|
ᴇᴠᴇʀʏ Human being has a 𝙳𝙴𝚂𝙸𝚁𝙴, 🄳🄴🅂🄸🅁🄴 has many ways, who knows the subconscious mind, he will be the real hero.
|
𝙋𝙚𝙖𝙘𝙚
𝘿𝙤𝙣'𝙩 𝙖𝙘𝙘𝙚𝙥𝙩 𝙩𝙝𝙚 𝙥𝙖𝙩𝙝 𝙤𝙛 𝙬𝙖𝙧... 𝘼𝙘𝙘𝙚𝙥𝙩 𝙩𝙝𝙚 𝙥𝙖𝙩𝙝 𝙤𝙛 𝙥𝙚𝙖𝙘𝙚.... 𝙒𝙝𝙞𝙘𝙝 𝙞𝙨 𝙩𝙝𝙚 𝙗𝙚𝙨𝙩 𝙥𝙖𝙩𝙝 𝙤𝙛 𝙡𝙞𝙛𝙚 𝙬𝙝𝙚𝙧𝙚 𝙬𝙚 𝙡𝙞𝙫𝙚 𝙬𝙞𝙩𝙝𝙤𝙪𝙩 𝙛𝙚𝙖𝙧 𝙖𝙣𝙙 𝙗𝙪𝙧𝙙𝙚𝙣.
𝘿𝙤 𝙢𝙚𝙙𝙞𝙩𝙖𝙩𝙞𝙤𝙣 𝙧𝙚𝙜𝙪𝙡𝙖𝙧 𝙛𝙤𝙧 𝙩𝙚𝙣 𝙢𝙞𝙣𝙪𝙩𝙚𝙨 𝙚𝙖𝙧𝙡𝙮 𝙞𝙣 𝙩𝙝𝙚 𝙢𝙤𝙧𝙣𝙞𝙣𝙜 𝙖𝙣𝙙 𝙚𝙫𝙚𝙣𝙞𝙣𝙜🙏.
𝙄𝙩'𝙨 𝙗𝙚𝙘𝙤𝙢𝙚 𝙩𝙝𝙚 𝙣𝙚𝙬 𝙗𝙚𝙜𝙞𝙣𝙣𝙞𝙣𝙜 𝙤𝙛 𝙣𝙚𝙬 𝙢𝙚𝙢𝙤𝙧𝙞𝙯𝙞𝙣𝙜 𝙖𝙣𝙙 𝙨𝙩𝙧𝙚𝙨𝙨 𝙛𝙧𝙚𝙚 𝙘𝙖𝙥𝙖𝙗𝙞𝙡𝙞𝙩𝙞𝙚𝙨 𝙩𝙤 𝙞𝙢𝙥𝙧𝙤𝙫𝙚 𝙤𝙬𝙣 𝙨𝙪𝙗- 𝙘𝙤𝙣𝙘𝙞𝙤𝙪𝙨 𝙢𝙞𝙣𝙙.
जनतेची मनातील 'आशा', 'लोकाशा'!!!
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकारिता! कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ या तीन आधारस्तंभाला जेवढे महत्त्व लोकशाहीमध्ये आहे, तितक्याच प्रमाणात पत्रकारिता हा लोकशाहीचा अविभाज्य घटक आहे. संसदीय लोकशाही पद्धतीमध्ये देशांमधील होणाऱ्या घडामोडी आणि त्यात भासणारी कमतरता या विरोधात जनतेच्या वतीने आवाज उठवणारी यंत्रणा. लोक भावनेबरोबरच देश हित , राज्य हित, आणि पटरी वरून बाजूला घसरणाऱ्या गाडीला पटरीवर आणण्याचा प्रयत्न , ही पत्रकारिता करत असते किंबहुना त्यामध्ये त्यांना यशही येते. कधी कधी मात्र मोठ्या प्रमाणात आवाज उठवावा लागतो हा आवाज म्हणजे, पत्रकारिता होय.
निर्भीड निरपेक्षता जोपासणारी बीड जिल्ह्यातील एकमेव पत्रितकारिता दैनिक लोकाशाच्या रूपाने नावारूपाला आली. देशपातळीपासून ते बीड जिल्ह्यापर्यंत सर्व स्तरातील बातम्यांचा अग्रलेख असो की सामान्य बातमी असो ती पोट तिडकीने मांडण्याचा आणि ती जनसामान्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न दैनिक लोकाशाचा असतो. कोणत्याही एका राजकीय पक्षाची भूमिका न स्वीकारता सर्वसमावेशक भूमिका स्वीकारून जिल्हास्तरावरील मराठवाडा स्तरावरील किंवा महाराष्ट्र स्तरावरील बातम्यांना अचूकपणे मांडून " बहुजन हिताय बहुजन सुखाय" अशी भूमिका घेणाऱ्या वर्तमानपत्राचा ठसा हा आगळावेगळा ठरतो.
"ऐसी वाणी बोलिए मन का आप खोए,
औरन को शीतल करे,
आपहुं शीतल होए"
वरील कबीरच्या दोह्यातून आपल्याला अशी प्रतीत होते - 'अशी वाणी असली पाहिजे की, ज्या वाणीने इतरांना तर आनंद मिळतोच आणि स्वतःलाही आनंद मिळतो'. लोकपत्रकारिता मध्ये लोकाशाचे सुद्धा असेच सगळे वेगळे स्थान निर्माण झाले आहे. लोकाशावरी अग्रलेख असो किंवा संपादकीय पानावरील लेख, ही सर्व साधारणपणे सामान्य माणूस आणि शेतकरी वर्गावर आधारित असतात. त्याचबरोबर उद्योग क्षेत्रातील विविध नामांकित व्यक्तिरेखा ते निर्माण होणाऱ्या समस्या वर आधारित असतात. त्यामुळे जनसामान्याला एक आवाज निर्माण झाला आहे. ज्या आवाजामुळे सामाजिक समस्या शासन दरबारी मांडल्या जातात. त्याची दखल शासनाकडून घेतलेली अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील. लोकाशाची भाषा ही खरोखरच जनसामान्याची भाषा म्हणून उदयास येत आहे. प्रत्येकाच्या मनातील अनेक गुपित लोकाशाच्या माध्यमातून शासन दरबारी प्रकट होताना दिसत आहेत. त्यामुळे हा आवाज लोक आवाज बनत आहे. ही वस्तुस्थिती नाकारणे अशक्य आहे.
लोक मनातील बुलंद आवाज, जनसामान्यातील समस्यांचा लेखाजोखा, त्याचबरोबर मानवी मनाच्या अंतर्पटलातील घुसमट, लोक चळवळीच्या माध्यमातून वर्तमानपत्रात प्रसिद्ध करून त्याला वाचा फोडण्याचे काम, आजचे निर्भीड निष्पक्ष वर्तमानपत्र दैनिक लोकाशा करत आहे. याचा सार्थ अभिमान वाटतो. आज एक तप पूर्ण करून दुसरे अर्ध तप पूर्णत्वास जात असताना आत्यानंद होतो . भविष्याची आधुनिक नांदी ठरताना दिसते. दैनिक लोकाशाच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!!!
डोंगरदिवे राहुल रामकिसन
श्री निगमानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,
निमगाव (मच्छिंद्रनाथ गड) तालुका शिरूर जिल्हा बीड.
अत्त दीप भव
जगामध्ये अनेक प्रकारचे तत्त्वज्ञान, सिद्धांत, प्रचलित पद्धती , आपापल्या प्रभावातील विचारानुसार निर्माण झालेले तत्त्वज्ञ, हो एका विशिष्ट मोठ्या व्यक्तीने किंवा प्रभावित सत पुरुषाने बोललेली वाणी म्हणजे अज्ञानी लोकांसाठी अमृतवाणी, अशा प्रकारची धारणा प्रचलित पद्धती व प्रभावित पद्धती यानुसार लोकांच्या मनपटलावरती बिंबवली गेली. याचा परिणाम म्हणून सर्व लोकांनी ती अनुकरणातून साक्षात आचरणात आणली. परिणामी याचा परिणाम असा झाला की, एका विशिष्ट विद्वान समजल्या गेलेल्या व्यक्तीने केलेले भाष्य अज्ञानी व्यक्तींकरिता पूर्णपणे बाबा प्रमाण व्हावे. त्यानुसार त्यांनी त्याचा अवलंब करावा. हीच प्रथा परंपरा पुढे चालत जाऊन, एका विशिष्ट व्यक्ती भोवती तिचा संचार होऊन समाजामध्ये संक्रमण रुपी रुजणे त्या व्यक्तीचे दैवत्व सिद्ध करण्यासाठी कारणीभूत ठरते. पुढे चालून तर्क संगत आणि विसंगत विचारांची ज्यावेळेला चर्चा विमर्श होतो.तेव्हा, त्यातून निर्माण होणारी सत्यता बाहेर पडते. ती सत्यता कोणी एका महापुरुषांनी सांगितली म्हणून मान्य करणे , हे बौद्ध धर्माला मान्य नाही. जेव्हा ती सत्यता प्रत्येकाच्या कसोटीवर आणि चिकित्सवर सिद्ध होते तेव्हा, ते 'सत्य' बुद्धांनी मानले .
"अत: दीप भव " हा जगासाठी दिलेला संदेश वेगळा तर आहे.परंतु, तो इतरांपेक्षा सकस आहे.कारण प्रत्येक मतावर चिकित्सा करणे हा प्रत्येक मानवाचा अधिकार आहे. त्या अधिकारानुसार प्रत्येकाने आपली मत मांडली पाहिजेत , हा त्या पाठीमागचा स्वयंप्रकाशित होण्याचा मुख्य उद्देश बुद्धांनी सांगितला. जगातील कोणतीही व्यक्ती सम्यक संबुद्ध होऊ शकते. जगाच्या पाठीवर असा उपदेश देणार एकमेव मार्गदर्शक तथा मार्ग दाता "बुद्ध" आहे!!! ते स्वतःला कधीही सर्वोच्च स्थान देऊन स्वतःची पूजा अर्चा करण्यास स्पष्ट नकार देतात. त्याही उपर जाऊन ते पुढे सांगतात की , प्रत्येक जण सम्यक संबुद्ध होऊ शकतो . प्रत्येकाला 'अरहत' प्राप्त होऊ शकते. प्रत्येकाने त्यांनी दिलेल्या साधनेवर जर पाऊल ठेवले तर कोणालाही ते अशक्य नाही. ही वस्तुस्थिती जगाच्या मानव कल्याणासाठी प्रत्येक मानवाला देताना बुद्धांनी कधीही संकोच बाळगला नाही. स्वतःला कधीही देव मानले नाही. म्हणून ते सरळ सांगतात स्वतः स्वयंप्रकाशी व्हा!
सिद्धार्थ गौतम म्हणून सरळ सर्वांना संदेश देतात एखादा कोणीतरी महात्मा काहीतरी सांगतो म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका.कारण , शाश्वत सत्य पडताळणी हा प्रत्येक मानवाचा अधिकार आहे. बुद्ध जे सांगतात त्यानुसारच ती कृतीही करतात. आचरण हा बौद्ध धम्माचा मूळ पाया आहे . चारित्र्याची शुद्धता हीच खरी व्यक्तीची विश्वासनीयता आहे. बुद्धांनी जे बुद्धत्व प्राप्त केले. ते फक्त बुद्धांनाच प्राप्त होईल असा ते दावा कधीही करू शकत नाही. जो योग्य त्या साधनेने जाईन अचरण करील त्या प्रत्येकास तो हक्कही आहे आणि ते प्राप्तही होईल.
बौद्ध धम्मामध्ये साध्या,सरळ आणि सोप्या पद्धतीने पाच मार्ग सांगितलेले आहेत ते म्हणजे, पशु हत्या करणार नाही, खोटं बोलणार नाही, व्याभीचार करणार नाही, चोरी करणार नाही, आणि कोणतेही मद्य सेवन करणार नाही. या जोडीला अष्टगम मार्गाचा स्वीकार करून माझे जीवन सार्थक ठरवेल असा सर धोपट मार्ग सर्वांनी स्वीकारल्यास जीवनातील दुःखाचे कारण सहज उमगेल आणि माणूस म्हणून जीवन जगू शकेल..!!!
श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर स्वामी निगमानंद महाराज पुण्यतिथी सोहळा
महाराष्ट्रातील थोर संतांच्या संगतीत सहवास लाभलेले ब्रह्मभूती स्वामी निगमानंद महाराज यांचे 20 ऑक्टोबर 2023 रोजी चतुर्थ पुण्यस्मरण सोहळा मोठ्या थाटात संपन्न होत आहे . या सोहळ्याची सर्व नियोजन व आयोजन गडाचे मठाधिपती श्री स्वामी जनार्दन महाराज गुरु निगमानंद महाराज हे करत आहेत या पुण्यतिथी सोहळ्यास पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून आयोजित केलेल्या कीर्तन सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वामी जनार्दन महाराज यांनी केले आहे.
पुण्यतिथी सोहळा निमित्त ब्रह्मभूत गुरुवर्य स्वामी निगमानंद जी महाराज यांचे पुण्यस्मरण सर्व भक्तगणांना व्हावे म्हणून अश्विन शुद्ध पंचमी गुरुवार दिनांक 19 /10/ 2023 रोजी रात्री सहा ते आठ वाजता श्री ह भ प महंत संभाजी महाराज श्रीक्षेत्र तुकाराम महाराज संस्थान मादळमोही यांचे कीर्तन होईल. नंतर आठ ते नऊ वाजता समाधी अभिषेक होईल.
अश्विन शुद्ध षष्ठी शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी दहा ते बारा वाजता श्री ह भ प गुरुवर्य महंत भास्करगिरी महाराज श्रीक्षेत्र दत्त संस्थान देवगड यांचे अमृततुल्य कीर्तन होईल. त्यानंतर पंचक्रोशीतील सर्व गावकरी व सर्व भाविक भक्त यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
वरूनराजा..थांबरे आता!!!
आम्ही माणस तू कसाही आलास काय अन गेलास काय ?
आला तरी आम्ही शिव्याच घालतो
आणि
नाही आलास तरी शिव्याच देतो.
पण तू आमचा पोशिंदा ना,
तुलाच आमची काळजी.
आम्ही लेकरे री तुझी
आम्ही चूक केली काय अन नाही केली काय
पण तू आम्हाला माफ करत आलास
इथून पुढेही माफ करणारच तू !!
कारण तू आमचा दातायस .
असो लेकरे गाऱ्हाण तिथेच करतात जिथे हट्ट पुरवला जातो
व रागही तिथंच व्यक्त केला जातो जिथे अतूट नात्याचं प्रेम असत.
हे हि तूच शिकवलंस अम्हास..खरंय ना हे ?
मग बघना आमची तू तहान भागवलीस ,
गुरांना चारा दिलास , पशूपक्षाना अन्न पाणी सुद्धा दिलंस
आता आम्हा पांढरपेशा लोकांना झाडाला पाण्याच्या बाटल्या लटकावायची गरज नाही ठेवलीस।
आम्ही तुझचं घेतो , जमलंच तर तेच दिन दुबळ्यांना दिलच तर माध्यमातून दिंडोरा पिटायला कधी मागेपुढे पाहत नाही ?
पण आमच्या या स्वार्थापुढे तू हे माफच करत आलास.
किती रे तुझी करूणा हि.
हे करुणाकरा .....
आमच्यावर करुणा करशील का ??..
तुझा अंमच्यवरचा राग मान्ययरे
आम्ही माणस स्वार्थापोटी गटात, जातीत ,धर्मामध्ये विखुरलो
अन एकमेकांच्या जीवावर उठलो नव्हे कित्येक निरपराध लोकांचा यात बाळी गेलाही.
दोन दिवसापूर्वीचच बघना 20 भरतिय जवान मारले बघ त्या निर्दयी पशूंनी.
काय म्हणत असतील त्या शहिदांच्या माता ?
आई रडून सांगेल ,पण त्या पित्याने आपला टाहो कोठे फोडावा सांगना ?
आज कोणताही बातम्यांचा चॅनल लाव कोठेतरी एक निर्भया घडलेली असते.
अस ऐकल्यावर नखशिखांत अग्नीचा डोंब उसळतो.
पण काय करणार करता तर काहीच येत नाही.
शेवटी तुलाही हे सहन होत नसावं म्हणून तर तू असा कोपत आहेस काय ?
असा प्रश्न मनाला स्पर्शून जातो.
पाठीमागं वळून पाहिल्यावर तू केदारनाथ , बिहार , मुबई(2005), यापैकी कोणालाच सोडलं नाहीस.
आम्ही आमच्यातील माणुसकी हरवत चाललोय मान्य आहे.
जग खंडाबरोबर धर्मात विखुरलं
एका खंडातून अनेक देशात
एका देशातून अनेक पंथ , धर्म , आणि धर्मातील जाती.
कधी कधी घडणारया घटना पाहून एक प्रश्न पुन्हा पडतो-
"मांणसासाठी धर्म असतो कि ,
धर्मासाठी माणूस ?"
या व्यर्थ वल्गना करत बसण्यापेक्षा माझी एक विनंती ऐकशील वरूनराजा...
आज आम्ही मानव न्यायय् हक्कासाठी मोर्चे आंदोलन अन प्रति आंदोलन/ मोर्चे यात अडकून पडलोय .
पण माणूस म्हणून जर जगलो ना तर अशा किळसवाण्या घटना घडणारच नाहीत.
पण उद्या आम्ही या देशासाठी याच बांधवांसाठी जीव देणारी आमची मनुसकीरे.
आज सोन्यासारखी पीक अलयीत, सर्वजण खुश आहेत तुझं येन सर्वानाच सुखद धक्का आहे
पण हाच धक्का उद्याचा बुक्का होऊ देऊ नकोस.आज अख्खा महाराष्ट्र न्हाहून निघालाय
तुझीच कृपा आहे.
शेतकऱ्यांच्या पिकात माती तर आमच्या मुखात माती गेल्यासारखं होईल.
शेतकार्याच्या याच पिकावर खूप अपेक्षा आहेत. उद्या याच गोष्टीवर त्याला मुळीच लग्न करायचय, पोरांची शिक्षण पुरन करायचेत,
एवढच काय वरूनराजा सावकराकडची गहन जमीन सोडवून घ्यायची, जमलंच सारं तर मनातला एखादा नवस फ़ेडायचाय .
पण एकमात्र खरं , हे पिकांचं जर का नाही जमलं तर 'मात्र' झाल्याशिवाय राहरणार नाही.
हे वरूनराजा
माझ्या या शेतकऱ्याला नको त्या गोष्टीकडे
आणि जीवनाच्या दोरखंडाकडे जाण्यापासून वाचवरे करुणाकरा!
वरूनराजा .....थांब रे आता!!!
:-डोंगरदिवे राहुल रामकीसन
On the occasion of celebrating Independence Day of India 15th August 2023.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
#The preamble of Indian Constitution
निकोप भारतासाठी मानसिकता बदलायला हवी
दलित म्हटलं की एका विशिष्ट वर्गाचा उल्लेख आणि त्या वर्गाविषयी असणारी एका विशिष्ट वर्गाची मानसिकता अत्यंत हीन व समज गैरसमजात असते . या ठिकाणी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. हजारो वर्षांपासून चालत आलेली हीन मानसिकता बदलणे सोपे नाही . परंतु विशिष्ट वर्गाने वैचारिक परिवर्तन करून घेतल्यास एकमेकांविषयी सामाजिक सामंजस्य राखल्यास त्या ठिकाणी मोठा बदल होऊ शकतो. वास्तवामध्ये प्रत्यक्ष असे घडतेघडते, हिंदू धर्मानुसार स्पृश्य आणि अस्पृश्य हे जे दोन घटक आहेत हीच मानसिकता आजही दिसून येते. त्याची तीव्रता कमी झाली एवढेच ! जेव्हा केव्हा आजचा आधुनिक दलित शिक्षण घेऊन पुढे जातो आहे, तेव्हा मात्र त्याच्यावर व त्याच्या गुणवत्तेवर जातीय समीकरणे कळत नकळतपणे लादली जातात. विशिष्ट वर्गवारीतून आलेला एखादा व्यक्ती आपल्या कार्यक्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करत असला तरीही त्याच्या कामाची चर्चा तर होतच नाही. परंतु ,तो कुठे चुकतो किंवा कोणती एखादी कळत नकळतपणे चूक घडते यावर एक विशिष्ट वर्ग लक्ष ठेवून असतो अर्थातच त्या व्यक्तीची कमतरता शोधून त्यावर मानसिक व सामाजिक एक प्रकारचा अदृश्य हल्लाच केला जातो.
पारतंत्र्यातील भारत आणि पारतंत्र्यानंतरचा स्वतंत्र भारत हा सर्व जगाचा आदर्श जरी ठरत असला तरीही त्यातील अंतर्गत जातीय समीकरणे , धर्म , पंथ यांच्यातील अंतर्गत कलह सुप्त अवस्थेमध्ये शीत युद्ध खेळत आहेत. जेव्हा-केव्हा याचा आगडोंब उसळतो तेव्हा, येथे वेगवेगळ्या नावाखाली दूर गंभीर परिणाम दिसून येतात. मग मणिपूर मधील हिंसाचार असेल, लव जिहाद सारखी प्रकरण असतील, जाती-जातीतील मतभेद हे कायमस्वरूपी आपल्याला पाहायला मिळतात. ज्या जातीचा मोठा समूह असतो ते समूह छोट्या जातीतील लोकांवर अन्याय अत्याचार करताना दिसतात. प्रस्थापित जाती आणि इतर जाती यांच्यामधील वैचारिक अधिष्ठान आणि एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आजही तेवढाच संवेदनशील आहे की, जेवढा स्वतंत्र भारताच्या अगोदर होता. भारत स्वतंत्र झाला भारताला स्वतःचे संविधान मिळाले. राज्यघटनेने प्रत्येकाला हक्क, कर्तव्य आणि जबाबदारी देऊन टाकली . वास्तविकता अशी आहे की, जो हक्क मागतो त्यालाच या ठिकाणी दोशी ठरवण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि त्यांना यशही येते. जो हक्क मागतो त्याला हक्क तर मिळतच नाही पण सजा मिळायला वेळ लागत नाही. प्रश्न पडेल सजा म्हणजे फक्त कायदेशीर गुन्हा ठरणे काय? तर ही सजा कायदेशीर गुन्ह्यात न येता सामाजिक गुन्हे मध्ये येते. अशी बरीचशी प्रकरण आहेत जी कायद्याच्या पटलावर न येता न्यायव्यवस्थेपासून वंचित राहतात आणि सामाजिक न्यायव्यवस्था त्यांना जेल पेक्षाही पत्थर वागणूक देते. समाजामध्ये अशी अनेक प्रकरण आहेत, जे मोठ्या समाजातील लोक छोट्या समाजावर अन्याय अत्याचार करतात किंबहुना स्त्रियांवर सुद्धा अत्याचार होतात. परंतु सामाजिक दबाव आणि हलाखीची परिस्थिती यामुळे ही गरीब लोक सामाजिक दबावा पुढे झुकतात. याचाच अर्थ असा होतो की, त्या ठिकाणी अन्याय होऊनही गप गुमान ते सहन करतात आत्मसन्मान आणि स्वाभिमान या गोष्टी त्यांच्यापासून सर्व कोसो दूर आहेत.
या उलट दुसरी गोष्ट या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावीशी वाटते. जर या छोट्या जातीच्या व्यक्तीकडून एखादा अपराध झाल किंवा संशयाचा बळी ठरला. तर त्याला गावाबाहेर हाकलून दिले जाते. जातीच्या नावावर त्याला नको ती ताशेरे ओढले जातात. त्याची मानसिक मानहानी करून त्याला न्यायालयीन हक्कापासून वंचित ठेवले जाते. कारण, समाजव्यवस्था अशी बनलेली आहे की, मोठ्या समाजावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष , समज गैरसमज किंवा खरंच अन्याय झाला असेल तर त्या बाजूने न्याय हक्कासाठी सर्वजण सहकार्य करतात . खरंच अन्याय असेल तर सहकार्य करणे गैर नाही. अन्याय करणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे. पण या उलट छोटा मोठा करत बसण्यापेक्षा जो अपराधी आहे. त्याला शिक्षा झालीच पाहिजे. अशी सरळ आणि साधी भावना प्रत्येकाने जपली तर कोणत्याही एका विशिष्ट घटकावर अन्याय होणार नाही.
भारताला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे झाली. तरीही स्वातंत्र्याचा खरा अर्थ आपल्याला कळलाय का? असा प्रश्न मनामध्ये सारखा भेडसावतो. प्रत्येक ठिकाणी अन्याय आणि अत्याचार यांची सीमाही अटकेपार गेलेली आहे. प्रत्येक ठिकाणी अन्यायाच्या घटना घडत असताना केंद्र सरकार व राज्य सरकार यांची शासन व्यवस्था कोणत्या पद्धतीने काम करते? हे कळायला थांग पत्ता लागत नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्राला प्रश्न केल्यास केंद्र शासन म्हणते, 'तो त्या वैयक्तिक राज्याचा प्रश्न आहे' आणि राज्य शासन म्हणते, 'केंद्राने हस्तक्षेप करायला हवा' दोन्ही सरकार- केंद्र शासन व राज्य शासन एकाच पक्षाची शासन व्यवस्था असून निर्णय प्रक्रियेमध्ये एवढी दिरंगाई का आहे? प्रत्येक राजकीय पक्षांची मत मतांतरे वेगवेगळी असू शकतात, विचारधारा वेगळ्या असू शकतात. देशासाठी सर्वांनी एकत्र यायला काय हरकत आहे? सामान्य माणसाने एवढी माफक अपेक्षा का करू नये? जागतिक पटलावर भारताचे प्रतिमा उंचावली हे जेवढे वास्तव आहे तेवढेच, अंतर्गत अस्थिरता आपल्याला रोखू शकत नाही . याचीही जाण सध्याच्या राजकीय लोकांनी ठेवावी. असं म्हटलं जातं, स्वतःचं घर संभाळावं म्हणजे, गावगाडा सांभाळता येतो. गाव सांभाळता आलं, तालुका , जिल्हा सांभाळता येतो. ज्याची जिल्ह्यावर पकड असते, तो राज्य आणि देश सांभाळू शकतो.एक मोठा राजकीय नेता होतो. देशाची सूत्रे हाती आल्यावर त्यांना सर्वांसाठी उद्देशाचा नायक म्हणून काम करणे अपेक्षित असते. पण...जेव्हा असे प्रसंग वास्तवात उतरतात, तेव्हा मात्र हिच राजकीय मंडळी पारंपरिक पद्धतीने आलेल्या राजकारणाची मुळी पकडून आधुनिकतेचा आव आणून हत्तींच्या दातासारखा खेळ करतात. हे वास्तव कोणीही मान्य करेल. कारण, सध्याची देशाची आणि राज्यांची राजकारणाची स्थिती तीच आहे.
जेव्हा भारत विकसनशील राष्ट्राचे स्वप्न पाहतो आणि प्रत्यक्ष उतरवण्यासाठी राजकीय रणनीती अवलंबितो. सध्याची 'मेक इंडिया' सारखे तत्व असो किंवा इतर असलेल्या योजना असो, त्या प्रत्यक्ष उतरवण्यासाठी गुणवत्तेला प्राधान्य देणे. या वाचाळ वाणी नव्हेत तर, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. प्रत्येक राजकीय नेत्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे . कोणताही नेता उच्च पदावर विराजमान होतो. याचा अर्थ तो त्याच्या कसोटीमध्ये यशस्वी झालेला असतो. पण जेव्हा यशस्वी होतो, तेव्हा त्याने आपली राजकीय भूमिका मांडत असताना ' संविधानाला ' विसरता कामा नये . कारण ,विकसित राष्ट्रासाठी निष्पक्ष भूमिका व त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना, उद्योग क्षेत्रातील लोकांना पुढे घेत असताना, त्या उद्योगाची फंडामेंटल काय आहे? त्याचबरोबर एखादा उद्योग अत्यंत कुशल पद्धतीने राबविण्यात येत असेल, तर अशा उद्योगांना चालना देण्यासाठी राजकीय मंडळीने 'जी ट्वेंटी' सारख्या विचारधारेमध्ये सहभागी करून घेऊन, भारतासाठी नवदृष्टी मांडण्याचा किंबहुना सिद्ध करण्यासाठी त्यांना संधी देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर विरोधी गटाला सुद्धा आपले मत मांडण्यासाठी वेळ देता आला पाहिजे. अशी जर मानसिकता नसेल तर , एक तर्फी हुकूमशाही अस्तित्वात आहे की काय? असे जनतेला वाटायला नको. कारण लोकशाहीमध्ये विरोधी गटाच्या भूमिकेला अत्यंत महत्त्व आहे विरोधी गटाशिवाय लोकशाही जिवंत राहू शकत नाही .असे होत नसेल तर, त्या लोकशाहीचा उपयोग काय?
एकंदरीत सध्याची राजकीय स्थिती व देशाची मानसिकता व तिला योग्य ठिकाणी किंवा अयोग्य ठिकाणी घेऊन जाण्याची राजकीय नेते मंडळाची भूमिका, ही अत्यंत पूर्वाश्रमीच्या मानसिकतेवर आधारित आहे. एखादा कुशल नेता असेल तर तो 'भारतीय' आहे . यापेक्षा तो कोणत्या जातीतला आहे. असाच विचार केला जातो. त्यानंतर तो कोणत्या 'धर्माचा' किंवा 'पंथाचा' आहे. असा विचार केला जातो. परंतु तो 'भारतीय' आहे. हा विचार कोणीच करत नाही. देशावर संकट आल्यानंतरच आपण भारतीय आहोत. "भारत माझा देश आहे.." या देशासाठी प्राण्यांची आहुती द्यायला प्रत्येक जण तयारही होतो. ही झाली ' 'देश भावना', 'देशप्रेम' मग देशात समतेने , आनंदाने राहण्यासाठी आपलं 'भारतीयत्व' कोठे जाते? भारतातील प्रत्येक घटक हा संकट समईच एक येणार आहे का ? तेव्हाच आपलं देश प्रेम, राष्ट्रीयत्व, राष्ट्रवाद जिवंत होतो, प्रखर होतो आणि न्याय हक्कासाठी आपण बंड आणि आंदोलने करतो. युद्धाच्या प्रसंगी ही आपण एक होतो. मग हीच मानसिकता आनंदाने राहण्यासाठी का बदलत नाही. तेव्हा मात्र हीच राजकीय मंडळी या अस्थिरतेचा फायदा घेऊन राजकारण करताना, त्याचबरोबर वेगवेगळ्या विचारधारा ही सत्तेमध्ये सामील होण्यासाठी अनेक प्रकारच्या युवत्या करताना, सर्व देश पाहतो आहे. हेही यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. अन्याय झाला असेल मग तो कोणीही असो तो 'गुन्हेगार' आहे याच दृष्टीने तिच्याकडे पाहायला हवे. परंतु अन्याय करणारा कोणत्या समूहातून येतो. त्यानुसार जर त्याचा न्याय निवडा केला जात असेल तर मात्र चिंतेची बाब आहे. अशा प्रकारची विकृत मानसिकता बदलण्यासाठी सामाजिक, राजकीय, धार्मिक , पंथ या सर्वांचीच भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. जर सर्वांनीच ठरवले 'न्याय' हा 'न्याय' असला पाहिजे . विघातक विकृतींना या ठिकाणी वाव नसला पाहिजे. तेव्हाच न्यायदेवतेच्या हातातील तराजू संतुलित राहील! अर्थात न्यायव्यवस्थेचे वेगळेपण सक्षम आणि सामान्य जनतेसाठी हक्काचे ठिकाण राहील! आजही हक्काचे ठिकाण आहे. परंतु , वर उल्लेख केलेल्या मानसिकतेचा विचार केल्यानंतर थोडीशी मनात शंका येते.
शेतकरी- THE FARMER
जगाचा पोशिंदा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, तो म्हणजे शेतकरी!!! जो प्रत्यक्ष संघर्ष संघर्ष करत असतो . प्रत्येक वेळेला तो एक प्रकारची पैंज लावत असतो पैंजमध्ये हरत असतो. जगामध्ये एकमेव असा हा शेतकरी निसर्गाच्या जीवावर , भरवशावर लाखो रुपये मातीखाली टाकत असतो . शाश्वती मात्र कोणतीच नाही. पण त्या शेतकऱ्याला कसली सुट नाही की, भविष्यातील संकटांना सामोरे कसे जायचे याची थोडीशी सुद्धा चिंता नसते . यश आलं तर कष्टाचा चीज झालं आणि अपयश आलं तर नशिबात नव्हतं! हे एक वाक्य त्याच्या जीवाला साथ घालून जाते. अपयशातही जीवन जगतो आणि यशामध्येही जीवन जगतो. जगत असताना यातना काय होतात? त्या शेतकऱ्यापेक्षा जास्त कोणी जानु शकत नाही. कारण आपण फक्त व्यासपीठावरून आणि एखाद्या पेपर संवादातून व्यथा मांडू शकतो पण त्या व्यथा आपण प्रत्यक्ष जगल्यानंतर त्याची दाहकता आणि दुःख किती असते याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही.
पूर्वीपासून शेतकऱ्याची हाल अपेष्टा होत असताना आपण सर्वजण पाहतो किंबहुना आपण त्यातला एक भागही असू शकतो. आधुनिक युगातील शेतीमध्ये क्रांती होत गेली . कमी क्षेत्रांमध्ये अधिकचे उत्पन्न होऊ लागले. धवल क्रांती आणि हरितक्रांती झाली . प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्याला याचा कितपत लाभ झाला हे कोणालाही अचूक सांगता येणार नाही . परंतु ज्या ठिकाणी जलसिंचन वाढले त्या ठिकाणी फळ बागायती शेतीचे क्षेत्रही विकसित झाले . विशिष्ट ठिकाणचा विकास झाला म्हणजे सर्व शेतकऱ्यांचे विकास झाला असं म्हणता येणार नाही. अज बहुतेक क्षेत्रामध्ये जलसिंचन योजना पोहोचलेल्या नाही. त्यामुळे तेथील शेतकरी आजही निसर्गावर आधारित शेती करत आहे . खास करून मराठवाडा, विदर्भ , खान्देश या ठिकाणी जलसिंचन नसल्यामुळे येथील शेतकरी निसर्गावर आधारित शेतकरी करतात आणि त्यांची शेती म्हणजे पूर्णतः एक प्रकारचा जादूचा आकडा असे म्हणावे लागेल .
शेतकरी शेती करत असताना त्या शेतीमध्ये त्याचा कुटुंबातील सर्व सदस्य शेतीमध्ये राब राब राबतात. शेती पिकवतात शंभर टक्के निसर्ग वर आधारित शेती करताना तर वर दगड आणि खाली माथा अशी परिस्थिती आहे . त्यामुळे शेतीमध्ये कुठल्याही उत्पादन जर चांगले आले तर त्याला बाजार भाव मिळत नाही . व्यापारी धोरण त्या शेतकऱ्यांच्या पदरात योग्य असा भाव पदरात पडू देत नाही. याच जर उदाहरण द्यायचं झालं तर, महाराष्ट्रातील कापूस पिक मोठ्या प्रमाणात पिकवले जाते. कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे या ठिकाणी शेतमजुरापासून शेतकऱ्याला चांगले दिवस आले आहेत. पण होतं काय, जर शेतकऱ्याने कापूस सुरुवातीला विकला तर त्या कापसाला शेवटी चांगला भाव असतो. हा झाला एका वर्षाचा अनुभव . म्हणून शेतकरी दुसऱ्या वर्षी आपल्या कापसाला शेवटी चांगला भाव येईल म्हणून कापसाचा साठा आपल्या घरी करून ठेवतो. त्यामध्ये मग अनेक अडचणी असतात अंगाला खाज सुटणे, लहान मुलाकडून किंवा इतर माणसाकडून नकळतपणे साठवलेल्या कापसाला आग देखील लागते. एवढा त्रास सहन करून शेतकरी त्या कापसाचे जतन करतो आणि शेवटी भाव योग्य मिळेल या आशेवरती तो जगत असतो. पण....होतं काय ज्या वर्षी शेतकरी मोठ्या प्रमाणात कापसाची साठवण करून ठेवतो नेमकं त्याच वर्षी कापसाचे भाव गडगडलेले असतात. तेव्हा, मात्र शेतकऱ्यांना काय करावे आणि काय करू नये असे होते. हा झाला पहिला भाग. नंतर कधी कधी तर असे होते शेतकऱ्याला सुरुवातीला चांगला भाव येतो तर कधीकधी मध्ये मध्यापर्यंत चांगला भाव येतो पुन्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची भारतीय बाजारपेठेवर परिणाम झालेला दिसून येतो . यामुळे शेतकरी आणि छोटे व्यापारी ही तोट्यात येतात. मग शेतकऱ्यांना प्रश्न पडतो आपण कापूस कधी विकायचा ? किती दिवस ठेवायचा? आणि कधी विक्रीला काढायचा ? याचा अंदाज सांगणार आज कोणीही नाही ,त्यामुळे आज शेतकरी मोठा तोट्यात जात आहे . परिणामी तो नको त्या मार्गावर जाऊन अपवादात्मक असेही प्रकार घडतात ते आपले जीवन यात्रा संपवतात.
ज्वलंत उदाहरण म्हणजे औरंगाबाद विभागाचे माजी आयुक्त माननीय केंद्रेकर साहेबांनी केलेला सर्वे याची बुलंद साक्ष आहे. हा सर्वे एक लाख लोक आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे असे स्पष्टपणे सांगून शासन दरबारी हा मुद्दा मांडला. शासनाने दखल न घेतल्यामुळे किंवा इतर कारणामुळे राजीनामा दिला. जेव्हा माझी आयुक्त साहेबांनी हा सर्वे केला तेव्हा त्यांनी काही विशिष्ट प्रश्नावली तयार केली होती . त्या प्रश्नावली मध्ये त्या शेतकऱ्याच्या दैनंदिन जीवनाचे चित्र स्पष्ट दिसत होते . त्यावर आधारित हा सर्वे अत्यंत तंतोतंत किंबहुना शंभर टक्के वास्तव म्हणावा लागेल. कारण आज पर्यंत एवढा ग्राउंड वर रिपोर्ट कधी झालाच नव्हता. आत्महत्येची कारणे समजतच नव्हती . ती समजण्यामध्ये अधिकारी कितपत यशस्वी झाला येणारा काळ सांगेल. तेव्हा मात्र शासनाने या अहवालाची आणि अहवालावरून केलेल्या शिफारशीची दखल घेतली असती तर बरे झाले असते. असे आत्मपरीक्षणाची वेळ या शासनावर येऊ नये.
आजच्या काळामध्ये सर्व सेवाभावी संस्था ,सामाजिक संघटना, शेतकरी संघटना , मजूर संघटना व सामाजिक चळवळीत काम करणारे ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक या सर्वांनी मिळून शेतकऱ्यांचे उद्बोधन वर्ग आयोजित करून शेतकऱ्यांचे मन घट्ट करून त्यांच्यामध्ये नवचेतना निर्माण करण्यासाठी,"एक होता कार्व्हर" सारखी पुस्तके त्यांच्या वाचनात आणून द्यावी . त्याचबरोबर शेती उद्योगांमध्ये यशस्वी महान व्यक्तींची चरित्रे त्यांना प्रेरणादायी होतील अशा स्वरूपात त्यांच्यासमोर मांडण्यात यावी की , ज्यामुळे त्यांच्यामध्ये नवचेतना निर्माण होणे, सर्वसाधारण शेती न पाहता ती शेती उद्योग म्हणून पहावी व यशस्वी शेती उद्योजक निर्माण व्हावेत. यासाठीचे प्रयत्न करणे आवश्यक आहे. असं जर झालं तर शेतकऱ्यांना मानसिक आधार मिळाल्यामुळे रडण्याऐवजी ते लढायला शिकतील. आशि त्यांची मानसिकता घट्ट करणे केवळ वरील लोकांची जिम्मेदारी नसून त्यात शासनाचा सिंहाचा वाटा असावा. शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव , त्याचबरोबर घरामध्ये होणाऱ्या नुकसान भरपाईची सोय सुद्धा शासनाकडून करण्यात आली तर, शेतकरी हतबल न होता मोठ्या उमेदीने जगायला शकेल. शेती व्यवसाय हा सर्व व्यवसायांना पुढे पुढे घेऊन जातो मग इतर व्यवसाय धारकांनी सुद्धा शेतकरी व शेती व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे. किमान बी बियाणे विक्रेते यांनी शेतकऱ्यांची अडवणूक न करता त्यांना योग्य त्या किमतीत बी बियाणे, खत यांची विक्री केली जावी. एवढी माफक अपेक्षा करायला काय हरकत आहे. वर उल्लेख केलेल्या सर्व घटक सामान्य जरी वाटत असले तरी, ते इतके मोलाचे आहे. ज्यामुळे एखादा शेतकरी निश्चितच शेवटच्या टोकापासून किंबहुना आत्महत्येपासून दूर जाईल आपल्या कुटुंबाचा आधार बनेल.
।।जय जवान जय किसान।।
📝#Rahul Dongardive
Manipur incident is the height of brutality
भारत जगातील आगळावेगळा देश म्हणून सर्वत्र परिचित येथील धर्म, जाती, पंथ, वेशभूषा, पारंपारिक पद्धती यांना सर्वसमावेशक असणारा हा भारत जगामध्ये आपलं वेगळेपण सिद्ध करतो. स्वातंत्र्य पूर्वीचा भारत आणि स्वातंत्र्योत्तर भारत अल्पावधीमध्ये केलेली अफलातून प्रगती पहिल्यावर जगालाही हेवा वाटतो. ज्या ठिकाणी विज्ञानाची सुरुवात शून्यातून झाली तिथे इस्रो वैज्ञानिक संस्था आज जगामध्ये आपला विलक्षण ठसा निर्माण करत आहे. 14 जुलै 2023 दुपारी दोन वाजून 35 मिनिटांनी चंद्रयान थ्री चे प्रक्षेपण यशस्वी झाले. सर्व भारतीयांसाठी गौरवाची अभिमानाची बाब ! पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून यशस्वीपणे अंतराळात सुद्धा भरारी घेणारी महिला याचा जगाला अभिमान. भारतीय वंशाच्या असणाऱ्या कल्पना चावला आणि सुनीता विल्यम नागरिकत्व जरी अमेरिकेचे असले, नासा मधून जरी त्या चंद्रावर जाऊन परतत असताना यांनास तांत्रिक अडचण आल्यामुळे कल्पना चावलाचा मृत्यू झाला. जगामध्ये या भारतीय वंशाच्या आहेत म्हणून भारताने मोठा त्यांचा गुणगौरव केला . सर्व देशवासीयांना याचा अभिमान होता.
भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू आदिवासी समाजातील उच्चपदस्थ महिला म्हणून सर्वांना गर्व आहे. एका बाजूला केलेला महिलांचा गौरव आणि दुसऱ्या बाजूला भारतामध्ये लांच्छनास्पद घडलेल्या घटना यामधील खूप मोठी दरी पाहिल्यानंतर आपण अनेक क्षेत्रामध्ये आपली प्रगती करत आहोत तर दुसऱ्या बाजूला त्याच महिलेच्या इज्जतीचे धिंडवडे भर चौकात काढले जातात. यावर एक शब्द किंवा एखादा प्राईम टाईम हल्लाबोल कोणत्याही चैनल वर दिसला नाही. ही लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभ याकडून अवहेलना होत नाही का? साध्या साध्या गोष्टीला ब्रेकिंग न्यूज बनवणारा मीडिया एवढी मोठी घटना मणिपूरमध्ये घडते त्यावर एक चकार शब्द निघत नाही. फक्त मनिपुर पेटला आहे,जळतो आहे, दोन-तीन महिन्यापासून तेथील आग शांत होत नाही. डबल इंजिन सरकार आहे तरीही राज्यातील आरजुकता वाढतच आहे. याची कारण आणि मूळ शोधण्यात मीडियाला रस वाटत नाही का ? घटनाही तीन मे 2023 रोजी घडते त्याची पडसाद सीमित भागापुरते राहतात. मानवाच्या मनाला हेलावून आणि स्तब्ध करून टाकणारा व्हिडिओ हळूहळू व्हायरल होतो. महाराष्ट्रापासून देशाच्या राज्यसभेपर्यंत सभागृहा तहकूब होतात तेव्हा, कुठे आपल्या मिडीयाला जाग येते आणि ब्रेकिंग न्यूज लागते...हे सर्व रिपोर्ट अगोदरच मीडियाला माहीत असावेत परंतु जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकणार नाही. आजही जातीय चटके या देशांमध्ये आपणाला अनुभवायला मिळत आहेत प्रत्येक राज्यामध्ये एक विशिष्ट वर्ग एका विशिष्ट वर्गाच्या विरोधात हेवा करू लागलेला आहे.
मणिपूर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला निर्देश दिले की, मैंतेई समाजाचा अनुसूचित जनजातीमध्ये समावेश करण्यात यावा,त्यासाठी त्यांनी योग्य ती पावले उचलावी. या निर्देशाचे समज गैरसमज पहाडी भागात राहत असणाऱ्या आदिवासी जमाती 'कुकी' व 'नागा' यांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे समज गैरसमज निर्माण होऊन या निर्णयाच्या विरोधामध्ये 'ऑल ट्राईब स्टुडंट्स मनिपुर ' द्वारे मोठा मोर्चा निघाला. मोर्चामध्ये किमान 50 ते 60 हजार विद्यार्थी सहभागी होते आणि या ठिकाणी खऱ्या समज आणि गैरसमजला सुरुवात झाली. अगोदर सोशल मीडिया रिपोर्ट आणि त्यानंतर मीडिया यांच्यानुसार त्या मोर्चामध्ये अनुसूचित जमातीवर मैंतेई समाजाच्या लोकांनी आक्रमण केले आणि मोर्चामध्ये हल्ला कल्लोळ माजला. मोर्चाची कुठेही वाच्यता होऊ नये म्हणून मणिपूर सरकारने तीन मे रोजी सर्व इंटरनेट सेवा बंद केली होती. जो विद्यार्थ्यांच्या मोर्चामध्ये गैरसमज निर्माण झाला होता. अगदी त्याच प्रकारचा मैंतेई समाजामध्ये गैरसमज निर्माण झाला. मोर्चाचे दंगलीमध्ये रूपांतर झाले होते. प्रत्येक ठिकाणी लोक सैरावैर भटकत होते . एकमेकावर हल्ले होत होते. क्षणांमध्ये शांत असणारा मणिपूर आगीने होरपळत होता.
मणिपूरच्या पहाडी भागांमध्ये राहणाऱ्या नागा आणि कुकी समाजाच्या मनामध्ये प्रस्थापित असणाऱ्या मैंतेई समाजाबद्दल काही गैरसमज होते. त्याची कारणही तशीच होती कारण त्यांच्या हे स्पष्ट होते की, मैंतेई हा समाज परकीय आहे. त्याचबरोबर तो आजही पूर्वीपासून सत्तेत आहे. साठ आमदारांपैकी 40 आमदार हे त्याच समाजाचे आहेत . फक्त 20 आमदार हे कुकी आणि नागा या आदिवासी समाजाचे आहेत. जर या प्रस्थापित लोकांना अनुसूचित जनजातीमध्ये समावेश केला गेला तर, आपल्या संविधानात्मक अधिकारावर गदा येईल. कारण संविधानानुसार तेही त्याच जागेवर दावा करू शकतील. शैक्षणिक संस्थांमध्ये व इतर सरकारी कार्यालयामध्ये त्याच लोकांची भरती केली जाईल , हा एक महत्त्वाचा मुद्दा. पारंपारिक पद्धती प्रमाणे प्रस्थापित समुदाय हा पहाडी भागांमध्ये जमीन खरेदी करू शकत नाही. परंतु पहाडी भागातील असणारे कुकी आणि नागा लोक सर्वत्र जमीन खरेदी करू शकतात. जर या प्रस्थापित समाजाला पूर्वीपासून राज्य करत असलेल्या समाजाला अनुसूचित जनजातीमध्येच प्रवेश मिळाला तर, ते लोक पहाडी इलाख्यात आक्रमण करतील आणि येथील मूळनिवासी लोकांचे सांस्कृतिक आणि पारंपारिक अस्तित्व नष्ट होईल. अशी भीती त्यांच्या मनात होती. म्हणून मणिपूर आदिवासी विद्यार्थी संघटनेने मोर्चा काढला होता.
वर उल्लेख केल्याप्रमाण पूर्वी पासून या दोन समाजामध्ये चालत आलेली वैमानस्य व समज आणि गैरसमज याचा विस्फोट झाला. ज्याप्रमाणे कुकी आणि नागा यांच्यामध्ये अफवा पसरवण्यात आली आणि दंगल उसळली त्याचाच परिणाम म्हणून त्याच प्रकारच्या अफवा मैंतेई समाजामध्ये सुद्धा झाल्या. त्याचाच परिणाम म्हणून 04 मे 2023 रोजी समाजाचा 800 ते 1000 लोकांचा समूह आधुनिक क्षेत्रासह एफ आय आर रिपोर्टनुसार बि. फिनोम पहाडी इलाख्यात असणाऱ्या गावात घुसला तिच्यामध्ये एके फोर्टी सेवन, एस एस एल आर, 302 रायफल यासह आदिवासी लोकांवरती आक्रमण केले. यांच्याकडेही शस्त्रे आली कुठून? हा मोठा गंभीर आणि कुठ प्रश्न आहे. मैंतेई समजाणे आदिवासी समाजावर आक्रमण केले आहे. त्यामध्ये ते लोक घरे पेटवतात जीवे मारतात या भीतीपोटी समोरच असणाऱ्या घरामध्ये एक कुटुंब राहत होते. आपला जीव मुठीत धरून जीव वाचावा म्हणून जंगलामध्ये पळत होते. हजाराच्या संख्येने आलेल्या हल्लेखोराने त्यांना पाहिले. त्यांचा पाठलाग करत हल्लेखोरांनी त्यांना गाठले. सुडाने पेटून उठलेल्या नराधमांनी मातेसमान असणाऱ्या पन्नास वर्षीय महिलेला नग्न करून, 21 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केला . चाळीस वर्षे महिलेला सुद्धा नग्न केले . अशा दोन्ही महिला नग्न करून भर रस्त्यावरून त्यांची गावातून नग्न धिंड काढण्यात करण्यात आली. नग्न धिंड काढून सर्वजण हजारोंच्या संख्येने आलेला हल्लेखोरांचा समूह त्या माता माऊलींच्य लग्न शरीराचे दिंडवडे काढून थांबला नाही, तर त्या महिलांच्या प्रायव्हेट पार्टची छेडखानी करत असतानाचा व्हिडिओ अत्यंत संवेदनशील आणि अपमान कारक आहे. एक स्त्री आपल्या इज्जतीचे धिंडवडे इतक्या सहज काढून देईल काय ? स्वतःचे कपडे काढून त्यांच्याबरोबर चालेल काय ? याला ती विरोध करत होती . तिला वाचवण्यासाठी तिचे वडील आले तर त्या नराधमांनी त्याला गोळी घालून जागीच ठार मारले . तेव्हा मात्र ती आपल्या वडिलांसाठी स्त्री निर्वस्त्र होण्यास तयार झाली . तिचा भाऊ तिला वाचण्यासाठी आला तर त्यालाही ठेचून मारण्यात आले. एक अबला स्त्री काय करणार? असेच म्हणावे लागेल. शेवटी त्या नालायक दुष्कर्म करणाऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे ऐकावे लागले. नाही ऐकव तर, आणखीन एक दोन जनाच्या लाशी पडल्या असत्या. एक लाजिरवाणी बाब म्हणजे , यामध्ये पोलीस असूनही काही करू शकले नाहीत. ही मोठी चिंतेची बाब स्पष्टपणे जाणवते . मग अशा लोकांना संरक्षण कोण देणार ? या प्रश्नाचे उत्तर सहज मिळणे शक्य नाही. मन पिळवटून येते,स्तब्ध होते , शब्द राहत नाही आणि यावर , 18 मे 2023 तारखेला एफ आय आर दाखल झाल्यानंतर घटनेमागील पडद्याचा राज बाहेर निघतो. 19 मे 2023 ला प्रस्थापित समजल्या जाणाऱ्या हल्लेखोराकडून कडून केल्या गेलेल्या जगातील सर्वात वाईट घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर येतो आणि देशच काय जगाला सुन्न करणारी घटना पाहून सर्वजण हळूहळू व्यक्त करतात . तरीही केंद्र सरकारला जाग येत नाही याची मात्र शोकांतिकाच आहे.
एवढा वाईट प्रसंग एखाद्या भगिनीशी व्हावा आणि असे दुष्कृत्त करणारा आरोपी दोन महिन्यानंतर अटक होतो. हे कोणत्या विवेकी माणसाला आणि शासन व्यवस्थेला पटेल काय? राज्य सरकार यावर कोणतीही कारवाई सहजासहजी करत नाही. यातच त्याचा अर्थ समजून जायचं आरोपीची किती आणि कुठपर्यंत पोहोच आहे. या दोन्ही समाजाच्या हिंसाचारामध्ये आतापर्यंत 120 च्या वर मृत्यू पावले आहेत. आतापर्यंत 90 दिवसाच्या पुढे झाले तरीही मनिपुर पेटलेलेच आहे . त्यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकार चुपी साधून आहेत . परिस्थिती आवाक्याच्या बाहेर आहे. जेव्हा हे सुप्रीम कोर्टाच्या लक्षात येते तेव्हा, सुप्रीम कोर्ट राज्य आणि केंद्रामध्ये हस्तक्षेप करून यावर गंभीर पावले उचलायला लावते. नसता सुप्रीम कोर्ट दखल देईल अशा प्रकारची खडी सुनावणी केल्यानंतर देशाचे पंतप्रधान मीडियासमोर येतात आणि त्यांचं हृदय भावनाप्रधान होतं. त्यांच्याकडे यावर कारवाई संदर्भात राजकीय सुतवाच निघतात. देशाच्या सगळ्यात शक्तिशाली व्यक्तीकड ही बातमी एवढ्या उशिरा पोहोचते मग सामान्य जनतेकडे न्याय मिळण्यासाठी किती दिवस लागतील ? हे सांगता येत नाही.
हिंसाचार हा हिंसाचार असतो. त्यामध्ये कोण कोणावर करतो. यापेक्षा त्यामध्ये निरपराध आणि निष्पाप लोकांचे बळी जातात. स्त्रियांच्या इज्जतीची लक्तरे वेशीला टांगली जातात. निर्माण झालेल्या परिस्थितीमधून मार्ग काढणे हे येथील राजकीय शासन व्यवस्थेचे सर्वात मोठे आणि प्रथम कार्य असले पाहिजे. न्यायव्यवस्था आहे म्हणून न्याय जिवंत आहे . न्यायव्यवस्थेचे वेगळे महत्त्व आणि लोकांचा विश्वास त्यावर आजही भक्कम झालेला पाहतो. सुप्रीम कोर्टाने जर ताशेरे ओढले नसते, तर यावर पंतप्रधान बोललेच नसते का? असे अनेक प्रश्न आणि शंका मनामध्ये निर्माण होताना आपण सर्वांनी एकच गोष्ट लक्षात ठेवायला हवी. व्यक्ती पेक्षा देश श्रेष्ठ आहे. देशापुढे सर्व व्यक्ती समान आहे आणि हा आपला मूळ गाभा समोर ठेवून अन्याय अत्याचार करणाऱ्याला कठोरातील कठोर शासन व्हावे ही एवढी न्याय मागणी शासन दरबारी उतरावी. त्याचबरोबर नव्वद दिवसापासून पेटलेले मनिपुर शांत व्हावे हीच इच्छा.
# 📝Rahul Dongardive
इंग्रजांनी भारतात प्रथम रेल्वे निर्माण केली भलेही त्याची सुख सुविधा ही त्यांच्यासाठी त्यांनी केलेली असली तरीही, ती एकदम मजबूत उत्कृष्ट गुणवत्तेची होती. हे वास्तव. कोणीही नाकारू शकत नाही. 'व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले', हे काय नवीन नाही. त्यांनी व्यापारही केला ,अन्याय केला अत्याचार केला. तत्कालीन परिस्थितीमध्ये निर्माण केलेली वास्तुशिल्प, नद्यांवरील पुलं यांची बांधणी एवढी मजबूत होती. ते जाऊन आज 75 वर्षे झाली. तरीही त्या काळात केलेल्या एखाद्या वास्तूची गुणवत्ता आपण पाहत आहोत. एवढेच काय त्यांची कार्यक्षमता संपल्यानंतर आजही भारत सरकारशी ते वस्तू किंवा पूल यांच्या विषयीचा पत्रव्यवहार करतात आणि होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव करून देतात.
वरील दाखले येण्याचा एवढाच उद्देश होता की,आज भारत स्वतंत्र आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुद्धा आपण साजरा केला. जग भारताकडे एका मोठ्या आशेने पाहत आहे. एक समृद्ध अशी विकसित राष्ट्राची निर्मिती होत असताना 'विकसनशील' शब्द आपल्याला सोडत नाही. मोठी गांभीर्याची गोष्ट जरी असली, तरी सध्याचे राजकारणी त्याकडे एवढे संवेदनशील आहेत असे वाटत नाही. कारण हजारो कोटी रुपये खर्च होऊन सध्याचे राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग निर्माण केले जात आहेत. महामार्गावरील एवढे मोठे खर्च पाहत असताना हृदय भरून येत. आपला भारत हा विकसित होतो आहे याचा अभिमानही वाटतो. परंतु, जेव्हा रस्ते निर्माण होतात तेव्हा मात्र रस्त्याकडे पाहून चिंता वाटते.
डांबरी रस्ते पावसाने खराब होतात. हे जरी मान्य केले. तरीही त्याची गुणवत्ता एवढी कमकुवत असू नये. रस्ता पुढे व्हावा आणि पाठीमागे डांबर उकडून जावे एवढी तरी गुणवत्ता आजच्या गुत्तेदाराने आणि राज्यकर्त्यांनी सांभाळावी. कारण रस्ता निर्माण केला जातो. हजारो, लाखो, करोडो रुपये त्याच्यावर खर्च केले जातात. त्याचा हिशोबही शासनाला तसा दिला जातो. शासनही त्याप्रमाणे त्याला मंजुरी देते. रोड पूर्ण झाला म्हणून त्याचं कम्प्लिशन सर्टिफिकेट देते. वास्तवात मात्र त्या ठिकाणी खड्ड्यात रोड आहेत? की रोडमध्ये खड्डे आहेत? याचा प्रश्न कोणीही सोडू शकत नाही. भारतातील अनेक राष्ट्रीय किंवा राज्य मार्ग असतील डांबर उखडून खड्डे पडलेच आहेत . रस्त्यावर निर्माण करण्यात आलेल्या नवीन फुल सुद्धा एक वर्षाच्या आत पडावा , यापेक्षा कौतुकास्पद कामगिरी आधुनिक भारतीय इंजिनिअरिंगची कामगिरी मोठी असू शकते काय ?
भारतीय स्वातंत्र्यानंतर भारत देश हा लवकरात लवकर विकसित राष्ट्र होईल अशी सर्वांनी अपेक्षा केली होती. भारतीय स्वातंत्र्याचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी "ट्रीस्ट् विथ डेस्टिनी" त्यांचं गाजलेलं भाषण. जग झोपलेला आहे आणि आपण स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करत आहोत. हा जल्लोष एवढ्या पुरता मर्यादित न राहता आलेल्या प्रत्येक आवाहनांना तोड देण्यासाठी आपण प्रत्येकाने संघर्ष केला पाहिजे. भारतीय स्वातंत्र्यासाठी दिलेल्या अनेक थोर स्वातंत्र्यसेनानींचा विसर पडू न देता मोठ्या शक्तीने आणि हिमतीने या देशासाठी अर्थात इमानदारीने स्वयं प्रगती करून घेतली पाहिजे.
आज असे नाईलाजाने शंका येऊ लागते. ब्रिटिश निघून गेले परंतु, त्यांची कूटनीती आणि क्रूरता आजही आपल्या प्रशासन व्यवस्थेने जपून ठेवली आहे की काय? असे संभ्रम सामान्य जनतेच्या मनात निर्माण होतात.
समाजामध्ये अशी नेहमी चर्चा होत असते की, प्रत्येक रस्ता निर्मितीमध्ये राज्यकर्ता गुत्तेदार आणि प्रशासन व्यवस्थेतील लोक एकमेकांच्या हातात हात घालून पुढे जात आहे. रस्ता निर्माण करत असताना त्या रस्त्याची गुणवत्ता आणि दर्जा यावर कोणीही विचार न करता फक्त आणि फक्त कमिशन कोणाला किती द्यायचे? प्रत्येकाची भागीदारी किती असावी? आणि रस्ता कागदपत्रे कसा पूर्ण करावा? याचा एक नवीन पायंडा स्वतंत्र भारतात अगदी गुण्यागोविंदाने राबवला जातो. वास्तविक याचा कोणालाही पुरावा देता येणार नाही. परंतु अशी चर्चा समाजात दबक्या आवाजाने होत असते. कारण सामान्य माणसांनी अन्याच्या विरोधात बोलू नये हीच अवस्था आज भारतामध्ये सर्वत्र दिसून येते.
भारतातील रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण हे अत्यंत गंभीर आहे. त्याचबरोबर एखादा कर्ता पुरुष त्या कुटुंबातून अपघाताने हिरावून घेतला, तर त्या कुटुंबाची काय परिस्थिती निर्माण होते ? हे ते कुटुंबच जाणे . म्हणून, प्रशासन व्यवस्था आणि राज्यकर्त्यांनी भारतीय जनतेचा पालकत्वाची भूमिका निर्भय आणि इमानदारीने निभावल्यास, रस्तेच काय असं कोणत्याही शाखेतील काम हे सरळ आणि नियमाने केल्यास सामान्य जनतेचे हाल होणार नाही . छोटी बालके आपल्या आई-बाबांना मुकणार नाही. सामान्य जनतेला न्याय मिळेल एवढी माफक अपेक्षा एका भारतीयांनी करावी यात वावगे पणा वाटू नये.
📝🖊Dongardive Rahul.