गुरुवार, १९ मे, २०२२

वेदातील आनंद ब्रह्मलीन निगमानंद

           

                               ब्रह्मलीन निगमानंद महाराज यांची मूर्ती


        "दु:ख में सुमिरन सब करे सुख में करें न कोय |

             जो सुख में सुमिरन करे तो दुख काहे होए ||"

अध्यात्मातील ज्ञानाची गोडी निर्माण झाल्यानंतर भक्तीत तल्लीन होऊन नवीन  शोधाच्या मार्गाने मार्गक्रमण करत असताना, तहानभूक हरवून दुःखाचे कारण शोधत आत्मशक्ती जागृत होते. तिलाच आपण दैवी शक्ती असे म्हणतो. या दैवी शक्तीला प्राप्त करून घेण्यासाठी योग साधना अत्यंत महत्वाची असते. चित्त शुद्ध,  एकाग्र झाले. अर्थातच सर्व विकारी गोष्टीवर नियंत्रण होते. या गोष्टीची परिपूर्ण जान ब्रह्मलीन स्वामी निगमानंद महाराजांना होती. सदैव त्यांनी प्रभू नामाच्या चिंतनाची आस सोडली नाही. संकटसमयी भगवंताचा धावा तर सगळेच करतात. परंतु , सुखांमध्ये हि प्रभू नामाची आवड आणि निवड करता आली म्हणजे, त्याला कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. ही विशेष बाब भक्तजनांना बाबा सांगत असत. सर्व भक्तां प्रति बाबांची आशीर्वाद रुपी दया एक आगळेवेगळे विलक्षण देवत्व सिद्ध करते. प्रत्येकाची समस्या समजून  व त्यावर योग्य असा उपाय सुचवणे किंबहुना संकट मुक्ति चे मार्गदर्शन बाबा करत असायचे. जीवन प्रवास खूप खडतर होता. या संघर्षमय जीवनात आत्मशुद्धी साठी शिक्षणाची आस कधी सोडली नाही. शिक्षण हे शैक्षणिक अथवा अध्यात्मिक असो ते परिपूर्ण असले पाहिजे . त्याविषयी सखोल ज्ञान असणे ही त्या विद्यार्थ्याची तळमळ असली पाहिजे.


मायंबा च्या सेवेसाठी निघालेले सिताराम महाराज अर्थातच आजचे निगमानंद बाबा! ज्ञानासाठी प्रथमता आळंदी नंतर पंढरपूर.  आध्यात्मिक शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी - उच्चशिक्षणासाठी ऋषिकेश कडे बाबा वळू लागले. जिद्दीच्या जोरावर त्यांनी ऋषिकेश गाठले . बारा वर्षाच्या खडतर तपश्चर्येनंतर त्यांनी वेद, उपनिषदे यांचा सखोल अभ्यास केला. या अभ्यासातून त्यांचे गुरू बाबां वरती एवढे खुश झाले की, त्यांनी बाबांना "निगमानंद" ही पदवी दिली. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास वेदातील आनंद असा त्यांचा अर्थ होतो. एवढंच नाहीतर भगवद्गीतेवरील त्यांचे प्रभुत्व एवढे होते की, एका पाश्चात्त्य व्यक्तीला भारतीय अध्यात्माने वेड लावावे. भगवद्गीता इंग्रजीतून शिकण्यासाठी बाबांच्या गुरुंकडे त्यांनी अट्टाहास धरला. बाबांच्या गुरूंनी मात्र निगमानंद इंग्रजीतून भगवद्गीता शिकवतील असा आदेश बाबांना दिला. इंग्रजीचे कसलेही ज्ञान नसताना त्या परकीय नागरिकाकडून इंग्रजी शिकून भगवद्गीतेचे भाषांतर इंग्रजीमध्ये सांगावे, ही एवढीच सरळ आणि साधी गोष्ट नव्हती. नंतर बाबांचे इंग्रजीवरील प्रभुत्व परिसरातील सर्व नागरिकांनी अनुभवले. एवढेच नाही तर बाबांनी या अंधकार मय परिसरामध्ये ज्ञानरूपी वटवृक्ष लावण्याचे कामही केले. श्री निगमानंद विद्यालय निमगाव येथे 1986 च्या नंतर विद्यार्थ्यांना इंग्रजी सुद्धा शिकवली ही वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. हे वास्तव चित्र तत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी अनुभवणे, हे त्या विद्यार्थ्यांचे भाग्य!


हिमालयातील योग साधनेनंतर  शिक्षण पूर्ण करून बाबा आपल्या मायभूमीकडे परतले. प्रथम  त्यांचे आगमन सिंदफणा आणि किंवा नदीच्या संगमेश्वर मंदिरामध्ये झाले .  जटाधारी साधकाला भेटण्यासाठी सर्व परिसर उन्मळून पडला. गावातील प्रतिष्ठित आणि जुन्या लोकांनी बाबांची ओळख पटवली गेली." अरे हे तर आपले सिताराम बुवा!" बाबांचे आगमन हे त्या परिसरासाठी एक परिवर्तनशील स्थित्यंतर होते. एका भक्ताचे मायंबा वरती आगमन हे सर्वांसाठी आनंददायी आणि प्रेरणादायी होते.  बाबांच्या मनामध्ये चाललेली मनाची घुसमट मात्र थांबता थांबत नव्हती. मायंबा वरची पशुहत्या त्यांना सहन होत नव्हती. म्हणून त्यांनी या पशुहत्या वरती आपले अस्त्र उगारले. मायंबा वरची पशुहत्या ही सर्व परिसरातील लोकांना पचनी पडायला खूप वेळ लागला. परिसरातील बहुतांश विनाशकारी लोकांना पशुहत्या बंदी आवडली नाही .  बाबा मधील इच्छा शक्तीपुढे कोणतीही अघोरी शक्ती टिकू शकली नाही . शेवटी मात्र मायंबा वर पशुहत्या बंद केली आणि बाबांनी त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाच्या निवासस्थान म्हणून भीमसिंह महाराजांच्या हस्ते दत्त आणि मच्छिंद्रनाथ मंदिराची उभारणी केली. अध्यात्मिक शक्ती द्वारे बाबांनी कबीर पंथी एकतारी भजन याद्वारे निर्व्यसनी आणि माळकरी भक्तगण निर्माण केला. त्याकाळी ,"वाजेल टाळ तर पडेल काळ."  अशा अंधश्रद्धा विरोधी मोहिमा त्यांनी खंडित केल्या. बाबा प्रत्येक वाईट गोष्टींना विरोध करून चांगल्या सवयी समाजामध्ये रुजविण्याचा प्रयत्न करत होते. परंतु काही चांडाळ चौकटी करणारे लोक बाबांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष विरोध करत होते. कधी कधी बाबा एवढे हतबल होत असत की, त्यांना असे वाटे," परत आपण हिमालया मध्ये जावे. " गुरु असणारे वामनभाऊ महाराज त्यांना आठवत वामन भाऊ महाराज म्हणत ,"आपणास असे करून कसे चालेल, आपले आगमन या परिसर उद्धारासाठी झालेले आहे . त्यामुळे आपण परत जाऊ शकत नाही." तेव्हा मात्र बाबांमध्ये एक वेगळीच स्फूर्ती निर्माण व्हायची आणि बाबा पुन्हा नेटाने धार्मिक कार्याच्या कामाला लागत. शेवटी देवाचा अंश ना ते !कधीही थकले नाहीत. अविरतपणे भजनाच्या माध्यमातून एक- एक भक्त जोडत गेले. पुढे चालून  वारकरी संप्रदायाची पताका त्यांनी हाती घेतली पंढरपूर ,आळंदी आणि पैठण अशा दिंड्या सुद्धा जाऊ लागल्या. हजारो लाखो, वारकरी, वारकरी संप्रदायामध्ये जोडला गेला. पंढरपूर आळंदी आणि पैठण या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून , त्याठिकाणी मोठमोठे भक्तनिवास उभारले. या फक्त निवासामधून सर्व वारकरी संप्रदायाला धार्मिक ठिकाणी गेल्यानंतर आश्रय मिळाला ही बाबांची पुण्याई.


संत ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्यांसाठी अर्थात बहुजनांसाठी ज्ञानाची द्वारे ज्ञानेश्वरी द्वारे खुली  केली.  तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची निर्मिती झाली . संत तुकाराम महाराजांनी तर त्यामध्ये एक नावीन्य आणि नवचैतन्य निर्माण केले. जवळपास आपल्या 5000 अभंगांमध्ये सर्व जनतेला ज्ञानदान केले आणि तोच ज्ञानदानाचा मार्ग बाबांनी  आपल्या कार्यातून समर्थपणे पेलला. सर्व परिसरातील लोकांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. आज मच्छिंद्रनाथ गड येथे बाबांच्या हातून निर्माण झालेले स्वर्ग रुपी स्थान या ठिकाणी उभारले गेले आहे. बाबांच्या वैकुंठ गमनानंतर गडाची यशस्वी परंपरा स्वामी जनार्दन महाराज पार पाडत आहेत.  ब्रह्मलीन निगमानंद महाराजांनी गडावर आलेल्या प्रत्येक भक्ताची विचारपूस करावी त्याची अडचण समजून घ्यावी आणि त्या समस्येची निरूपण करावे ही भक्त गणांसाठी एक आगळीवेगळी नांदी ठरत होती. बाबांनी या गडाच्या माध्यमातून लाखो वारकरी निर्माण तर केलेच परंतु , महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजलेले  ख्यातनाम गायक व कीर्तनकार सुद्धा निर्माण केले. 


आज बाबा आपल्यात नाहीत. पण त्यांनी निर्माण केलेल्या धार्मिक वारकरी गड व शिक्षण संस्थांच्या माध्यमातून ते आपल्यात सदैव विचाराने आणि आशीर्वादाने सोबतच आहेत . याची जाणीव प्रत्येक क्षणी होते .त्यांनी निर्माण केलेल्या शिक्षण संस्थेतून हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत .मोठ्या पदापर्यंत पोहोचलेले आहेत. मुलींचे शिक्षण हे बारावीपर्यंत होत आहे. काही मुली सुद्धा नोकरी करताना दिसत आहेत. हे फक्त बाबांच्या दूर दृष्टिकोनातून सिद्ध होत आहे . समाजाला विकसित करण्यासाठी, शिक्षण किती महत्त्वाचे आहे?  हे बाबांना माहित होते. म्हणून, त्यांनी शिक्षण गंगा दारोदारी पोहोचवली. ती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून. शैक्षणिक क्षेत्राबरोबर आध्यात्मिक क्षेत्राकडे ही त्यांनी आपला भर दिला. आळंदी सारख्या पवित्र ठिकाणाहून संस्कृत शिक्षण दिले जात आहे. भरकटलेल्या मनाला एकाग्र करण्यासाठी अध्यात्माची आवश्यकता आहे. हे बाबांनी ओळखले होते. म्हणून त्यांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच आध्यात्मिक क्षेत्राकडे सुद्धा खूप लक्ष दिले.

देव म्हणजे आहे तरी काय ? एखाद्याचा पाठीवरती हात असणे, आणि एखाद्या संकटावर मात करणे. तोही देवच ! एखाद्याचा पाठीवरती हात नसणे आणि बिकट परिस्थितीतून मार्गक्रमण करणे. अर्थात स्वयंस्फूर्तीने स्वतःतील चेतना जागृत करणे, तोही देवच ! एखाद्याच्या शाब्दिक आधाराने अस्थिर मनाला स्थिर करणे, तोही देवाच ! या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी मिळणे त्यालाच संत म्हणतात. या संतांचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे, तोही देवाच!  देवाचा अनुभव आणि अनुभूती ही वेगवेगळी असू शकते .सार मात्र' यश' हाच आहे.  हाच अनुभव बाबांच्या सानिध्यातील भक्तगण घेत असावेत. म्हणूनच नांदेवाली याठिकाणी ब्रह्मलीन निगमानंद महाराजांचे भव्य मंदिर उभारले गेले आहे. त्यामध्ये मनाला मोहीत करणारी मूर्ती एक आगळेवेगळे आश्चर्य. गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथे सुद्धा मोठ्या आनंदी उत्साहाने तळणेवाडीकर बाबांची मूर्ती प्रतिष्ठापना व मंदिर उभारणी करत आहेत. ही बाबांवर असणारी त्यांची श्रद्धा आणि भक्ती होय . मंदिरातील मुर्त्या पाहिल्यावर आपल्या असे लक्षात येतं, त्या मूर्तींची कीर्ती खूप असते . समाज विकासित व्हावा, त्याचे भले व्हावे ही प्रांजळ भावना त्या संतांच्या ठायी असते.  त्यासाठी त्यांना अनेक समाज कंटक यांच्याशी लढा उभा करावा लागतो. तोही अहिंसा ,अध्यात्मिक शक्ती द्वारे .परंतु, हे परिवर्तन इथे सहज आणि सरळ सोपे नसते. त्यासाठी त्यांना अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. समाजाकडून होणारा त्रास सहन करावा लागतो. तोही समाजाच्या भल्यासाठी! हे विशेष . तेव्हा कुठे त्यांना देवत्व प्राप्त होते. अशा या महान संतांच्या चरणी नतमस्तक होतो .जय निगमानंद!

लेखक :: डोंगरदिवे राहुल रामकिसन


रविवार, १६ जानेवारी, २०२२

आबाजी - संत भगवानबाबा

            आबाजी - संत भगवानबाबा

'मन' एक अशी  वास्तविक संकल्पना की, तिच्या अनंत पैलूंचा अभ्यास करणारी अनेक विद्वान मंडळी होऊन गेली. जीवनाचा अंतिम सार देखील मानवी मनाचा समाधानरुपी 'वर्म' होय. मन खूपच चंचल आहे. अनेक दुःखांचे कारण देखील मनच. या मानवी मनाला नियंत्रित करून, पंच इंद्रियावर  ताबा मिळवतो,तो साधू! योगी सतपुरुष म्हणून ओळखला जातो. मानवी मनाच्या उत्तुंग शिखराला गवसणी घालण्या करिता निघालेलं मन, स्थिर - अस्थिर  तर आकाशामध्ये स्वच्छंद विहार करतं तेही मनच! 

 "नाही निर्मळ जीवन | काय करील साबण ||"

 "मन चंगा तो कठौती में गंगा |"

संत तुकाराम महाराज व संत रोहिदास महाराज,' मना'चे मोठ्या मनाने वर्णन करतात. जिवनाला अंतरंग द्यायचे असतील तर, मन शुद्ध असायला हवे. मन अशुद्ध आहे तर वरवरच्या काय ला कितीही साबण लावून उपयोग काय? कारण त्वचा साफ होईल पण अशुद्ध मन शुद्ध कधी होणार? मन गंगेच्या पाण्यासारखंं स्वच्छ असेल, निर्मळ असेल, कटोती मध्ये गंगा आपल्याला विराजमान झाल्याशिवाय राहणार नाही. मग हे मन कुठे स्थिरावेल की, मग कशामध्ये मग्न होईल? सहज संता शिवाय कोणीही सांगू शकत नाही . 


एक संत-महात्मे या भूमीत जन्माला आले. पावन भूमी होती सावरगाव. सावरगाव तसं माळरानावरती वसलेलं. सर्व बाजूंनी डोंगर दरा. सर्व शेती निसर्गावर आधारित. निराजी पाटील यांचे चिरंजीव भगुआबा. भगुआबांना दोन पुत्रं होते, रामजी व तूबाजी. तुबाजीचा विवाह कौतिकाबाईशी झाला. माता कौतिकाबाई सात्विक व गुणसंपन्न होत्या. त्यांच्या सद्गुणांची चर्चा गावभर होत असायची. पाटलाच्या घराण्या बरोबर आई-वडिलांच्या घराण्याचा ही उद्धार केला  होता.  तुबाजी पाटील व कौतिकाबाईना चार अपत्ये होती  - ग्यानबा, ज्ञानबा ,बाबू व शंकर. घर गोकुळासारखं भरलं होतं. तेव्हा मात्र कौतिका बाईंना पाचव्या अपत्याचे डोहाळे लागले. डोहाळे लागले घोडेस्वारीचे,पंढरपूरच्या वारीचे, भजनाचे, कीर्तनाचे. असे आगळेवेगळे डोहाळे लागणारी माता ही अगदी वेगळीच ना!  दिवसामागून दिवस जात होते. नऊ महिन्याचा कालावधी कधी सरला ते कळलेच नाही. माता कौतिकाबाई प्रसूत झाल्या. सूर्याने प्रकाशित असणाऱ्या तेजाला त्यांनी जन्म दिला होता. आखीवरेखीव सुंदर रूप, चंद्रप्रकाशा परी शितल काया, साक्षात कोण्या एका तेजस्वी दैवी शक्तीने जन्म घेतला की काय? असा प्रश्न  कौतिका मातेला पडायचा. एवढेच काय परिसरातही चर्चा होत असायची. हे  बालक विलक्षणच आहे. कारण ,'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ' या उक्तीप्रमाणे बारशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी हा तेजस्वी बालक जास्तच रडू लागला. म्हणून आजीची धांदल उडालेली .भगुजी नाव कानात म्हटले ,आणि बाळ शांत झाले. आजोबा पोटाला आला . अशी वल्गना करण्यात आली. तूबाजी पाटलांना प्रश्न पडला, वडिलांच्या नावाने आपल्या पोराला कसं बोलावं. म्हणून आई म्हणाली तुझ्या बाबांना तू आबा म्हणायचास ना मग बाळाचे नाव 'आबाजी', असे नामकरण करण्यात आले. 

आबाजी चा सांभाळ तळहाताच्या फोडाप्रमाणे माता कौतिका बाईने केला. आबाजीला लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती. सावरगावला शिक्षणाची सुविधा नव्हती. म्हणून ,शिक्षणासाठी मामाचे गाव लोणी ला पाठवण्यात आले. लोणी मध्ये प्राथमिक शिक्षण घेतले. तेथेही पुढील शिक्षण नव्हते. परिसरामध्ये निजाम- इंग्रजांमध्ये धुमश्चक्री चालायची, त्यात भारतीय स्वातंत्र्याची वारेही मोठ्या जोमाने घुमत होती. त्याचाही परिणाम आबाजीवर होत होता. प्राथमिक शिक्षण आटोपल्यानंतर परत सावरगावला आले. परिसरामध्ये वारकरी संप्रदायाचे प्रवाह जोमात चाललेले होते. त्यांचाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आबाजीवर परिणाम होत होता. एव्हाना त्यांची त्यांना आवड होती. कारण, लहानपणापासूनच आईने पोथी, पुराण, राम ,कृष्ण यांच्या गोष्टी सांगितल्या होत्या. त्यामुळे अध्यात्म हे त्यांचे अविभाज्य अंग बनले होते. 

नारायण गड म्हणजे, तुबाजी पाटलांचे कुलदैवत . एकदा वारीसाठी ते नारायणगडावर आले, सोबत आपली मुले, आबाजीला  पण घेऊन आले. नगद नारायणा चे दर्शन घेतले, माणिक बाबांचे दर्शन घेतले, परत निघाल्यावर आबाजी गाडीतून उतरून माणिक बाबांच्या जवळ जाऊन बसला. अनेक  युक्त्या केल्या. परंतु,आबाजी गड सोडायला तयार नाही. हे पाहून माणिक बाबांनाही आश्चर्य वाटले. माणिक बाबांच्या आज्ञेवरून आबाजीला नारायणगडावर ठेवण्यात आले. आबाजीची निस्सीम भक्ती पाहून माणिक बाबा प्रभावित झाले होते. भविष्यातील नारायण गडाचा उत्तराधिकारी म्हणून  आबाजी कडं पाहत होते. गुरूदिक्षा साठी माणिक बाबा आवाक् झाले होते .परंतु त्या बालकाची जिद्द चिकाटी परमेश्वरावरील भक्ती व मंदिरावर जाऊन उडी खाली घेणे, हे अचंबित करणारे होते. शेवटी माणिकबाबांनी आबाजीला पारखले व गुरुदिक्षा दिली. एवढंच नाही तर "भगवान" असे नामकरण केले. आबाजी चे भगवान बाबा झाले. पुढील योगसाधनेच्या अभ्यासासाठी भगवान बाबा अर्थात माणिक बाबांचे पट्टशिष्य मुकुंद राजांच्या गुहेमध्ये तपश्चर्येसाठी गेले. दोन - तीन वर्षाच्या खडतर तपश्चर्येनंतर भगवानबाबांना आत्मज्ञान मिळाले. नारायणगडावर परत आल्यानंतर , हभप श्री बंकट स्वामी महाराज यांचे घडाला पाय लागले . भगवान मध्ये एक दिव्य शक्ती आहे. या शक्तीला ज्ञानाची आणखीन गरज आहे. हे त्यांनी ओळखले ,म्हणून स्वामींनी माणिक बाबांना 'भगवान' मागितला. माणिकबाबांनी मोठ्या जड अंतकरणाने , 'हा देवाचा प्रसाद आपण वाटून खाऊया' असं म्हणून मोठ्या जड अंतःकरणाने भगवान बंकट स्वामींच्या स्वाधीन केला. तिथून पुढे भगवान बाबांचे शिक्षण हे आळंदीला झाले. वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन शिक्षण संपन्न होऊन भगवान बाबा पुन्हा नारायणगडावर आले. 

प्रथमत: गुरु माणिक बाबांचे आशीर्वाद घेऊन नारायण गडावरती दर एकादशीला कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. बाबा आपल्या रसाळ वाणीतून भक्तगणांना ज्ञानेश्वरीच्या अमृत ज्ञानातून देत असत. गडावर भक्तगणांची वर्दळ वाढत चालली होती. बंकट स्वामींचा आशीर्वाद पाठीशी होता. वारकरी संप्रदायाची पताका, मानाच्या शिरपेचात रोवण्यासाठी नारायण गडावरून पहिली दिंडी पंढरपूरला निघाली. पहिल्या दिंडीमध्ये एकूण फक्त 13 वारकरी होते.  दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे ज्ञानेश्वरांना अपेक्षित असणारी सर्व समभाव अशी होती. सर्व जातींची माणसं होती, पुढे या दिंडीचे रूपांतर खूप मोठ्या जनसागरात झाले. नगद नारायण आणि माणिक बाबा यांच्या आशीर्वादाने भगवान बाबांना ऐश्वर्यसंपन्नता लाभली होती. हा देह फक्त नारायण गडाच्या सेवेसाठी आणि माणिक बाबांची आज्ञा साठी आहे.  भगवान बाबांनी अनेक सत्कार्य केले. गडावरील नारळी सप्ताह प्रारंभ सुद्धा बाबांनीच केला होता. पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी येथे साळसिद बाबा यांच्या नावावर पशुहत्या मोठ्या प्रमाणात होत होती. बाबांनी ती अघोरी प्रथा बंद करून त्या ठिकाणी सिद्धनाथाचे मंदिर उभा केले.पशुहत्या बंद झाली. त्याचबरोबर माजलगाव तालुक्यातील चिंचाळा येथे अवघडबाबा याच्या नावाखाली गोहत्या केली जायची. हे बाबांना चांगलेच जिव्हारी लागले होते. भगवान बाबांनी त्या काळामध्ये त्या विरोधात बंड पुकारून अध्यात्माच्या मार्गाने अवघडबाबा हा अवघडबाबा नसून नाथ संप्रदायातील 'अडभंगनाथ' आहेत हे सिद्ध केले. "तेथील गोहत्या करण्याऐवजी माझी हत्या करा ,नंतर गोहत्या करा "असा नारा दिला . शेवटी कल्लू रोहिल्यांनी मध्यस्थी करत तेथील गोहत्येला बंदी घातली. पुढे तो रोहिला बाबांचा परम भक्त बनला. 


 हे ऐश्वर्य सांभाळण्यासाठी मल्ल तयार करण्यात आले. गोरगरीब वरील अन्याय दूर करण्यात येत होते. पुढे या मल्लांचा गडावरील या भरलेल्या धनाकडे लोभाने पाहू लागले किंबहुना ते धन आपल्या घरी असावे अशी लालसा त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. भगवान बाबा ना हे  मान्य नव्हते. भगवान बाबा विरोधात अनेक प्रकारच्या चांडाळ चौकटी सुरू झाल्य. 

 बाबा कोणालाही भीक घालत नसत . सर्व मल्ल आखाड्याचे नियोजित असणारा उस्ताद गवळी. कुस्ती मध्ये भगवान बाबांकडून पराभूत झाला. पन्नास खेड्यामध्ये नावलौकिक असणारा गवळी उस्ताद पराभूत झाला, ही बाब गवळीच्या जिव्हारी लागली,आणि तेथून पुढे नारायण गडावर ती कटकारस्थान रचले जाऊ लागले. पुढे उस्ताद भगवानबाबांना त्रास देणारा ठरला . नको त्या गोष्टींना सामोरे जावे लागले .शेवटी सत्वाची परीक्षा म्हणून बाबांनी स्वतः लिंग छेद केला. एवढे मोठे अग्निदिव्य पार करून सुद्धा खळांचा त्रास मात्र थांबला नव्हता. शेवटी माणिक बाबांच्या निधनानंतर नारायण गडावरती जातीय तेढ निर्माण झाला. उत्तराधिकारी, 'महादेव बाबा 'याचे भांडण कोर्टात गेले. कोर्टातून सुप्रीम कोर्टात अर्थात् निजाम दरबारी. दरबारातून निकाल आला. महादेव बाबा उत्तराधिकारी बनले भगवानबाबांनी नारायण गड सोडल. 



महंत माणिक बाबांच्या जाण्याने भगवान बाबांच्या उर्वरित योगसाधनेत खूप मोठी पोकळी निर्माण झाली होती. त्यात खेळांच्या त्रास हा असह्य होता. शेवटी निर्णय घेतला हिमालयात निघून जावे. हिमालयाचा मार्ग पकडला खरा .परंतु, खरवंडी च्या मातेच्या भक्तीपोटी बाबा परत खरवंडी ला आले. धौम्य गडावर राहण्याचे ठरवले. विजयादशमीच्या मुहूर्तावर भगवान बाबांनी सीमोल्लंघन केले. धौम्य गडाची स्थापना केली. धौम्य गडावर  बाबा रामतांना परिसर पाहत होता. परिसरातील दुःखी ,शोषितांना आनंद होत होता. भगवान बाबा च्या मनातील हिमालय आता दूर जात आहे. त्यांच्या प्रेमाचे वलय आपल्याला मिळणार आहे. ही आत्मिक समाधानाची हाक सर्व भक्तगणांना सुखावून टाकत होती. पुढे चालून सर्व भक्तगण, 'गड बांधा रे '...ही मोहीम हाती घेतात. सात वर्षाच्या अथक परिश्रमानंतर भगवान बाबांच्या नियोजनानुसार आणि मनातील कृती आराखड्यानुसार एक मोठा गड बांधून तयार झाला होता. बाबांच्या चेहऱ्यावर ही नवचैतन्य दिसत होते. एक नवीन वस्तू उभा राहिली होती. याची ख्याती  महाराष्ट्रभर पसरली. 

तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते विजय  विठ्ठल मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यशवंतराव चव्हाण भारावून गेले . भगवान बाबांच्या कार्याची तत्परता आणि सिद्धता स्वतः पाहिली होती. महाराष्ट्राच्या मराठी माणसांचे वर्णन करत असताना महाराष्ट्राची सत्ता कोणा संकुचित व्यक्तीच्या हातात जाणार नाही, त्याची जबाबदारी स्वीकारली. संत सांप्रदायाचे आभार मानून त्यासमोर लीन होऊन भगवान बाबांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी,धौम्य गडाचे नामकरण ,"भगवान गड" जाहीर केले . शासकीय दरबारी 'भगवानगड' अशीच नोंद राहील, अशी घोषणा सुद्धा केली. भगवानगड निर्मितीमध्ये पंचक्रोशीतील अबाल वृद्धांचा सिंहाचा वाटा आहे याची जाणीव आशीर्वादपर भाषणामध्ये भगवानबाबांनी करून दिली. 

बाबांचे वय वाढत होते. शरीरही आता पहिल्यासारखे साथ देत नव्हते.यातच बाबांना हृदयविकाराचा पहिला झटका आला होता. डॉक्टर काळजी घ्यायला सांगत होते. बाबा विश्रांती घेतील? हा यक्षप्रश्न सर्वांनाच भेडसावत होता. विदर्भ व पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा किर्तन रुपी समाजप्रबोधन मात्र अखंड सुरू होते. हृदयविकाराच्या आजाराने बाबा चांगलेच ग्रासले होते. भविष्यातील गडाचा वारसदार हा  प्रख्यात पंडित असावा. समाजाची जाण असावी, भगवान गडावरचा प्रपंच यापुढे प्रज्वलित ठेवण्यासाठी एक निष्णात वक्ता असावा, त्याच बरोबर अध्यात्मातील शिरोमणी असावा .अशा अनेक शंका-कुशंका बाबांच्या मनात येत होत्या . त्यासाठी योग्य ' योगी' म्हणून भीमसिंह महाराज समोर दिसत असत . वारसदाराची संकल्पना भीमसिंह महाराज यांच्या कानावर घातली तेव्हा मामासाहेबांचा वारस म्हणून मला नेमायचा, असे म्हणतात. तेव्हा बाबा थोडे निराश झाले. भीमसिंह महाराजांना बाबा म्हणत, 'तुम्ही गडावर या ,कार्यक्रमाची रूपरेषा तुम्हालाच बघावी लागणार' त्यानुसार भीमसिंह महाराज भगवान गडावर येत असत. 


14 जानेवारी 1965 हा दिवस, मकर संक्रांतीनिमित्त बाबा दर्शनासाठी गादीवर बसले होते. परिसरातील माता  माऊली दर्शन घेऊन परत जात होत्या. पुण्यकाळ दिवसभर असल्यामुळे सुवासिनी येत होत्या. खरवंडी च्या बाजीराव पाटलांची सुवासिनी त्यात होत. बाबांचे दर्शन घेण्यासाठी त्यांनी त्यांच्या पायाला हात लावला . पायांना ताप चढलेला होता. त्यांनी आलेल्या सुवासिनी बरोबर त्याची चर्चा केली. घरी गेल्याबरोबर सासूबाईंच्या कानावर घातले. सासूबाईंनी बाजीराव पाटील यांच्या कानावर घातले. बाजीराव समजायचे ते समजून गेले. डॉ घेऊन  टांग्यात बसून गडावर गेले. बाबांची तब्येत बिघडली होती. बाबांना घेऊन ते नगरला गेले. नगर ला गेल्यानंतर बाबांना हृदयविकाराचा दुसरा झटका येऊन गेला आहे. असे सांगण्यात आले. पुढील उपचारासाठी रूबी हॉल पुणे येथील परदेशातील डॉ ग्रॅट कडे घेऊन जावे ,असे सांगण्यात आले. 

पुणे येथील रुबी रुग्णालयात भगवान बाबा वरती उपचार सुरू झाले .परंतु काळ बराच पुढे गेलेला होता. बाबांनाही त्यांची जाणीव होती. शेवटच्या समयी ज्ञानेश्वरी चे निरूपण करावे. रुग्णालयांमध्ये ज्ञानेश्वरी वाचन सुरू झाले. सर्व भक्तांना वाटले आता बाबा सुखरूप बाहेर पडतील परंतु 18 जानेवारी 1965 चा दिवस उजाडला बाबांना मात्र शेवटच्या क्षणापर्यंत ज्ञानेश्वरी जवळ हवी होती. अंतिम समय छातीवर ज्ञानेश्वरी घेऊन, 

        ज्ञानोबा!

            ज्ञानोबा!!

                ज्ञानोबा!!!

       म्हणत बाबांची प्राणज्योत मालवली. 


📝लेखक :- डोंगरदिवे राहुल रामकिसन

Enemy

                 ENEMY




Without problems we can't face the struggles and without struggles we can't become a unique personality  in the world. If you think it's very hardest task, at the time you must think against, that's your golden opportunity to chase it. 

Problems may be created in our life, created problem is not lifetime, there must be a solution. Just  find out the way, where we want to satisfaction with full solution. That solution depend on your  thinking power and state of mind. Actually the position of mind is fully converted and stuck in dilemma, that's why no one can't make a decision. Can we find out the deficiency? Actually we want to do something but could not do anything and the reason is scare. Why someone scare about the unknown conditions? And we know all are fictions, but the thinking track is real platform. This is one of the most powerful track to forward as well as backward. When we stuck in that , we could not come out from that position. You have confused, which is same thing

So friends it is very easy to fight against enemy, but some Enemies are not seen easily.  They are hidden with us. So it's very hard to identify the reality and the reality is not simple thing to trust on it. Sometimes we wander  hither and thither to find out the deficiency ,enemy and any other tricks to solve the problem.  Many more Times we can't reach the bottom . Because we believe on those people who are fully betrayed ? In history also there are a lot example,  a vast empire and kings kingdom demolished because of their kith and kins. Nowadays the ruling method is changed. Everyone tried to capture the ownership of in every field, sometimes it's totally depend on power. Who wants monarchy, those people are used their power against weaker. Here l want to know about weak means not power but they worried about future and the bad signs of future.so they take back from critical situation. But the  thinks all are beaten by me. 

Friends I would like to say, " Good deeds are best work. " If we honestly doing our work, there is no any difficulty. But remind it  huge obstacles are front of you. The other thing is you will be won. Don't care about who's ur enemy? Enemy doesn't have any relationship. The just took the benefits of an opportunity. So don't give them that an opportunity. Be alert from those people who most trusted  by you. On time try to identify the existence and modify your relationship and be practical. 

One more thing is here, if you always think about your blood relationship and confused. It's so hard to come out. So think deeply if you forgive them and they could not change their temper, then what's the value of your sacrifice? That's why be alert. And be practical. 

📝📝Rahul R. Dongardive