श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर स्वामी निगमानंद महाराज पुण्यतिथी सोहळा
महाराष्ट्रातील थोर संतांच्या संगतीत सहवास लाभलेले ब्रह्मभूती स्वामी निगमानंद महाराज यांचे 20 ऑक्टोबर 2023 रोजी चतुर्थ पुण्यस्मरण सोहळा मोठ्या थाटात संपन्न होत आहे . या सोहळ्याची सर्व नियोजन व आयोजन गडाचे मठाधिपती श्री स्वामी जनार्दन महाराज गुरु निगमानंद महाराज हे करत आहेत या पुण्यतिथी सोहळ्यास पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून आयोजित केलेल्या कीर्तन सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वामी जनार्दन महाराज यांनी केले आहे.
पुण्यतिथी सोहळा निमित्त ब्रह्मभूत गुरुवर्य स्वामी निगमानंद जी महाराज यांचे पुण्यस्मरण सर्व भक्तगणांना व्हावे म्हणून अश्विन शुद्ध पंचमी गुरुवार दिनांक 19 /10/ 2023 रोजी रात्री सहा ते आठ वाजता श्री ह भ प महंत संभाजी महाराज श्रीक्षेत्र तुकाराम महाराज संस्थान मादळमोही यांचे कीर्तन होईल. नंतर आठ ते नऊ वाजता समाधी अभिषेक होईल.
अश्विन शुद्ध षष्ठी शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी दहा ते बारा वाजता श्री ह भ प गुरुवर्य महंत भास्करगिरी महाराज श्रीक्षेत्र दत्त संस्थान देवगड यांचे अमृततुल्य कीर्तन होईल. त्यानंतर पंचक्रोशीतील सर्व गावकरी व सर्व भाविक भक्त यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.