सोमवार, २४ जुलै, २०२३

Manipur incident is the height of brutality - मणिपूर घटणा निर्दयतेचा कळस

 Manipur incident is the height of brutality



भारत जगातील आगळावेगळा देश म्हणून सर्वत्र परिचित येथील धर्म, जाती, पंथ, वेशभूषा, पारंपारिक पद्धती  यांना सर्वसमावेशक असणारा हा भारत जगामध्ये आपलं वेगळेपण सिद्ध करतो. स्वातंत्र्य पूर्वीचा भारत आणि स्वातंत्र्योत्तर भारत अल्पावधीमध्ये केलेली अफलातून प्रगती पहिल्यावर जगालाही हेवा वाटतो. ज्या ठिकाणी विज्ञानाची सुरुवात शून्यातून झाली तिथे इस्रो वैज्ञानिक संस्था आज जगामध्ये आपला विलक्षण ठसा निर्माण करत आहे. 14 जुलै 2023 दुपारी दोन वाजून 35 मिनिटांनी चंद्रयान थ्री चे प्रक्षेपण यशस्वी झाले. सर्व भारतीयांसाठी गौरवाची  अभिमानाची बाब ! पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून यशस्वीपणे अंतराळात सुद्धा भरारी घेणारी महिला याचा जगाला अभिमान. भारतीय वंशाच्या असणाऱ्या कल्पना चावला आणि सुनीता विल्यम नागरिकत्व जरी अमेरिकेचे असले, नासा मधून जरी त्या चंद्रावर जाऊन  परतत असताना यांनास तांत्रिक अडचण आल्यामुळे कल्पना चावलाचा  मृत्यू झाला. जगामध्ये या भारतीय वंशाच्या आहेत म्हणून भारताने मोठा त्यांचा गुणगौरव केला . सर्व देशवासीयांना याचा अभिमान होता.

भारताच्या  महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू आदिवासी समाजातील उच्चपदस्थ महिला म्हणून सर्वांना गर्व आहे. एका बाजूला  केलेला महिलांचा गौरव आणि दुसऱ्या बाजूला भारतामध्ये लांच्छनास्पद घडलेल्या घटना यामधील खूप मोठी दरी पाहिल्यानंतर आपण अनेक क्षेत्रामध्ये आपली प्रगती करत आहोत तर दुसऱ्या बाजूला त्याच महिलेच्या इज्जतीचे धिंडवडे भर चौकात काढले जातात. यावर एक शब्द किंवा एखादा प्राईम टाईम हल्लाबोल कोणत्याही चैनल वर दिसला नाही. ही लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभ याकडून अवहेलना होत नाही का?  साध्या साध्या गोष्टीला ब्रेकिंग न्यूज बनवणारा मीडिया एवढी मोठी घटना मणिपूरमध्ये घडते त्यावर एक चकार शब्द निघत नाही. फक्त मनिपुर पेटला आहे,जळतो आहे, दोन-तीन महिन्यापासून तेथील आग शांत होत नाही. डबल इंजिन सरकार आहे तरीही राज्यातील आरजुकता वाढतच आहे. याची कारण आणि मूळ शोधण्यात मीडियाला रस वाटत नाही का ? घटनाही तीन मे 2023 रोजी घडते त्याची पडसाद सीमित भागापुरते राहतात. मानवाच्या मनाला हेलावून आणि स्तब्ध करून टाकणारा व्हिडिओ हळूहळू व्हायरल होतो. महाराष्ट्रापासून देशाच्या राज्यसभेपर्यंत सभागृहा तहकूब होतात तेव्हा, कुठे आपल्या मिडीयाला जाग येते आणि ब्रेकिंग न्यूज लागते...हे सर्व रिपोर्ट अगोदरच मीडियाला माहीत असावेत परंतु जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकणार नाही. आजही जातीय चटके या देशांमध्ये आपणाला अनुभवायला मिळत आहेत प्रत्येक राज्यामध्ये एक विशिष्ट वर्ग एका विशिष्ट वर्गाच्या विरोधात हेवा करू लागलेला आहे.



मणिपूर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला निर्देश दिले की, मैंतेई समाजाचा अनुसूचित जनजातीमध्ये समावेश करण्यात यावा,त्यासाठी त्यांनी योग्य ती पावले उचलावी. या निर्देशाचे समज गैरसमज पहाडी भागात राहत असणाऱ्या आदिवासी जमाती 'कुकी' व 'नागा' यांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे समज गैरसमज निर्माण होऊन या निर्णयाच्या विरोधामध्ये 'ऑल ट्राईब  स्टुडंट्स मनिपुर ' द्वारे मोठा मोर्चा निघाला. मोर्चामध्ये किमान 50 ते 60 हजार विद्यार्थी सहभागी होते आणि या ठिकाणी खऱ्या समज आणि गैरसमजला सुरुवात झाली. अगोदर सोशल मीडिया रिपोर्ट आणि त्यानंतर मीडिया यांच्यानुसार त्या मोर्चामध्ये अनुसूचित जमातीवर मैंतेई समाजाच्या लोकांनी आक्रमण केले आणि मोर्चामध्ये हल्ला कल्लोळ माजला. मोर्चाची कुठेही वाच्यता होऊ नये म्हणून मणिपूर सरकारने तीन मे रोजी सर्व इंटरनेट सेवा बंद केली होती. जो विद्यार्थ्यांच्या मोर्चामध्ये गैरसमज निर्माण झाला होता.  अगदी त्याच प्रकारचा मैंतेई समाजामध्ये गैरसमज निर्माण झाला. मोर्चाचे दंगलीमध्ये रूपांतर झाले होते. प्रत्येक ठिकाणी लोक सैरावैर भटकत होते . एकमेकावर हल्ले होत होते. क्षणांमध्ये शांत असणारा मणिपूर आगीने होरपळत होता.



मणिपूरच्या पहाडी भागांमध्ये राहणाऱ्या नागा आणि कुकी समाजाच्या मनामध्ये प्रस्थापित असणाऱ्या मैंतेई समाजाबद्दल काही गैरसमज होते. त्याची कारणही तशीच होती कारण त्यांच्या हे स्पष्ट होते की, मैंतेई हा समाज परकीय आहे. त्याचबरोबर तो आजही पूर्वीपासून सत्तेत आहे. साठ आमदारांपैकी 40 आमदार हे त्याच समाजाचे आहेत . फक्त 20 आमदार हे कुकी आणि नागा या आदिवासी समाजाचे आहेत. जर या प्रस्थापित लोकांना अनुसूचित जनजातीमध्ये समावेश केला गेला तर, आपल्या संविधानात्मक अधिकारावर गदा येईल. कारण संविधानानुसार तेही त्याच जागेवर दावा करू शकतील. शैक्षणिक संस्थांमध्ये व इतर सरकारी कार्यालयामध्ये त्याच लोकांची भरती केली जाईल , हा एक महत्त्वाचा मुद्दा. पारंपारिक पद्धती प्रमाणे प्रस्थापित समुदाय हा पहाडी भागांमध्ये जमीन खरेदी करू शकत नाही. परंतु पहाडी भागातील असणारे कुकी आणि नागा लोक सर्वत्र जमीन खरेदी करू शकतात. जर या प्रस्थापित समाजाला पूर्वीपासून राज्य करत असलेल्या समाजाला अनुसूचित जनजातीमध्येच प्रवेश मिळाला तर, ते लोक पहाडी इलाख्यात आक्रमण करतील आणि येथील मूळनिवासी  लोकांचे सांस्कृतिक आणि पारंपारिक अस्तित्व नष्ट होईल. अशी भीती त्यांच्या मनात होती. म्हणून मणिपूर आदिवासी विद्यार्थी संघटनेने मोर्चा काढला होता. 

वर उल्लेख केल्याप्रमाण पूर्वी पासून या दोन समाजामध्ये चालत आलेली वैमानस्य व समज आणि गैरसमज याचा विस्फोट झाला. ज्याप्रमाणे कुकी आणि नागा यांच्यामध्ये अफवा पसरवण्यात आली आणि दंगल उसळली त्याचाच परिणाम म्हणून त्याच प्रकारच्या अफवा मैंतेई समाजामध्ये सुद्धा झाल्या. त्याचाच परिणाम म्हणून 04 मे 2023 रोजी समाजाचा 800 ते 1000 लोकांचा समूह आधुनिक क्षेत्रासह एफ आय आर रिपोर्टनुसार बि. फिनोम पहाडी इलाख्यात असणाऱ्या गावात घुसला तिच्यामध्ये एके फोर्टी सेवन, एस एस एल आर, 302 रायफल यासह आदिवासी लोकांवरती आक्रमण केले. यांच्याकडेही शस्त्रे आली कुठून? हा मोठा गंभीर आणि कुठ प्रश्न आहे. मैंतेई समजाणे आदिवासी समाजावर आक्रमण केले आहे. त्यामध्ये ते लोक घरे पेटवतात जीवे मारतात या भीतीपोटी समोरच असणाऱ्या घरामध्ये एक कुटुंब राहत होते. आपला जीव मुठीत धरून जीव वाचावा म्हणून जंगलामध्ये पळत होते. हजाराच्या संख्येने आलेल्या हल्लेखोराने त्यांना पाहिले. त्यांचा पाठलाग करत हल्लेखोरांनी त्यांना गाठले. सुडाने पेटून उठलेल्या नराधमांनी मातेसमान असणाऱ्या पन्नास वर्षीय महिलेला नग्न करून, 21 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केला . चाळीस वर्षे महिलेला सुद्धा नग्न केले . अशा दोन्ही महिला नग्न करून भर रस्त्यावरून त्यांची गावातून नग्न धिंड काढण्यात करण्यात आली.   नग्न धिंड काढून सर्वजण हजारोंच्या संख्येने आलेला हल्लेखोरांचा समूह त्या माता माऊलींच्य लग्न शरीराचे दिंडवडे काढून थांबला नाही, तर त्या महिलांच्या प्रायव्हेट पार्टची छेडखानी करत असतानाचा व्हिडिओ अत्यंत संवेदनशील आणि अपमान कारक आहे. एक स्त्री आपल्या इज्जतीचे धिंडवडे इतक्या सहज काढून देईल काय ? स्वतःचे कपडे काढून त्यांच्याबरोबर चालेल काय ? याला ती विरोध करत होती . तिला वाचवण्यासाठी तिचे वडील आले तर त्या नराधमांनी त्याला गोळी घालून जागीच ठार मारले . तेव्हा मात्र ती आपल्या वडिलांसाठी स्त्री  निर्वस्त्र होण्यास तयार झाली . तिचा भाऊ तिला वाचण्यासाठी आला तर त्यालाही ठेचून मारण्यात आले. एक अबला स्त्री काय करणार?  असेच म्हणावे लागेल. शेवटी त्या नालायक दुष्कर्म करणाऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे ऐकावे लागले. नाही ऐकव तर, आणखीन एक दोन जनाच्या लाशी पडल्या असत्या. एक लाजिरवाणी  बाब म्हणजे , यामध्ये पोलीस असूनही काही करू शकले नाहीत. ही मोठी चिंतेची बाब स्पष्टपणे जाणवते . मग अशा लोकांना संरक्षण कोण देणार ? या प्रश्नाचे उत्तर सहज मिळणे शक्य नाही. मन पिळवटून येते,स्तब्ध होते , शब्द राहत नाही आणि यावर , 18 मे 2023 तारखेला एफ आय आर दाखल झाल्यानंतर घटनेमागील पडद्याचा राज बाहेर निघतो.  19 मे 2023 ला प्रस्थापित समजल्या जाणाऱ्या हल्लेखोराकडून कडून केल्या गेलेल्या जगातील सर्वात वाईट घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर येतो आणि देशच काय जगाला सुन्न करणारी घटना पाहून सर्वजण हळूहळू व्यक्त करतात . तरीही केंद्र सरकारला जाग येत नाही याची मात्र शोकांतिकाच आहे. 

एवढा वाईट प्रसंग एखाद्या भगिनीशी व्हावा आणि असे दुष्कृत्त करणारा आरोपी दोन महिन्यानंतर अटक होतो. हे कोणत्या विवेकी माणसाला आणि शासन व्यवस्थेला पटेल काय?  राज्य सरकार यावर कोणतीही कारवाई सहजासहजी करत नाही. यातच त्याचा अर्थ समजून जायचं  आरोपीची किती आणि कुठपर्यंत पोहोच आहे. या दोन्ही समाजाच्या हिंसाचारामध्ये आतापर्यंत 120 च्या वर मृत्यू पावले आहेत. आतापर्यंत 90 दिवसाच्या पुढे झाले तरीही मनिपुर पेटलेलेच आहे . त्यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकार चुपी साधून आहेत . परिस्थिती आवाक्याच्या बाहेर आहे. जेव्हा हे सुप्रीम कोर्टाच्या लक्षात येते तेव्हा, सुप्रीम कोर्ट राज्य आणि केंद्रामध्ये हस्तक्षेप करून यावर गंभीर पावले उचलायला लावते. नसता सुप्रीम कोर्ट दखल देईल अशा प्रकारची खडी सुनावणी केल्यानंतर देशाचे पंतप्रधान मीडियासमोर येतात आणि त्यांचं हृदय भावनाप्रधान होतं. त्यांच्याकडे यावर कारवाई संदर्भात राजकीय सुतवाच निघतात. देशाच्या सगळ्यात शक्तिशाली व्यक्तीकड ही बातमी एवढ्या उशिरा पोहोचते मग सामान्य जनतेकडे न्याय मिळण्यासाठी किती दिवस लागतील ? हे सांगता येत नाही. 

हिंसाचार हा हिंसाचार असतो. त्यामध्ये कोण कोणावर करतो. यापेक्षा त्यामध्ये निरपराध आणि निष्पाप लोकांचे बळी जातात. स्त्रियांच्या इज्जतीची लक्तरे वेशीला टांगली जातात. निर्माण झालेल्या परिस्थितीमधून मार्ग काढणे हे येथील राजकीय शासन व्यवस्थेचे सर्वात मोठे आणि प्रथम कार्य असले पाहिजे. न्यायव्यवस्था आहे म्हणून न्याय जिवंत आहे . न्यायव्यवस्थेचे वेगळे महत्त्व आणि लोकांचा विश्वास त्यावर आजही भक्कम झालेला पाहतो. सुप्रीम कोर्टाने जर ताशेरे ओढले नसते, तर यावर पंतप्रधान बोललेच नसते का?  असे अनेक प्रश्न आणि शंका मनामध्ये निर्माण होताना आपण सर्वांनी एकच गोष्ट लक्षात ठेवायला हवी. व्यक्ती पेक्षा देश श्रेष्ठ आहे. देशापुढे सर्व व्यक्ती समान आहे आणि हा आपला मूळ गाभा समोर ठेवून अन्याय अत्याचार करणाऱ्याला कठोरातील कठोर शासन व्हावे ही एवढी न्याय मागणी शासन दरबारी उतरावी. त्याचबरोबर नव्वद दिवसापासून पेटलेले मनिपुर शांत व्हावे हीच इच्छा. 


# 📝Rahul Dongardive

1 टिप्पणी: