणे नेस्तनाबूत होताना पाहत आहोत . यां 'मी' ला जर आपण थोडसं बाजूला ठेवलं तर कोणाचीही हानी होणार नाही.
अहम - ईर्षा माणसाकडे असतात, परंतु स्वकर्तृत्वातून मिळालेले 'यश ', आगळा वेगळा आनंद देणार असत. त्यातील असणारा स्वाभिमान -अभिमान हा गौरवास्पद असतो . पण एकमेकांची जिरवण्यासाठी निर्माण झालेला ' मी ' कधी ? कशी ? केव्हा ? कोणाची ? किंवा स्वतः च स्वतःची वाट लावतो, हे कळतही नाही ! तरीही गुर्मी उतरत नाही ! याला एकच कारण आहे , ते म्हणजे 'मी'!
या भयंकर 'मी' ला बाजूला ठेवून स्वतःतील 'आम्ही ', 'आपण' या पद्धतीने आत्मसन्मान , स्वाभिमान जागृत केल्यास, मिळणाऱ्या परमोच्च आनंदाचा , रसास्वाद हा निश्चितच अलौकिक असेल यात शंका नाही .
WRITER # DONGARDIVE RAHUL