भारतात नव्हे तर जगभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते .भारतातील दिन दुबळ्यांचा , वंचित घटकाचा , शोषित त्याचबरोबर अन्याय -अत्याचार यांना बळी पडलेल्या समाजाचा मूकनायक म्हणून डॉ.बाबासाहेबांची प्रतिभा जगाच्या मनपटलावर उमटली आहे. वास्तविक पाहता जगातील एकमेव असा समाज आहे , जो डॉक्टर बाबासाहेबांना आपला बाप समजतो. जन्मदात्या बापानंतर जीवनाला खरा अर्थ देणाऱ्या आणि वैयक्तिक उन्नती बरोबर सामाजिक उन्नतीचा समावेश करणारा मार्गदाता तो म्हणजे बाप ! समाजामध्ये अनेक मत मतांतर, प्रवाह वेगवेगळ्या पद्धतीने मांडले जातात . तेव्हा, सिद्धतेसाठी अनेक पुराव्यांचा संदर्भ दिला जातो. डॉ बाबासाहेब असं रसायन आहे जे की सामाजिक कोणत्याही समस्येवर खात्रीशीर इलाज करणारी अभिक्रिया करते कोणत्याही दुष्परिणामांशिवाय.
डॉक्टर बाबासाहेबांची विद्वत्ता पाहता सर्वजण त्यांना शरण येतात . त्यांच्या ज्ञानाच्या अथांग सागरासमोर कोणीही टिकाव करू शकत नाही ,ही वस्तुस्थिती . म्हणूनच त्यांची ओळख विश्वभूषण, बोधिसत्व ,महानायक, मूकनायक, भारतरत्न रतीय राज्यघटनेचे शिल्पकार अशी आहे.
14 एप्रिल 2023 या दिवशी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी कोणताही गाजावाजा न करता किंवा प्रसिद्धीच्या झोतात असणारी जाहिरात न करता भारतातील 125 फूट सर्वात उंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ब्राझ पुतळा हैदराबाद येथे उभा केला. घटनाकारांविषयी ही असणारी त्यांची निस्सिम भक्ती व ज्ञानाच्या अथांग सागराचा गौरवच होता त्यामध्ये कोणताही स्वार्थचा लवलेश दिसून येत नव्हता. बाबासाहेबांचे क्रांतिकारी विचार ही तर प्रेरणा आहेच लोकशाही लोकांसाठी असावी त्याचबरोबर औद्योगिक विकास होणे ही महत्त्वाचे आहे औद्योगिक विकासासाठी ध्येय धोरणे त्यांनी आखली होती कृषी क्षेत्रामध्ये सिंचनाला महत्त्व किती आहे यासाठी भाकरा नांगल सारखे सिंचन प्रकल्प त्यांनी राबवले त्यातून बाबासाहेब आधुनिक भारताचे जनकच . हेच विचार त्यांना जगभर नावलौकिक किंबहुना जगाला आदर्शवत आहेत.
अमेरिकेमध्ये याच वर्षी दुसरी एक महत्त्वाची घटना घडली. अमेरिकेच्या जर्सी या शहरांमध्ये सिटी कौन्सिल हॉल या ठिकाणी अमेरिकन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व भारतीय दूतावास यांच्या उपस्थितीमध्ये अमेरिकेच्या ध्वजाबरोबर अशोक चक्र असलेला बाबासाहेबांचा निळा झेंडा फडकवण्यात आला निळा झेंडा म्हणजे जातीयतेच्या विरोधातील आणि असमानताच्या विरोधातील ध्वज होय न्यू जर्सी या ठिकाणी 14 एप्रिल हा दिवस इक्वलिटी डे म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येणार आहे असे जाहीर करण्यात आले बाबासाहेबांना खरोखरच एक आगळी वेगळी मानवंदना होती.
डॉ बाबासाहेबांची जयंती म्हटलं की, सर्व तळागाळातील समाज मोठ्या आनंदाने यात सहभागी होतो बाबासाहेबांची जयंती ही सण म्हणूनही साजरी केली जाते. नवे कपडे, खायला गोड पदार्थ, एक आगळावेगळा सण साजरा केला जातो . आपणावर केलेला या मोठ्या परोपकाराने हा समाज बाबासाहेबांच्या चरणावरती नतमस्तक होतो . बाबासाहेबांचं नातं हे समाजाशी घट्ट आहे . त्यांना त्यामध्ये सूर्य चंद्र आहे तोपर्यंत दरार पडणार नाही ही वास्तविकता कोणीही नाकारू शकत नाही किंबहुना शंका उपस्थित करू शकत नाही हे वास्तव सत्य! तरीही हा समाज विखुरलेला आपण पाहतो आहोत. राजकीय पक्षांनी यामध्ये अनेक गट पाडले. तत्कालीन परिस्थिती मधील बाबासाहेबांचा समाज अन्यायाच्या विरोधात पेटून उठलेला होता . बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली हक्कासाठी भांडत होता . येवला परिषद, काळाराम मंदिर प्रवेश किंवा महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह असेल बाबासाहेबांनी दिलेले हे लढे सामाजिक हक्क आणि निसर्गतः निसर्गाने दिलेले हक्क यासाठीचा होता . हजारो वर्षापासून चालत आलेली गुलामी अर्थात मनुवादी विचारसरणी नेस्तनाबूत केली. दोन वर्ष 11 महिने 18 दिवस अहोरात्र प्रयत्न करून भारतातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ निर्मिती केली . ते म्हणजे भारतीय संविधान होय . सर्व समाजाला, सर्व धर्माला, सर्व पंथांना एकत्रित आणले. जगातील सर्वात मोठी लोकशाहीची देन बाबासाहेबांनी या भारताला दिली.
डॉक्टर आंबेडकर यांनी भारताला संविधान दिले . 73 वर्षापासून या संविधानानुसार भारताचा राज्यकारभार चालतो . जगातील सर्वोत्कृष्ट संविधान म्हणून भारतीय राज्यघटने कडे पाहिले जाते . बाबासाहेबांना अपेक्षित असणारी समाज रचना आणि भारतातील प्रत्येक नागरिकांची हक्क कर्तव्य आणि जबाबदारी त्यांनी संविधानाच्या माध्यमातून मांडले व सर्वच जनतेस स्वतःच्या धर्मपंथानुसार वागण्याचे आणि विचार मांडण्याचे स्वातंत्र्य दिले. ही बाबासाहेबांची आपल्या समाजाप्रती व भारताप्रती असणारे आदराची भावना आणि प्रगतशील भारत कसा असावा याविषयीची ध्येय धोरणे होती. परंतु समाजाविषयीची त्यांचे विचार वेगळे होते . तळागाळात खिचपत पडलेला समाज आदर्श जीवन कसा जगेल . यासाठी त्यांनी सर्व समान वागणूक असणारा धर्म या समाजाला दिला तो म्हणजे बौद्ध धम्म होय.
जर बौद्ध धर्म प्रमाणे आचरण समाजाने केले तर, त्यांच्याकडे पाहून उच्चवर्णीय सुद्धा कुतूहलाने तोंडात बोट घालतील.एवढी अपेक्षा त्यांनी ठेवली असावी धम्मानुसार पंचशीला प्रमाणे समाजातील सर्व लोक वर्तन करतील, बौद्ध धर्माचे सच्चे अनुयायी बनतील , शिक्षणाच्या माध्यमातून मोठमोठ्या पदावर विराजमान होतील ,जे मोठे होतील ते इतर आपल्या बांधवांना आधार देतील, आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करतील . एवढा विचार करत असताना असे विचार केलेला असेल की,
हे सर्व स्व प्रयत्नाने आणि स्वकष्टाने करतील . त्यामध्ये कोणाच्याही उपकार आणि उपकाराची सहानुभूती नसावी. केलेल्या कष्टाचा पूर्ण मोबदला मात्र असावा.
रायटर : - डोंगरदिवे राहुल