क्रिकेट- सट्टा - रम्मी आणि तरुण
इंटरनेटच्या युगामध्ये प्रत्येक गोष्ट ही प्रत्येकाच्या अगदी बोटाच्या टोकावर आली . प्रत्येक जण जगाच्या आसपास या आंतरजालाच्या माध्यमातून अत्यंत जवळ गेला. जेव्हा पाहिजे तेव्हा, जगातील कोणत्याही गोष्टीचा कानोसा एव्हाना माहिती घेता येते. प्रत्येक जण आलेल्या समस्यातून उपाय शोधण्यासाठी या इंटरनेटचा वापर करतो. संगणकाच्या पिढ्या आणि त्यानंतर मोबाईल मधील पिढ्यांची क्रांती ही अतुलनीय आणि अमुलाग्र बदल घडवणारी. तंत्रज्ञान रुपी ज्ञानगंगा प्रत्येकाच्या हातात आहे. प्रत्येक जण नव्या गोष्टींचा शोध घेतो, बोध घेतो एवढेच नव्हे तर त्यातून तो नवीन शिकण्याचा प्रयत्न करतो. जगातील अशी कोणतीही गोष्ट नाही की जी अज्ञानरूपे राहील अशी नाही. ज्याची चिकित्सक आणि कुशाग्र बुद्धिमत्ता गुरु शिवाय इंटरनेटच्या माध्यमातून ज्ञान मिळवू शकते. ही वस्तुस्थिती जरी असली, तरीही गुरु शिवाय गत्यंतर नाही. हे वास्तव आहे. मेकॅनिक टीचर हा फिजिकल टीचर समोर कधीही टिकाऊ ठरू शकत नाही. मान्य आहे तो अचूक असेल परंतु संवेदनशील निश्चितच नसेल.
विज्ञान आणि तंत्रज्ञान या गोष्टीचा जेवढा शोध आणि मानवी कल्याणासाठी वापर वाढला. तेवढेच त्याचे दूर गंभीर परिणाम समोर येताना आपण पाहत आहोत . कोरोना काळातील अध्यापन हे पूर्णपणे ऑनलाईन झाले. त्याचे परिणाम ही चांगले झाले. त्याचबरोबर दुष्परिणाम सुद्धा झाले .हे नाकारता येणार नाही. मोबाईलच्या क्रांतीनंतर प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला खरा परंतु , त्याची गांभीर्यने दखल घेतल्यास, सरासरी असे दिसून येते की, सर्वात उदयनमुख समाजातील तरुण हा मोबाईलच्या व्यसनाच्या आहारी गेलेला दिसून येतो. मोबाईल जितका लाभदायी आहे तेवढाच तो भयंकर आहे.. आपण हे नाकारू शकत नाही. क्वचित प्रसंगी मुले मोबाईलवर अभ्यास करताना दिसतात . वास्तविकपणे चित्र मात्र गंभीर व विलक्षण आहे . मुलांचा बहुतांश वेळ हा मोबाईल रिल्स, शॉर्ट व्हिडिओ पाहण्यातच जाताना दिसतो. याचे व्यसन इतके प्रत्येकाच्या मानसिकतेमध्ये घुसलेले आहे ते बाहेर पडणे कदापिही शक्य नाही. एक उदाहरण म्हणून समजून घ्या, समजा एखाद्या व्यक्तीचा मोबाईल हा कार्यालयाला किंवा इतर कामाच्या ठिकाणी जात असताना स्वतःच्या घरी राहिला आहे . हे त्याला पूर्णपणे माहीत असते.पण तो घरी येईपर्यंत मोबाईल पॉकेटमध्ये ठेवतो त्या पॉकेट ला अनेक वेळा हात लावतो. एवढ्यावरच तो थांबत नाही. त्याला कित्येक वेळा भास होतो की, मोबाईल आपला आपल्या जवळच आहे. याचाच अर्थ असा होतो, 'माहीत असून सुद्धा मोबाईल आपल्याजवळ आहे' हा आजार सुद्धा फोबियाचा प्रकार असू शकतो.
वरील विवेचन करण्या पाठीमागचा मुख्य हेतू असा आहे की, तरुण पिढी ही पूर्णपणे मोबाईलच्या अधीन झाली आहे . तरुण पिढीने एक अभ्यासाचे कारण पुढे करून राहिलेल्या खूप मोठ्या फावल्या वेळामध्ये या तरुण पिढीचा वेळ हा मोबाईल वरील मनोरंजनामध्ये जातो. इथपर्यंत ठीक . दैनंदिन व्यवहारातील जाहिराती पाहत असताना अनेक प्रकारच्या अशा जाहिराती असतात की, त्यामध्ये चक्क तरुणांना 'महाराज' यासारख्या संबोधनाने संबोधले जाते व वेगवेगळ्या ॲप डाऊनलोड करून त्या ॲपवरून आपण एवढे पैसे जिंकू शकता पैसा डायरेक्ट आपल्या बँक अकाउंट मध्ये कसा जातो. याची प्रतिकृती दाखवून या तरुण पिढीला गुमराह केल्याच्या घटना आपण ऐकत असतो. ज्ञान मिळवणे आणि ज्ञानाची दळणवळण करणे यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान हा मानव कल्याणासाठी बहुमोल ठेवा .हे निर्विवाद सत्य आहे. परंतु, याचा वापर कसा करायचा हे विज्ञान ज्या त्या व्यक्तीच्या हाताच्या बोटावर ठेवते! ही वस्तुस्थिती आहे . मग प्रश्न पडतो मेकॅनिकल टीचर पेक्षा संवेदनशील टीचर या गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला देतो. मेकॅनिकल टीचर हा सूचना देतो आणि सूचनेनुसार काम करून घेतो म्हणून गुरु शिष्य परंपरेला कुठेतरी छेद निर्माण होतो की? अशीही एक शंका मनात येऊन जाते.
हजारो लाखो तरुण आज मोबाईल द्वारे क्रिकेट सीझनमध्ये क्रिकेटवर पैसे लावतात. कमी वेळामध्ये अति पैसा कमावणे , हा त्यांचा मुख्य हेतू. क्रिकेट वरील ॲप डाऊनलोड करण्यासाठी क्रिकेटच्या फिवर मध्ये प्रत्येक कंपनी आपापल्या ॲपचा प्रचार करताना दिसते. पैसा कसा कमवावा ? टीम कशी तयार करावी? अशा अनेक प्रकारचे मार्गदर्शन सुद्धा करते आणि शेवटी हा खेळ हानिकारक आहे यामध्ये आर्थिक नुकसान सुद्धा होऊ शकते . अशा प्रकारचा कायदेशीर सल्ला कंपनी देते . कंपनी कंपनीचे काम करते. पैशाचा मोह दाखवून ते खेळणाऱ्या लोकांना सावध सुद्धा करते.तरीही लोक कोणत्याही प्रकारचा विचार न करता कमावणारी कमी ,पण ..गमवणारी जास्त आहेत. त्याचे चित्र आपल्याला प्रत्येक खेडोपाडी ते शहरापर्यंत पाहायला भेटते. कुठेतरी एखाद्याला पैसे येतात आणि त्याच्याकडे पाहून सर्व इतर तरुण मंडळी दिवा स्वप्नांमध्ये रमून जाऊन अशा खेळांवरती पैसा लावतात व पैसा गमावतांना अनेक तरुण शिकार बनली आहेत. कोणत्याही ॲपवर किंवा कंपनीवर दोष द्यायचा नाही. परंतु , त्याला बळी पडणारा तरुण हा सुरुवातीला छोट्या छोट्या रकमा लावून टीम तयार करतो आणि याची सवयीत रूपांतर होते हे त्रिकाल बाधित सत्य कोणीही लपवू शकत नाही . तरुण हे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अशा प्रकारच्या व्यसनामध्ये अडकतात शेवट मात्र निराशेच्या जगात केला जातो. अशा खेळांपासून अनेक शॉक बसलेली लोकं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. इथे नम उल्लेख करणे योग्य वाटत नाही. एका व्यक्तीने तर अक्षरशः स्वतःची रेडीमेड गारमेंट विकून करोडो रुपयाचा लॉस झालेली व्यक्ती प्रत्यक्षात आहे . प्रश्न पडतो हजाराने लाखो रुपये गमावलेली कित्येक असतील अशा प्रकारची ॲप ज्या त्या सीझनमध्ये प्रत्येक ठिकाणी जाहिरातीच्या स्वरूपात आपल्याला पाहायला खास करून प्रत्येकाच्या हातात असणारा मोबाईल व त्यावर असणारी मनोरंजनात्मक ॲप प्रत्येक ठिकाणी ती जाहिरात फ्लॅश होते. अनेक प्रकारची ॲप्स क्रिकेटशी संबंधित आहे . तो खेळ खेळणे किती सोपे आहे . याची जाहिरात सुद्धा केली जाते . हजार ते लाखोंमध्ये कित्येक लोक प्रभावित होतात . ॲप डाऊनलोड करून कोणी मौज म्हणून, कोणी शोक म्हणून,तर कोणी अनुभव म्हणून. या ॲपच्या नादी लागतात . सर्व कृतींचे रूपांतर सवयी मध्ये होते. ते एक प्रकारचे ऑनलाइन व्यसन बनते.
क्रिकेटचे सीजन संपले मग फावल्या वेळामध्ये इतर मनोरंजनात्मक साधनांचा वापर कसा करावा या प्रयत्नात असतात . तेव्हा त्यांना कायदेशीररित्या परिपूर्ण असणाऱ्या आणखी दुसऱ्या मोबाईलच्या स्क्रीन वरती लुकलुकणाऱ्या जाहिराती आकर्षित करतात. ती म्हणजे 'रमी' मोठमोठे जाहिरातदार या जाहिराती करतात . खास करून 'सेलिब्रिटी' या ॲपच्या जाहिराती करताना आपण सर्रास पाहतो . फिल्म इंडस्ट्रीज मधला कोणताही सेलिब्रिटी कोणाचा ना कोणाचा आदर्श असतो. कोणत्या ना कोणत्या सेलिब्रिटीद्वारे केल्या गेलेल्या जाहिरातीद्वारे लाखो तरुण वरील प्रमाणे मनोरंजन म्हणून ऑनलाइन रमी खेळताना दिसतील. सुरुवातीला जरी छोटी मोठी रक्कम लावून रमी खेळतात. प्रत्येकाच्या हातात असणारा मोबाईल त्यामध्ये असणारी विघातक ॲप्स व प्रत्येक मोबाईल हा बँक कनेक्ट आहे. स्वयं अर्थ पूर्ण व्यक्तीने अशा गोष्टी करणे ही थोडीशी वेगळा भाग मानू . परंतु ,आज अशी काही तरुण आहेत की, जी पूर्णपणे आई-वडिलांवर अवलंबून असतात. मग अशा तरुणांना जर अशी व्यसन लागली तर त्यांच्या आयुष्याचा प्रश्न खूप भयंकर आहे. हे वेगळे सांगायला नको . कारण, वर्तमानपत्रांमधून किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे अशा अनेक बातम्या येतात की,आशा तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातलेला ऐकायला व पाहायला मिळतो. मग त्यामध्ये त्याचे अज्ञान असेल, तरुण अवस्थेतील मन असेल, मी इतरांपेक्षा वेगळा कसा आहे ? ही मानसिकता असेल या सर्व गोष्टी प्रत्येक तरुणात असतात. या मनस्थितीचा फायदा संबंधित कंपन्या अर्थात ॲप्स उचलतात. यामध्ये कंपन्याचा कसलाही तरुणांना बळी पाडण्यासाठीचा प्रयत्न नसतो. असं ते त्यांच्या चेतावणी द्वारे दाखवतात. प्रत्यक्षात जाहिरातीमधून दाखवलेल्या मृगजळ फलप्राप्तीसाठी तरुण त्याच्या पाठी लागतात.
वरील प्रकारची दोन्हीही ॲपचे वर्गवारी केली असता, आपल्या लक्षात येते क्रिकेटशी संबंधित असणारे सर्व ॲप हे तीन तासांमध्ये लाखो रुपये कमवलेली एक जाहिरात दाखवतात.
क्रिकेटच्या फीवर मध्ये असणारी ॲप क्रिकेट फिवर मध्ये वापरायची. एरवी मात्र रमी सारखे ॲप मधून अनेक तरुण आपले जीवन उद्ध्वस्त करू पाहत आहेत. या सर्व तरुणांना माझे आव्हान असेल, मृगजळा मागे न धावता स्वयंप्रकाशित होऊन जीवनाचा मार्ग योग्य पकडल्यास योग्य वेळी आपले जीवन सावरले जाईल व प्रगती केल्याचा आनंद हा वेगळाच असतो, हे सिद्ध होईल.
📝#Rahul Dongardive
Very Nice 👌👌👌
उत्तर द्याहटवाThank you🙏
उत्तर द्याहटवा