बुधवार, २१ जून, २०२३

डॉक्टर - कट प्रॅक्टिस Doctor - cut practice

 Doctor - Cut practice


प्राचीन काळापासून ते आज तागायत पर्यंत मानवी जीवनाला सुदृढ ठेवण्यासाठी , जडीबुटी पासून औषध बनवणारे वैद्य असायचे. वैद्य रुग्णाच्या लक्षणावरून रोगाचे निदान करत असत. तेही अचूक पूर्वी एखाद्या रुग्णाला आजार झाल्यानंतर झाडपाल्याचे औषध उपचार आणि तो पूर्ण बरा होत असे. वैद्यही माफक प्रमाणात किंबहुना रुग्णाची परिस्थिती पाहून त्याच्याकडून पैसे घेत असायचे. रुग्णसेवेमध्ये मानवता खचून भरलेली असायची. रुग्णाचा आजार बरा झाला किंवा तो पूर्णपणे ठणठणीत झाला तर , वैद्य हा स्वतःच्या ज्ञानाला धन्यता मानत असेल. त्या काळातही वैद्यांकडनं औषधोपचाराच्या पद्धतीमध्ये एक अचूकता असायची त्यामध्ये क्वचित प्रसंगी चूक होत असेल . परंतु , ती चूक वैद्याच्या जिव्हारी लागत असायची. तेव्हा मात्र तो स्वतःला माफ करत नसायचा. अशा अनेक प्रकारच्या गोष्टी स्वरूपी किस्से पुस्तकातून पाहायला मिळतात. झाडाच्या मुळापासून शेंड्यापर्यंत सर्व गोष्टींमध्ये औषधी गुण आहेत. हे सिद्ध करणारे हिंदू कालीन, बौद्ध कालीन वैद्य आजही त्यांच्या कार्याने जिवंत आहेत. परंतु असा एकही वैद्य नव्हता की तो मनुष्याच्या जीवाशी खेळत असायचा. तो फक्त त्या रुग्णाला त्या आजारातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असायचा . हे त्याचे अंतिम ध्येय होते.

प्राचीन काळानंतर वैद्यकशास्त्रामध्ये होणारी क्रांती व त्याचे मानवी जीवनावर होणारे इष्ट परिणाम . वास्तविक पाहता रुग्ण हा हळूहळू बरा होत असायचा. तदनंतर आधुनिक युग सुरू झाले. आधुनिक युगामध्ये विज्ञानाला खूप महत्त्व आले. विज्ञान युगामध्ये प्रत्यक्ष कृतीला आणि परिणामांना महत्व दिले जाऊ लागले. एखादा आजार आहे म्हणजे ,त्याचे मूळ असले पाहिजे. मूळ शोधून त्या मुळावर घाव केल्यानंतर आजार पूर्ण बरा होतो. आजच्या विज्ञान युगातील मानसिकता व वास्तविकता आहे. प्रारंभिक काळामध्ये विज्ञान युगाने मानवी जीवनदानासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केले. मानव कल्याणासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग सुद्धा झाला,नव्हे होतो आहे. ही सत्यता जरी असली  तरी त्यापुढे गेलेला हा विलास वादी आजचा डॉक्टर रुग्णाच्या जीवाशी खेळत आहे . मी या ठिकाणी नम्रपणे नमूद करू इच्छितो की सर्वच डॉक्टर असे नाहीत . जे आहेत ते आहेतच! हे मान्य किरा किंवा न करा ती सत्यता कोणीही नाकारू शकत नाही . मानव कल्याणासाठी अहोरात्र झगडणारा ही डॉक्टरच आहे. अशा डॉक्टरच्या चरणावरती नतमस्तक झाले तरी वावगे ठरणार नाही . परंतु रुग्णाच्या जीवाशी इमोशनल ब्लॅकमेल करून हजारो लाखो रुपये उकळणाऱ्या डॉक्टरांना शरम वाटलीच पाहिजे. अशा डॉक्टरांना मधील असणारा माणूस पुन्हा जिवंत व्हावा हीच अपेक्ष!!! 



जगामध्ये लोकशाही शासन व्यवस्था आल्यापासून प्रत्येक व्यक्तीला आपले हक्क जबाबदारी आणि कर्तव्य याची जाणीव झाली. स्वातंत्र्य- समता - बंधुत्व त्रिसूत्री प्रसिद्ध झाली . आरोपी कोणीही असो त्याला आपली बाजू मांडण्याचा अधिकार मिळाला. न्याय हक्कासाठी तो न्यायालयात दाद मागू लागला. असं म्हटलं जातं ,'जगामध्ये अशा दोन व्यक्ती आहेत . त्यापैकी पहिली व्यक्ती न्यायालयीन न्याय मागत असताना वकिलाला नेहमी सत्य व खरे बोलावे. त्याच पद्धतीने डॉक्टरला सुद्धा आरोग्य विषयी सत्य माहिती द्यावी तेव्हाच कुठे त्या व्यक्तीला न्याय मिळू शकतो आणि आरोग्यावर योग्य उपचार होऊ शकतात.' म्हणून कधी या दोन लोक व्यक्तीला लोक खोटं बोलत नाहीत . त्याचे कारणही तसेच आहे कारण त्यामुळे त्या व्यक्तीला योग्य न्याय मिळू शकतो.

एवढी मीमांसा करण्या पाठीमागचा उद्देश हाच की आधुनिक युगामध्ये  जेवढा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढला या पाठीमागचा मुख्य हेतू हा होता की, मानव कल्याणासाठी याचा योग्य वापर व्हावा वास्तविक पाहता हा वापर मानव कल्याणापेक्षा स्वहित साधण्याच्या पाठीमागे जास्त लागला आहे.

आज एखाद्या हॉस्पिटलमध्ये जायचं म्हटलं तर अगोदर आपल्या पॉकेट मनी पाहावे लागते. भरलेला खिसा नसेल तर उपचार मिळणार नाहीत . सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुद्धा अनेक आजारावर उपचार मोफत केले जातात. शासनाच्या अनेक आजारावर करोडो रुपयांच्या योजना राबवत आहे . हजारो लोक या योजनेचा लाभ घेत आहेत. शासनाद्वारे खाजगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा मोठमोठे आजारावर औषधोपचार आणि शस्त्रक्रियेसाठी लाखो रुपये नागरिकांच्या आरोग्याची चिंता म्हणून , खर्च करत आहे . अशा अनेक योजना आहेत की , ज्या राज्य शासनाद्वारे सामान्य रुग्णाला पैसे अभावी उपचार करता यावेत म्हणून शासन अर्थ पुरवठा करते आहे. 'आयुष्मान भारत योजना ' केंद्र सरकार मार्फत राबवली जाते . यामध्ये सर्व आजारांचा समावेश होतो . राज्य शासनामार्फत 'महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना'  यामध्ये सर्व घटकांचा समावेश केल्या गेलेला आहे. 'राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना' केंद्र शासन व राज्य शासन अशा अनेक प्रकारचे योजना या योजनांमुळे गोरगरीब जनतेला सामान्य माणसाला खूप मोठा आधार मिळाला, नव्हे जीवनदान मिळाले.


मोठमोठ्या शहरातील नजरेत न मावणारी हॉस्पिटल पाहिल्यावर माणसाला अचंबित होते . खेड्या पाड्यातील माणसं औषध उपचारासाठी किंवा गंभीर आजारासाठी मोठमोठ्या हॉस्पिटलला जातात . बिचारी भोळी भाबडी जनता आरोग्यावर योग्य उपचार होईल म्हणून नको त्या पद्धतीने पैसा जमा करतात आणि नामांकित गाजलेल्या हॉस्पिटलमध्ये जातात. कोणी दाग दागिने तर कोणी जमीन गहाण ठेवतो . अशा मोठ्या हॉस्पिटलमध्ये जात असताना पेशंट सरळ कधीही जात नाही.  बऱ्याच दिवसाच्या उद्भवलेल्या ट्रीटमेंट नंतर किंवा अचानक उद्भवलेल्या शारीरिक त्रासानंतर तेथील लोकल डॉक्टरच्या सल्ल्यानुसार, त्याला आपण रेफर असे म्हणतो. लोकल डॉक्टरच्या पत्रावर आपण त्या ठिकाणी ऍडमिट होतो आणि तिथून पुढे सुरू होते माणसाच्या देहाची वास्तविक प्रॅक्टिस . डॉक्टरच्या आयुष्यातील प्रॅक्टिस हा अविभाज्य घटक आहे. त्याने त्याचा कसा वापर करावा ? हे त्याला वैयक्तिक माहीत असते. एखादा रुग्ण अनेक आजाराने त्रस्त जरी असला योग्य निदान झाल्यास त्याला मोठमोठ्या खर्चातून वाचवले जाऊ शकते. डॉक्टरच्या व्यवसायातील ही मोठी नैतिक जबाबदारी आहे. परंतु डॉक्टर पेशंटच्या रोग निदान नंतर त्याच्याशी कशी औषधोपचार करायचे? हे तो ठरवतो . आजच्या भाषेत सांगायची झाल्यास रुग्ण आपल्या हॉस्पिटलमध्ये जास्तीत जास्त दिवस कसा राहील याची तजवीज केली जाते. कारण जेवढा रुग्ण हॉस्पिटलमध्ये जास्त दिवस राहील तेवढा त्याच्याकडून पैसा वसूल करता येऊ शकतो . अनेक प्रकारची चार्ज लावले जातात . नको त्या टेस्ट केल्या जातात  अशा टेस्ट आहेत, तिच्यावर हजारो रुपये खर्च केले जातात. त्यापैकी बऱ्याचशा टेस्टची गरज सुद्धा नसते. मग सोनोग्राफी , टू डी इको , एक्स-रे असेल अशा नको त्या टेस्ट पेशंटचे नातेवाईक भीतीपोटी करतात. आलेल्या रुग्णांपैकी रुग्ण नातेवाईकास एखादा टक्का कळत असेल की, आपल्या पेशंटला झाले काय? बहुतेक 99% केसेस मध्ये अज्ञानपणाचाही डॉक्टर लोक फायदा घेतात, ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही. शहरातल्या डॉक्टरकडे ज्या लोकल डॉक्टरने पाठवले जाते त्याला आधुनिक युगातील दोन नंबरचा धंदा म्हटलं तर वावगे ठरू नये त्यानुसार त्याला त्याची कमिशन दिले जाते त्याला आता आज आपण कट प्रॅक्टिस म्हणतो.


धावपळीच्या युगामध्ये समाजामध्ये जवळपास 90 टक्के लोकांना एंटासिड या गोळीची गरज असते. दिनांक वीस जून 2023 च्या 'आज तक' न्यूज चॅनलच्या सर्वेनुसार ब्लॅक अँड व्हाईट शो मधील आकडेवारीनुसार 90 करोड पेक्षा जास्त लोकांना ऍसिडिटी ,बीपी आणि शुगर या आजाराने त्रस्त लोक आहेत या आजाराची कारणे सुद्धा तशीच आहेत जशी की दैनंदिन जीवनाच्या धावपळीमध्ये लोक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात व्यायाम करत नाही आहार असा आहे की ज्याला पचण्यासाठी कष्ट करावे लागतात पण तशी शारीरिक कष्ट लोकांकडून होत नाही म्हणून अशा आजारांना लोक बळी पडत आहेत हे आजार सुद्धा अशी भयंकर आहे की ज्यामुळे माणूस ऍस ऍसिडिटी म्हणून दुर्लक्ष करतो तर त्यात त्याला अटक आलेला असतो अशा बिकट परिस्थितीमध्ये कधीकधी मृत्यूने माणसांना कंवटाळलेले असते.

आजचे डॉक्टर वरील परिस्थितीचा फायदा अशाच प्रकारे उठवतात. एखाद्या पेशंटला अचानक धाप, दम ,दडपण आल्यासारखे, त्याचबरोबर चक्कर येऊन पडणे, खूप मोठ्या प्रमाणात घाम येणे, छातीमध्ये तीव्र वेदना होणे , अशा प्रकारची लक्षणे दिसल्यास रुग्ण आणि रुग्णाची नातेवाईक खूप घाबरतात . सुरुवातीला ते लोकल डॉक्टर कडे जातात. मग लोकल डॉक्टर त्यांना शहरातील त्याच्या पद्धतीनुसार चांगल्या डॉक्टरचा रेफर करतात. परिस्थिती इतकी भयावह असते  की,  लोकल डॉक्टरच्या सांगण्यानुसार रुग्णाचे नातेवाईक रुग्णाला घेऊन रेफर केलेल्या डॉक्टर कडे घेऊन जातात. तिथून पुढे सुरू होतो डॉक्टरचा कट प्रॅक्टिसचा भाग !...एखाद्या सिनेमालाही लाजवेल अशी भयंकर परिस्थिती निर्माण केली जाते. रुग्ण गाडीतून उतरल्यापासून आयसीयू रूम मध्ये घेऊन जाईपर्यंत सर्वांचे चेहरे पडलेले असतात. रुग्णाच्या नातेवाईकाचा तर विचारच करायला नको. त्याला काय करावे आणि काय करू नये ?याचे भान राहिलेली नसते. तो काहीही करायला तयार असतो. कारण, त्याला रुग्ण महत्त्वाचा असतो. तसं तो डॉक्टरांना बोलूनही दाखवतो. डॉक्टर साहेब काय पैसे लागायचे ते लागू द्या? पण माझ्या पेशंटला वाचवा...वेळ प्रसंगी डॉक्टरच्या पाया सुद्धा पडतात . अशी अनेक उदाहरणे आहेत जे आपण सर्रास पाहतो किंवा अनेक जणांनी ते अनुभवले सुद्धा असेल.


पेशंट ऍडमिट करे पासून स्टेबल होईपर्यंत लोकल डॉक्टर आणि शहरातील डॉक्टर यांची फोन सुरू असतात . त्या फोनवर लोकल डॉक्टर पेशंटच्या आर्थिक परिस्थितीचा इतिहास सांगत असतो . त्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे का? तो एवढे पैसे देऊ शकतो का ? पैशाच्या बिलामध्ये काही अडचण येऊ शकते का ? त्या पेशंटची पोहोच कुठपर्यंत आहे ? एखाद्या राजकीय संघटनेची किंवा राजकीय पुढाऱ्याशी संबंधित आहे का? तो वैयक्तिक रित्या स्वभावाने कसा आहे? त्याच्या जवळचे कोणी डॉक्टर आहेत का? किंवा इतर क्षेत्रांमध्ये काम करतात का? एवढी चौकशी झाल्या नंतर तो भावनिक आहे का? हा मोठा प्रश्न विचारला जातो आणि तिथून पुढे त्या रुग्णाला कशी ट्रीटमेंट द्यायची? हे तो शहरातला डॉक्टर ठरवतो. लोकल डॉक्टर वरील प्रश्नांची सर्व उत्तरे देतो रुग्ण कोण आहे? कसा आहे? काय आहे ? यापेक्षा तो पैशावाला आहे किंवा नाही? हा एक प्रश्न त्या रुग्णाच्या जीवाशी खेळायला लावतो. प्रत्यक्षात या प्रश्नांच्या अगोदरच त्या दोघांनाही सांकेतिक भाषेमध्ये माहिती मिळालेली असते. 


लोकल डॉक्टर वर उल्लेखलेल्या लक्षणानुसार पेशंट आणि पेशंटच्या नातेवाईकांना अटॅक नसताना सुद्धा अटॅक आला असे सांगतो.  शेवटी रुग्णाचे  नातेवाईक डॉक्टरचे वाक्य अंतिम समजतात आणि शहरातल्या डॉक्टर कडे जातात. या ठिकाणी एक गंभीर बाब म्हणजे, लोकल डॉक्टर हा स्वतः रेफर केलेल्या डॉक्टर कडे घेऊन जा असे सांगतो . पेशंट किंवा  नातेवाईकाने जर दुसऱ्या डॉक्टरच्या नाव सुचवलं तर तो त्या डॉक्टर कडे घेऊन जात नाही. पेशंटला अत्यंत गंभीर बनवण्यात लोकल डॉक्टरचा सिंहाचा वाटा असतो. हे नाकारून चालणार नाही . त्यानुसार त्याला शहरातील डॉक्टरकडे एडमिट केले जाते . अनेक प्रकारच्या टेस्ट झाल्यानंतर रुग्णाचा नातेवाईकाने जर 'परत टेस्ट बाहेर करू' असं सांगितलं रिपोर्ट नॉर्मल सुद्धा येतात. हा कोणता चमत्कार म्हणायचाआणि त्याच डॉक्टरच्या मनानं राहायचं म्हटल्यास दररोज 15 ते 20 हजार रुपये बिल आकारले जाते. रुग्णाला खरोखरच अटॅक आला असल्यास हे बिल आणि त्यावर औषध उपचार करणे गरजेचे आह. परंतु एखाद्या रुग्णाला अटॅक नसताना तशी परिस्थिती निर्माण करणे व त्यानुसार हाय ट्रीटमेंट देणे ही खरोखरच डॉक्टर प्रॅक्टिस आहे काय? हे डॉक्टरचे पाप नाही काय? असे अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होतात मग मुद्दा हा आहे. सुशिक्षित माणसांशी असे खेळ खेळले जातात तर जिथे शिक्षणाची गंगा अजून कसल्याही प्रकारे पोहोचलीच नाही,अज्ञान आहे. अशा लोकांशी हे डॉक्टर काय करत असतील याचा कोणीही अंदाज लावू शकत नाही.

हृदयाच्या संबंधित आजारामध्ये कोणीही रिस्क घेत नाही . ही वस्तुस्थिती आहे . परंतु, त्याच हृदयाशी डावपेच करणारा डॉक्टर हिंस्र पशु पेक्षा नीच आहे. असे काही रुग्ण पाहिले की , त्यांना धुंदीच्या गोळ्या देऊन हॉस्पिटलमध्ये आठ आठ दहा दिवस ठेवले जाते. रुग्ण बरा झाल्यानंतर सांगतो, तुम्ही बोलत होता , ऐकू येत होता , सगळे कळत होते . डोळे मात्र उघडत नव्हते . यावरून धुंदीच्या गोळ्या आहेत हे सिद्ध होते.  रुग्णशुद्धीवर आला की एक गोळी दिली जाते.पुन्हा रुग्ण झोपी गेल्यासारखा दिसतो ,  हालचाली मात्र चालूच असतात. खरोखरच अटॅक असेल तर , त्यावर उपचार होणे गरजेचे आहे . वेळप्रसंगी ऑपरेशन करणे सुद्धा गरजेचे आहे. परंतु वरील लक्षणानुसार त्याला अटॅक आहे आणि त्यावर स्टेन टाकण्यासारखे उपचार करणे ही माणुसकीला काळीमा फासणारी लाजिरवाणी गोष्ट आहे. अशाच डॉक्टरच्या चुकीच्या निदानामुळे आणि पैशाच्या मोहापाई अनेक रुग्ण दगावल्याच्या घटना समाजात घडत आहेत.असे डॉक्टर राजकारणाशी संबंधित असल्यामुळे सामान्य रुग्ण त्यांच्या विरोधात दंड थोपटू शकत नाही किंबहुना पेशंट तर हातातून जातोच जातो . पण ...हाती निराशा आणि आर्थिक नुकसान या दलाल डॉक्टरांकडून केले जाते.

रुग्णाच्या टेस्ट अशा केल्या जातात, त्याचे रिपोर्ट पाहून कोणीही सांगेल,या रुग्णाला हे झाले होते..ते झाले होते .गंभीर आजार असल्यामुळे रुग्न दगावू शकतो . तशा प्रकारची आपण ऑपरेशन करत असताना संमती देत असतो . त्यानंतरच डॉक्टर पेशंटला ऑपरेशन थेटर मध्ये घेऊन जातात आणि उपचार करतात करतात. पण असे रिपोर्ट जर गलत असतील तर आपण न्यायालयात सुद्धा दाद मागू शकत नाही . हे वास्तव जरी भयंकर असले तरी, ते सत्य आहे  परंतु पुराव्या अभावी आपण या ठिकाणी सिद्धता देऊ शकत नाही हे दुर्दैव ! कारण , सगळी संबंधित रुग्णालयाची व्यवस्था हात मिळवणी करून बनलेली असते. लोकल डॉक्टर कट वीस टक्के पासून 30% पर्यंत आहे ज्या ठिकाणी जास्त कट दिला जातो त्या ठिकाणी लोकल डॉक्टर पेशंट रेफर करतात. हे कोणीही नाकारू शकत नाही. काही डॉक्टरने याची कबुली सुद्धा दिलेली आहे पण पुढे कोणीही येणार नाही, दुर्भाग्य! पेशंट ऍडमिट होतो घरी जातो त्याच्याशी खेळलेले डाव त्याच्या लक्षात येत नाही . झालेल्या बिलिंग चा तपशील शहरातील डॉक्टर त्याला सविस्तर देतात अशा डॉक्टरांचे कट देण्यासाठी विशिष्ट यंत्रणा शहरातील डॉक्टर राबवतात इमानदारीने ज्याचा कट त्याला दिला जातो.

जाहीर आवाहन.... 

आदरणीय डॉक्टर ,एखाद्या रुग्णावर उपचार करत असताना त्याचे अचूक निदान करा.खरंच गरज असेल तर , त्यावर योग्य ते उपचार करा कठीण प्रसंगी ऑपरेशन सुद्धा करा . त्यातून तुम्ही कट पद्धती वापरा, तुम्हाला काय पाहिजे ? ते करा . पण....विनंती आहे . एखाद्या रुग्णाला कसलाही आजार नसताना पैशाच्या असुरी मोहापाई त्याच्या जीवनाशी खेळू नका . मान्य आहे तुम्ही, त्या रुग्णाचे जीवनदाते आहात . जीव दिला तर तुमची प्रॅक्टिस श्रेष्ठ आहे . पण ?..जीव घेतला तर नियती तुम्हाला माफ करणार नाही. स्वामी विवेकानंद यांच्या मतानुसार "कोणत्याही एका रुग्णाचा पाच  मिनिटाचे निदान हे अंतिम असू शकत नाही....." मग विचार करा आपण मशीनद्वारे केलेले निदान आपल्या हातात आहे. निदान कसे करायचे हेच जर तुमच्या हातात असेल तर , वैद्यकशास्त्रात अज्ञान असणाऱ्या लोकांना तुमच्या मर्जीनुसार फसवू नका. तुम्ही इमानदारीने प्रॅक्टिस केली तर तुम्हाला आयुष्यात कमी पडणार नाही. पुढच्या पिढ्या सुद्धा आनंदात जगतील. पण एक लक्षात ठेवा नियती नावाची एक अशी देवी शक्ती आहे. जिथे तुमच्या कर्माचा लेखा जोखा ठेवला जातो . तुम्हाला पैसा भरपूर मिळेल पण समाधान कधीच मिळणार नाही.याची जाणीव असू द्या.. 


📝🖊𝚁𝚊𝚑𝚞𝚕 𝙳𝚘𝚗𝚐𝚊𝚛𝚍𝚒𝚟𝚎










२ टिप्पण्या: