सोमवार, ३ मे, २०२१

COVID-19 : भय इथले संपत नाही

 COVID-19 : भय इथले संपत नाही




भारतामध्ये प्रथम मार्चमध्ये एक दिवसाचा कडकडीत बंद पाळण्यात आला. प्रधानमंत्र्यांच्या सूचनेवर सर्व भारतवासीयांना त्याचे पालन आणि अनुकरण केले. नंतर लॉकडाऊन मे-जून पर्यंत वाढत गेला. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक होते. कोरोनाच्या साखळीने माणसांची साखळी मात्र तुटत होती. मिडीया मधून प्रसारित होणाऱ्या बातम्या व संसर्ग पसरण्याची तीव्रता पाहता स्वकीयांच्या भेटीसाठी किंवा जीव वाचवण्यासाठी लोक आपापल्या गावी, शहराकडे परतू लागले. अनेक मजुरांचा नाहक बळी गेला. त्या रेल्वेखाली चिरडल्या गेलेल्या किंचाळ्या, उपासमारी याने आजही काळजाचे ठोके स्तब्ध होतात. हृदयद्रावक घटना आजही मन सुन्न करतात. आज तब्बल चौदा महिन्यानंतरही तीच परिस्थिती पुन्हा अवतरते काय? अशी शंका मनात निर्माण होत आहे. आज दोन मे 2021 रोजी कोरणा संसर्ग चा विक्रमी आकडा, तीन लाख 92 हजार 488 अशी नोंद झाली. कोरोना प्रमाण कदाचित वाढलेलं असेल किंवा कमी झालेलं असेल. भारतीय राजकारणाचा विचार करत असताना स्वार्थापुढे देश मोठा नाही असेच सिद्ध होताना दिसते आहे. आज झालेल्या निवडणुक निकालानंतर राष्ट्रीय स्तरावर कोरोना नियंत्रण च्या बैठका आपले पंतप्रधान घेताना दिसतात. पाच राज्यांच्या निवडणुकांमधे मात्र प्रचार रणधुमाळी मध्ये याचा विसर पडलेला आपण सर्वांनीच पाहिला. अलोट गर्दी मध्ये स्वतः खुद्द पंतप्रधानांनी प्रचंड मोठ्या सभा घेतल्या. त्यातून कोरोनाचा प्रसार झाला याचे आकडे आता बाहेर येऊ लागलेले आहेत. स्वतःचा पक्ष आणि सत्ता समीकरणे यापेक्षा देश मोठा नाही, हे स्पष्ट होते. 

सत्ता मोहापायी दस्तुरखुद्द पंतप्रधान आपल्या मंत्रीमंडळात सहकारी असणारे दिग्गज केंद्रीय मंत्री प्रचारात उतरले तेव्हा मात्र कोरोना चा विसर पडला होता. या धामधुमीत मध्ये भारतामध्ये अनेक भयावह घटना घडल्या. मुंबईतील विरार येथे वल्लभ हॉस्पिटल ला लागलेल्या आगीमध्ये तेरा जणांचा मृत्यू झाला. कोरोना ऋग्न पॉझिटिव्ह असणाऱ्या हॉस्पिटलची अशी अवस्था होती, अनेक निष्पाप रुग्णांचा मृत्यू झाला. दिल्ली येथील पलंगाच्या शोधा करिता भटकणाऱ्या एका रुग्णाचा कारमध्येच मृत्यू झाला टाइम्स ऑफ इंडिया न ही बाजू लावून धरली होती. नागपूर येथील रुग्णालयांमध्ये सुद्धा चार जणांचा मृत्यू झाला. गुजरात मधील भरूच येथे हॉस्पिटलला लागलेल्या आगीमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत देशांमध्ये 215 542 जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही हे मृत्यूचे तांडव सुरूच आहे. सर्व जगच हतबल झाले आहे.भारताची स्थिती ही आवाक्याबाहेरची झाली आहे. भारतासारख्या विशाल देशामध्ये ऑक्सिजन अभावी आणि औषधोपचार अभवी लोक तडफडून मारताना दिसतात. एवढी भयंकर स्थिती असताना सुद्धा केंद्र आणि राज्य सरकार संबंध ताणलेले दिसतात. राज्य सरकार केंद्रावर आरोप करते, तर केंद्र सरकार राज्य व लोक  यांच्यावर आरोप करताना आपण पाहत आहोत. आरोपाच्या फैरी झडत असताना, स्वतंत्र असणारी न्यायव्यवस्थेला दखल घ्यावी लागते. नाईलाजाने न्यायव्यवस्था हळहळते आणि केंद्र व राज्य सरकार यांचे कान टोचण्याचे काम सुद्धा करते.या  वस्तुस्थितीची आपणास मीडियातून चर्चा होताना दिसते. ऑक्सिजन, ऑक्सीजन प्लांट साठी अनेक देशातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे, ही झाली मानवता. पण विश्वगुरू बनू इच्छिणार्‍या भारताकडे मात्र याचा अभाव आहे,असेच दिसते. कारण, राजकारणापलीकडे त्यांना अंदाधुंद करून सोडणारा सत्ता मोह सुधरू देत नाही. कोरोना संसर्गाच्या लढ्यात अनेक लोकांचा बळी तर गेलाच,  परंतु या लढ्यामध्ये जनजागृती करणारा महत्त्वपूर्ण घटक म्हणजे पत्रकारिता. पत्रकारिता करत असणारे 165 पत्रकारांना प्राणांची आहुती द्यावी लागली, हे शाश्वत सत्य दडवून ठेवता येणार नाही. न दिसणाऱ्या शत्रूच्या लढ्या पेक्षा राजकारणातील संसर्ग हा खूप मोठा दिसतो. संकट समयी सर्व राजकारण्यांनी एकत्र येऊन या लढ्याला साथ दिल्यास कोरोना संसर्गाची साखळी आपण पटकन तोडून टाकू. विविधतेतील एकता, संकट पूर्वी दाखवली तर तिचा योग्य उपयोग भारतमातेसाठी होईल. अंतिम संकटापर्यंत आपण असं शांत राहायचं का? जेव्हा पर्यायच उरत नाही तेव्हा मात्र एकत्र पाहिजे. अगोदर शत्रूला पोसायचे, त्याचा आपल्या स्वार्थासाठी उपयोग करून घ्यायचा आणि नंतर त्याला हाकलून देण्यासाठी भारतीय ऐक्य दाखवायचे. ती स्वातंत्र्य पूर्वीची परंपरा पुन्हा वेगळ्या पद्धतीने अवतरण्याची भीती मनामध्ये  कासावीस करते. 

जागतिक आपत्तीमध्ये भारताची सध्याची अवस्था खूपच गंभीर आणि चिंताजनक आहे. भारतातील सर्व हॉस्पिटल कोरोना रुग्णाने हाउसफुल झालेले आहेत. राजधानी दिल्लीची तर अवस्था खूपच बिकट आहे लोक स्वतःच्या कार मध्ये औषध उपचार घेताना, ऑक्सीजन सिलेंडर गाडीच्या बाहेर असताना रस्त्यावर दिसत आहे. देशातील एका आमदाराला उपचाराअभावी मृत्यू येत असेल तर,  सामान्य माणसांचे हाल कसे असतील? याची कल्पनाच करणे व्यर्थ ठरेल. प्रत्येक जिल्हा रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता आणि औषधोपचाराचा तुटवडा या समस्येने ग्रासलेले आहे. खूप आरडाओरड केल्यानंतर केंद्राकडून राज्याला ऑक्सिजन पुरवला जातो. सर्वांसाठी देश मोठा की देशासाठी राजकारण मोठे, अशा शंका निर्माण होणे ही खूप मोठी निंदनीय बाब आहे. शासकीय रुग्णालयाची अशी अवस्था असताना खाजगी रुग्णालयात औषध उपचार करणे सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडणारे आहे काय? खाजगी रुग्णालयांमध्ये ऍडमिट होतानाच हजारो लाखो रुपयांचे डिपॉझिट भरा, त्याशिवाय ऍडमिट करूनही घेतले जात नाही. त्याचबरोबर शासकीय रुग्णालय विषयी असणारे ग्रामीण भागातील गैरसमज ही एक मोठी चिंतेची बाब बनली. त्या अकारण भीतीपोटी लोक आपले आजार लपवण्याचा प्रयत्न करत आहे. हाच आजार बळावला तर मृत्यू निश्चित आहे. हे या लोकांना कोण समजावून सांगणार. समजावण्याचा प्रयत्न केलाच तर लोकांचे उद्धटपणाची वर्तनं, त्यांच्याच जीवाशी खेळ खेळत आहे. गंभीर परिस्थितीमधून सुखरूपपणे बाहेर पडायचे ठरवले, सर्वच राजकीय पक्षांनी ,घटक पक्षांनी , स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन लोकांच्या मनातील भिती काढण्याचा प्रयत्न करून सदृढ मनाने, निस्वार्थपणे देश हित लक्षात ठेवून निकराचा लढा दिला पाहिजे. 

लोक प्राणाशी झुंज देत असताना, कोरोना नंतर निमोनिया सारख्या गंभीर आजारावर रामबाण उपाय म्हणून रेमडिसीवर या औषधाचा वापर केला जातो. या औषधाचा गैरवापर व साठेबाजी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. औरंगाबाद सारख्या ठिकाणी तर वापरलेल्या बाटल्यांमध्ये सलाईन चे पाणी भरून हजारो रुपयांना विकले जात आहे. रेमडीसिवीर या औषधाचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात आहे. आहे ते औषध, योग्य त्या किमतीला मिळत नाही. मूळ किमतीच्या दहापट पैसा वसूली दलालांमार्फत केली जाते. सामान्य माणसाला तर तो मिळतच नाही,आणि जर मिळालाच तर वरदहस्त लागतो. एक वेळच्या औषधाची किंमत जर तीस ते चाळीस हजार असेल तर, सात ते आठ दिवसानंतर येणारे बिल किती असेल? यामुळे लोकांना औषध मिळत नाही. अनेक संसार उद्ध्वस्त होताना दिसतात. रुग्णालयांमध्ये एवढा मोठा न परवडणारा उपचार करूनही रुग्ण दगावत असेल, यापेक्षा भयंकर शोकांतिका कोणती होता आसु शकते? 

हॉस्पिटलच्या खर्चापोटी अनेक कुटुंबे उध्वस्त होताना पहायला मिळतात. कृत्रिम औषध तुटवडा गंभीर झालेल्या रुग्णासाठी मृत्यू ठरत आहे. चांगल्या गोष्टींचे श्रेष्ठत्व स्वतःच्या नावे घेण्यासाठी राजकीय मंडळी अग्रेसर असतात. अपयश मात्र कोणी माथी मारून घेत नाही. आज प्रत्येक पक्षाचे उत्कृष्ट हॉस्पिटल असायला हवे होते.श्रद्धे साठी मंदिर जशी हवी असतात, त्याचप्रमाणे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय अस्तित्वात असणे आवश्यक आहे. वास्तवातील ज्यावेळेला संसर्गजन्य किंवा इतर साथीचे रोग येतात तेव्हा, मात्र या रुग्णालयाची आपल्याला नितांत आवश्यकता आहे. भयंकर असणाऱ्या जागतिक साथीच्या रोगांमध्ये राज्यकर्ते, राजकारणी मंडळींनी रुग्णांसाठी अभय शिबिरे, त्याचबरोबर जनजागृती करणे आवश्यक ठरते. राजकारण करण्यासाठी आपल्याला आयुष्य पडलेल आहे. परंतु, ज्यांच्या जीवावर आपण राजकारण करतो, ती जनताच नसेल तर, राजकारण कोणासाठी करणारा? आणि कशासाठी?  कोरोना सारख्या भयंकर संसर्गजन्य आजारात औषधोपचारा बरोबर मानसिक आधाराची सुद्धा गरज आहे. मानसिक आधार राजकारणी उत्कृष्टपणे देऊ शकतात. हे ज्याने त्याने ओळखले पाहिजे. सृजनशील समाजनिर्मितीसाठी आरोग्यसंपन्न, सुदृढ व्यक्ती टिकणे आणि निर्माण होणे आवश्यक आहे. समाजातील समज आणि गैरसमज दूर करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाने संयमाची भूमिका घेऊन उपाययोजना व नियोजन केले तर या संकटातून सर्वजण सुखरूप बाहेर पडू. रुग्णालयातील आगीचा प्रश्न  असो अथवा कृत्रिम औषध तुटवडा या सर्व आरोपींवर  योग्य ती कारवाई झाली तर भविष्यात अश्या गोष्टींची पुनरावृत्ती होणार नाही.  परंतु हे प्रश्न जर असेच डोळ्याआड केले जातील , तर समाज आणि सरकार त्याबरोबर इतर राजकीय  पक्ष यांच्यात समन्वय साधला जाणार नाही. परिणामतः भय इथले संपत नाही.!

Writer:-

#RAHUL R. DONGARDIVE


२ टिप्पण्या:

  1. हॅलो खूप छान सर आपण आपल्या लेखणीतून कोरोना ची वास्तविक परिस्थिती आपल्या लेखणीच्या माध्यमातून आपण व्यक्त करत आहे तसेच सध्याच्या युगामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये असणारे मतभेद त्याचबरोबर जनतेपेक्षा निवडणुका महत्त्वाच्या विचारधारा डोळ्यासमोर ठेवून काम करणारे काही राजकीय पक्ष या विषयी आपण आपले प्रकट विचार मांडले त्याबद्दल आपले आभार आपले विचार निश्चितपणे

    आजच्या परिस्थितीला धरून आहेत असेच आपण लिहीत राहा आणि वाचायला मिळावेत हीच इच्छा

    उत्तर द्याहटवा