सोमवार, ६ सप्टेंबर, २०२१

Heavy rain slashes in Maharashtra

 वरूनराजा..थांबरे आता!!!



आम्ही माणसं  तू कसाही आलास काय अन..गेलास काय ?

आला तरी आम्ही शिव्याच घालतो

आणि

नाही आलास तरी शिव्याच देतो.

पण तू आमचा पोशिंदा ना, 

तुलाच आमची काळजी.

आम्ही लेकरे री तुझी

आम्ही चूक केली काय? अन नाही काय? 

पण...तू आम्हाला माफ करत आलास. 

इथून पुढेही माफ करणारच ना तू !!

कारण तू आमचा दातायस .

असो, लेकरे गाऱ्हाण तिथेच करतात, जिथे हट्ट पुरवला जातो. 

रागही तिथंच व्यक्त केला जातो. जिथे अतूट नात्याचं प्रेम असतं.

हे ही तूच शिकवलंस अम्हास..खरंय ना हे ?

बघना, आमची तू तहान भागवलीस ,

गुरांना चारा दिलास , पशूपक्षांना अन्न पाणी सुद्धा दिलंस. 

आता आम्हा पांढरपेशा लोकांना झाडाला पाण्याच्या बाटल्या लटकावायची गरज नाही ठेवलीस. 


आम्ही तुझचं घेतो , जमलंच तर तेच दिन-दुबळ्यांना देतो. दीनदुबळ्यांच्या केलेल्या मदतीचा फायदा उठवण्यासाठी माध्यमातून दिंडोरा पिटायला कधी मागेपुढे पाहत नाही ?

पण ...आमच्या या स्वार्थाला तू हे माफ करत आलास.

किती रे तुझी करूणा ही... 

हे करुणाकरा .....

आमच्यावर करुणा करशील का ??..

तुझा अंमच्यवरचा राग मान्ययरे. 

आम्ही माणस स्वार्थापोटी गटात, जातीत ,धर्मामध्ये विखुरलो

अन एकमेकांच्या जीवावर उठलो, नव्हे कित्येक निरपराध लोकांचा यात बळी गेलाही.

 दोन दिवसापूर्वीचच बघना 20 भरतिय जवान मारले , त्या निर्दयी पशूंनी.


काय म्हणत असतील त्या शहिदांच्या माता ?

आई रडून सांगेल ,पण त्या पित्याने आपला टाहो कोठे फोडावा सांगना ?

आज कोणताही बातम्यांचा चॅनल लाव,कोठेतरी एक निर्भया घडलेली असते.

असं ऐकल्यावर नखशिखांत अग्नीचा डोंब उसळतो.

 काय करणार ? करता तर काहीच येत नाही.


शेवटी तुलाही हे सहन होत नसावं म्हणून तर तू असा कोपत नाहीस ना ?

असा प्रश्न मनाला स्पर्शून जातो.

पाठीमागं वळून पाहिल्यावर तू केदारनाथ , बिहार , मुबई(2005), यापैकी कोणालाच सोडलं नाहीस.

आम्ही आमच्यातील माणुसकी हरवत चाललोय मान्य आहे.

जग खंडाबरोबर धर्मात विखुरलं. 

एका खंडातून अनेक देशात, 

एका देशातून अनेक पंथ , धर्म , आणि धर्मातील जाती.

कधी कधी घडणारया घटना पाहून एक प्रश्न पुन्हा पडतो-

"मांणसासाठी धर्म असतो कि ,

धर्मासाठी माणूस ?"

या व्यर्थ वल्गना करत बसण्यापेक्षा माझी एक विनंती ऐकशील वरूनराजा...


आज आम्ही मानव न्यायय् हक्कासाठी मोर्चे आंदोलन अन प्रति आंदोलन/ मोर्चे यात अडकून पडलोय .

पण माणूस म्हणून जर जगलो ना , तर अशा किळसवाण्या घटना घडणारच नाहीत.

पण उद्या आम्ही या देशासाठी, याच बांधवांसाठी जीव देणारी आमची मनुसकीरे.

आज सोन्यासारखी पीक आलित, सर्वजण खुश आहेत तुझं येन सर्वानाच सुखद धक्का आहे .  

हाच धक्का उद्याचा बुक्का होऊ देऊ नकोस.आज अख्खा महाराष्ट्र न्हाहून निघालाय. 

तुझीच कृपा आहे ! 

शेतकऱ्यांच्या पिकात माती, तर आमच्या मुखात माती गेल्यासारखं होईल.

शेतकार्याच्या याच पिकावर खूप अपेक्षा आहेत. उद्या याच गोष्टीवर त्याला मुलीचं लग्न करायचय, पोरांची शिक्षणं पुर्ण करायचित,

 एवढच काय वरूनराजा सावकराकडची गहान जमीन सोडवून घ्यायची, जमलंच सारं तर मनातला एखादा नवस फ़ेडायचाय .

एकमात्र खरं , हे पिकांचं जर का नाही जमलं, तर 'मात्र' झाल्याशिवाय राहरणार नाही.

हे वरूनराजा 

माझ्या या शेतकऱ्याला नको त्या गोष्टीकडे, 

आणि....

जीवनाच्या दोरखंडाकडे जाण्यापासून वाचवरे..

करुणाकरा!

वरूनराजा .....थांब रे आता!!!

     Writer :- डोंगरदिवे राहुल 

२ टिप्पण्या: