प्राचीन कालापासून मध्य युग ते आज पर्यंत राजेशाही, सम्राट, भांडवलशाही, साम्राज्यवाद आणि साम्राज्यविस्तार प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष स्वरूपाने, घडत असताना आपण पाहत आहोत. यातून यातून निर्माण होत असणारा सत्तासंघर्ष , प्रत्यक्षात राबवता न आल्यामुळे, निर्माण झालेले शीतयुद्ध आज सर्व जगास परिचित आहे. परंतु आजही एखाद्या भू-भागाविषयी असणारी लालसा लपून राहत नाही. हे वास्तव सत्य कोणीही नाकारू शकत नाही. त्याची परिणती अशी झाली, प्रत्येक जण आपला भूभाग वाचवणे आणि त्याचे जतन करण्यासाठी नवनवीन क्षेत्रांचा शोध लावणे हे सर्वच राष्ट्राची लक्ष ठरले. आज प्रत्येक राष्ट्र नवनवीन शोध आणि त्याचा उपयोग कसा करता येईल, मग तो भौतिक सुखासाठी असेल किंवा राष्ट्रीय संरक्षणासाठी कोणीही मागे पुढे पाहत नाही. आज जगात दृष्टिकोन आणि नियम एवढी शिल्लक आहे प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होतांना कोठेही दिसत नाही. हे कटू सत्य. लपवून ठेवता येणार नाही.
भविष्यातील हा सत्ता संघर्ष विकोपाला जाईल याची कल्पना, दुसऱ्या महायुद्धातील अनुभव किती संहारक आहे. तत्कालीन राजकीय नेत्यांना, त्याचबरोबर तत्वज्ञाना होती. म्हणूनच संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना करण्यात आली. 1918 नंतर जे संयुक्त राष्ट्र संघाचे काम होते,त्यापेक्षा अधिक प्रभावी काम करण्यासाठी नवीन राष्ट्रसंघाची नियुक्ती करण्यात आली. आंतरराष्ट्रीय न्यायालय सुद्धा स्थापन करण्यात आले. जगातील सर्व राष्ट्रांनी झालेल्या अन्यायाच्या बाबतीत या न्यायालयात धाव घेता आली, आणि याला पाठिंबा देण्याचे काम 5 अस्थाई सदस्य असलेल्या राष्ट्रांनी करावे. पुढे हेच संयुक्त राष्ट्रसंघ आपल्या हातात कसे येईल. शीत युद्ध सदस्य राष्ट्र मध्ये आहे, हे लपून राहत नाही. भविष्यातील संहार प्रवृत्तीची आता त्यांना जाण होती. म्हणून एक काळ, "युद्ध नको, बुद्ध हवा" हा संदेश सुद्धा जगभर पसरला. प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणी व कार्यकुशलता याचा अभाव दिसून येतो.सत्तासंघर्ष हा घरचा असो,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय असो ,त्यामध्ये नीती व कूटनीति खच्चून भरलेली असते. अणुबॉम्ब किती संहारक आहे. हे जगाने ओळखले, म्हणूनच युद्ध नकोच. अशी भूमिका सर्व जगाची झाली.
व्यासपीठावरील भाषण देणारा स्वतः वक्ता त्या बोलण्याचे किती अनुसरण करतो. हा एक अनुत्तरित प्रश्न ? तरीही जनता त्यावरच विश्वास ठेवते,ही त्यांची श्रद्धा समजावी की अंधश्रद्धा ? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अगदी याच पद्धतीने संयुक्त राष्ट्राची अवस्था पाहताना आपल्याला दुःख होते. एवढ्या मोठ्या शक्तीपुढे सामान्य माणसांनी बोलावे तरी काय ? सामान्य माणसाचा ऐकणार कोण ? याची अनुभूती प्रत्येक जगातील राष्ट्राला येते आहे. संयुक्त राष्ट्राचे अपयश म्हणावे की दुर्दैव ! अनु बॉम चा पुनर्वापर होऊ नये म्हणून प्रगत राष्ट्रांनी इतर संहारक शास्त्रांचा शोध लावण्यास सुरुवात केली. संहारक शस्त्रांपैकी 'जैविक' आणि 'विषाणू' यांचा वापर करून नवीन शस्त्रे निर्माण केली आहेत. अगोदर अॅथरॅक्स सारखा जिवाणू जगात येऊन प्रचंड खळबळ उडाली होती. 90 च्या दशकातील ही बाब. आज पूर्ण जगाला एकाच चक्रव्यूह मध्ये अडकून टाकलं , प्रगत राष्ट्र, अप्रगत राष्ट्रांना, सर्वांनाच वेठीस धरून ठेवलं. जगामध्ये मृत्यूचा हाहाकार माजवला. एवढंच काय अख्ख जग थांबलं ! पण..काळ कोणासाठी थांबत नाही. अशा प्रकारचा एक विलक्षण विषाणू, जगामध्ये थैमान माजवत आहे. तो म्हणजे कोरोना- COVID -19 !!!
चीनमधील वुहान या शहरांमध्ये covid-19 चा पहिला रुग्ण आढळला. वुहान शहरामध्ये या रोगाने भयानक स्वरूप धारण केले. लोकांचाा बळी घेतला. एका डॉक्टर कडून या रोगाची माहितीी मिळाली. रोग वाऱ्या सारखा पसरला. पश्चिम राष्ट्रात तर या रोगाने भयानक स्वरूप धारण केले. इटली या देशांमध्ये देशांमध्येे हजारो लोकांचे बळी गेलेे .अमेरिका रशिया या देशात सुद्धा या रोगांनी थैमान माजवले. विकसित राष्ट्रांच्या मेडिकल सुविधाा एवढ्या जबरदस्त असताना सुद्धा या राष्ट्रांना कोरोना पुढे हात टेकले. covid-19 चा प्रसार एवढा जबरदस्तत होता की, सर्व जग या रोगाने व्यापून टाकले. प्रत्येक देशांच्या बातम्यांमधूूूूूून चर्चा आणि विमर्श यामधून हा रोग किती भयंकर आहे याची जाणीव सर्व जगाला कळली.
चंद्रावर जाणारा माणूस आज मंगळावरची राहण्यासाठी जमीन शोधतो आहे. अभ्यास करत आहे. पण अचानक आलेल्या covid-19 मुळे या जगातील शास्त्रज्ञ किंबहुना विचारवंत सुद्धा ठप्प झाली. काय करावे ? आणि कोणते उपचार करावे? याविषयी सर्व अनभिज्ञ ! शेवटी लक्षणावरून औषध उपचार करणे. असाच पायंडा पडत गेला. भारतामध्ये तर एड्सवर जे उपचार केले गेले,त्याचे रिझल्ट ही योग्य रीतीने मिळाले. जगातील प्रत्येक राष्ट्र या रोगाने व्यापून टाकल्यामुळे जगाची आर्थिक प्रगती मंदावली. अनेक कामगारांचे, उद्योगपतींचे दिवाळे निघाले. आज पर्यंत आपण पाहिले असेल, प्रत्येक जण पोटासाठी वणवण फिरत होता. वाटेल ती कामे करत होता. उच्चशिक्षित लोक सुद्धा या राष्ट्रातून त्या राष्ट्रात नोकरीसाठी जात होते. आपली गुणवत्ता सिद्ध करत होते . अनेक भौतिक सुविधा मिळवण्यासाठी वाटेल ते करत होते. पण या कोरोनाने, प्रत्येक व्यक्तीला भौतिक सुखापेक्षा जीव महत्त्वाचा, याची जाणीव झाली. जो तो जीव वाचविण्यासाठी सैरावैरा भटकू लागला. अनेक मजुरांचे रस्त्यावरती प्राण गेले, अनेक जणांनी माणुसकी दाखवली. अन्नदान कार्यक्रम राबवले,सेवाभावी संस्था पुढे सरसावल्या, सामाजिक कार्यकर्ते मदतीला धावून आले. अनेक नोकरदारांनी अन्नदानाचे कार्यक्रम सुरू केले. खेड्यापाड्यांमध्ये भाकरी गोळा करून शहरातील मजुरांना वाटप करण्यात आल्या. कुठेही अधिकृत नसणारे कॅम्प संस्था निर्माण झाल्या आणि अधिकृत असणाऱ्या संस्थांपेक्षा निर्माण झालेल्या माणुसकीच्या भावनेतून गोरगरीब मजूर यांना अन्नदान केले. हे कोणालाही लपवता येणार नाही. रोग भयंकर आहे पण माणुसकी श्रेष्ठ आहे हेच यातून सिद्ध होते.
माणूस हा समाजशील प्राणी आहे, तो एकमेकांशिवाय जगू शकत नाही आणि हाच माणूस एकमेकांना मारायला उठला आहे. विज्ञानाने केलेली प्रगती मानवी कल्याणासाठी तिचा वापर, हा दिवास्वप्न सारखा वाटू लागला. कारण विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्यातील भेद मात्र हा कायम दुरावा करणारा ठरला. होय "अनाकलनीय गोष्टींचा शोध म्हणजे, विज्ञान आणि त्या शोधाचा मानव कल्याणासाठी वापर करणे म्हणजे तंत्रज्ञान " मग या विज्ञानाचा वापर हा मानव कल्याणासाठी होता होता, मानवाच्या जीवावर उठला. मग याला तंत्रज्ञान म्हणावे काय? मी एक सामान्य माणूस जगातील शास्त्रज्ञांना आव्हान करतो,आपण या भविष्यातील येणाऱ्या नवीन पिढीचे मार्गदर्शक आहात. तुम्ही लावलेले शोध मानव कल्याण कारी आहेत. सत्य. पण त्याचा वापर कसा करावा हेही तुमच्या हातात. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, या शोधांचा वापर मानवी मूल्य आणि मानव यांच्यासाठी घातक होऊ नये याची काळजी घ्या!
जगामध्ये सत्तासंघर्ष होत होता,आजही आहे आणि शास्त्रज्ञ निर्माण होतील, सत्ताधीश बदलतील, शोध लागले आहेत आणखी नवीन शोध लागतील, पण त्या शोधाचा वापर जर मानवी कल्याणासाठी होत नसेल, तर त्या शोधाचा उपयोग काय? जगामध्ये अनेक महान शास्त्रज्ञांनी अनेक शोध लावले. नवनवीन शोधांमुळे मानवी जीवन कल्याणकारी होऊ लागले, अनेक रोगांना आपणच मुळासकट उखडून टाकले. आपण थोर आहात. आपल्या शोधांचा उपयोग मानवी कल्याणासाठी जर होत असेल, तर आपण आदरणीय आहात. देव नाही पण देवा पेक्षा कमी नाही आहात. पण हेच शोध जर मानवासाठी घातक ठरत असतील तर आपण राक्षस आहात! असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
जगभर आज निरपराध लोकांची बळी जाण्याची पद्धत, खरोखरच त्या गोष्टीतील राक्षसा सारखी वाटते. हजारो लोक बेघर होतांना दिसत आहेत. लाखो लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. या सर्वांची आपण काळजी घ्यायला हवी. हे मृत्युमुखी पडू नयेत. भारतासारख्या देशाने यावरून लस विकसित केली आणि जगातील प्रभावी लस म्हणून उदयास आली. आज भारत सत्तर-ऐंशी देशाला लस पुरवतो आहे. अभिमानाची गोष्ट आहे. हा रोग झाला नसता तर, लाखो लोकांचा बळी गेला नसता. बातम्यांमधून प्रसारित होणारी, हृदयाला पिळवटून टाकणारी, दाहक दृश्य सुन्न करतात. या सर्व एक होऊयात, आपल्या भूमीचा आपल्या राष्ट्राचा, आपल्या मातीचा, आपल्या तत्त्ववेत्त्यांच्या ,आदर्शांचा, मान राखूयात. पण त्या भावनेपोटी इतरांना कमी लेखू नका. जसे तुमचे आदर्श, तसेच सर्व जगातील राष्ट्रांमधील थोर पुरुषांची आदर्श असतात. आपल्याला आपले पण, जेवढे असते. तसेच प्रत्येकाला प्रत्येक राष्ट्रांमध्ये निर्माण झालेले, योद्धे ,युगपुरुष, महानायक, अध्यात्मिक गुरु, आदरणीयअसतात. पूजनीय असतात. तर चला मग आपण सर्वांचाच आदर करूया, हा आदर मानव कल्याण समोर ठेवून व्यक्त करूया.