अत्त दीप भव
जगामध्ये अनेक प्रकारचे तत्त्वज्ञान, सिद्धांत, प्रचलित पद्धती , आपापल्या प्रभावातील विचारानुसार निर्माण झालेले तत्त्वज्ञ, हो एका विशिष्ट मोठ्या व्यक्तीने किंवा प्रभावित सत पुरुषाने बोललेली वाणी म्हणजे अज्ञानी लोकांसाठी अमृतवाणी, अशा प्रकारची धारणा प्रचलित पद्धती व प्रभावित पद्धती यानुसार लोकांच्या मनपटलावरती बिंबवली गेली. याचा परिणाम म्हणून सर्व लोकांनी ती अनुकरणातून साक्षात आचरणात आणली. परिणामी याचा परिणाम असा झाला की, एका विशिष्ट विद्वान समजल्या गेलेल्या व्यक्तीने केलेले भाष्य अज्ञानी व्यक्तींकरिता पूर्णपणे बाबा प्रमाण व्हावे. त्यानुसार त्यांनी त्याचा अवलंब करावा. हीच प्रथा परंपरा पुढे चालत जाऊन, एका विशिष्ट व्यक्ती भोवती तिचा संचार होऊन समाजामध्ये संक्रमण रुपी रुजणे त्या व्यक्तीचे दैवत्व सिद्ध करण्यासाठी कारणीभूत ठरते. पुढे चालून तर्क संगत आणि विसंगत विचारांची ज्यावेळेला चर्चा विमर्श होतो.तेव्हा, त्यातून निर्माण होणारी सत्यता बाहेर पडते. ती सत्यता कोणी एका महापुरुषांनी सांगितली म्हणून मान्य करणे , हे बौद्ध धर्माला मान्य नाही. जेव्हा ती सत्यता प्रत्येकाच्या कसोटीवर आणि चिकित्सवर सिद्ध होते तेव्हा, ते 'सत्य' बुद्धांनी मानले .
"अत: दीप भव " हा जगासाठी दिलेला संदेश वेगळा तर आहे.परंतु, तो इतरांपेक्षा सकस आहे.कारण प्रत्येक मतावर चिकित्सा करणे हा प्रत्येक मानवाचा अधिकार आहे. त्या अधिकारानुसार प्रत्येकाने आपली मत मांडली पाहिजेत , हा त्या पाठीमागचा स्वयंप्रकाशित होण्याचा मुख्य उद्देश बुद्धांनी सांगितला. जगातील कोणतीही व्यक्ती सम्यक संबुद्ध होऊ शकते. जगाच्या पाठीवर असा उपदेश देणार एकमेव मार्गदर्शक तथा मार्ग दाता "बुद्ध" आहे!!! ते स्वतःला कधीही सर्वोच्च स्थान देऊन स्वतःची पूजा अर्चा करण्यास स्पष्ट नकार देतात. त्याही उपर जाऊन ते पुढे सांगतात की , प्रत्येक जण सम्यक संबुद्ध होऊ शकतो . प्रत्येकाला 'अरहत' प्राप्त होऊ शकते. प्रत्येकाने त्यांनी दिलेल्या साधनेवर जर पाऊल ठेवले तर कोणालाही ते अशक्य नाही. ही वस्तुस्थिती जगाच्या मानव कल्याणासाठी प्रत्येक मानवाला देताना बुद्धांनी कधीही संकोच बाळगला नाही. स्वतःला कधीही देव मानले नाही. म्हणून ते सरळ सांगतात स्वतः स्वयंप्रकाशी व्हा!
सिद्धार्थ गौतम म्हणून सरळ सर्वांना संदेश देतात एखादा कोणीतरी महात्मा काहीतरी सांगतो म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका.कारण , शाश्वत सत्य पडताळणी हा प्रत्येक मानवाचा अधिकार आहे. बुद्ध जे सांगतात त्यानुसारच ती कृतीही करतात. आचरण हा बौद्ध धम्माचा मूळ पाया आहे . चारित्र्याची शुद्धता हीच खरी व्यक्तीची विश्वासनीयता आहे. बुद्धांनी जे बुद्धत्व प्राप्त केले. ते फक्त बुद्धांनाच प्राप्त होईल असा ते दावा कधीही करू शकत नाही. जो योग्य त्या साधनेने जाईन अचरण करील त्या प्रत्येकास तो हक्कही आहे आणि ते प्राप्तही होईल.
बौद्ध धम्मामध्ये साध्या,सरळ आणि सोप्या पद्धतीने पाच मार्ग सांगितलेले आहेत ते म्हणजे, पशु हत्या करणार नाही, खोटं बोलणार नाही, व्याभीचार करणार नाही, चोरी करणार नाही, आणि कोणतेही मद्य सेवन करणार नाही. या जोडीला अष्टगम मार्गाचा स्वीकार करून माझे जीवन सार्थक ठरवेल असा सर धोपट मार्ग सर्वांनी स्वीकारल्यास जीवनातील दुःखाचे कारण सहज उमगेल आणि माणूस म्हणून जीवन जगू शकेल..!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा