On the occasion of celebrating Independence Day of India 15th August 2023.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
#The preamble of Indian Constitution
ᴇᴠᴇʀʏ Human being has a 𝙳𝙴𝚂𝙸𝚁𝙴, 🄳🄴🅂🄸🅁🄴 has many ways, who knows the subconscious mind, he will be the real hero.
On the occasion of celebrating Independence Day of India 15th August 2023.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
#The preamble of Indian Constitution
निकोप भारतासाठी मानसिकता बदलायला हवी
दलित म्हटलं की एका विशिष्ट वर्गाचा उल्लेख आणि त्या वर्गाविषयी असणारी एका विशिष्ट वर्गाची मानसिकता अत्यंत हीन व समज गैरसमजात असते . या ठिकाणी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. हजारो वर्षांपासून चालत आलेली हीन मानसिकता बदलणे सोपे नाही . परंतु विशिष्ट वर्गाने वैचारिक परिवर्तन करून घेतल्यास एकमेकांविषयी सामाजिक सामंजस्य राखल्यास त्या ठिकाणी मोठा बदल होऊ शकतो. वास्तवामध्ये प्रत्यक्ष असे घडतेघडते, हिंदू धर्मानुसार स्पृश्य आणि अस्पृश्य हे जे दोन घटक आहेत हीच मानसिकता आजही दिसून येते. त्याची तीव्रता कमी झाली एवढेच ! जेव्हा केव्हा आजचा आधुनिक दलित शिक्षण घेऊन पुढे जातो आहे, तेव्हा मात्र त्याच्यावर व त्याच्या गुणवत्तेवर जातीय समीकरणे कळत नकळतपणे लादली जातात. विशिष्ट वर्गवारीतून आलेला एखादा व्यक्ती आपल्या कार्यक्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करत असला तरीही त्याच्या कामाची चर्चा तर होतच नाही. परंतु ,तो कुठे चुकतो किंवा कोणती एखादी कळत नकळतपणे चूक घडते यावर एक विशिष्ट वर्ग लक्ष ठेवून असतो अर्थातच त्या व्यक्तीची कमतरता शोधून त्यावर मानसिक व सामाजिक एक प्रकारचा अदृश्य हल्लाच केला जातो.
पारतंत्र्यातील भारत आणि पारतंत्र्यानंतरचा स्वतंत्र भारत हा सर्व जगाचा आदर्श जरी ठरत असला तरीही त्यातील अंतर्गत जातीय समीकरणे , धर्म , पंथ यांच्यातील अंतर्गत कलह सुप्त अवस्थेमध्ये शीत युद्ध खेळत आहेत. जेव्हा-केव्हा याचा आगडोंब उसळतो तेव्हा, येथे वेगवेगळ्या नावाखाली दूर गंभीर परिणाम दिसून येतात. मग मणिपूर मधील हिंसाचार असेल, लव जिहाद सारखी प्रकरण असतील, जाती-जातीतील मतभेद हे कायमस्वरूपी आपल्याला पाहायला मिळतात. ज्या जातीचा मोठा समूह असतो ते समूह छोट्या जातीतील लोकांवर अन्याय अत्याचार करताना दिसतात. प्रस्थापित जाती आणि इतर जाती यांच्यामधील वैचारिक अधिष्ठान आणि एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आजही तेवढाच संवेदनशील आहे की, जेवढा स्वतंत्र भारताच्या अगोदर होता. भारत स्वतंत्र झाला भारताला स्वतःचे संविधान मिळाले. राज्यघटनेने प्रत्येकाला हक्क, कर्तव्य आणि जबाबदारी देऊन टाकली . वास्तविकता अशी आहे की, जो हक्क मागतो त्यालाच या ठिकाणी दोशी ठरवण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि त्यांना यशही येते. जो हक्क मागतो त्याला हक्क तर मिळतच नाही पण सजा मिळायला वेळ लागत नाही. प्रश्न पडेल सजा म्हणजे फक्त कायदेशीर गुन्हा ठरणे काय? तर ही सजा कायदेशीर गुन्ह्यात न येता सामाजिक गुन्हे मध्ये येते. अशी बरीचशी प्रकरण आहेत जी कायद्याच्या पटलावर न येता न्यायव्यवस्थेपासून वंचित राहतात आणि सामाजिक न्यायव्यवस्था त्यांना जेल पेक्षाही पत्थर वागणूक देते. समाजामध्ये अशी अनेक प्रकरण आहेत, जे मोठ्या समाजातील लोक छोट्या समाजावर अन्याय अत्याचार करतात किंबहुना स्त्रियांवर सुद्धा अत्याचार होतात. परंतु सामाजिक दबाव आणि हलाखीची परिस्थिती यामुळे ही गरीब लोक सामाजिक दबावा पुढे झुकतात. याचाच अर्थ असा होतो की, त्या ठिकाणी अन्याय होऊनही गप गुमान ते सहन करतात आत्मसन्मान आणि स्वाभिमान या गोष्टी त्यांच्यापासून सर्व कोसो दूर आहेत.
या उलट दुसरी गोष्ट या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावीशी वाटते. जर या छोट्या जातीच्या व्यक्तीकडून एखादा अपराध झाल किंवा संशयाचा बळी ठरला. तर त्याला गावाबाहेर हाकलून दिले जाते. जातीच्या नावावर त्याला नको ती ताशेरे ओढले जातात. त्याची मानसिक मानहानी करून त्याला न्यायालयीन हक्कापासून वंचित ठेवले जाते. कारण, समाजव्यवस्था अशी बनलेली आहे की, मोठ्या समाजावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष , समज गैरसमज किंवा खरंच अन्याय झाला असेल तर त्या बाजूने न्याय हक्कासाठी सर्वजण सहकार्य करतात . खरंच अन्याय असेल तर सहकार्य करणे गैर नाही. अन्याय करणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे. पण या उलट छोटा मोठा करत बसण्यापेक्षा जो अपराधी आहे. त्याला शिक्षा झालीच पाहिजे. अशी सरळ आणि साधी भावना प्रत्येकाने जपली तर कोणत्याही एका विशिष्ट घटकावर अन्याय होणार नाही.
भारताला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे झाली. तरीही स्वातंत्र्याचा खरा अर्थ आपल्याला कळलाय का? असा प्रश्न मनामध्ये सारखा भेडसावतो. प्रत्येक ठिकाणी अन्याय आणि अत्याचार यांची सीमाही अटकेपार गेलेली आहे. प्रत्येक ठिकाणी अन्यायाच्या घटना घडत असताना केंद्र सरकार व राज्य सरकार यांची शासन व्यवस्था कोणत्या पद्धतीने काम करते? हे कळायला थांग पत्ता लागत नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्राला प्रश्न केल्यास केंद्र शासन म्हणते, 'तो त्या वैयक्तिक राज्याचा प्रश्न आहे' आणि राज्य शासन म्हणते, 'केंद्राने हस्तक्षेप करायला हवा' दोन्ही सरकार- केंद्र शासन व राज्य शासन एकाच पक्षाची शासन व्यवस्था असून निर्णय प्रक्रियेमध्ये एवढी दिरंगाई का आहे? प्रत्येक राजकीय पक्षांची मत मतांतरे वेगवेगळी असू शकतात, विचारधारा वेगळ्या असू शकतात. देशासाठी सर्वांनी एकत्र यायला काय हरकत आहे? सामान्य माणसाने एवढी माफक अपेक्षा का करू नये? जागतिक पटलावर भारताचे प्रतिमा उंचावली हे जेवढे वास्तव आहे तेवढेच, अंतर्गत अस्थिरता आपल्याला रोखू शकत नाही . याचीही जाण सध्याच्या राजकीय लोकांनी ठेवावी. असं म्हटलं जातं, स्वतःचं घर संभाळावं म्हणजे, गावगाडा सांभाळता येतो. गाव सांभाळता आलं, तालुका , जिल्हा सांभाळता येतो. ज्याची जिल्ह्यावर पकड असते, तो राज्य आणि देश सांभाळू शकतो.एक मोठा राजकीय नेता होतो. देशाची सूत्रे हाती आल्यावर त्यांना सर्वांसाठी उद्देशाचा नायक म्हणून काम करणे अपेक्षित असते. पण...जेव्हा असे प्रसंग वास्तवात उतरतात, तेव्हा मात्र हिच राजकीय मंडळी पारंपरिक पद्धतीने आलेल्या राजकारणाची मुळी पकडून आधुनिकतेचा आव आणून हत्तींच्या दातासारखा खेळ करतात. हे वास्तव कोणीही मान्य करेल. कारण, सध्याची देशाची आणि राज्यांची राजकारणाची स्थिती तीच आहे.
जेव्हा भारत विकसनशील राष्ट्राचे स्वप्न पाहतो आणि प्रत्यक्ष उतरवण्यासाठी राजकीय रणनीती अवलंबितो. सध्याची 'मेक इंडिया' सारखे तत्व असो किंवा इतर असलेल्या योजना असो, त्या प्रत्यक्ष उतरवण्यासाठी गुणवत्तेला प्राधान्य देणे. या वाचाळ वाणी नव्हेत तर, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. प्रत्येक राजकीय नेत्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे . कोणताही नेता उच्च पदावर विराजमान होतो. याचा अर्थ तो त्याच्या कसोटीमध्ये यशस्वी झालेला असतो. पण जेव्हा यशस्वी होतो, तेव्हा त्याने आपली राजकीय भूमिका मांडत असताना ' संविधानाला ' विसरता कामा नये . कारण ,विकसित राष्ट्रासाठी निष्पक्ष भूमिका व त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना, उद्योग क्षेत्रातील लोकांना पुढे घेत असताना, त्या उद्योगाची फंडामेंटल काय आहे? त्याचबरोबर एखादा उद्योग अत्यंत कुशल पद्धतीने राबविण्यात येत असेल, तर अशा उद्योगांना चालना देण्यासाठी राजकीय मंडळीने 'जी ट्वेंटी' सारख्या विचारधारेमध्ये सहभागी करून घेऊन, भारतासाठी नवदृष्टी मांडण्याचा किंबहुना सिद्ध करण्यासाठी त्यांना संधी देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर विरोधी गटाला सुद्धा आपले मत मांडण्यासाठी वेळ देता आला पाहिजे. अशी जर मानसिकता नसेल तर , एक तर्फी हुकूमशाही अस्तित्वात आहे की काय? असे जनतेला वाटायला नको. कारण लोकशाहीमध्ये विरोधी गटाच्या भूमिकेला अत्यंत महत्त्व आहे विरोधी गटाशिवाय लोकशाही जिवंत राहू शकत नाही .असे होत नसेल तर, त्या लोकशाहीचा उपयोग काय?
एकंदरीत सध्याची राजकीय स्थिती व देशाची मानसिकता व तिला योग्य ठिकाणी किंवा अयोग्य ठिकाणी घेऊन जाण्याची राजकीय नेते मंडळाची भूमिका, ही अत्यंत पूर्वाश्रमीच्या मानसिकतेवर आधारित आहे. एखादा कुशल नेता असेल तर तो 'भारतीय' आहे . यापेक्षा तो कोणत्या जातीतला आहे. असाच विचार केला जातो. त्यानंतर तो कोणत्या 'धर्माचा' किंवा 'पंथाचा' आहे. असा विचार केला जातो. परंतु तो 'भारतीय' आहे. हा विचार कोणीच करत नाही. देशावर संकट आल्यानंतरच आपण भारतीय आहोत. "भारत माझा देश आहे.." या देशासाठी प्राण्यांची आहुती द्यायला प्रत्येक जण तयारही होतो. ही झाली ' 'देश भावना', 'देशप्रेम' मग देशात समतेने , आनंदाने राहण्यासाठी आपलं 'भारतीयत्व' कोठे जाते? भारतातील प्रत्येक घटक हा संकट समईच एक येणार आहे का ? तेव्हाच आपलं देश प्रेम, राष्ट्रीयत्व, राष्ट्रवाद जिवंत होतो, प्रखर होतो आणि न्याय हक्कासाठी आपण बंड आणि आंदोलने करतो. युद्धाच्या प्रसंगी ही आपण एक होतो. मग हीच मानसिकता आनंदाने राहण्यासाठी का बदलत नाही. तेव्हा मात्र हीच राजकीय मंडळी या अस्थिरतेचा फायदा घेऊन राजकारण करताना, त्याचबरोबर वेगवेगळ्या विचारधारा ही सत्तेमध्ये सामील होण्यासाठी अनेक प्रकारच्या युवत्या करताना, सर्व देश पाहतो आहे. हेही यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. अन्याय झाला असेल मग तो कोणीही असो तो 'गुन्हेगार' आहे याच दृष्टीने तिच्याकडे पाहायला हवे. परंतु अन्याय करणारा कोणत्या समूहातून येतो. त्यानुसार जर त्याचा न्याय निवडा केला जात असेल तर मात्र चिंतेची बाब आहे. अशा प्रकारची विकृत मानसिकता बदलण्यासाठी सामाजिक, राजकीय, धार्मिक , पंथ या सर्वांचीच भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. जर सर्वांनीच ठरवले 'न्याय' हा 'न्याय' असला पाहिजे . विघातक विकृतींना या ठिकाणी वाव नसला पाहिजे. तेव्हाच न्यायदेवतेच्या हातातील तराजू संतुलित राहील! अर्थात न्यायव्यवस्थेचे वेगळेपण सक्षम आणि सामान्य जनतेसाठी हक्काचे ठिकाण राहील! आजही हक्काचे ठिकाण आहे. परंतु , वर उल्लेख केलेल्या मानसिकतेचा विचार केल्यानंतर थोडीशी मनात शंका येते.
शेतकरी- THE FARMER
जगाचा पोशिंदा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, तो म्हणजे शेतकरी!!! जो प्रत्यक्ष संघर्ष संघर्ष करत असतो . प्रत्येक वेळेला तो एक प्रकारची पैंज लावत असतो पैंजमध्ये हरत असतो. जगामध्ये एकमेव असा हा शेतकरी निसर्गाच्या जीवावर , भरवशावर लाखो रुपये मातीखाली टाकत असतो . शाश्वती मात्र कोणतीच नाही. पण त्या शेतकऱ्याला कसली सुट नाही की, भविष्यातील संकटांना सामोरे कसे जायचे याची थोडीशी सुद्धा चिंता नसते . यश आलं तर कष्टाचा चीज झालं आणि अपयश आलं तर नशिबात नव्हतं! हे एक वाक्य त्याच्या जीवाला साथ घालून जाते. अपयशातही जीवन जगतो आणि यशामध्येही जीवन जगतो. जगत असताना यातना काय होतात? त्या शेतकऱ्यापेक्षा जास्त कोणी जानु शकत नाही. कारण आपण फक्त व्यासपीठावरून आणि एखाद्या पेपर संवादातून व्यथा मांडू शकतो पण त्या व्यथा आपण प्रत्यक्ष जगल्यानंतर त्याची दाहकता आणि दुःख किती असते याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही.
पूर्वीपासून शेतकऱ्याची हाल अपेष्टा होत असताना आपण सर्वजण पाहतो किंबहुना आपण त्यातला एक भागही असू शकतो. आधुनिक युगातील शेतीमध्ये क्रांती होत गेली . कमी क्षेत्रांमध्ये अधिकचे उत्पन्न होऊ लागले. धवल क्रांती आणि हरितक्रांती झाली . प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्याला याचा कितपत लाभ झाला हे कोणालाही अचूक सांगता येणार नाही . परंतु ज्या ठिकाणी जलसिंचन वाढले त्या ठिकाणी फळ बागायती शेतीचे क्षेत्रही विकसित झाले . विशिष्ट ठिकाणचा विकास झाला म्हणजे सर्व शेतकऱ्यांचे विकास झाला असं म्हणता येणार नाही. अज बहुतेक क्षेत्रामध्ये जलसिंचन योजना पोहोचलेल्या नाही. त्यामुळे तेथील शेतकरी आजही निसर्गावर आधारित शेती करत आहे . खास करून मराठवाडा, विदर्भ , खान्देश या ठिकाणी जलसिंचन नसल्यामुळे येथील शेतकरी निसर्गावर आधारित शेतकरी करतात आणि त्यांची शेती म्हणजे पूर्णतः एक प्रकारचा जादूचा आकडा असे म्हणावे लागेल .
शेतकरी शेती करत असताना त्या शेतीमध्ये त्याचा कुटुंबातील सर्व सदस्य शेतीमध्ये राब राब राबतात. शेती पिकवतात शंभर टक्के निसर्ग वर आधारित शेती करताना तर वर दगड आणि खाली माथा अशी परिस्थिती आहे . त्यामुळे शेतीमध्ये कुठल्याही उत्पादन जर चांगले आले तर त्याला बाजार भाव मिळत नाही . व्यापारी धोरण त्या शेतकऱ्यांच्या पदरात योग्य असा भाव पदरात पडू देत नाही. याच जर उदाहरण द्यायचं झालं तर, महाराष्ट्रातील कापूस पिक मोठ्या प्रमाणात पिकवले जाते. कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे या ठिकाणी शेतमजुरापासून शेतकऱ्याला चांगले दिवस आले आहेत. पण होतं काय, जर शेतकऱ्याने कापूस सुरुवातीला विकला तर त्या कापसाला शेवटी चांगला भाव असतो. हा झाला एका वर्षाचा अनुभव . म्हणून शेतकरी दुसऱ्या वर्षी आपल्या कापसाला शेवटी चांगला भाव येईल म्हणून कापसाचा साठा आपल्या घरी करून ठेवतो. त्यामध्ये मग अनेक अडचणी असतात अंगाला खाज सुटणे, लहान मुलाकडून किंवा इतर माणसाकडून नकळतपणे साठवलेल्या कापसाला आग देखील लागते. एवढा त्रास सहन करून शेतकरी त्या कापसाचे जतन करतो आणि शेवटी भाव योग्य मिळेल या आशेवरती तो जगत असतो. पण....होतं काय ज्या वर्षी शेतकरी मोठ्या प्रमाणात कापसाची साठवण करून ठेवतो नेमकं त्याच वर्षी कापसाचे भाव गडगडलेले असतात. तेव्हा, मात्र शेतकऱ्यांना काय करावे आणि काय करू नये असे होते. हा झाला पहिला भाग. नंतर कधी कधी तर असे होते शेतकऱ्याला सुरुवातीला चांगला भाव येतो तर कधीकधी मध्ये मध्यापर्यंत चांगला भाव येतो पुन्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची भारतीय बाजारपेठेवर परिणाम झालेला दिसून येतो . यामुळे शेतकरी आणि छोटे व्यापारी ही तोट्यात येतात. मग शेतकऱ्यांना प्रश्न पडतो आपण कापूस कधी विकायचा ? किती दिवस ठेवायचा? आणि कधी विक्रीला काढायचा ? याचा अंदाज सांगणार आज कोणीही नाही ,त्यामुळे आज शेतकरी मोठा तोट्यात जात आहे . परिणामी तो नको त्या मार्गावर जाऊन अपवादात्मक असेही प्रकार घडतात ते आपले जीवन यात्रा संपवतात.
ज्वलंत उदाहरण म्हणजे औरंगाबाद विभागाचे माजी आयुक्त माननीय केंद्रेकर साहेबांनी केलेला सर्वे याची बुलंद साक्ष आहे. हा सर्वे एक लाख लोक आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे असे स्पष्टपणे सांगून शासन दरबारी हा मुद्दा मांडला. शासनाने दखल न घेतल्यामुळे किंवा इतर कारणामुळे राजीनामा दिला. जेव्हा माझी आयुक्त साहेबांनी हा सर्वे केला तेव्हा त्यांनी काही विशिष्ट प्रश्नावली तयार केली होती . त्या प्रश्नावली मध्ये त्या शेतकऱ्याच्या दैनंदिन जीवनाचे चित्र स्पष्ट दिसत होते . त्यावर आधारित हा सर्वे अत्यंत तंतोतंत किंबहुना शंभर टक्के वास्तव म्हणावा लागेल. कारण आज पर्यंत एवढा ग्राउंड वर रिपोर्ट कधी झालाच नव्हता. आत्महत्येची कारणे समजतच नव्हती . ती समजण्यामध्ये अधिकारी कितपत यशस्वी झाला येणारा काळ सांगेल. तेव्हा मात्र शासनाने या अहवालाची आणि अहवालावरून केलेल्या शिफारशीची दखल घेतली असती तर बरे झाले असते. असे आत्मपरीक्षणाची वेळ या शासनावर येऊ नये.
आजच्या काळामध्ये सर्व सेवाभावी संस्था ,सामाजिक संघटना, शेतकरी संघटना , मजूर संघटना व सामाजिक चळवळीत काम करणारे ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक या सर्वांनी मिळून शेतकऱ्यांचे उद्बोधन वर्ग आयोजित करून शेतकऱ्यांचे मन घट्ट करून त्यांच्यामध्ये नवचेतना निर्माण करण्यासाठी,"एक होता कार्व्हर" सारखी पुस्तके त्यांच्या वाचनात आणून द्यावी . त्याचबरोबर शेती उद्योगांमध्ये यशस्वी महान व्यक्तींची चरित्रे त्यांना प्रेरणादायी होतील अशा स्वरूपात त्यांच्यासमोर मांडण्यात यावी की , ज्यामुळे त्यांच्यामध्ये नवचेतना निर्माण होणे, सर्वसाधारण शेती न पाहता ती शेती उद्योग म्हणून पहावी व यशस्वी शेती उद्योजक निर्माण व्हावेत. यासाठीचे प्रयत्न करणे आवश्यक आहे. असं जर झालं तर शेतकऱ्यांना मानसिक आधार मिळाल्यामुळे रडण्याऐवजी ते लढायला शिकतील. आशि त्यांची मानसिकता घट्ट करणे केवळ वरील लोकांची जिम्मेदारी नसून त्यात शासनाचा सिंहाचा वाटा असावा. शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव , त्याचबरोबर घरामध्ये होणाऱ्या नुकसान भरपाईची सोय सुद्धा शासनाकडून करण्यात आली तर, शेतकरी हतबल न होता मोठ्या उमेदीने जगायला शकेल. शेती व्यवसाय हा सर्व व्यवसायांना पुढे पुढे घेऊन जातो मग इतर व्यवसाय धारकांनी सुद्धा शेतकरी व शेती व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे. किमान बी बियाणे विक्रेते यांनी शेतकऱ्यांची अडवणूक न करता त्यांना योग्य त्या किमतीत बी बियाणे, खत यांची विक्री केली जावी. एवढी माफक अपेक्षा करायला काय हरकत आहे. वर उल्लेख केलेल्या सर्व घटक सामान्य जरी वाटत असले तरी, ते इतके मोलाचे आहे. ज्यामुळे एखादा शेतकरी निश्चितच शेवटच्या टोकापासून किंबहुना आत्महत्येपासून दूर जाईल आपल्या कुटुंबाचा आधार बनेल.
।।जय जवान जय किसान।।
📝#Rahul Dongardive
Manipur incident is the height of brutality
भारत जगातील आगळावेगळा देश म्हणून सर्वत्र परिचित येथील धर्म, जाती, पंथ, वेशभूषा, पारंपारिक पद्धती यांना सर्वसमावेशक असणारा हा भारत जगामध्ये आपलं वेगळेपण सिद्ध करतो. स्वातंत्र्य पूर्वीचा भारत आणि स्वातंत्र्योत्तर भारत अल्पावधीमध्ये केलेली अफलातून प्रगती पहिल्यावर जगालाही हेवा वाटतो. ज्या ठिकाणी विज्ञानाची सुरुवात शून्यातून झाली तिथे इस्रो वैज्ञानिक संस्था आज जगामध्ये आपला विलक्षण ठसा निर्माण करत आहे. 14 जुलै 2023 दुपारी दोन वाजून 35 मिनिटांनी चंद्रयान थ्री चे प्रक्षेपण यशस्वी झाले. सर्व भारतीयांसाठी गौरवाची अभिमानाची बाब ! पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून यशस्वीपणे अंतराळात सुद्धा भरारी घेणारी महिला याचा जगाला अभिमान. भारतीय वंशाच्या असणाऱ्या कल्पना चावला आणि सुनीता विल्यम नागरिकत्व जरी अमेरिकेचे असले, नासा मधून जरी त्या चंद्रावर जाऊन परतत असताना यांनास तांत्रिक अडचण आल्यामुळे कल्पना चावलाचा मृत्यू झाला. जगामध्ये या भारतीय वंशाच्या आहेत म्हणून भारताने मोठा त्यांचा गुणगौरव केला . सर्व देशवासीयांना याचा अभिमान होता.
भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू आदिवासी समाजातील उच्चपदस्थ महिला म्हणून सर्वांना गर्व आहे. एका बाजूला केलेला महिलांचा गौरव आणि दुसऱ्या बाजूला भारतामध्ये लांच्छनास्पद घडलेल्या घटना यामधील खूप मोठी दरी पाहिल्यानंतर आपण अनेक क्षेत्रामध्ये आपली प्रगती करत आहोत तर दुसऱ्या बाजूला त्याच महिलेच्या इज्जतीचे धिंडवडे भर चौकात काढले जातात. यावर एक शब्द किंवा एखादा प्राईम टाईम हल्लाबोल कोणत्याही चैनल वर दिसला नाही. ही लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभ याकडून अवहेलना होत नाही का? साध्या साध्या गोष्टीला ब्रेकिंग न्यूज बनवणारा मीडिया एवढी मोठी घटना मणिपूरमध्ये घडते त्यावर एक चकार शब्द निघत नाही. फक्त मनिपुर पेटला आहे,जळतो आहे, दोन-तीन महिन्यापासून तेथील आग शांत होत नाही. डबल इंजिन सरकार आहे तरीही राज्यातील आरजुकता वाढतच आहे. याची कारण आणि मूळ शोधण्यात मीडियाला रस वाटत नाही का ? घटनाही तीन मे 2023 रोजी घडते त्याची पडसाद सीमित भागापुरते राहतात. मानवाच्या मनाला हेलावून आणि स्तब्ध करून टाकणारा व्हिडिओ हळूहळू व्हायरल होतो. महाराष्ट्रापासून देशाच्या राज्यसभेपर्यंत सभागृहा तहकूब होतात तेव्हा, कुठे आपल्या मिडीयाला जाग येते आणि ब्रेकिंग न्यूज लागते...हे सर्व रिपोर्ट अगोदरच मीडियाला माहीत असावेत परंतु जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकणार नाही. आजही जातीय चटके या देशांमध्ये आपणाला अनुभवायला मिळत आहेत प्रत्येक राज्यामध्ये एक विशिष्ट वर्ग एका विशिष्ट वर्गाच्या विरोधात हेवा करू लागलेला आहे.
मणिपूर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला निर्देश दिले की, मैंतेई समाजाचा अनुसूचित जनजातीमध्ये समावेश करण्यात यावा,त्यासाठी त्यांनी योग्य ती पावले उचलावी. या निर्देशाचे समज गैरसमज पहाडी भागात राहत असणाऱ्या आदिवासी जमाती 'कुकी' व 'नागा' यांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे समज गैरसमज निर्माण होऊन या निर्णयाच्या विरोधामध्ये 'ऑल ट्राईब स्टुडंट्स मनिपुर ' द्वारे मोठा मोर्चा निघाला. मोर्चामध्ये किमान 50 ते 60 हजार विद्यार्थी सहभागी होते आणि या ठिकाणी खऱ्या समज आणि गैरसमजला सुरुवात झाली. अगोदर सोशल मीडिया रिपोर्ट आणि त्यानंतर मीडिया यांच्यानुसार त्या मोर्चामध्ये अनुसूचित जमातीवर मैंतेई समाजाच्या लोकांनी आक्रमण केले आणि मोर्चामध्ये हल्ला कल्लोळ माजला. मोर्चाची कुठेही वाच्यता होऊ नये म्हणून मणिपूर सरकारने तीन मे रोजी सर्व इंटरनेट सेवा बंद केली होती. जो विद्यार्थ्यांच्या मोर्चामध्ये गैरसमज निर्माण झाला होता. अगदी त्याच प्रकारचा मैंतेई समाजामध्ये गैरसमज निर्माण झाला. मोर्चाचे दंगलीमध्ये रूपांतर झाले होते. प्रत्येक ठिकाणी लोक सैरावैर भटकत होते . एकमेकावर हल्ले होत होते. क्षणांमध्ये शांत असणारा मणिपूर आगीने होरपळत होता.
मणिपूरच्या पहाडी भागांमध्ये राहणाऱ्या नागा आणि कुकी समाजाच्या मनामध्ये प्रस्थापित असणाऱ्या मैंतेई समाजाबद्दल काही गैरसमज होते. त्याची कारणही तशीच होती कारण त्यांच्या हे स्पष्ट होते की, मैंतेई हा समाज परकीय आहे. त्याचबरोबर तो आजही पूर्वीपासून सत्तेत आहे. साठ आमदारांपैकी 40 आमदार हे त्याच समाजाचे आहेत . फक्त 20 आमदार हे कुकी आणि नागा या आदिवासी समाजाचे आहेत. जर या प्रस्थापित लोकांना अनुसूचित जनजातीमध्ये समावेश केला गेला तर, आपल्या संविधानात्मक अधिकारावर गदा येईल. कारण संविधानानुसार तेही त्याच जागेवर दावा करू शकतील. शैक्षणिक संस्थांमध्ये व इतर सरकारी कार्यालयामध्ये त्याच लोकांची भरती केली जाईल , हा एक महत्त्वाचा मुद्दा. पारंपारिक पद्धती प्रमाणे प्रस्थापित समुदाय हा पहाडी भागांमध्ये जमीन खरेदी करू शकत नाही. परंतु पहाडी भागातील असणारे कुकी आणि नागा लोक सर्वत्र जमीन खरेदी करू शकतात. जर या प्रस्थापित समाजाला पूर्वीपासून राज्य करत असलेल्या समाजाला अनुसूचित जनजातीमध्येच प्रवेश मिळाला तर, ते लोक पहाडी इलाख्यात आक्रमण करतील आणि येथील मूळनिवासी लोकांचे सांस्कृतिक आणि पारंपारिक अस्तित्व नष्ट होईल. अशी भीती त्यांच्या मनात होती. म्हणून मणिपूर आदिवासी विद्यार्थी संघटनेने मोर्चा काढला होता.
वर उल्लेख केल्याप्रमाण पूर्वी पासून या दोन समाजामध्ये चालत आलेली वैमानस्य व समज आणि गैरसमज याचा विस्फोट झाला. ज्याप्रमाणे कुकी आणि नागा यांच्यामध्ये अफवा पसरवण्यात आली आणि दंगल उसळली त्याचाच परिणाम म्हणून त्याच प्रकारच्या अफवा मैंतेई समाजामध्ये सुद्धा झाल्या. त्याचाच परिणाम म्हणून 04 मे 2023 रोजी समाजाचा 800 ते 1000 लोकांचा समूह आधुनिक क्षेत्रासह एफ आय आर रिपोर्टनुसार बि. फिनोम पहाडी इलाख्यात असणाऱ्या गावात घुसला तिच्यामध्ये एके फोर्टी सेवन, एस एस एल आर, 302 रायफल यासह आदिवासी लोकांवरती आक्रमण केले. यांच्याकडेही शस्त्रे आली कुठून? हा मोठा गंभीर आणि कुठ प्रश्न आहे. मैंतेई समजाणे आदिवासी समाजावर आक्रमण केले आहे. त्यामध्ये ते लोक घरे पेटवतात जीवे मारतात या भीतीपोटी समोरच असणाऱ्या घरामध्ये एक कुटुंब राहत होते. आपला जीव मुठीत धरून जीव वाचावा म्हणून जंगलामध्ये पळत होते. हजाराच्या संख्येने आलेल्या हल्लेखोराने त्यांना पाहिले. त्यांचा पाठलाग करत हल्लेखोरांनी त्यांना गाठले. सुडाने पेटून उठलेल्या नराधमांनी मातेसमान असणाऱ्या पन्नास वर्षीय महिलेला नग्न करून, 21 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केला . चाळीस वर्षे महिलेला सुद्धा नग्न केले . अशा दोन्ही महिला नग्न करून भर रस्त्यावरून त्यांची गावातून नग्न धिंड काढण्यात करण्यात आली. नग्न धिंड काढून सर्वजण हजारोंच्या संख्येने आलेला हल्लेखोरांचा समूह त्या माता माऊलींच्य लग्न शरीराचे दिंडवडे काढून थांबला नाही, तर त्या महिलांच्या प्रायव्हेट पार्टची छेडखानी करत असतानाचा व्हिडिओ अत्यंत संवेदनशील आणि अपमान कारक आहे. एक स्त्री आपल्या इज्जतीचे धिंडवडे इतक्या सहज काढून देईल काय ? स्वतःचे कपडे काढून त्यांच्याबरोबर चालेल काय ? याला ती विरोध करत होती . तिला वाचवण्यासाठी तिचे वडील आले तर त्या नराधमांनी त्याला गोळी घालून जागीच ठार मारले . तेव्हा मात्र ती आपल्या वडिलांसाठी स्त्री निर्वस्त्र होण्यास तयार झाली . तिचा भाऊ तिला वाचण्यासाठी आला तर त्यालाही ठेचून मारण्यात आले. एक अबला स्त्री काय करणार? असेच म्हणावे लागेल. शेवटी त्या नालायक दुष्कर्म करणाऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे ऐकावे लागले. नाही ऐकव तर, आणखीन एक दोन जनाच्या लाशी पडल्या असत्या. एक लाजिरवाणी बाब म्हणजे , यामध्ये पोलीस असूनही काही करू शकले नाहीत. ही मोठी चिंतेची बाब स्पष्टपणे जाणवते . मग अशा लोकांना संरक्षण कोण देणार ? या प्रश्नाचे उत्तर सहज मिळणे शक्य नाही. मन पिळवटून येते,स्तब्ध होते , शब्द राहत नाही आणि यावर , 18 मे 2023 तारखेला एफ आय आर दाखल झाल्यानंतर घटनेमागील पडद्याचा राज बाहेर निघतो. 19 मे 2023 ला प्रस्थापित समजल्या जाणाऱ्या हल्लेखोराकडून कडून केल्या गेलेल्या जगातील सर्वात वाईट घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर येतो आणि देशच काय जगाला सुन्न करणारी घटना पाहून सर्वजण हळूहळू व्यक्त करतात . तरीही केंद्र सरकारला जाग येत नाही याची मात्र शोकांतिकाच आहे.
एवढा वाईट प्रसंग एखाद्या भगिनीशी व्हावा आणि असे दुष्कृत्त करणारा आरोपी दोन महिन्यानंतर अटक होतो. हे कोणत्या विवेकी माणसाला आणि शासन व्यवस्थेला पटेल काय? राज्य सरकार यावर कोणतीही कारवाई सहजासहजी करत नाही. यातच त्याचा अर्थ समजून जायचं आरोपीची किती आणि कुठपर्यंत पोहोच आहे. या दोन्ही समाजाच्या हिंसाचारामध्ये आतापर्यंत 120 च्या वर मृत्यू पावले आहेत. आतापर्यंत 90 दिवसाच्या पुढे झाले तरीही मनिपुर पेटलेलेच आहे . त्यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकार चुपी साधून आहेत . परिस्थिती आवाक्याच्या बाहेर आहे. जेव्हा हे सुप्रीम कोर्टाच्या लक्षात येते तेव्हा, सुप्रीम कोर्ट राज्य आणि केंद्रामध्ये हस्तक्षेप करून यावर गंभीर पावले उचलायला लावते. नसता सुप्रीम कोर्ट दखल देईल अशा प्रकारची खडी सुनावणी केल्यानंतर देशाचे पंतप्रधान मीडियासमोर येतात आणि त्यांचं हृदय भावनाप्रधान होतं. त्यांच्याकडे यावर कारवाई संदर्भात राजकीय सुतवाच निघतात. देशाच्या सगळ्यात शक्तिशाली व्यक्तीकड ही बातमी एवढ्या उशिरा पोहोचते मग सामान्य जनतेकडे न्याय मिळण्यासाठी किती दिवस लागतील ? हे सांगता येत नाही.
हिंसाचार हा हिंसाचार असतो. त्यामध्ये कोण कोणावर करतो. यापेक्षा त्यामध्ये निरपराध आणि निष्पाप लोकांचे बळी जातात. स्त्रियांच्या इज्जतीची लक्तरे वेशीला टांगली जातात. निर्माण झालेल्या परिस्थितीमधून मार्ग काढणे हे येथील राजकीय शासन व्यवस्थेचे सर्वात मोठे आणि प्रथम कार्य असले पाहिजे. न्यायव्यवस्था आहे म्हणून न्याय जिवंत आहे . न्यायव्यवस्थेचे वेगळे महत्त्व आणि लोकांचा विश्वास त्यावर आजही भक्कम झालेला पाहतो. सुप्रीम कोर्टाने जर ताशेरे ओढले नसते, तर यावर पंतप्रधान बोललेच नसते का? असे अनेक प्रश्न आणि शंका मनामध्ये निर्माण होताना आपण सर्वांनी एकच गोष्ट लक्षात ठेवायला हवी. व्यक्ती पेक्षा देश श्रेष्ठ आहे. देशापुढे सर्व व्यक्ती समान आहे आणि हा आपला मूळ गाभा समोर ठेवून अन्याय अत्याचार करणाऱ्याला कठोरातील कठोर शासन व्हावे ही एवढी न्याय मागणी शासन दरबारी उतरावी. त्याचबरोबर नव्वद दिवसापासून पेटलेले मनिपुर शांत व्हावे हीच इच्छा.
# 📝Rahul Dongardive
इंग्रजांनी भारतात प्रथम रेल्वे निर्माण केली भलेही त्याची सुख सुविधा ही त्यांच्यासाठी त्यांनी केलेली असली तरीही, ती एकदम मजबूत उत्कृष्ट गुणवत्तेची होती. हे वास्तव. कोणीही नाकारू शकत नाही. 'व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले', हे काय नवीन नाही. त्यांनी व्यापारही केला ,अन्याय केला अत्याचार केला. तत्कालीन परिस्थितीमध्ये निर्माण केलेली वास्तुशिल्प, नद्यांवरील पुलं यांची बांधणी एवढी मजबूत होती. ते जाऊन आज 75 वर्षे झाली. तरीही त्या काळात केलेल्या एखाद्या वास्तूची गुणवत्ता आपण पाहत आहोत. एवढेच काय त्यांची कार्यक्षमता संपल्यानंतर आजही भारत सरकारशी ते वस्तू किंवा पूल यांच्या विषयीचा पत्रव्यवहार करतात आणि होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव करून देतात.
वरील दाखले येण्याचा एवढाच उद्देश होता की,आज भारत स्वतंत्र आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुद्धा आपण साजरा केला. जग भारताकडे एका मोठ्या आशेने पाहत आहे. एक समृद्ध अशी विकसित राष्ट्राची निर्मिती होत असताना 'विकसनशील' शब्द आपल्याला सोडत नाही. मोठी गांभीर्याची गोष्ट जरी असली, तरी सध्याचे राजकारणी त्याकडे एवढे संवेदनशील आहेत असे वाटत नाही. कारण हजारो कोटी रुपये खर्च होऊन सध्याचे राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग निर्माण केले जात आहेत. महामार्गावरील एवढे मोठे खर्च पाहत असताना हृदय भरून येत. आपला भारत हा विकसित होतो आहे याचा अभिमानही वाटतो. परंतु, जेव्हा रस्ते निर्माण होतात तेव्हा मात्र रस्त्याकडे पाहून चिंता वाटते.
डांबरी रस्ते पावसाने खराब होतात. हे जरी मान्य केले. तरीही त्याची गुणवत्ता एवढी कमकुवत असू नये. रस्ता पुढे व्हावा आणि पाठीमागे डांबर उकडून जावे एवढी तरी गुणवत्ता आजच्या गुत्तेदाराने आणि राज्यकर्त्यांनी सांभाळावी. कारण रस्ता निर्माण केला जातो. हजारो, लाखो, करोडो रुपये त्याच्यावर खर्च केले जातात. त्याचा हिशोबही शासनाला तसा दिला जातो. शासनही त्याप्रमाणे त्याला मंजुरी देते. रोड पूर्ण झाला म्हणून त्याचं कम्प्लिशन सर्टिफिकेट देते. वास्तवात मात्र त्या ठिकाणी खड्ड्यात रोड आहेत? की रोडमध्ये खड्डे आहेत? याचा प्रश्न कोणीही सोडू शकत नाही. भारतातील अनेक राष्ट्रीय किंवा राज्य मार्ग असतील डांबर उखडून खड्डे पडलेच आहेत . रस्त्यावर निर्माण करण्यात आलेल्या नवीन फुल सुद्धा एक वर्षाच्या आत पडावा , यापेक्षा कौतुकास्पद कामगिरी आधुनिक भारतीय इंजिनिअरिंगची कामगिरी मोठी असू शकते काय ?
भारतीय स्वातंत्र्यानंतर भारत देश हा लवकरात लवकर विकसित राष्ट्र होईल अशी सर्वांनी अपेक्षा केली होती. भारतीय स्वातंत्र्याचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी "ट्रीस्ट् विथ डेस्टिनी" त्यांचं गाजलेलं भाषण. जग झोपलेला आहे आणि आपण स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करत आहोत. हा जल्लोष एवढ्या पुरता मर्यादित न राहता आलेल्या प्रत्येक आवाहनांना तोड देण्यासाठी आपण प्रत्येकाने संघर्ष केला पाहिजे. भारतीय स्वातंत्र्यासाठी दिलेल्या अनेक थोर स्वातंत्र्यसेनानींचा विसर पडू न देता मोठ्या शक्तीने आणि हिमतीने या देशासाठी अर्थात इमानदारीने स्वयं प्रगती करून घेतली पाहिजे.
आज असे नाईलाजाने शंका येऊ लागते. ब्रिटिश निघून गेले परंतु, त्यांची कूटनीती आणि क्रूरता आजही आपल्या प्रशासन व्यवस्थेने जपून ठेवली आहे की काय? असे संभ्रम सामान्य जनतेच्या मनात निर्माण होतात.
समाजामध्ये अशी नेहमी चर्चा होत असते की, प्रत्येक रस्ता निर्मितीमध्ये राज्यकर्ता गुत्तेदार आणि प्रशासन व्यवस्थेतील लोक एकमेकांच्या हातात हात घालून पुढे जात आहे. रस्ता निर्माण करत असताना त्या रस्त्याची गुणवत्ता आणि दर्जा यावर कोणीही विचार न करता फक्त आणि फक्त कमिशन कोणाला किती द्यायचे? प्रत्येकाची भागीदारी किती असावी? आणि रस्ता कागदपत्रे कसा पूर्ण करावा? याचा एक नवीन पायंडा स्वतंत्र भारतात अगदी गुण्यागोविंदाने राबवला जातो. वास्तविक याचा कोणालाही पुरावा देता येणार नाही. परंतु अशी चर्चा समाजात दबक्या आवाजाने होत असते. कारण सामान्य माणसांनी अन्याच्या विरोधात बोलू नये हीच अवस्था आज भारतामध्ये सर्वत्र दिसून येते.
भारतातील रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण हे अत्यंत गंभीर आहे. त्याचबरोबर एखादा कर्ता पुरुष त्या कुटुंबातून अपघाताने हिरावून घेतला, तर त्या कुटुंबाची काय परिस्थिती निर्माण होते ? हे ते कुटुंबच जाणे . म्हणून, प्रशासन व्यवस्था आणि राज्यकर्त्यांनी भारतीय जनतेचा पालकत्वाची भूमिका निर्भय आणि इमानदारीने निभावल्यास, रस्तेच काय असं कोणत्याही शाखेतील काम हे सरळ आणि नियमाने केल्यास सामान्य जनतेचे हाल होणार नाही . छोटी बालके आपल्या आई-बाबांना मुकणार नाही. सामान्य जनतेला न्याय मिळेल एवढी माफक अपेक्षा एका भारतीयांनी करावी यात वावगे पणा वाटू नये.
📝🖊Dongardive Rahul.
गोव्याचा पाऊस गोव्याच्या दारू सारखा आहे.
जशी गोव्याची दारू भरपूर पितात पण चढतच नाही.
तसा पाऊस भरपूर पडतो पण दिसतच नाही
😜😜😃😃😃😃😃😃
कोल्हापूरचा पाऊस.....घरजावया सारखा..
घुसला की...मुक्कामच..
रहा म्हणायची पंचायत...आणि
जा म्हणायची पण पंचायत...
😃😃😃
अन मुंबईचा पाऊस 🌨🌧
प्रेयसीच्या बापा व भावा सारखा ..
कधी येऊन टपकेल आणि
धो धो आपल्याला धुउन 🤛🏻🤛🏻 निघून जाईल सांगता येत नाही
🤣😂😅
पुण्याचा पाऊस बायकांसारखा.
त्या चिडल्या कि धड स्पष्ट बोलत नाहीत.
नुसती दिवसभर पिरपिर चालु.
पाऊस पण धड रपरपा पडत नाही. दिवसभर पिरपिर रिप रिप भुरभुर चालु असते. नुसता वैताग!
😂😳☔😂☔
कोकण चा पाऊस ........
लग्न झाल्यावर संसारात गुंतून जातो तसा
एकदा सुरवात झाली की शेवट पर्यंत धो धो धो धो धो धो पडतो ...
☔☔☔🌧🌧🌧💦💦💦
😝😂😜
खान्देशातील पाऊस म्हणजे लफडं...!
जमलं तर जमलं नाहीतर सारच हुकल...!!
😂😂🤗☔☔☔🌧🌧🌧
बेळगावचा पाऊस सात जन्म मिळालेल्या अनुभविक बायको सारखा...!
प्रेमाची रिमझिम,🌦️आपुलकीच्या झरा 💦व वरून वर्षाव करत असतात मायेच्या गारा..
🌨️🌨️🌨️👍🏼😊😊😊
*येणाऱ्या पावसाळ्याच्या हार्दिक शुभेच्छा*🙌
Doctor - Cut practice
प्राचीन काळानंतर वैद्यकशास्त्रामध्ये होणारी क्रांती व त्याचे मानवी जीवनावर होणारे इष्ट परिणाम . वास्तविक पाहता रुग्ण हा हळूहळू बरा होत असायचा. तदनंतर आधुनिक युग सुरू झाले. आधुनिक युगामध्ये विज्ञानाला खूप महत्त्व आले. विज्ञान युगामध्ये प्रत्यक्ष कृतीला आणि परिणामांना महत्व दिले जाऊ लागले. एखादा आजार आहे म्हणजे ,त्याचे मूळ असले पाहिजे. मूळ शोधून त्या मुळावर घाव केल्यानंतर आजार पूर्ण बरा होतो. आजच्या विज्ञान युगातील मानसिकता व वास्तविकता आहे. प्रारंभिक काळामध्ये विज्ञान युगाने मानवी जीवनदानासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केले. मानव कल्याणासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग सुद्धा झाला,नव्हे होतो आहे. ही सत्यता जरी असली तरी त्यापुढे गेलेला हा विलास वादी आजचा डॉक्टर रुग्णाच्या जीवाशी खेळत आहे . मी या ठिकाणी नम्रपणे नमूद करू इच्छितो की सर्वच डॉक्टर असे नाहीत . जे आहेत ते आहेतच! हे मान्य किरा किंवा न करा ती सत्यता कोणीही नाकारू शकत नाही . मानव कल्याणासाठी अहोरात्र झगडणारा ही डॉक्टरच आहे. अशा डॉक्टरच्या चरणावरती नतमस्तक झाले तरी वावगे ठरणार नाही . परंतु रुग्णाच्या जीवाशी इमोशनल ब्लॅकमेल करून हजारो लाखो रुपये उकळणाऱ्या डॉक्टरांना शरम वाटलीच पाहिजे. अशा डॉक्टरांना मधील असणारा माणूस पुन्हा जिवंत व्हावा हीच अपेक्ष!!!
जगामध्ये लोकशाही शासन व्यवस्था आल्यापासून प्रत्येक व्यक्तीला आपले हक्क जबाबदारी आणि कर्तव्य याची जाणीव झाली. स्वातंत्र्य- समता - बंधुत्व त्रिसूत्री प्रसिद्ध झाली . आरोपी कोणीही असो त्याला आपली बाजू मांडण्याचा अधिकार मिळाला. न्याय हक्कासाठी तो न्यायालयात दाद मागू लागला. असं म्हटलं जातं ,'जगामध्ये अशा दोन व्यक्ती आहेत . त्यापैकी पहिली व्यक्ती न्यायालयीन न्याय मागत असताना वकिलाला नेहमी सत्य व खरे बोलावे. त्याच पद्धतीने डॉक्टरला सुद्धा आरोग्य विषयी सत्य माहिती द्यावी तेव्हाच कुठे त्या व्यक्तीला न्याय मिळू शकतो आणि आरोग्यावर योग्य उपचार होऊ शकतात.' म्हणून कधी या दोन लोक व्यक्तीला लोक खोटं बोलत नाहीत . त्याचे कारणही तसेच आहे कारण त्यामुळे त्या व्यक्तीला योग्य न्याय मिळू शकतो.
एवढी मीमांसा करण्या पाठीमागचा उद्देश हाच की आधुनिक युगामध्ये जेवढा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढला या पाठीमागचा मुख्य हेतू हा होता की, मानव कल्याणासाठी याचा योग्य वापर व्हावा वास्तविक पाहता हा वापर मानव कल्याणापेक्षा स्वहित साधण्याच्या पाठीमागे जास्त लागला आहे.
आज एखाद्या हॉस्पिटलमध्ये जायचं म्हटलं तर अगोदर आपल्या पॉकेट मनी पाहावे लागते. भरलेला खिसा नसेल तर उपचार मिळणार नाहीत . सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुद्धा अनेक आजारावर उपचार मोफत केले जातात. शासनाच्या अनेक आजारावर करोडो रुपयांच्या योजना राबवत आहे . हजारो लोक या योजनेचा लाभ घेत आहेत. शासनाद्वारे खाजगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा मोठमोठे आजारावर औषधोपचार आणि शस्त्रक्रियेसाठी लाखो रुपये नागरिकांच्या आरोग्याची चिंता म्हणून , खर्च करत आहे . अशा अनेक योजना आहेत की , ज्या राज्य शासनाद्वारे सामान्य रुग्णाला पैसे अभावी उपचार करता यावेत म्हणून शासन अर्थ पुरवठा करते आहे. 'आयुष्मान भारत योजना ' केंद्र सरकार मार्फत राबवली जाते . यामध्ये सर्व आजारांचा समावेश होतो . राज्य शासनामार्फत 'महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना' यामध्ये सर्व घटकांचा समावेश केल्या गेलेला आहे. 'राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना' केंद्र शासन व राज्य शासन अशा अनेक प्रकारचे योजना या योजनांमुळे गोरगरीब जनतेला सामान्य माणसाला खूप मोठा आधार मिळाला, नव्हे जीवनदान मिळाले.
मोठमोठ्या शहरातील नजरेत न मावणारी हॉस्पिटल पाहिल्यावर माणसाला अचंबित होते . खेड्या पाड्यातील माणसं औषध उपचारासाठी किंवा गंभीर आजारासाठी मोठमोठ्या हॉस्पिटलला जातात . बिचारी भोळी भाबडी जनता आरोग्यावर योग्य उपचार होईल म्हणून नको त्या पद्धतीने पैसा जमा करतात आणि नामांकित गाजलेल्या हॉस्पिटलमध्ये जातात. कोणी दाग दागिने तर कोणी जमीन गहाण ठेवतो . अशा मोठ्या हॉस्पिटलमध्ये जात असताना पेशंट सरळ कधीही जात नाही. बऱ्याच दिवसाच्या उद्भवलेल्या ट्रीटमेंट नंतर किंवा अचानक उद्भवलेल्या शारीरिक त्रासानंतर तेथील लोकल डॉक्टरच्या सल्ल्यानुसार, त्याला आपण रेफर असे म्हणतो. लोकल डॉक्टरच्या पत्रावर आपण त्या ठिकाणी ऍडमिट होतो आणि तिथून पुढे सुरू होते माणसाच्या देहाची वास्तविक प्रॅक्टिस . डॉक्टरच्या आयुष्यातील प्रॅक्टिस हा अविभाज्य घटक आहे. त्याने त्याचा कसा वापर करावा ? हे त्याला वैयक्तिक माहीत असते. एखादा रुग्ण अनेक आजाराने त्रस्त जरी असला योग्य निदान झाल्यास त्याला मोठमोठ्या खर्चातून वाचवले जाऊ शकते. डॉक्टरच्या व्यवसायातील ही मोठी नैतिक जबाबदारी आहे. परंतु डॉक्टर पेशंटच्या रोग निदान नंतर त्याच्याशी कशी औषधोपचार करायचे? हे तो ठरवतो . आजच्या भाषेत सांगायची झाल्यास रुग्ण आपल्या हॉस्पिटलमध्ये जास्तीत जास्त दिवस कसा राहील याची तजवीज केली जाते. कारण जेवढा रुग्ण हॉस्पिटलमध्ये जास्त दिवस राहील तेवढा त्याच्याकडून पैसा वसूल करता येऊ शकतो . अनेक प्रकारची चार्ज लावले जातात . नको त्या टेस्ट केल्या जातात अशा टेस्ट आहेत, तिच्यावर हजारो रुपये खर्च केले जातात. त्यापैकी बऱ्याचशा टेस्टची गरज सुद्धा नसते. मग सोनोग्राफी , टू डी इको , एक्स-रे असेल अशा नको त्या टेस्ट पेशंटचे नातेवाईक भीतीपोटी करतात. आलेल्या रुग्णांपैकी रुग्ण नातेवाईकास एखादा टक्का कळत असेल की, आपल्या पेशंटला झाले काय? बहुतेक 99% केसेस मध्ये अज्ञानपणाचाही डॉक्टर लोक फायदा घेतात, ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही. शहरातल्या डॉक्टरकडे ज्या लोकल डॉक्टरने पाठवले जाते त्याला आधुनिक युगातील दोन नंबरचा धंदा म्हटलं तर वावगे ठरू नये त्यानुसार त्याला त्याची कमिशन दिले जाते त्याला आता आज आपण कट प्रॅक्टिस म्हणतो.
धावपळीच्या युगामध्ये समाजामध्ये जवळपास 90 टक्के लोकांना एंटासिड या गोळीची गरज असते. दिनांक वीस जून 2023 च्या 'आज तक' न्यूज चॅनलच्या सर्वेनुसार ब्लॅक अँड व्हाईट शो मधील आकडेवारीनुसार 90 करोड पेक्षा जास्त लोकांना ऍसिडिटी ,बीपी आणि शुगर या आजाराने त्रस्त लोक आहेत या आजाराची कारणे सुद्धा तशीच आहेत जशी की दैनंदिन जीवनाच्या धावपळीमध्ये लोक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात व्यायाम करत नाही आहार असा आहे की ज्याला पचण्यासाठी कष्ट करावे लागतात पण तशी शारीरिक कष्ट लोकांकडून होत नाही म्हणून अशा आजारांना लोक बळी पडत आहेत हे आजार सुद्धा अशी भयंकर आहे की ज्यामुळे माणूस ऍस ऍसिडिटी म्हणून दुर्लक्ष करतो तर त्यात त्याला अटक आलेला असतो अशा बिकट परिस्थितीमध्ये कधीकधी मृत्यूने माणसांना कंवटाळलेले असते.
आजचे डॉक्टर वरील परिस्थितीचा फायदा अशाच प्रकारे उठवतात. एखाद्या पेशंटला अचानक धाप, दम ,दडपण आल्यासारखे, त्याचबरोबर चक्कर येऊन पडणे, खूप मोठ्या प्रमाणात घाम येणे, छातीमध्ये तीव्र वेदना होणे , अशा प्रकारची लक्षणे दिसल्यास रुग्ण आणि रुग्णाची नातेवाईक खूप घाबरतात . सुरुवातीला ते लोकल डॉक्टर कडे जातात. मग लोकल डॉक्टर त्यांना शहरातील त्याच्या पद्धतीनुसार चांगल्या डॉक्टरचा रेफर करतात. परिस्थिती इतकी भयावह असते की, लोकल डॉक्टरच्या सांगण्यानुसार रुग्णाचे नातेवाईक रुग्णाला घेऊन रेफर केलेल्या डॉक्टर कडे घेऊन जातात. तिथून पुढे सुरू होतो डॉक्टरचा कट प्रॅक्टिसचा भाग !...एखाद्या सिनेमालाही लाजवेल अशी भयंकर परिस्थिती निर्माण केली जाते. रुग्ण गाडीतून उतरल्यापासून आयसीयू रूम मध्ये घेऊन जाईपर्यंत सर्वांचे चेहरे पडलेले असतात. रुग्णाच्या नातेवाईकाचा तर विचारच करायला नको. त्याला काय करावे आणि काय करू नये ?याचे भान राहिलेली नसते. तो काहीही करायला तयार असतो. कारण, त्याला रुग्ण महत्त्वाचा असतो. तसं तो डॉक्टरांना बोलूनही दाखवतो. डॉक्टर साहेब काय पैसे लागायचे ते लागू द्या? पण माझ्या पेशंटला वाचवा...वेळ प्रसंगी डॉक्टरच्या पाया सुद्धा पडतात . अशी अनेक उदाहरणे आहेत जे आपण सर्रास पाहतो किंवा अनेक जणांनी ते अनुभवले सुद्धा असेल.
पेशंट ऍडमिट करे पासून स्टेबल होईपर्यंत लोकल डॉक्टर आणि शहरातील डॉक्टर यांची फोन सुरू असतात . त्या फोनवर लोकल डॉक्टर पेशंटच्या आर्थिक परिस्थितीचा इतिहास सांगत असतो . त्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे का? तो एवढे पैसे देऊ शकतो का ? पैशाच्या बिलामध्ये काही अडचण येऊ शकते का ? त्या पेशंटची पोहोच कुठपर्यंत आहे ? एखाद्या राजकीय संघटनेची किंवा राजकीय पुढाऱ्याशी संबंधित आहे का? तो वैयक्तिक रित्या स्वभावाने कसा आहे? त्याच्या जवळचे कोणी डॉक्टर आहेत का? किंवा इतर क्षेत्रांमध्ये काम करतात का? एवढी चौकशी झाल्या नंतर तो भावनिक आहे का? हा मोठा प्रश्न विचारला जातो आणि तिथून पुढे त्या रुग्णाला कशी ट्रीटमेंट द्यायची? हे तो शहरातला डॉक्टर ठरवतो. लोकल डॉक्टर वरील प्रश्नांची सर्व उत्तरे देतो रुग्ण कोण आहे? कसा आहे? काय आहे ? यापेक्षा तो पैशावाला आहे किंवा नाही? हा एक प्रश्न त्या रुग्णाच्या जीवाशी खेळायला लावतो. प्रत्यक्षात या प्रश्नांच्या अगोदरच त्या दोघांनाही सांकेतिक भाषेमध्ये माहिती मिळालेली असते.
लोकल डॉक्टर वर उल्लेखलेल्या लक्षणानुसार पेशंट आणि पेशंटच्या नातेवाईकांना अटॅक नसताना सुद्धा अटॅक आला असे सांगतो. शेवटी रुग्णाचे नातेवाईक डॉक्टरचे वाक्य अंतिम समजतात आणि शहरातल्या डॉक्टर कडे जातात. या ठिकाणी एक गंभीर बाब म्हणजे, लोकल डॉक्टर हा स्वतः रेफर केलेल्या डॉक्टर कडे घेऊन जा असे सांगतो . पेशंट किंवा नातेवाईकाने जर दुसऱ्या डॉक्टरच्या नाव सुचवलं तर तो त्या डॉक्टर कडे घेऊन जात नाही. पेशंटला अत्यंत गंभीर बनवण्यात लोकल डॉक्टरचा सिंहाचा वाटा असतो. हे नाकारून चालणार नाही . त्यानुसार त्याला शहरातील डॉक्टरकडे एडमिट केले जाते . अनेक प्रकारच्या टेस्ट झाल्यानंतर रुग्णाचा नातेवाईकाने जर 'परत टेस्ट बाहेर करू' असं सांगितलं रिपोर्ट नॉर्मल सुद्धा येतात. हा कोणता चमत्कार म्हणायचाआणि त्याच डॉक्टरच्या मनानं राहायचं म्हटल्यास दररोज 15 ते 20 हजार रुपये बिल आकारले जाते. रुग्णाला खरोखरच अटॅक आला असल्यास हे बिल आणि त्यावर औषध उपचार करणे गरजेचे आह. परंतु एखाद्या रुग्णाला अटॅक नसताना तशी परिस्थिती निर्माण करणे व त्यानुसार हाय ट्रीटमेंट देणे ही खरोखरच डॉक्टर प्रॅक्टिस आहे काय? हे डॉक्टरचे पाप नाही काय? असे अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होतात मग मुद्दा हा आहे. सुशिक्षित माणसांशी असे खेळ खेळले जातात तर जिथे शिक्षणाची गंगा अजून कसल्याही प्रकारे पोहोचलीच नाही,अज्ञान आहे. अशा लोकांशी हे डॉक्टर काय करत असतील याचा कोणीही अंदाज लावू शकत नाही.
हृदयाच्या संबंधित आजारामध्ये कोणीही रिस्क घेत नाही . ही वस्तुस्थिती आहे . परंतु, त्याच हृदयाशी डावपेच करणारा डॉक्टर हिंस्र पशु पेक्षा नीच आहे. असे काही रुग्ण पाहिले की , त्यांना धुंदीच्या गोळ्या देऊन हॉस्पिटलमध्ये आठ आठ दहा दिवस ठेवले जाते. रुग्ण बरा झाल्यानंतर सांगतो, तुम्ही बोलत होता , ऐकू येत होता , सगळे कळत होते . डोळे मात्र उघडत नव्हते . यावरून धुंदीच्या गोळ्या आहेत हे सिद्ध होते. रुग्णशुद्धीवर आला की एक गोळी दिली जाते.पुन्हा रुग्ण झोपी गेल्यासारखा दिसतो , हालचाली मात्र चालूच असतात. खरोखरच अटॅक असेल तर , त्यावर उपचार होणे गरजेचे आहे . वेळप्रसंगी ऑपरेशन करणे सुद्धा गरजेचे आहे. परंतु वरील लक्षणानुसार त्याला अटॅक आहे आणि त्यावर स्टेन टाकण्यासारखे उपचार करणे ही माणुसकीला काळीमा फासणारी लाजिरवाणी गोष्ट आहे. अशाच डॉक्टरच्या चुकीच्या निदानामुळे आणि पैशाच्या मोहापाई अनेक रुग्ण दगावल्याच्या घटना समाजात घडत आहेत.असे डॉक्टर राजकारणाशी संबंधित असल्यामुळे सामान्य रुग्ण त्यांच्या विरोधात दंड थोपटू शकत नाही किंबहुना पेशंट तर हातातून जातोच जातो . पण ...हाती निराशा आणि आर्थिक नुकसान या दलाल डॉक्टरांकडून केले जाते.
रुग्णाच्या टेस्ट अशा केल्या जातात, त्याचे रिपोर्ट पाहून कोणीही सांगेल,या रुग्णाला हे झाले होते..ते झाले होते .गंभीर आजार असल्यामुळे रुग्न दगावू शकतो . तशा प्रकारची आपण ऑपरेशन करत असताना संमती देत असतो . त्यानंतरच डॉक्टर पेशंटला ऑपरेशन थेटर मध्ये घेऊन जातात आणि उपचार करतात करतात. पण असे रिपोर्ट जर गलत असतील तर आपण न्यायालयात सुद्धा दाद मागू शकत नाही . हे वास्तव जरी भयंकर असले तरी, ते सत्य आहे परंतु पुराव्या अभावी आपण या ठिकाणी सिद्धता देऊ शकत नाही हे दुर्दैव ! कारण , सगळी संबंधित रुग्णालयाची व्यवस्था हात मिळवणी करून बनलेली असते. लोकल डॉक्टर कट वीस टक्के पासून 30% पर्यंत आहे ज्या ठिकाणी जास्त कट दिला जातो त्या ठिकाणी लोकल डॉक्टर पेशंट रेफर करतात. हे कोणीही नाकारू शकत नाही. काही डॉक्टरने याची कबुली सुद्धा दिलेली आहे पण पुढे कोणीही येणार नाही, दुर्भाग्य! पेशंट ऍडमिट होतो घरी जातो त्याच्याशी खेळलेले डाव त्याच्या लक्षात येत नाही . झालेल्या बिलिंग चा तपशील शहरातील डॉक्टर त्याला सविस्तर देतात अशा डॉक्टरांचे कट देण्यासाठी विशिष्ट यंत्रणा शहरातील डॉक्टर राबवतात इमानदारीने ज्याचा कट त्याला दिला जातो.
जाहीर आवाहन....
आदरणीय डॉक्टर ,एखाद्या रुग्णावर उपचार करत असताना त्याचे अचूक निदान करा.खरंच गरज असेल तर , त्यावर योग्य ते उपचार करा कठीण प्रसंगी ऑपरेशन सुद्धा करा . त्यातून तुम्ही कट पद्धती वापरा, तुम्हाला काय पाहिजे ? ते करा . पण....विनंती आहे . एखाद्या रुग्णाला कसलाही आजार नसताना पैशाच्या असुरी मोहापाई त्याच्या जीवनाशी खेळू नका . मान्य आहे तुम्ही, त्या रुग्णाचे जीवनदाते आहात . जीव दिला तर तुमची प्रॅक्टिस श्रेष्ठ आहे . पण ?..जीव घेतला तर नियती तुम्हाला माफ करणार नाही. स्वामी विवेकानंद यांच्या मतानुसार "कोणत्याही एका रुग्णाचा पाच मिनिटाचे निदान हे अंतिम असू शकत नाही....." मग विचार करा आपण मशीनद्वारे केलेले निदान आपल्या हातात आहे. निदान कसे करायचे हेच जर तुमच्या हातात असेल तर , वैद्यकशास्त्रात अज्ञान असणाऱ्या लोकांना तुमच्या मर्जीनुसार फसवू नका. तुम्ही इमानदारीने प्रॅक्टिस केली तर तुम्हाला आयुष्यात कमी पडणार नाही. पुढच्या पिढ्या सुद्धा आनंदात जगतील. पण एक लक्षात ठेवा नियती नावाची एक अशी देवी शक्ती आहे. जिथे तुमच्या कर्माचा लेखा जोखा ठेवला जातो . तुम्हाला पैसा भरपूर मिळेल पण समाधान कधीच मिळणार नाही.याची जाणीव असू द्या..
📝🖊𝚁𝚊𝚑𝚞𝚕 𝙳𝚘𝚗𝚐𝚊𝚛𝚍𝚒𝚟𝚎
क्रिकेट- सट्टा - रम्मी आणि तरुण
इंटरनेटच्या युगामध्ये प्रत्येक गोष्ट ही प्रत्येकाच्या अगदी बोटाच्या टोकावर आली . प्रत्येक जण जगाच्या आसपास या आंतरजालाच्या माध्यमातून अत्यंत जवळ गेला. जेव्हा पाहिजे तेव्हा, जगातील कोणत्याही गोष्टीचा कानोसा एव्हाना माहिती घेता येते. प्रत्येक जण आलेल्या समस्यातून उपाय शोधण्यासाठी या इंटरनेटचा वापर करतो. संगणकाच्या पिढ्या आणि त्यानंतर मोबाईल मधील पिढ्यांची क्रांती ही अतुलनीय आणि अमुलाग्र बदल घडवणारी. तंत्रज्ञान रुपी ज्ञानगंगा प्रत्येकाच्या हातात आहे. प्रत्येक जण नव्या गोष्टींचा शोध घेतो, बोध घेतो एवढेच नव्हे तर त्यातून तो नवीन शिकण्याचा प्रयत्न करतो. जगातील अशी कोणतीही गोष्ट नाही की जी अज्ञानरूपे राहील अशी नाही. ज्याची चिकित्सक आणि कुशाग्र बुद्धिमत्ता गुरु शिवाय इंटरनेटच्या माध्यमातून ज्ञान मिळवू शकते. ही वस्तुस्थिती जरी असली, तरीही गुरु शिवाय गत्यंतर नाही. हे वास्तव आहे. मेकॅनिक टीचर हा फिजिकल टीचर समोर कधीही टिकाऊ ठरू शकत नाही. मान्य आहे तो अचूक असेल परंतु संवेदनशील निश्चितच नसेल.
विज्ञान आणि तंत्रज्ञान या गोष्टीचा जेवढा शोध आणि मानवी कल्याणासाठी वापर वाढला. तेवढेच त्याचे दूर गंभीर परिणाम समोर येताना आपण पाहत आहोत . कोरोना काळातील अध्यापन हे पूर्णपणे ऑनलाईन झाले. त्याचे परिणाम ही चांगले झाले. त्याचबरोबर दुष्परिणाम सुद्धा झाले .हे नाकारता येणार नाही. मोबाईलच्या क्रांतीनंतर प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला खरा परंतु , त्याची गांभीर्यने दखल घेतल्यास, सरासरी असे दिसून येते की, सर्वात उदयनमुख समाजातील तरुण हा मोबाईलच्या व्यसनाच्या आहारी गेलेला दिसून येतो. मोबाईल जितका लाभदायी आहे तेवढाच तो भयंकर आहे.. आपण हे नाकारू शकत नाही. क्वचित प्रसंगी मुले मोबाईलवर अभ्यास करताना दिसतात . वास्तविकपणे चित्र मात्र गंभीर व विलक्षण आहे . मुलांचा बहुतांश वेळ हा मोबाईल रिल्स, शॉर्ट व्हिडिओ पाहण्यातच जाताना दिसतो. याचे व्यसन इतके प्रत्येकाच्या मानसिकतेमध्ये घुसलेले आहे ते बाहेर पडणे कदापिही शक्य नाही. एक उदाहरण म्हणून समजून घ्या, समजा एखाद्या व्यक्तीचा मोबाईल हा कार्यालयाला किंवा इतर कामाच्या ठिकाणी जात असताना स्वतःच्या घरी राहिला आहे . हे त्याला पूर्णपणे माहीत असते.पण तो घरी येईपर्यंत मोबाईल पॉकेटमध्ये ठेवतो त्या पॉकेट ला अनेक वेळा हात लावतो. एवढ्यावरच तो थांबत नाही. त्याला कित्येक वेळा भास होतो की, मोबाईल आपला आपल्या जवळच आहे. याचाच अर्थ असा होतो, 'माहीत असून सुद्धा मोबाईल आपल्याजवळ आहे' हा आजार सुद्धा फोबियाचा प्रकार असू शकतो.
वरील विवेचन करण्या पाठीमागचा मुख्य हेतू असा आहे की, तरुण पिढी ही पूर्णपणे मोबाईलच्या अधीन झाली आहे . तरुण पिढीने एक अभ्यासाचे कारण पुढे करून राहिलेल्या खूप मोठ्या फावल्या वेळामध्ये या तरुण पिढीचा वेळ हा मोबाईल वरील मनोरंजनामध्ये जातो. इथपर्यंत ठीक . दैनंदिन व्यवहारातील जाहिराती पाहत असताना अनेक प्रकारच्या अशा जाहिराती असतात की, त्यामध्ये चक्क तरुणांना 'महाराज' यासारख्या संबोधनाने संबोधले जाते व वेगवेगळ्या ॲप डाऊनलोड करून त्या ॲपवरून आपण एवढे पैसे जिंकू शकता पैसा डायरेक्ट आपल्या बँक अकाउंट मध्ये कसा जातो. याची प्रतिकृती दाखवून या तरुण पिढीला गुमराह केल्याच्या घटना आपण ऐकत असतो. ज्ञान मिळवणे आणि ज्ञानाची दळणवळण करणे यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान हा मानव कल्याणासाठी बहुमोल ठेवा .हे निर्विवाद सत्य आहे. परंतु, याचा वापर कसा करायचा हे विज्ञान ज्या त्या व्यक्तीच्या हाताच्या बोटावर ठेवते! ही वस्तुस्थिती आहे . मग प्रश्न पडतो मेकॅनिकल टीचर पेक्षा संवेदनशील टीचर या गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला देतो. मेकॅनिकल टीचर हा सूचना देतो आणि सूचनेनुसार काम करून घेतो म्हणून गुरु शिष्य परंपरेला कुठेतरी छेद निर्माण होतो की? अशीही एक शंका मनात येऊन जाते.
हजारो लाखो तरुण आज मोबाईल द्वारे क्रिकेट सीझनमध्ये क्रिकेटवर पैसे लावतात. कमी वेळामध्ये अति पैसा कमावणे , हा त्यांचा मुख्य हेतू. क्रिकेट वरील ॲप डाऊनलोड करण्यासाठी क्रिकेटच्या फिवर मध्ये प्रत्येक कंपनी आपापल्या ॲपचा प्रचार करताना दिसते. पैसा कसा कमवावा ? टीम कशी तयार करावी? अशा अनेक प्रकारचे मार्गदर्शन सुद्धा करते आणि शेवटी हा खेळ हानिकारक आहे यामध्ये आर्थिक नुकसान सुद्धा होऊ शकते . अशा प्रकारचा कायदेशीर सल्ला कंपनी देते . कंपनी कंपनीचे काम करते. पैशाचा मोह दाखवून ते खेळणाऱ्या लोकांना सावध सुद्धा करते.तरीही लोक कोणत्याही प्रकारचा विचार न करता कमावणारी कमी ,पण ..गमवणारी जास्त आहेत. त्याचे चित्र आपल्याला प्रत्येक खेडोपाडी ते शहरापर्यंत पाहायला भेटते. कुठेतरी एखाद्याला पैसे येतात आणि त्याच्याकडे पाहून सर्व इतर तरुण मंडळी दिवा स्वप्नांमध्ये रमून जाऊन अशा खेळांवरती पैसा लावतात व पैसा गमावतांना अनेक तरुण शिकार बनली आहेत. कोणत्याही ॲपवर किंवा कंपनीवर दोष द्यायचा नाही. परंतु , त्याला बळी पडणारा तरुण हा सुरुवातीला छोट्या छोट्या रकमा लावून टीम तयार करतो आणि याची सवयीत रूपांतर होते हे त्रिकाल बाधित सत्य कोणीही लपवू शकत नाही . तरुण हे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अशा प्रकारच्या व्यसनामध्ये अडकतात शेवट मात्र निराशेच्या जगात केला जातो. अशा खेळांपासून अनेक शॉक बसलेली लोकं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. इथे नम उल्लेख करणे योग्य वाटत नाही. एका व्यक्तीने तर अक्षरशः स्वतःची रेडीमेड गारमेंट विकून करोडो रुपयाचा लॉस झालेली व्यक्ती प्रत्यक्षात आहे . प्रश्न पडतो हजाराने लाखो रुपये गमावलेली कित्येक असतील अशा प्रकारची ॲप ज्या त्या सीझनमध्ये प्रत्येक ठिकाणी जाहिरातीच्या स्वरूपात आपल्याला पाहायला खास करून प्रत्येकाच्या हातात असणारा मोबाईल व त्यावर असणारी मनोरंजनात्मक ॲप प्रत्येक ठिकाणी ती जाहिरात फ्लॅश होते. अनेक प्रकारची ॲप्स क्रिकेटशी संबंधित आहे . तो खेळ खेळणे किती सोपे आहे . याची जाहिरात सुद्धा केली जाते . हजार ते लाखोंमध्ये कित्येक लोक प्रभावित होतात . ॲप डाऊनलोड करून कोणी मौज म्हणून, कोणी शोक म्हणून,तर कोणी अनुभव म्हणून. या ॲपच्या नादी लागतात . सर्व कृतींचे रूपांतर सवयी मध्ये होते. ते एक प्रकारचे ऑनलाइन व्यसन बनते.
क्रिकेटचे सीजन संपले मग फावल्या वेळामध्ये इतर मनोरंजनात्मक साधनांचा वापर कसा करावा या प्रयत्नात असतात . तेव्हा त्यांना कायदेशीररित्या परिपूर्ण असणाऱ्या आणखी दुसऱ्या मोबाईलच्या स्क्रीन वरती लुकलुकणाऱ्या जाहिराती आकर्षित करतात. ती म्हणजे 'रमी' मोठमोठे जाहिरातदार या जाहिराती करतात . खास करून 'सेलिब्रिटी' या ॲपच्या जाहिराती करताना आपण सर्रास पाहतो . फिल्म इंडस्ट्रीज मधला कोणताही सेलिब्रिटी कोणाचा ना कोणाचा आदर्श असतो. कोणत्या ना कोणत्या सेलिब्रिटीद्वारे केल्या गेलेल्या जाहिरातीद्वारे लाखो तरुण वरील प्रमाणे मनोरंजन म्हणून ऑनलाइन रमी खेळताना दिसतील. सुरुवातीला जरी छोटी मोठी रक्कम लावून रमी खेळतात. प्रत्येकाच्या हातात असणारा मोबाईल त्यामध्ये असणारी विघातक ॲप्स व प्रत्येक मोबाईल हा बँक कनेक्ट आहे. स्वयं अर्थ पूर्ण व्यक्तीने अशा गोष्टी करणे ही थोडीशी वेगळा भाग मानू . परंतु ,आज अशी काही तरुण आहेत की, जी पूर्णपणे आई-वडिलांवर अवलंबून असतात. मग अशा तरुणांना जर अशी व्यसन लागली तर त्यांच्या आयुष्याचा प्रश्न खूप भयंकर आहे. हे वेगळे सांगायला नको . कारण, वर्तमानपत्रांमधून किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे अशा अनेक बातम्या येतात की,आशा तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातलेला ऐकायला व पाहायला मिळतो. मग त्यामध्ये त्याचे अज्ञान असेल, तरुण अवस्थेतील मन असेल, मी इतरांपेक्षा वेगळा कसा आहे ? ही मानसिकता असेल या सर्व गोष्टी प्रत्येक तरुणात असतात. या मनस्थितीचा फायदा संबंधित कंपन्या अर्थात ॲप्स उचलतात. यामध्ये कंपन्याचा कसलाही तरुणांना बळी पाडण्यासाठीचा प्रयत्न नसतो. असं ते त्यांच्या चेतावणी द्वारे दाखवतात. प्रत्यक्षात जाहिरातीमधून दाखवलेल्या मृगजळ फलप्राप्तीसाठी तरुण त्याच्या पाठी लागतात.
वरील प्रकारची दोन्हीही ॲपचे वर्गवारी केली असता, आपल्या लक्षात येते क्रिकेटशी संबंधित असणारे सर्व ॲप हे तीन तासांमध्ये लाखो रुपये कमवलेली एक जाहिरात दाखवतात.
क्रिकेटच्या फीवर मध्ये असणारी ॲप क्रिकेट फिवर मध्ये वापरायची. एरवी मात्र रमी सारखे ॲप मधून अनेक तरुण आपले जीवन उद्ध्वस्त करू पाहत आहेत. या सर्व तरुणांना माझे आव्हान असेल, मृगजळा मागे न धावता स्वयंप्रकाशित होऊन जीवनाचा मार्ग योग्य पकडल्यास योग्य वेळी आपले जीवन सावरले जाईल व प्रगती केल्याचा आनंद हा वेगळाच असतो, हे सिद्ध होईल.
📝#Rahul Dongardive
एक साठी ओलांडलेले शेतकरी . आयुष्यभर शेतामध्ये राबराब राबले , हाडाची काड केली, मुलांना शिकवलं, शेती पिकवली. नवरा बायको ने शेतीमध्ये कष्ट करत असताना ना दिवस पाहिला आणि रात्र पाहिली . शेतामध्ये रक्ताचे पाणी करायचं ,...पण शेत पिकवायची! पिकलेल्या धान्यातून वर्षभराची धान्य खाण्यासाठी घरी ठेवायचं आणि उरलेलं धान्य बाजारात विकून घर प्रपंच भागवायचा . ती शेतीही निसर्गावर अवलंबून आहे . निसर्ग बऱ्यापैकी उदार झाला तर शेती पीकायची . तो कमी झाला आणि जास्त झाला तरी शेतीवर आसमानी संकटांना का काहुर माजायचं. अशी विचारधारा घेऊन शेतकरी आलेल्या संकटातून देवाच्या परमश्रद्धेतून देवालाच साकडे घालायचा. माझी शेती पिकू दे, मुलांना शिक्षण देईल एवढा पैसा दे , मला फुकटचं नको ,माझ्या शेतीच्या पिकलेल्या आणि शरीरातून निघालेल्या घामाच्या हिमतीवर दे, माझी संसार रुपी वेल अशीच बहरू दे , हे ईश्वरा जगाचही कल्याणकर आणि त्या पाठोपाठ माझ्या मुलाबाळांचही भलं कर . अशी टाहो फोडणारा बाप आणि आई ही प्रत्येक कुटुंबाची आधारस्तंभ असतात . त्या कुटुंबासाठी एक मैलाचा दगड असतात. त्या कुटुंबासाठी तो पाठीचा कणा असतो. तोच आधारवड सुद्धा असतो!
अपार कष्टातून असाच गगनाला भिडणारा वेलु भरला होता . आप्पासाहेब सोपानराव मस्के यांनी जिद्दीच्या जोरावर मुलांना शिक्षण दिले होते. एक मुलगा डॉक्टर बनवला दुसऱ्या मुलांना शिक्षण देऊन त्याला सक्षम करण्यासाठी ते सदैव तत्पर होते. कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली झाली होती. आप्पासाहेबांची स्वप्न साकार करण्याची प्रत्यक्ष वेळ आली होती. त्यानुसार त्यांच्या इच्छेनुसार मुलांनी शेतामध्ये विहीर खोदण्याचे काम सुरू केले. विहीर खोदण्याचे काम पोकलेन मशीन द्वारा सुरू होते. माती काम झाल्यानंतर खडक फोडण्यासाठी जिलेटिन कांड्याचा वापर केला जातो. त्याद्वारे खडक फोडला जातो म्हणून ट्रॅक्टरने विहिरीत बार घेण्यासाठी जिलेटिन कांड्या बांधावर ठेवण्यात आल्या होत्या. शेतकऱ्याच्या घरातील सर्वांनी याची माहिती होती.पण..आप्पाराव मात्र यापासून अनभिज्ञ होते. विहिरी शेजारी बांधावर गवत वाढलेले असल्यामुळे प्रतिवर्षाप्रमाणे बांधावरील गवत जाळण्याची प्रथा शेतकऱ्याच्या मनामध्ये तरळत होती. आप्पासाहेब सकाळीच उठले आग काडीपेटी घेतली, शेतातील बांध पेटवण्यासाठी गेले. बांधाचे एका साईड पासून त्यांनी बांध पेटवला . वाळलेल्या गवत असल्यामुळे बांध पेटत पेटत एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जात होता. विहीरीजवळच्या टोकाजवळ जिलेटिनच्या कांड्या ठेवलेल्या होत्या, हे दृश्य त्यांच्या मुलाने पाहिले तोही जोरात धावत वडिलांकडे धावत गेला.तो ओरडून सांगत होता त्या ठिकाणी जिलेटीनच्या कांड्या ठेवलेल्या आहेत. तेथील आग विझवा नसता तेथून दूर जा. सोपानराव सुद्धा घाबरून गेले त्यांना काय करावे कळत नव्हते. आग विझवावी कि तिथून पळून जावे,संभ्रमात असतानाच पेटलेला बांध मात्र जिलेटीनच्या कांड्यावर पोहोचला आणि नको ती गोष्ट घडली. क्षणामध्ये सोपान रावणच्या स्वप्नांचा चकनाचुर झाला . सोपानरावांच्या देहाच्या चिंधड्या उडाल्या जिलेटिन कांड्याचा स्फोट एवढा भयंकर होता की परिसरात चार ते पाच किलोमीटर पर्यंत त्याचा आवाज घुमला ,घरावरची पत्रे थरथरली, प्रचंड असा आवाज येऊन आकाशामध्ये धुळीचे लोळची लोळ उडाले . प्रत्यक्ष स्फोटापासून आप्पासाहेबांच्या देहाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या, मृतदेह चाळीस ते पन्नास फूट उंच उडून पडला आणि एका सदग्रहस्थाचा अंत झाला. जवळच असणारा त्यांचा मुलगा ऋषिकेश पाहत होता . त्याला काय करावे? कळत नव्हते. त्या स्फोटामध्ये उडालेल्या माती व खडे त्याच्या चेहऱ्यावर जाऊन आरपार घुसले डोळेही अधू झाले. डोळ्यांवरती उपचार जालना येथील गणपती रुग्णालयात सुरू आहेत.
घडलेला प्रकार हा अत्यंत निर्दयी आणि संयमाचा बांध फुटणारी आहे . आपण सहज म्हणतो , ज्याच्या त्याच्या कर्मानुसार त्याला फळ मिळते . परंतु , या ठिकाणी अशी घटना घडल्यानंतर कर्म सिद्धांत थोडासा विक्षिप्त वाटतो. कारण , चांगले कर्म करणाऱ्याच्या वाट्यालाही अशी परिस्थिती निर्माण व्हावी. याला योगायोग समजावा की दुर्दैव समजावे. धार्मिक कर्म सिद्धांत थोडासा बाजूला ठेवला तर विज्ञान युगात वावरत असताना सत्य कडू जरी असले तरीही ते मान्य करावेच लागते. सूर्य कधी तळ हाताने झाकता येत नाही. अगदी त्याचप्रमाणे विज्ञान युगात मशिनरी किंवा स्फोटकांशी खेळत असताना चुकीला माफी नाही हे सिद्ध होते. मग ती चूक कळत नकळतपणे का असेना चूकच सिद्ध होते. त्या ठिकाणी कोणाचीही गय केली जात नाही. अशा गोष्टी घडल्या म्हणजे आपण त्याला निव्वळ योगायोग किंवा प्रारब्ध असे समजतो प्रत्यक्षात मात्र वास्तव वेगळे असते म्हणून प्रत्येकाने सावधगिरी बाळगावी.
शेतकऱ्यांना आवाहन...
वृक्षवल्ली आम्हा सोयरे.... असे म्हणत असताना आपण त्या वृक्षांची काळजी घेणे सुद्धा महत्त्वाचे आहे शेतातील बांध पेटवत असताना वृक्षलगत न पेटवता त्या ठिकाणी खुरपणी करून गवत काढावे. त्यामुळे त्या वृक्षाची निगा राखली जाईल. परिसरातील सर्व शेतांमधून चक्कर मारत असताना बरेचसे लिंबाची झाडं जळालेली ही आढळली. त्यामुळे निसर्गाची खूप मोठी हानी होते. अशा प्रकारची हानी होऊ नये म्हणून, बांधावरील गवत पेटवताना काळजी घ्यायला शिका. शेतकऱ्याच्या बांधावरील झाड कधीही तोटा देणार नाही त्याचा फायदाच करून जाईल.
📝#Rahul Dongardive
पंतप्रधानाच्या उद्घोषनेनंतर दुसऱ्या दिवसापासून बँकांमध्ये रांगाची रांगा लागल्या. सामान्य माणसापासून श्रीमंत माणसापर्यंत प्रत्येकजण बँकेच्या दारामध्ये असणारी पुंजी बदलण्यासाठी बँकेमध्ये खेट्या मारू लागला. अनेक लोकांना आपले प्राणही गमवावे लागले ,ही दाहकता मनाला संवेदनशील बनवते. नोटबंदी झाली आणि कमिशन एजंट चा भस्मासुर प्रत्येक बँकेच्या दारामध्ये पाहायला मिळाला. नोटबंदी मध्ये मोठा बदलण्यासाठी काही बंधन होती. त्यामुळे सामान्य माणसाचे हाल झाले . ही वस्तुस्थिती जरी असली, तरीही गडगंज संपत्ती वाले माणसं कोणी बँकेच्या दारात उभा राहिलेला आपण पाहिला नाही. घरपोहोच नवीन नोटा त्यांना मिळाल्या प्राप्त झाल्या. पण सामान्य माणूस रांगांमध्ये उभा राहून व्याकुळ झाला होता. हे चित्र सर्व भारताने पाहिले अनुभवले.
नोटबंदी मधील प्रमुख दावा....
पंतप्रधानाच्या उद्घोषनेनंतर नोटबंदी झाली नोटबंदी का करण्यात आली ? याचे स्पष्टीकरण स्वतः महोदयांनी दिले होते . त्यामध्ये प्रथम कॅशलेस इकॉनॉमिचा प्रचार व प्रसार करण्यासाठी डिजिटायझेशन किती महत्त्वाचे आहे हे सांगण्यात आले. त्याचा परिणाम आज आपल्याला दिसत आहे. खेडोपाडी डिजिटायझेशन झाले की, वस्तुस्थिती आहे. त्यानंतर दुसरा दावा करण्यात आला होता. नकली चलनावर लगाम घालण्यात येईल शासनाची भूमिका ठाम आणि कौतुकास्पद होती.परंतु, डिजिटायझेशनच्या जमान्यामध्ये झेरॉक्स मारलेल्या नोटा सुद्धा जनतेने अनुभवल्या . रियल इस्टेट मध्ये पारदर्शकता येईल असे सर्वांनाच वाटले होते . काही ठिकाणी यशही आले असेल . पण.....बहुतेक ठिकाणी पारदर्शकता ही फक्त कागदपत्रेच राहिली. प्रत्यक्ष व्यवहार होत असताना कसा होतो? कसा केला जातो? त्याची प्रत्यक्ष अनुभूती ही प्रत्येकाची वेगळीच आहे. त्यामुळे रियल इस्टेट पारदर्शक झाले असे म्हणता येणार नाही.
सर्वात महत्त्वाचा शासनाद्वारे प्रकाश झोतामध्ये येणारा मुद्दा म्हणजे, 'काळे धन', 'व्हाईट कॉलर ' पेक्षा ब्लॅक मनी भारतात सर्वात जास्त आहे . हे खुद्द पंतप्रधानांनी सांगितले होते . हा काळा पैसा जर वापरात आला तर भारत हा विकसित राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही . त्याचबरोबर भारतातील प्रमुख समस्या असलेल्या सर्व गोष्टी या पैशाने सोडवता येतील . एवढेच काय तर प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये सुद्धा येऊ शकतात. निवडणुकी साठी अपप्रचार ही करण्यात आला परंतु जेव्हा नोटबंदी झाली तेव्हा हा काळा पैसा गेला कोठे ? कारण आरबीआयच्या सर्वेनुसार आणि आकडेवारीनुसार जवळपास 99% च्या वर बँकेमध्ये पैसा जमा झाला . मग हा काळा पैसा गेला कोठे ? या प्रश्नाचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही. नोटबंदीमुळे टॅक्स प्रणाली वाढणार यामध्ये वाढ सुद्धा झाली . परंतु शासनाचे दावे केले होते ते पूर्णपणे फलप्राप्तिस उतरले का ?याची शाश्वती देता येत नाही.
आरबीआय ने दोन हजार रुपयाच्या नोटा वितरणातून काढून घेतल्या... नोटबंदी नाही!
19 मे 2023 रोजी आरबीआय ने केलेल्या घोषणेनुसार दोन हजार रुपयाच्या नोटा वितरण व्यवस्थेतून काढून घेण्यात आल्या आहेत,असे सांगण्यात आले . त्यानुसार दोन हजार रुपयाची नोट वितरण व्यवस्थेतून संपुष्टात आली. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत प्रत्येकाला ह्या नोटा बँकेत जमा करता येतील. परंतु, एका व्यक्तीला फक्त दहा नोटा बदलता येतील, त्यापेक्षा जास्त नोटा एक व्यक्ती बदलू शकत नाही. आरबीआय ने हे नियम घालून दिले.
आरबीआय या ठिकाणी स्पष्ट करते की, ही नोटबंदी नसून दोन हजार रुपयांच्या नोटा फक्त वितरण व्यवस्थेतून काढून घेण्यात आल्या आहेत. त्याची कारण समोर करत असताना पुढील काही मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊयात. कारण गुलाबी नोटांची छपाई 2019 पासूनच बंद केली गेली होती.
1. दोन हजार रुपये नोटा छापण्याचा उद्देश वेगळा
सदरील मुद्द्यांचे स्पष्टीकरण असताना आरबीआय सांगते . दोन हजार रुपयाच्या नोटा छापण्याचा उद्देश हा वेगळा होता. नोटबंदीनंतर व्यवहारातील प्रमुख मोठा असणाऱ्या पाचशे रुपये व एक हजार रुपये यांची तूट भरून काढण्यासाठी मोठ्या रकमेची नोट छापण्यात आली होती. त्याचबरोबर पाचशे रुपयांच्या एक हजार रुपयाचे नोटा अचानक व्यवहारातून बंद झाल्यास त्याचा खूप मोठा परिणाम जनतेला सोसावा लागला असता. परिणाम कमी होण्यासाठी म्हणून गुलाबी नोट छाटण्यात आली होती.
2. गुलाबी नोटांचे आयुष्य संपले
आरबीआय पुढे जाऊन हेही स्पष्ट करते की दोन हजार रुपयांच्या नोटांचे आयुष्य हे फक्त चार ते पाच वर्षांचे होते आरबीआयने 89 टक्के नोटा वितरित केल्या होत्या. गुलाबी नोटाचे आयुष्य संपल्यामुळे त्या वितरण व्यवस्थेमध्ये जास्त दिवस ठेवता येणार नाही.त्यामुळे गुलाबी नोट वितरण व्यवस्थेतून काढून घेण्यात आली आहे .
3. चलनामध्ये गुलाबी नोटांची संख्या कमी झाली..
वितरण व्यवस्थेतील वितरणानुसार दोन हजार रुपयांच्या नोटा ज्या पद्धतीने वितरित केल्या होत्या त्या प्रमाणात त्या चलनामध्ये राहिल्या नव्हत्या याचा अर्थ त्याचा कुठेतरी साठा केला गेला असावा 31 मार्च 2018 रोजी 6.73 लाख करोड रुपयाच्या नोटा वितरीत केल्या होत्या एकूण नोटांच्या तुलनेत त्याची हिस्सेदारी 37.3% होती वितरित हिसेधारीनुसार प्रत्यक्ष त्याचा व्यवहारातील उपयोग खूपच कमी झाला होता तो फक्त 10.8 % राहिला होता.
4. गुलाबी नोटांचा उद्देश पूर्ण झाला
नोटबंदी नंतर ज्या उद्देशासाठी गुलाबी नोटा छापण्यात आल्या होत्या अर्थात दोन हजार रुपयाची नोट तो उद्देश पूर्ण झाला . पाचशे रुपये आणि 1000 रुपयाच्या नोटा यांच्या वितरण व्यवस्थेतील नोटबंदीमुळे जनतेला जो नाहक त्रास होणार होता . तो त्रास दूर करण्यासाठी आरबीआय ने 2000 च्या नोटा छापून वितरित केल्या होत्या. त्यामुळे भारतातील आर्थिक तूट निर्माण झाली नाही नोटबंदी यशस्वी झाली.
5. दोन हजार रुपयाची नोट चलनात कमी झाली
आज पाचशे रुपयांच्या आणि इतर नोटांचा मुबलक प्रमाणात असणारा उपयोग हा योग्य पद्धतीने होतो आहे . दोन हजार रुपयांच्या नोटा चलनामध्ये कमी जरी असल्या तरी त्याचा परिणाम हा कुठेही दिसून येत नाही. त्यामुळे इथून पुढे दोन हजार रुपये नोटांची गुलाबी नोटांची गरज नाही असे या ठिकाणी आरबीआय स्पष्ट करते.
आरबीआय ने दिलेल्या स्पष्टीकरणातून सत्यता जरी समोर येत असली तरीही, गुलाबी नोटा वाल्यांचे धाबे दणाणले आहेत. बँकेच्या वर्किंग डे मध्ये पुन्हा आपल्याला एकदा नोटबंदीचे चित्र पाहायला मिळेल . बँकेच्या दारासमोर रांगाची रांगा लागलेल्या दिसतील . ह्या रांगा नोटबंदी इतक्या नसतील. हे तितकेच खरे . ह्या नोटा सुद्धा सामान्य लोकांकडूनच बदलून घेतले जातील . कोणतेही धनिक लोक बँकेच्या दारात दिसणार नाहीत . गुलाबी नोट वितरणातून काढून घेतल्यानंतर गुलाबी नोटांचा साठा कमी होईल . असे असले तरीही, त्या रिकाम्या झालेल्या जागेची जागा पुन्हा दुसऱ्या नोट घेतील ही मानसिकता कधी बदलेल कोणीही सांगू शकत नाही.
#📝Dongardive Rahul.
प्रस्तुत चित्रपटांमध्ये ही कथा पूर्णपणे एक 'कट 'आहे. चित्रपट एका नर्सिंग कॉलेजमध्ये सुरू होतो. त्या ठिकाणी त्यांना समाजसेवा , समाजाप्रती आपली बांधिलकी आणि कर्तव्य शिकवले जाते. त्यानुसार त्या मुली कार्यही करतात अर्थात शिक्षणात सुरू होते. नरसिंग चे शिक्षण घेत असताना तीन मैत्रिणी त्याचबरोबर एक चौथी मैत्रीण सुद्धा त्यांना मिळते. शालिनी उन्नीकृष्णन अर्थात फातिमा, निमा ,असिफा, गीतांजली या चार मैत्रिणी. नर्सिंग चे शिक्षण घेण्यासाठी एकत्र आलेल्या, एकाच रूम मध्ये राहतात. चौघींचीही कॉलेजमध्ये एन्ट्री होते . शालिनी, निमा आणि गीतांजली या नवख्या मैत्रिणी एकत्र राहत असताना त्यांच्यासोबत असणारी 'असिफा' ही देखील नर्सिंग शिक्षण घेत होती. चित्रपटांमध्ये असिफाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची होती. कारण ,यांच्या सर्व गोष्टी प्रत्यक्षात राबवणारी आणि त्या गोष्टींना योग्य प्रकारे वळण देणारी, कट रचनारी व इस्लाम धर्म विषयीचा सकारात्मक ब्रेन वॉश करून 'अल्ला' कसा मोठा आहे. याविषयी आपली भूमिका आणि सकारात्मक पाऊल पुढे उचलताना इसिसचे संबंधित दाखवली आहे. आय. एस. आय. एस. म्हणजेच, 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया' या ठिकाणी अशा बळी पाडून आणलेल्या स्त्रियांना भरती केले जात असायचे. तेव्हा इसिसचे महत्त्व आणि इतर धर्म कसे तुच्छ आहेत . 'अल्लाह' एकमेव महान आहे. याची व्याख्याने देताना असिफा चित्रपटात दिसते.
शालिनी असिफाच्या चर्चेने आणि दिलेल्या व्याख्यानाने एवढी प्रभावित होताना दिसते की, आशिफाचे बोलणे शालिनीच्या गळी लवकर उतरते. आसिबाच्या प्रत्येक बोलण्यावर ती लक्ष देऊन ऐकते . शरीयत कानून जाणून घेण्याचा प्रयत्न करते, काही दिवसाच्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत होते. दिवाळीच्या सुट्टी असतील किंवा इतर सुट्ट्यांमध्ये शालिनीचे गाव दूर असल्यामुळे ती जास्त करून गावी जात नसायची. असिफा मात्र तिला आपल्या घरी घेऊन जात होती. ईद असेल किंवा इतर सणांच्या दिवशी आसिफा- शालिनी, निमा, गीतांजली एकत्र येऊन सर्व परिवारासोबत सण उत्सव साजरा करत असत. जेव्हा संधी भेटेल तेव्हा असे असिफा मात्र मुस्लिम धर्म कसा श्रेष्ठ! आणि अल्लाह कसा महान आहे. याची एकही संधी सोडत नव्हती. दोन हिंदू आणि एक ख्रिश्चन मैत्रीण असणारी फक्त असिफाच बोलणं ऐकून घेतात. मुस्लिम धर्माच्या अनुकरणाचा किंवा त्यानुसार बदल करण्याचा त्यांच्यामध्ये कोणताही लवलेश दिसत नाही. तेव्हा मात्र या तिघी जनीची पूर्वनियोजित कटकारस्थानानुसार एका दुकानांमध्ये वस्त्रे फाडली जातात. त्यांना खुलेआम- चेतावणी दिली जाते. एवढ्या मोठ्या दुकानांमध्ये कोणीही त्यांच्या मदतीला येत नाही. त्यामुळे तिघेही खचून जातात. तेव्हा ही गोष्ट असिफाला कळते . तेव्हा मात्र ती हिजाब अर्थात बुरखा महत्त्व समजावून सांगते . बुरखा तुम्ही घातला असता तर , तुम्हाला कोणीही छेडले नसते. तेव्हापासून तिघी हिजाब घालायला सुरुवात करतात.
परत एकदा एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, जी मुलगी आपल्या प्रियकरापासून गरोदर राहते , तोच प्रियकर अचानक गायब होतो. शालिनी अर्थात फातीमाच्या अब्रूची लुटा लुट करून इज्जतीची लक्तरे वेशीला टांगतो. काही दिवसानंतर आपला प्रियकर आपल्याला सोडून गेला, तेव्हा मात्र ती अत्यंत खचून जाते. जीवन संपवावेसे वाटते ,आपण फसलो याची तिला जाणीवही होते . घरचे आपणास स्वीकारणार नाही , दोष द्यायचा कुणाला? आणि याच्यावर उपाय काय? या प्रश्नाचे उत्तर मात्र तिला शोधूनही मिळत नाही. शेवटचा पर्याय म्हणून मौलवींचे मार्गदर्शन घ्यावे . यासाठी ती मुलगी जाते . इज्जत जाऊ नये म्हणून मौलवींच्या सांगण्यानुसार दुसऱ्या तरुणाला आपला पती मानते . मौलवींचे शब्दही तितकेच प्रखर आणि करारी असतात , ' निकाह अगोदर प्रियकरा बरोबर आलेल्या संबंधातून जे आपत्य पोटात वाढत आहे हे पाप आहे. हे पाप धुऊन काढण्यासाठी एका नवीन पुरुषाबरोबर निकाह करणे आणि त्याच्याबरोबर भारतात बाहेर सीरीयाला जाणे हा एकमेव पर्याय मौलवी देतात. याला अंधश्रद्धा म्हणावे की धर्मांधता ?
जो 'अल्लाहशी' काफीर होतो, जो काफीर असतो तो पापी असतो त्याच्यातून जर मुक्ती मिळवायचे असेल तर काफीर झालेल्या व्यक्तीला दगडाने मारावे किंवा त्याच्या तोंडावर थुंकावे तरच अल्ला नाराज होत नाही तो खुश होतो अशी दाहक प्रतिमा गीतांजलीच्या समोर उभी करून मृत्यूच्या दारावर उभा असणाऱ्या पित्याच्या तोंडावर गीतांजली थुंकते आणि काल्पनिक असणाऱ्या पापातून मुक्ती पाण्याचा केविलवाणा प्रयत्न करते. ही तिची आपल्या धर्माविषयी अर्थात नवीन धर्माविषयी आपुलकी आणि ओढ होती, हे इथे निश्चित होते. ज्याच्यावर जीवापाड प्रेम करावे ,त्याच्यासाठी माता, भगिनी, वडील यांचा त्याग करून मुस्लिम धर्म स्वीकारावा . इसिसमध्ये समाविष्ट व्हावे. यासाठीचे प्रयत्न जेव्हा तिच्या लक्षात येतात, तेव्हा मात्र तिची नग्न चित्रे सोशल मीडियावर व्हायरल करून तिच्या घराची, तिची इज्जत चव्हाट्यावर आणली जाते ..तेव्हा मात्र आपण या कटामध्ये प्रत्यक्ष सहभागी झालो आणि आपला मार्ग चुकला याची जेव्हा तिला जाणीव होते.तेव्हा मात्र, जग संपलेला असतं.कारण , समाज काय म्हणेल ? आपल्या इज्जतीचा चोळामेळा आपल्या प्रियकराने असे सार्वजनिक करावा.. त्याचा तिला एवढा पश्चाताप होतो की, जवळच असलेल्या हिजाबने गळफास घेऊन आत्महत्या करते. शेवटी पर्याय उरलेला नसतो.
चित्रपट हा वस्तुस्थितीशी संबंधित आहे किंवा जवळीकता आहे. असे असले तरीही चित्रपटात पूर्ण राजकारण दिसते आहे. कम्युनिस्ट कार्यकर्ता व्यक्ती स्वातंत्र्य या गोष्टीचा विचार करताना स्वतःच्या मुलीला धर्माचे शिक्षण देत नाही ही बाब प्रकर्षाने दाखवली आहे. त्यामुळे तिच्यावर संस्कार रुजले नव्हते. म्हणूनच तिच्यावर इस्लामी धर्माचा प्रभाव पडला, अशी झलक पाहायला भेटते.
वरील तीनही मुली जेव्हा धर्म शिक्षण घेतात तेव्हा त्या ठिकाणी इतरही मुली असतात. त्यांचेही तीच काम असते, त्यांनाही असंच फसवलेलं असतं,अशी भाग्यलक्ष्मी सांगते. असं निष्पाप मुस्लिम मुलावर प्रेम करणाऱ्या हिंदू आणि ख्रिश्चन मुलींची अशीच फसवणूक झालेली या चित्रपटातून दिसते. सुरुवातीला ह्या मुलींना लव जिहादच्या नावाखाली आणि इसिसच्या भरती करिता कसे ब्रेनवॉश केले जाते. याचीसुद्धा एक कूटनीती आणि पूर्वनियोजित षडयंत्र पावलो पावली दिसून येते. सुरुवातीच्या प्रेमलीला मात्र जेवढ्या सुखद आणि आल्हाददायी चित्रित केलेले आहेत, त्यापेक्षा भयंकर त्या मुलींची भरती इसिस मध्ये होते.तेव्हा मात्र, त्यांच्यावर एका वेळेला अनेक जण बलात्कार करताना दिसतात. हवस भागवण्याची ती एक मशीन म्हणूनच तिचा वापर केला गेला. जिन विरोध केला किंवा पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेला तिच्या डोक्यात गोळीच दिसली! !आधुनिक युगामध्ये मोबाईल बंदी आहे , हा आश्चर्यचकित करणारा विषय . त्याचबरोबर ज्यांनी वापरला ,त्या महिलेची गोळी घालून हत्या करण्यात आलेली आहे . ही एक अत्यंत निंदनीय बाब असून स्त्री स्वातंत्र्यावर मोठा घाला आहे. शालिनी गरोदर असताना तिच्यावर केलेला बलात्कार अत्यंत निंदनीय वाटतो. मानवतावादी दृष्टिकोनाला एक मोठी चपराक आहे. असे दुष्कृत्य होत असेल तर मग 'अल्लाह'चा अनुयायी तो खरच आहे का?
चिंतन...
वरील सर्व गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर एक गोष्ट मात्र लक्षात येते, प्रत्येक समस्या ही निर्माण होत असते. पण....ती समस्या अंतिम असू शकत नाही. सुशिक्षित असणाऱ्या मुली छोटीशी कट रचना त्यांच्या लक्षात येत नाही आणि जेव्हा लक्ष देते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. मग आत्महत्या शिवाय दुसरा पर्याय उरत नाही . म्हणून ,सर्व सुजाण मुलींनी प्रलोभनाच्या पाठीमागे किंवा दिखाउ सौंदर्याच्या पाठीमागे न लागता ,आई-बाबांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासावर विश्वास ठेवून त्यांच्या विश्वासांना तडा जाता कामा नये असे वर्तन करावे. ज्यामुळे आई-बाबांना गर्व वाटेल, देशसेवा ,समाजसेवा आणि समाजाप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी आलेल्या संधीचे सोने करावे अशी शिकवण मनी बाळगावी . शंभर लोक म्हणतात म्हणून, ते सत्य आहे . ही गोष्ट टाळावी . स्वतःच्या मनपटलावर उमटणाऱ्या छटा चांगल्या किंवा वाईट सत्याची सचोटीवर त्या उतरतात किंवा नाही. दूरदृष्टीचा विचार ठेवून पावले उचलली तर, ती व्यर्थ जाणार नाही असा विश्वास वाटतो . जगातील असा कोणताही धर्म नाही जो वाईट शिकवण देतो. प्रत्येक धर्म हा प्रेम शिकवतो, दया , करुणा, माया- ममता या सर्व धर्मामध्ये नीती पाहायला मिळतात . फक्त मांडणी आणि संरचना वेगळे असू शकते . पण प्रत्येक धर्माचे हित आणि सार मानव कल्याण हेच आहे. यावरून स्पष्ट होते . कोणताही धर्म मानवहिताशी किंवा मानव देहाची खेळत नाही . तो फक्त 'मानव कल्याण ' समर्पित आहे. हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही.
अशा घडलेल्या, मानव कल्याणाच्या मार्गात अडथळा आणणाऱ्या घटना निंदनीय आणि कलंकित जरी असल्या तरी, त्याचे योग्य मार्गदर्शन करून उपाय शोधणे काळाची गरज आहे. पण जेव्हा जेव्हा राजकीय पक्ष चित्रपट प्रमोट करतात. काही राज्यांमध्ये बंदी होते तर, काही राज्यांमध्ये टॅक्स फ्री साठी मागणी केली जाते . एवढेच काय तर राजकीय लोक चित्रपट गृहे बुक करतात. म्हणजेच प्रेक्षकांना फुकट सिनेमा दाखवतात आणि तेही कुठेतरी राजकारण , प्रचार, प्रसार आणि निवडणुका तोंडावर , असं होतं. निश्चितच ही लांच्छनास्पद बाब आहे.
# 📝डोंगरदिवे राहुल