HOLY THOUGHT"
"Every human being has a Desire.
Desire has many ways , whoever knows the feelings of subconscious mind.
He become genuine lover of life. "
# Rahul R. Dongardive
ᴇᴠᴇʀʏ Human being has a 𝙳𝙴𝚂𝙸𝚁𝙴, 🄳🄴🅂🄸🅁🄴 has many ways, who knows the subconscious mind, he will be the real hero.
HOLY THOUGHT"
"Every human being has a Desire.
Desire has many ways , whoever knows the feelings of subconscious mind.
He become genuine lover of life. "
# Rahul R. Dongardive
तुम्ही संत मायबाप
" यह तन विष की बेलरी, गुरु अमृत की खान |
शिष दियो जो गुरु मिले, तो भी सस्ता जान |"
भारतीय संस्कृती वारसा आणि गुरु-शिष्य परंपरा लक्षणीय आहे. जागतिक स्तरावरील अध्यात्मिक ठसा हा जगा वेगळा. एखाद्या शिष्याला अस्सल ज्ञान मिळवायचे असेल , तर त्यासाठी त्याला एका उत्तम गुरुची आवश्यकता आहे. गुरू-शिष्य संबंध संबंधी अनेक व्यथा आपण ऐकलेल्या आहेत, आणि वाचलेल्या सुद्धा आहेत. योग्य गुरु मिळाला नाही तर त्या शिष्याचे जीवन शुद्ध ज्ञानाने परिपूर्ण होणार नाही. ज्ञानाची भूक त्याची कधी पूर्ण होऊ शकत नाही. कारण, पंचेंद्रिया वर काबू मिळवण्यासाठी एक सच्चा गुरु असावा लागतो. विषाने भरलेले हे पूर्ण शरीर शुद्ध करायचे झाल्यास त्यासाठी अमृतासमान गुरु असायला हवा आणि असा चांगला जर गुरू मिळत असेल तर त्यासाठी आपले सर कलम करावे लागले तरीही चालेल. अशी उपासना करणारा शिष्य ही असावा लागतो. गुरू-शिष्याची पवित्र संवेदना आणि अवलंबिता सच्चा गुरू शिष्या संबंधी प्रेरित करत असते. असाच अमृताचा कलश ब्रह्मलीन स्वामी निगमानंद महाराजांच्या स्वरूपामध्ये मच्छिंद्रनाथ गडावर अवतरले आणि परिसरातील अज्ञानाला दूर करण्यासाठी साक्षी ठरले.
ब्रह्मलीन स्वामी निगमानंद महाराज यांनी परिसरांमध्ये ही शिष्यपरंपरा हयात असतांना आयुष्यभर राबवली न्याय हा न्याय असला पाहिजे, कोणावरही अन्याय नाही झाला पाहिजे, त्याचबरोबर सर्वांचा उद्धार कसा करता येईल? साक्षात प्रयत्न संवादातून त्यांनी सिद्धही केले. "संघर्षाशिवाय जीवन नाही, जीवनात हा संघर्ष असलाच पाहिजे, तरच आपण जिवंत आहोत हे त्याचे लक्षण" ही त्यांची वाणी सर्वांना प्रेरित करत असते. समाज प्रवाहाच्या विरोधात जाऊन काम करायचे असल्यास, मग ते आध्यात्मिक असो किंबहुना समाज उद्धाराचे असो हे कठीणच -
" असाध्य ते साध्य करि सायास,
कारण अभ्यास, तुका म्हणे |"
ही तुकाराम महाराजांची शिकवण बाबांनी स्वतःमध्ये अंगीकारली होती. म्हणूनच त्यांनी समाज उद्धाराचे कार्य अविरतपणे सुरू ठेवले. आज त्यांच्या पश्चात हजारो भक्तगण त्यांच्या वाणीतून निघालेल्या शब्दांना प्रमाण मानत आहेत. शब्दरत्न प्रमाणे माणसातील रत्न आणि त्याची जाण बाबांनी करून घेतली. त्याचे बीजारोपण आशी केले की, त्यातून निघणारा अर्थ हा समाजाचे भान ठेवणारा निघावा व तो या समाजाचा सुधारक ठरावा. बाबांची दूरदृष्टीता आपणास आज पाहावयास मिळत आहे. त्यांच्या जाण्याने परिसरावर शोककळा पसरली होती, तरी तो परिसर आज अजरामर झालेल्या त्यांच्या वाणीतून ओथंबून वाहतांना दिसत आहे. निगमानंद बाबाची आपल्यात आज नसले तरी त्यांच्या कीर्तीरूपाने प्रत्येकाच्या हृदयात वसलेली आहेत परंतु बाबांची मूर्ती गावोगावी बसविण्याचे काम सुद्धा सुरू आहे प्रथम मूर्ती प्राणप्रतिष्ठा गावकऱ्यांच्या वतीने बसविण्याचे काम नांदेवाली या गावापासून सुरू होते.
शिरूर तालुक्यातील नांदेवाली येथे बाबांचा जन्म झाला. नांदेवाली च्या भूमीत अध्यात्मातील रत्न जन्मावा आणि त्या भूमीचा त्याचबरोबर परिसराचा नगर जिल्ह्याचा अध्यात्मातील मानबिंदू ठरावा ही नांदेवाली करांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणून त्यांच्या कार्याची उत्तरदायित्व सिद्ध करण्यासाठी मनातील उत्कंठा आणि भाविक भक्ती यांचा संयोग म्हणून बाबा हयात असताना जन्मभूमीत अगोदर मंदिर उभारून आज दिनांक 27 ऑक्टोबर 20 21 रोजी बाबांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होत आहे बाबांवर असणारे भक्तीचे स्वरूप व अस्मिता गावकऱ्यांच्या हृदयामध्ये स्पंदना प्रमाणे धडपडते आहे.
"ऐसी वाणी बोलिये मन का आप खोये |
औरन को शीतल करे,आपहुं शीतल होए |"
बाबांच्या जीवनातील सगळ्यात मोठी उपलब्धी कोणती असेल ? असा जर प्रश्न पडला तर, त्याचे उत्तर सहाजिकच आहे.बाबांचे बोल, बाबांची संवाद क्षमता एवढी जबरदस्त होती की, ऐकणार्यांना ते सारखे ऐकावे वाटत असे. कोणाचा द्वेष नाही, ना मत्सर ! सर्वांप्रती असणारी आदरयुक्त भावना आणि प्रेम ही बाबांची विशेषता. गडावर येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्तांची विचारपूस करणे, त्यांच्याशी आत्मीयतेने संवाद साधणे व त्यांच्या समस्या जाणून घेणे. त्या ऊपर मार्गदर्शन करणे. ही बाबांची खासियत , "जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले" हे बाबांच्या नसानसात सारखे खेळायचे. बाबांचे ते शब्द प्रत्येक भक्तगणांना आपलेसे वाटायचे. त्यातून त्यांच्या समस्या तर कुठे दूर व्हायच्या आणि भक्तिमार्ग मध्ये ते नाहुन निघायचे. कळत सुद्धा नव्हते. प्रत्येक भक्ताला बाबा म्हणजे संत मायबाप वाटायचे. कारण, आईप्रमाणे दया आणि बाबांनी प्रमाणे पालकत्व स्वीकारण्याची जबाबदारी बाबा स्वतः कधी घेत असत हे समोरच्याला कळत पण नव्हते. त्यांची वाणी एवढी मधुर होती की, ती प्रत्येकाला आपल्या दुःखातून मुक्त झाल्यासारखे वाटायचे. सन्मार्गाने जीवन जगण्यासाठीचा मार्ग लोकांना आवडू लागायचा. भक्तांच्या बाबतीत हे जरी खरे असलेही. परंतु ,माझा भक्त अडचणींवर मात करतोय त्याच्या समस्यांची उकल होते, भक्ताचे समाधान जेव्हा भक्तांच्या चेहऱ्यावर दिसायचे , तेव्हा बाबा मात्र सद्गदित होत असायचे. ती शीतलता व प्रसन्नता प्रत्येकाच्या आठवणीत आजही आहे.
निस्सीम भक्ती आणि अर्थपूर्ण श्रद्धा असल्यावर परमेश्वराचे साक्षात रूप या नयनी उतरल्याशिवाय राहत नाही, ही परम श्रद्धा होय. निगमानंद महाराजांनी आपल्या हयातीमध्ये दीनदुबळ्यांची सेवा, अध्यात्म त्याचबरोबर शैक्षणिक गरज लक्षात घेता, या तीनही क्षेत्रावर काम केले. एवढेच नाही तर त्यासाठी पावले देखील उचलली. याचे प्रत्यक्ष उदाहरण अथवा अनुभव घ्यायचा असेल, मच्छिंद्र गड निमगाव आपले स्वागत करत आहे. प्रत्येक भक्तांना या गडाला भेट द्यावी असे नंदनवन बाबांनी साक्षात उभे केले आहे. बाबा आपल्यात आज नाहीयेत परंतु, त्यांचे कार्य, विचार, श्रद्धा आजही लोकांच्या ओठावरती आणि हृदय यावरती कोरली गेली आहे. नांदेवाली या त्यांच्या जन्मभूमी मध्ये बाबांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होत आआहे. वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार अगदी अंतर्मनातून बाबांनी केला. अशा महान विभूतींच्या चरणी नतमस्तक व्हावे, यापेक्षा दुसरे परमभाग्य कोणते असु शकत नाही.
" बुरा जो देखन मै चला बुरा न मिलिया कोय |
जो मन देखा अपना, मुझसे बुरा न कोय |"
📝📝
WRITER : RAHUL R DONGARDIVE
अध्यात्मातील शिरोमणी निगमानंद!!!
Nigmanand Maharaj |
लागता त्या मनाला शांत, संयमी, मजबूत निर्णय क्षमता, कार्यक्षम करण्यासाठीचा एकमेव मार्ग म्हणजे अध्यात्म होय. मानवी देहाला कोणतीच वनौषधी किंवा आता चे विज्ञान दुरुस्त करू शकत नाही, तेव्हा मात्र अध्यात्म आणि त्या आध्यात्माची अचूक हातोटी वापरून बाधित झालेल्या मनाला योग्य मार्गाने ज्ञान देण्याचे कार्य वैकुंठवासी ह भ प निगमानंद महाराज यांनी केले होते. अध्यात्मिक अभ्यासातून भविष्याचा वेध घेत. वेद, उपनिषदे, शास्त्र, त्याहून पुढे जाऊन योगसाधने द्वारे समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे काम, समाजातील रूढ, प्रथा योग्य की अयोग्य याची कारणमीमांसा करून योग्य पथ् दाखवण्याचे कार्य महाराजांनी केले.
तिथीप्रमाणे आज वैकुंठवासी स्वामी निगमानंद महाराज यांचे द्वितीय पुण्यस्मरण आहे. 4 ऑक्टोबर 2019 रोजी अध्यात्मातील शिरोमणी आपल्यातून निखळला. शिरूर तालुक्यातील नव्हे, महाराष्ट्र या थोर महात्म्याला पोरका झाला. बाबांचे कार्य हीच त्यांची आगळीवेगळी ओळख आहे. मायंबाचे मच्छिंद्रनाथ वास्तव स्वीकारून प्रत्यक्षात अवलंब करणे हे अग्निदिव्य होते. या अग्निदिव्यातून बाबांनी सरळ मार्ग काढत समाज उद्धाराचा व त्या भरकटलेल्या समाजाला योग्य दिशा देण्याचा मार्ग स्वीकारला. मार्ग स्वीकारणे सोपे होते. परंतु, त्या मार्गावर अगणित असणारे काटे व त्याचे चावे फक्त बाबांनी जाणले. त्यांच्या मनाला व त्यांच्या देहाला समाजातील क्रूर वृत्तीचा खूप मोठा आघात होत होता. बाबांच्या आठवणी सांगत असतांना, बाबा स्वतःहून सांगायचे, "या समाजाला सुधारणे पाहिजे तेवढे सोपे नाही. अध्यात्माची गोडी लावणेही तेवढे सोपे नव्हते." परंतु बाबाची अध्यात्मातील गोडी, वारकरी संप्रदाय, संतांचे आशीर्वाद आणि बाबांची प्रबळ इच्छाशक्ती पुढे त्या क्रूर प्रथा टिकल्या नाहीत. बाबांनी शेवटी त्या क्रूर प्रथा मोडून काढल्या. कबीरांच्या एकतारी भजन यापासून ते आजच्या टाळ-मृदंगाच्या घोषाने परिसर दुमदुमून जात आहे. ही दाहक वास्तवता पाहिजे तेवढी सोपी नव्हती. बाबांनी त्यासाठी जिवाचे रान केले. मन परिवर्तनासाठी समाजाला अध्यात्म पटवून दिले. तुमचा उद्धार करत आहे,ते अध्यात्मच आहे. शुद्ध अंतकरणाने श्रद्धा ठेवली तर, आपली स्वप्ने साकार करता येतात, त्याची परिस्थिती सर्व परिसराला आहे.
बाबांनी अध्यात्मा बरोबर सामाजिक प्रश्नांना सुद्धा वाचा फोडली. अध्यात्माची गोडी ही संसारीक जीवन सुखरूप व जगण्यासाठी योग्य आहे. परंतु ती गोडी अविरतपणे टिकवून ठेवायची असेल तर, त्यासाठी संसाराचे अर्थ बळकट करावे लागेल, ते अर्थ बळकट करण्यासाठी शेती व्यवसाय टिकवावा लागेल. सिंदफणा खळखळून वाहते, ते पाणी बाबांना खुणावत होते. म्हणून परिसरातील सर्व लोकांना विहीर खोदण्याचे आव्हान केले. परिसरातील लोकांना ते पटले. प्रत्येकाने आपापल्या शेतामध्ये विहिरी खोदल्या. काळानुरूप बदल करत बोर घेतले. निसर्गावर आधारित वाचणारी शेती कृत्रिम पाण्याच्या स्रोतावर उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांसाठी फलदायी आहे. शेतकऱ्यांनीसुद्धा ओळखले आणि बाबांचे स्वप्न साक्षात उतरु लागले. यातून बाबांचा भविष्यातील द्रष्टेपणा व समाजाची आर्थिक परिस्थिती कशी भक्कम करावी, हे त्यांचे उदारमतवादी विचार मनाला हेलावून सोडतात. सिंचन क्षेत्रासाठी बाबांनी दिलेला नारळ कधीही फेल गेले नाही. अंधश्रद्धेचा भाग नाही, पूर्णपणे श्रद्धा असल्यावर हवी कार्य फळास येतात याची अनुभूती सर्व भक्त गणाला आहे. परिस्थितीनुरूप बदल करणे, हे प्रत्येक माणसाचे निसर्गतः बदलणारे चक्र आहे. परिस्थितीनुरूप बदल करून स्वतः अंगीकार करणे आणि समाजामध्ये तो रुजवणे हे सामान्य माणसाचे काम नाही त्यासाठी एका युगंधराचा जन्म होणे अपेक्षित होते आणि तेही संताच्या स्वरूपात ! स्वामी निगमानंद जन्मास आले!!!. समाजात परिवर्तन केले. सर्वोच्च शिखर गाठण्यासाठी अहोरात्र झटले, नको त्या वाईट प्रसंगाला तोंड दिले. परंतू, जिद्द सोडली नाही. वारकरी संप्रदायाची पताका अविरतपणे फडकवण्यासाठी सदोदित झटत राहिले.
एका ओसाड माळरानावर नंदनवन फुलवणारे महामेरू आपल्यातून आज निघून गेले आहेत. आज त्यांचे द्वितीय पुण्यस्मरण सोहळा श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड निमगाव मायंबा येथे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. कोविड नाईन्टीन परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नियमांचे पालन केले जात आहे. वैकुंठवासी निगमानंद महाराजांची वारकरी संप्रदायाची पताका अविरतपणे तेवत ठेवण्यासाठी गडाचे मठाधिपती श्री ह भ प स्वामी जनार्दन महाराज गुरु निगमानंद महाराज हे बाबांनी दिलेल्या अध्यात्माचा वसा पुढे घेऊन जात आहेत. अध्यात्मातून केलेले परिसरातील परिवर्तन हे कायमस्वरूपी असते. वै. ह भ प स्वामी निगमानंद महाराज यांनी सिद्ध केले होते. तोच वारसा आज पुढे कायम ठेवत आहे. अशा असणार्या आधुनिक युगातील थोर महात्मे यास द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन!
Writer :
डोंगरदिवे राहुल रामकिसन
श्री निगमानंद विद्यालय निमगाव (मा)
तालुका शिरूर जिल्हा बीड,
महाराष्ट्र
वरूनराजा..थांबरे आता!!!
आम्ही माणसं तू कसाही आलास काय अन..गेलास काय ?
आला तरी आम्ही शिव्याच घालतो
आणि
नाही आलास तरी शिव्याच देतो.
पण तू आमचा पोशिंदा ना,
तुलाच आमची काळजी.
आम्ही लेकरे री तुझी
आम्ही चूक केली काय? अन नाही काय?
पण...तू आम्हाला माफ करत आलास.
इथून पुढेही माफ करणारच ना तू !!
कारण तू आमचा दातायस .
असो, लेकरे गाऱ्हाण तिथेच करतात, जिथे हट्ट पुरवला जातो.
रागही तिथंच व्यक्त केला जातो. जिथे अतूट नात्याचं प्रेम असतं.
हे ही तूच शिकवलंस अम्हास..खरंय ना हे ?
बघना, आमची तू तहान भागवलीस ,
गुरांना चारा दिलास , पशूपक्षांना अन्न पाणी सुद्धा दिलंस.
आता आम्हा पांढरपेशा लोकांना झाडाला पाण्याच्या बाटल्या लटकावायची गरज नाही ठेवलीस.
आम्ही तुझचं घेतो , जमलंच तर तेच दिन-दुबळ्यांना देतो. दीनदुबळ्यांच्या केलेल्या मदतीचा फायदा उठवण्यासाठी माध्यमातून दिंडोरा पिटायला कधी मागेपुढे पाहत नाही ?
पण ...आमच्या या स्वार्थाला तू हे माफ करत आलास.
किती रे तुझी करूणा ही...
हे करुणाकरा .....
आमच्यावर करुणा करशील का ??..
तुझा अंमच्यवरचा राग मान्ययरे.
आम्ही माणस स्वार्थापोटी गटात, जातीत ,धर्मामध्ये विखुरलो
अन एकमेकांच्या जीवावर उठलो, नव्हे कित्येक निरपराध लोकांचा यात बळी गेलाही.
दोन दिवसापूर्वीचच बघना 20 भरतिय जवान मारले , त्या निर्दयी पशूंनी.
काय म्हणत असतील त्या शहिदांच्या माता ?
आई रडून सांगेल ,पण त्या पित्याने आपला टाहो कोठे फोडावा सांगना ?
आज कोणताही बातम्यांचा चॅनल लाव,कोठेतरी एक निर्भया घडलेली असते.
असं ऐकल्यावर नखशिखांत अग्नीचा डोंब उसळतो.
काय करणार ? करता तर काहीच येत नाही.
शेवटी तुलाही हे सहन होत नसावं म्हणून तर तू असा कोपत नाहीस ना ?
असा प्रश्न मनाला स्पर्शून जातो.
पाठीमागं वळून पाहिल्यावर तू केदारनाथ , बिहार , मुबई(2005), यापैकी कोणालाच सोडलं नाहीस.
आम्ही आमच्यातील माणुसकी हरवत चाललोय मान्य आहे.
जग खंडाबरोबर धर्मात विखुरलं.
एका खंडातून अनेक देशात,
एका देशातून अनेक पंथ , धर्म , आणि धर्मातील जाती.
कधी कधी घडणारया घटना पाहून एक प्रश्न पुन्हा पडतो-
"मांणसासाठी धर्म असतो कि ,
धर्मासाठी माणूस ?"
या व्यर्थ वल्गना करत बसण्यापेक्षा माझी एक विनंती ऐकशील वरूनराजा...
आज आम्ही मानव न्यायय् हक्कासाठी मोर्चे आंदोलन अन प्रति आंदोलन/ मोर्चे यात अडकून पडलोय .
पण माणूस म्हणून जर जगलो ना , तर अशा किळसवाण्या घटना घडणारच नाहीत.
पण उद्या आम्ही या देशासाठी, याच बांधवांसाठी जीव देणारी आमची मनुसकीरे.
आज सोन्यासारखी पीक आलित, सर्वजण खुश आहेत तुझं येन सर्वानाच सुखद धक्का आहे .
हाच धक्का उद्याचा बुक्का होऊ देऊ नकोस.आज अख्खा महाराष्ट्र न्हाहून निघालाय.
तुझीच कृपा आहे !
शेतकऱ्यांच्या पिकात माती, तर आमच्या मुखात माती गेल्यासारखं होईल.
शेतकार्याच्या याच पिकावर खूप अपेक्षा आहेत. उद्या याच गोष्टीवर त्याला मुलीचं लग्न करायचय, पोरांची शिक्षणं पुर्ण करायचित,
एवढच काय वरूनराजा सावकराकडची गहान जमीन सोडवून घ्यायची, जमलंच सारं तर मनातला एखादा नवस फ़ेडायचाय .
एकमात्र खरं , हे पिकांचं जर का नाही जमलं, तर 'मात्र' झाल्याशिवाय राहरणार नाही.
हे वरूनराजा
माझ्या या शेतकऱ्याला नको त्या गोष्टीकडे,
आणि....
जीवनाच्या दोरखंडाकडे जाण्यापासून वाचवरे..
करुणाकरा!
वरूनराजा .....थांब रे आता!!!
Writer :- डोंगरदिवे राहुल
कृषीप्रधान भारत देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा शेती आहे. शेतीचे संगोपन अर्थात काळया मातीतून सोनं पिकवण्याची धमक भारतीय शेतकऱ्यांमध्ये आहे. अर्थव्यवस्थेचा कणा शेती जरी असली, तरी तिला भक्कम आणि सक्षम ठेवण्याची क्षमता शेतकऱ्यांमध्ये आहे. शेतकऱ्याला आपण कणा म्हटलं, तर काही वावगे ठरणार नाही. शेती, शेतकरी आणि देश म्हणजे भारताच्या आर्थिक, भौतिक आणि सामाजिक ऐक्याचा त्रिवेणी संगम. शेती हा प्रमुख व्यवसाय असला तरी या व्यवसायाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खरा उत्पादन निर्माता स्वतः निर्माण केलेल्या उत्पादनास योग्य मोबदला प्राप्त करू शकत नाही. मोबदला अर्थात नफ्याचा धनी हा दुय्यम स्थान असलेल्या व्यापाऱ्यास मिळत आहे. प्रमुख असणारा व्यवसाय हा आज कनिष्ठ मानला आहे. जिरायती शेतकऱ्यांच्या यामध्ये प्रकर्षाने उल्लेख करावासा वाटतो. वास्तविक पाहता बागायतदार आणि जिरायती शेती करणारा शेतकरी निसर्गावर अवलंबून आहे. नैसर्गिक आपत्ती आपण समजू शकतो, परंतु मानव निर्मित मागणीचा तुटवडा करून अमाप पैसा कमवणे, हे व्यापाराचे प्रमुख वैशिष्ट्य. याच व्यापाराला शासनाचा अप्रत्यक्ष पाठिंबा, हे दुर्दैव. 1965च्या भारत-पाक युद्धानंतर जी परिस्थिती उद्भवली त्या परिस्थितीवर आधारित तत्कालीन भारताचे पंतप्रधान दिवंगत लाल बहादूर शास्त्री यांनी, "जय जवान, जय किसान" हा नारा दिला होता. शास्त्रीजींनी त्यावेळी या नाऱ्या द्वारे भारतीय लष्कर आणि शेतकरी यांचा गौरव केला होता. स्वातंत्र्याच्या केवळ अठरा वर्षानंतर अशी घोषणा केली, तेव्हा शेती व्यवसायाला चांगले दिवस येणार असे शेतकऱ्यांना वाटले होते. कालांतराने सरकार व सरकारमधील सत्ताधारी लोक बदलली. शेती व्यवसाय सरकारी योजनांपासून वंचित, नव्हे फक्त कागदोपत्री राहीला. भारत देशामध्ये एक ऑगस्ट क्रांती नंतर क्रांतिपर्व सुरू झाले होते. औद्योगिक क्रांति निर्णायक ठरते. हरितक्रांती, श्वेतक्रांती होत गेल्या. भारतीय शेतीला योग्य असे महत्व प्राप्त झाले. 1965 शास्त्रींच्या गौरव उदगारानंतर भारतीय शेतकरी वंचितच राहिला तो आजपर्यंत. प्रत्येक लोकसभा निवडणुकीच्या वेळेला शेतकऱ्यांना आश्वासित केले जाते. त्यांच्या पिकांना हमीभाव, योग्य मोबदला मिळवून द्यायचे, अनेक पर्याय खुले करून ठेवले जातात. बिचारा शेतकरी या सर्वावर विश्वास ठेवून आपले अमूल्य मतदान दान करतो. निवडणुका होतात. बहुमतात असणारा पक्ष, सरकार स्थापन करतो. वास्तविक पाहता दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचा माणस सत्ताधारी पक्षात असला पाहिजे. पण..पुढची पाच वर्ष आश्वासने हवेतच विरली जातात. प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी आणि त्यांचे प्रयत्न कुठेच दिसत नाहीत. शेवटी पाच वर्ष संपण्या ची वेळ येते, तेेंव्हा मात्र आश्वासनांची खैरात पुन्हा केली जाते. दिलेले आश्वासनं कितपत मार्गी लागली याचा कोणीही विचार करत नाही.
कोरोना महामारी काळामध्ये सरकारने कृषी विषयक कायदा 2020 अमलात आणला. देशांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. खास करून पंजाब आणि हरियाणा या शेतकऱ्यांनी तर या कृषिविषयक कायद्याच्या विरोधात चक्काजाम आंदोलन केले. आजही ते आंदोलन सुरूच आहे. सरकार तर सांगते, कायदा शेतकरी उद्धारासाठी आहे. दिल्लीमध्ये चाललेले आंदोलन हे जगाचे लक्ष वेधून घेते. मग या कायद्याला शेतकऱ्यांचा विरोध का?
कृषी विषयक कायदा 2020 च्या कायद्याकडे दृष्टिक्षेप टाकूया , 2020 च्या कायद्यामध्ये तीन विधेयके पास करण्यात आली. तीन विधेयकाचे स्पष्टीकरण सरकार देत असताना सांगते हा कायदा कृषी उद्धारासाठी आहे. अर्थात शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. शेतकऱ्यांना स्वातंत्र्य दिले आहे. असाही उल्लेख केला जातो. केंद्र सरकारने पुढील विधेयके पारित केली १) शेतकरी उत्पादने व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक 2020. २) शेतकरी (सशक्तीकरण व संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार 2020. ३) अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती ) विधेयक 2020
विधेयक एक, संवर्धन आणि सबलीकरण विधेयक 2020 नुसार कृषी उत्पन्न बाजार समिती अस्तित्वात राहील,परंतु बाजार समिती शिवाय शेतकरी आपला उत्पादित माल इतर राज्यांमध्ये किंवा बाहेर देशांमध्ये डायरेक्ट विकू शकतो. एवढेच नाही तर शेतकरी स्वतःचा मालमाल ई- ट्रेडींग द्वारे ज्या ठिकाणी जास्त भाव असेल त्या ठिकाणी माल विकू शकेल.
विधेयक क्रमांक 2,शेतकरी सशक्तीकरण व संरक्षण यानुसार शेतकरी स्वतः व्यापारी, कंपन्या आणि शेतीमालावर प्रक्रिया करून उत्पादन करणाऱ्या उद्योजकांशी जोडला जाईल. त्याद्वारे तो योग्य मोबदला मिळवु शकेल.शेतकऱ्यांनी शेतात पेरणी करण्यापूर्वी किंवा एखाद्या पिकाच्या हंगामापूर्वी त्या पिकाची किंमत कंपनी व शेतकरी यांच्या संमतीने ठरवली जाईल. त्यामुळे पेरणी च्या अगोदर मालाची किंमतीबाबत शेतकरी आश्वासित केला जाईल. यापुढे हा कायदा असं सांगतो ठरल्यानुसार शेतकरी आणि कंपनी यांच्यामध्ये वाद उद्भवल्यास, भावाची हमी आणि बाजार भाव यांच्यामध्ये प्रत्यक्ष भाव न मिळाल्यास निर्माण झालेला तंटा प्रांत अधिकार्याकडे सोडवला जाईल. प्रांत अधिकाऱ्याला त्यावर निर्णय देण्यासाठी तीस दिवस असतील. 30 दिवसाच्या आत यावर निर्णय देणे बंधनकारक असेल. प्रांत अधिकार्याच्या निर्णयाविरोधात अपील करण्याचा अधिकार शेतकऱ्याला असेल. त्यानुसार तो जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करू शकतो. जिल्हाधिकारी सुद्धा 30 दिवसांच्या आतच निर्णय देईल. कंपनीला मात्र उच्च न्यायालयात दाद मागता येणार नाही.शेतकरी मात्र उच्च न्यायालयात दाद मागू शकतो.
विधेयक क्रमांक तीन नुसार तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, कांदा,बटाटा यांना आवश्यक वस्तू कायद्यातून वगळण्यात आले आहे. केंद्र सरकारने एग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड याद्वारे एक लाख कोटी साठवणुकीचे गोदाम, कोल्ड स्टोरेज यासाठी प्रयत्न केले आहे.
वरील तीनही विधेयकांचे अवलोकन केले असता, शेतकरी आंदोलन का पेटले? आणि त्यांच्या समस्या कोणत्या? शेतकऱ्या समोर उपस्थित झालेले प्रश्न असे आहेत. १)कृषी उत्पन्न बाजार समिती संपुष्टात येणार का? सरकारच्या मतानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती संपुष्टात येणार नाही. परंतु तिची एकाधिकारशाही संपुष्टात येईल. समितीला व्यापारया बरोबर स्पर्धा करावी लागेल. तर शेतकऱ्यांना असे वाटते, कृषी उत्पन्न बाजार समिती संपुष्टात आली, तर त्यांचा माल कंपनी कवडीमोल भावाने खरेदी करतील,शेतकऱ्यांची पिळवणूक करतील,अशी शंका शेतकऱ्याचे मनात निर्माण होत आहे.हमी भावानुसार सर्व व्यापारी कंपनी माल विकत घेईल. हे कशावरून? तशाप्रकारची लेखी हमी सरकार देत नाही किंबहुना विधेयकामध्ये तशी तरतूद करत नाही. २) शेतकऱ्याची कंपनी आणि व्यापारामधून फसवणूक होईल का? विधेयका नुसार शेतकऱ्याने विकलेल्या मालाचे पैसे तीन दिवसाच्या आत देणे बंधनकारक राहील, असे जरी असले तरी शेतकऱ्याच्या मनामध्ये एक शंका निर्माण होते. तीन दिवसाच्या आत जर पैसे नाही आले किंवा करारानुसार पैसे नाही दिले तर प्रांत अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्या मध्ये वाद सोडवण्यासाठी कित्येक दिवस लागू शकतात तोपर्यंत शेतकऱ्यांनी काय करायचे. वाद निर्माण झाला तर प्रांताधिकारी कडे 30 आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे 30 असे एकूण आठ दिवस लागतात.त्यामुळे एखाद्या शेतकऱ्यावर भयावह संकट ओढवू शकते. आशी शंका शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होते. ३) शेतकऱ्यांच्या शेत जमिनीची मालकी नष्ट होईल का? विधेयकानुसार शेतकऱ्याच्या शेतीतील उत्पादनावर कंपनी करार करेल अर्थात कंपनी शेतकर्यांच्या शेतीवर हक्क घेऊ शकत नाही.परंतु शेतातील उत्पादनावर तिचा हक्क असेल. शेतकऱ्याच्या मनामध्ये येथे शंका निर्माण होते- करारानुसार उत्पादन पिकले नाही तर त्यात निर्माण होणारी तूट भरून काढायची कशी?
कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू राहील तिला कंपनीबरोबर स्पर्धा करावी लागेल आणि जर स्पर्धा करता नाही आली तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्व राहील काय? अस्तित्वात राहून शेतकऱ्याकडून ठरलेल्या हमी भावानुसार खरेदी करण्याचे धोरण सुरू ठेवेल? अशी कोठेही विधेयकात तरतूद नाही. हमी किंमतीला शेतीमाल विकत घेण्याचे स्पष्ट आश्वासन, विधेयकात नसेल तर हमीभाव निरर्थक ठरतात. शेतकऱ्यांना आपला माल विकण्याच्या स्वातंत्र्यापेक्षा तो माल सरकारने खरेदी करण्याची हमी जास्त महत्वाची वाटते. कारण किमान आधारभूत किंमत (एम. एस. पी. ) ठरवण्याचा पूर्ण अधिकार हा कृषीमंत्रालय, भारत सरकार ला आहे. कृषी मंत्रालय ज्या पद्धतीने एम .एस .पी.(MSP) ठरवते त्यानुसार त्या मालाची आधारभूत किंमत ठरत असते त्यालाच आपण हमीभाव असे म्हणतो. सरकारने पारित केलेले सर्वच कायदे, शेतकऱ्यांना समजतात असे नाही शेतकऱ्याला एवढंच माहित असतं की, शेतात खूप राबल्यावर पीक जोमात येतं,परंतु त्या पिकलेल्या उत्पादनावर भाव ठरवण्याचा अधिकार नसतो. उत्पादनाचे भाव कायद्यानुसार ठरतात. हे त्याला शेवटी माहीत होते. म्हणूनच शेतकऱ्याची दयनीय अवस्था, कृषिप्रधान देशामध्ये पहायला भेटते.
शेती केवळ उपजीविकेचे साधन नसून राष्ट्रीय उत्पन्नाचा स्रोत आहे. ही बाब आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवी. देशातील सर्व कृषी विद्यापीठांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांसाठी योग्य असे उत्पादनाचे स्रोत निर्माण करायला हवे. ज्याद्वारे शेतकरी निसर्गावर आधारित शेती करू शकेल. कारण, बहुतेक ठिकाणी सिंचनाच्या सोयी उपलब्ध नाहीत. सरकारने सिंचनावरती लक्ष देऊन खास करून दुष्काळी भागात सिंचन वाढवावे. शासनाने आयोजित केलेल्या योजना योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतात की नाही याची शहानिशा करणे सुद्धा आवश्यक आहे. योजनांमध्ये दलाली कमी करून थेट बांधावर योजना राबविल्यास शेतकरी मेटाकुटीला येणार नाही. शेतीकडे उद्योग म्हणून पाहण्याची गरज आहे. हा उद्योग जर संकटात सापडला तर भविष्यातील येणाऱ्या अडचणी खूप मोठ्या असतील.
हरित क्रांतीचे जनक म्हणून प्रोफेसर स्वामीनाथन यांनी मोलाचे कार्य पार पाडले. पंजाबी गहू आणि मेक्सिको येथील गहू त्यांच्यावर प्रक्रिया करून भरपूर उत्पन्न देणारा गहू निर्माण केला, तांदूळ निर्माण केला. 1965 नंतर झालेली हरितक्रांती जगाला अचंबित करते आहे. त्या धर्तीवर आधारित कृषी विद्यापीठातील प्रोफेसर यांनी काम करून शेतकऱ्यांना नवसंजीवनी दिली तर शेतकरी स्वाभिमानाने जीवन जगेल आणि आत्मनिर्भर बनेल. सरकारने सुद्धा स्वामिनाथन यांनी केलेल्या शिफारशींवर जर विचार केला तर कोणताही शेतकरी आत्महत्या करणार नाही. वर उल्लेख केलेल्या सिंचनावर भर द्या सांगतात. स्वामीनाथन यांनी सांगितलेली वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम जशी योग्य प्रकारे राबवली जाते. त्याच पद्धतीने इतर शिफारशी लागू केल्यास देशातील शेतकरी हा सक्षम बनेल.
शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज ,जर शेतीवर अनावधानाने नैसर्गिक आपत्ती आल्यास बँकांनी कर्ज वसुलीसाठी तगादा लावू नये. विनाअडथळा त्यांना पिक विमा कवच द्यावे. शेतकरी आत्महत्या नंतर दिली जाणारी आर्थिक मदत ही अत्यंत तुटपुंजी आहे. शासनाची मदत अधिकची करून त्या कुटुंबाला दुःखातून सावरण्या बरोबर त्यांना सबलीकरणासाठी मदत करावी. ग्रामपातळीवर जलसिंचन, नैसर्गिक स्त्रोत संवर्धनासाठी पुढाकार घेणाऱ्या ग्रामपंचायतीचा पुरस्कार देऊन गुणगौरव केल्यास ग्रामपंचायती या क्षेत्राकड वळतील. 14 व्या वित्त आयोगमध्ये स्वतंत्र तरतूद करावी. वेगवेगळ्या भूभागानुसार पीक उत्पादनास प्रोत्साहन द्यावे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून, शेतकऱ्याकडून अचूक माहिती घेऊन झालेल्या नुकसानीस योग्य तो मोबदला देण्यात यावा. त्यामुळे शेतकरी हताश व जीवन संपवण्याच्या मार्गाकडे जाणार नाहीत. शेती शेतकरी व शासन यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी असणार तलाठी हा सुद्धां हितचिंतक असणे महत्वाचे आहे. कारण हा महत्त्वपूर्ण दुवा आहे. शासनाच्या योजना योग्य लाभार्थ्यास पोचण्याचे काम शेती व शासन यांच्यामध्ये दुवा ठरणारे अधिकारी सक्षम पणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिल्यास, शेतकऱ्यावर निराश होण्याची वेळ येणार नाही.
जय जवान! जय किसान !!जय विज्ञान!!! ||जय 🇮🇳भारत||
-राहुल डोंगरदिवे
Due to the covid-19 virus, everyone tried to keep away from this pandemic. The world's major countries are also worried about this pandemic and its panic. Researchers and scientists find out the remedy, but the final solution is not finished. This process is going on a vast. The major problem is, how to break the chain? Which is the weapon to stop this pandemic disease? And the answer is a lockdown. It is the major weapon to stop the chain and the best remedy for covid. The second wave of the covid-19 virus is powerful and destroyed a lot of people. From the last year, the first wave and the symptoms of the covid are different from today. The spreading ratio is so high. The world is aware of it and its side effects. 1st, 2nd, 3rd and fourth waves will come, but we are not fit for that. We have a lot of deficiencies and we are struggling with a lack of strategy. One of the most important deficiency is politics. The politician has played a different kind of politics. High Court said to the central government, 'We are doomed '. The Supreme Court is aware of the central Government takes action against citizens who criticize the situation. This is the condition of the current ambience.
If the central government played a role just like partiality that's not fair. It's inhuman. Politician plays politics always but it's not time to play cunning tricks. It's the moment to come together and fight against the covid -19 pandemic. We should forget all past event and tie up a new bond for a healthy India. If there is only a scare in front of the people at that time don't forget what's the next ambience? Everyone tries to save themselves and they can do everything for their life. Sometimes the situation will be converted into wrath. So we must compromise with them and try to solve the problem honestly. If we ignore them then see one day will come, on that day only chaos and arbitrariness will be sustained. It's totally in our hand, how to handle the current situation, and provide all things related to human beings. At first, we should help the people and make them positive look at this pandemic. Support them and provide medical facilities without discrimination.
People must follow the instructions given by the government. If the people's do not follow such type of instructions then the covid-19 is not controlled. If the disease is spreading all over as fast as wind speed, we can't imagine, what's next? According to the expertise, 3rd phase will be uncontrolled and we have no chance to control it. The central task force committee says, if you want to prevent the third phase, there is no way without 'strictly lockdown'. The central government could not seriously think about that. Stay home, stay safe, stay alert the formula of long life.
Don't afraid when similar symptoms are seen related to covid. Go to the doctor and consult and take medicine. A viral doctor's prescription is not suitable for everyone. So keep you a secure distance from that viral video and message. Always use the weapon ( mask, hand gloves, sanitiser and regular rules.) battel against covid- 19. If we have all things then we beat the pandemic disease. We have experienced, a lot of people, who are not going to the hospital? and tells us the problem ( survey representative). Few persons had prejudiced information about the civil hospital, because of their misunderstanding about the civil hospital. They think all are not going to good. So they afraid and worried about the future.
The scare of covid, many people without consultation taking medicine and another hard dose. Doctors also suggested the HRTC because of the exact diagnosis and treatment. Dr Guleria said, in critical cases HRTC essential but in a mild symptom, there is no need for an HRTC report. In such type of critical cases, take the consult of a specialist. Follow the instructions and does and don't. Don't go forward with overconfidence. Nowadays if a man infected to covid, and then whole family members pass away(it's happened in Nanded, Maharashtra). No coherence between the family and society. So we must find out the symptom and contact doctors. Don't live in an imaginary world. Accept the truth about this pandemic, take proper treatment, and support your family. It's also a national service.
According to the High court and the Supreme Court, we must take care of all. To handle this critical position, Supreme Court established a task force for transparent oxygen allocation. What does Central Government for covid prevention? It's a huge question. Now, the condition is so poor and we are going to the third position of the corona. All we are alerted and make a unique strategy for preventing the third phase.
We should not trust baseless news viral on social sites. Just like it's a huge conspiracy or other. We the People of the world must ignore dirty politics, bad things, understanding - misunderstanding. We must forward positive news, support each other and a little contribution against covid. It's the necessity of the present era. If we just find out only difficulties and deficiency, the situation will be converted into a big disaster. So do something to prevent covid. From today, start the battle against spreading the hidden virus. Follow the local government & Unicef instructions -
# when you are around other people wear a mask that covers your nose, mouth, and chin.
# Keep a safe distance from others.
# If you must gather other people, meet outdoor or choose species with good airflow.
With full of confidence be ready to fight for lives.
# Be alert, stay home, stay safe.
COVID-19 : भय इथले संपत नाही
भारतामध्ये प्रथम मार्चमध्ये एक दिवसाचा कडकडीत बंद पाळण्यात आला. प्रधानमंत्र्यांच्या सूचनेवर सर्व भारतवासीयांना त्याचे पालन आणि अनुकरण केले. नंतर लॉकडाऊन मे-जून पर्यंत वाढत गेला. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक होते. कोरोनाच्या साखळीने माणसांची साखळी मात्र तुटत होती. मिडीया मधून प्रसारित होणाऱ्या बातम्या व संसर्ग पसरण्याची तीव्रता पाहता स्वकीयांच्या भेटीसाठी किंवा जीव वाचवण्यासाठी लोक आपापल्या गावी, शहराकडे परतू लागले. अनेक मजुरांचा नाहक बळी गेला. त्या रेल्वेखाली चिरडल्या गेलेल्या किंचाळ्या, उपासमारी याने आजही काळजाचे ठोके स्तब्ध होतात. हृदयद्रावक घटना आजही मन सुन्न करतात. आज तब्बल चौदा महिन्यानंतरही तीच परिस्थिती पुन्हा अवतरते काय? अशी शंका मनात निर्माण होत आहे. आज दोन मे 2021 रोजी कोरणा संसर्ग चा विक्रमी आकडा, तीन लाख 92 हजार 488 अशी नोंद झाली. कोरोना प्रमाण कदाचित वाढलेलं असेल किंवा कमी झालेलं असेल. भारतीय राजकारणाचा विचार करत असताना स्वार्थापुढे देश मोठा नाही असेच सिद्ध होताना दिसते आहे. आज झालेल्या निवडणुक निकालानंतर राष्ट्रीय स्तरावर कोरोना नियंत्रण च्या बैठका आपले पंतप्रधान घेताना दिसतात. पाच राज्यांच्या निवडणुकांमधे मात्र प्रचार रणधुमाळी मध्ये याचा विसर पडलेला आपण सर्वांनीच पाहिला. अलोट गर्दी मध्ये स्वतः खुद्द पंतप्रधानांनी प्रचंड मोठ्या सभा घेतल्या. त्यातून कोरोनाचा प्रसार झाला याचे आकडे आता बाहेर येऊ लागलेले आहेत. स्वतःचा पक्ष आणि सत्ता समीकरणे यापेक्षा देश मोठा नाही, हे स्पष्ट होते.
सत्ता मोहापायी दस्तुरखुद्द पंतप्रधान आपल्या मंत्रीमंडळात सहकारी असणारे दिग्गज केंद्रीय मंत्री प्रचारात उतरले तेव्हा मात्र कोरोना चा विसर पडला होता. या धामधुमीत मध्ये भारतामध्ये अनेक भयावह घटना घडल्या. मुंबईतील विरार येथे वल्लभ हॉस्पिटल ला लागलेल्या आगीमध्ये तेरा जणांचा मृत्यू झाला. कोरोना ऋग्न पॉझिटिव्ह असणाऱ्या हॉस्पिटलची अशी अवस्था होती, अनेक निष्पाप रुग्णांचा मृत्यू झाला. दिल्ली येथील पलंगाच्या शोधा करिता भटकणाऱ्या एका रुग्णाचा कारमध्येच मृत्यू झाला टाइम्स ऑफ इंडिया न ही बाजू लावून धरली होती. नागपूर येथील रुग्णालयांमध्ये सुद्धा चार जणांचा मृत्यू झाला. गुजरात मधील भरूच येथे हॉस्पिटलला लागलेल्या आगीमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत देशांमध्ये 215 542 जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही हे मृत्यूचे तांडव सुरूच आहे. सर्व जगच हतबल झाले आहे.भारताची स्थिती ही आवाक्याबाहेरची झाली आहे. भारतासारख्या विशाल देशामध्ये ऑक्सिजन अभावी आणि औषधोपचार अभवी लोक तडफडून मारताना दिसतात. एवढी भयंकर स्थिती असताना सुद्धा केंद्र आणि राज्य सरकार संबंध ताणलेले दिसतात. राज्य सरकार केंद्रावर आरोप करते, तर केंद्र सरकार राज्य व लोक यांच्यावर आरोप करताना आपण पाहत आहोत. आरोपाच्या फैरी झडत असताना, स्वतंत्र असणारी न्यायव्यवस्थेला दखल घ्यावी लागते. नाईलाजाने न्यायव्यवस्था हळहळते आणि केंद्र व राज्य सरकार यांचे कान टोचण्याचे काम सुद्धा करते.या वस्तुस्थितीची आपणास मीडियातून चर्चा होताना दिसते. ऑक्सिजन, ऑक्सीजन प्लांट साठी अनेक देशातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे, ही झाली मानवता. पण विश्वगुरू बनू इच्छिणार्या भारताकडे मात्र याचा अभाव आहे,असेच दिसते. कारण, राजकारणापलीकडे त्यांना अंदाधुंद करून सोडणारा सत्ता मोह सुधरू देत नाही. कोरोना संसर्गाच्या लढ्यात अनेक लोकांचा बळी तर गेलाच, परंतु या लढ्यामध्ये जनजागृती करणारा महत्त्वपूर्ण घटक म्हणजे पत्रकारिता. पत्रकारिता करत असणारे 165 पत्रकारांना प्राणांची आहुती द्यावी लागली, हे शाश्वत सत्य दडवून ठेवता येणार नाही. न दिसणाऱ्या शत्रूच्या लढ्या पेक्षा राजकारणातील संसर्ग हा खूप मोठा दिसतो. संकट समयी सर्व राजकारण्यांनी एकत्र येऊन या लढ्याला साथ दिल्यास कोरोना संसर्गाची साखळी आपण पटकन तोडून टाकू. विविधतेतील एकता, संकट पूर्वी दाखवली तर तिचा योग्य उपयोग भारतमातेसाठी होईल. अंतिम संकटापर्यंत आपण असं शांत राहायचं का? जेव्हा पर्यायच उरत नाही तेव्हा मात्र एकत्र पाहिजे. अगोदर शत्रूला पोसायचे, त्याचा आपल्या स्वार्थासाठी उपयोग करून घ्यायचा आणि नंतर त्याला हाकलून देण्यासाठी भारतीय ऐक्य दाखवायचे. ती स्वातंत्र्य पूर्वीची परंपरा पुन्हा वेगळ्या पद्धतीने अवतरण्याची भीती मनामध्ये कासावीस करते.
जागतिक आपत्तीमध्ये भारताची सध्याची अवस्था खूपच गंभीर आणि चिंताजनक आहे. भारतातील सर्व हॉस्पिटल कोरोना रुग्णाने हाउसफुल झालेले आहेत. राजधानी दिल्लीची तर अवस्था खूपच बिकट आहे लोक स्वतःच्या कार मध्ये औषध उपचार घेताना, ऑक्सीजन सिलेंडर गाडीच्या बाहेर असताना रस्त्यावर दिसत आहे. देशातील एका आमदाराला उपचाराअभावी मृत्यू येत असेल तर, सामान्य माणसांचे हाल कसे असतील? याची कल्पनाच करणे व्यर्थ ठरेल. प्रत्येक जिल्हा रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता आणि औषधोपचाराचा तुटवडा या समस्येने ग्रासलेले आहे. खूप आरडाओरड केल्यानंतर केंद्राकडून राज्याला ऑक्सिजन पुरवला जातो. सर्वांसाठी देश मोठा की देशासाठी राजकारण मोठे, अशा शंका निर्माण होणे ही खूप मोठी निंदनीय बाब आहे. शासकीय रुग्णालयाची अशी अवस्था असताना खाजगी रुग्णालयात औषध उपचार करणे सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडणारे आहे काय? खाजगी रुग्णालयांमध्ये ऍडमिट होतानाच हजारो लाखो रुपयांचे डिपॉझिट भरा, त्याशिवाय ऍडमिट करूनही घेतले जात नाही. त्याचबरोबर शासकीय रुग्णालय विषयी असणारे ग्रामीण भागातील गैरसमज ही एक मोठी चिंतेची बाब बनली. त्या अकारण भीतीपोटी लोक आपले आजार लपवण्याचा प्रयत्न करत आहे. हाच आजार बळावला तर मृत्यू निश्चित आहे. हे या लोकांना कोण समजावून सांगणार. समजावण्याचा प्रयत्न केलाच तर लोकांचे उद्धटपणाची वर्तनं, त्यांच्याच जीवाशी खेळ खेळत आहे. गंभीर परिस्थितीमधून सुखरूपपणे बाहेर पडायचे ठरवले, सर्वच राजकीय पक्षांनी ,घटक पक्षांनी , स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन लोकांच्या मनातील भिती काढण्याचा प्रयत्न करून सदृढ मनाने, निस्वार्थपणे देश हित लक्षात ठेवून निकराचा लढा दिला पाहिजे.
लोक प्राणाशी झुंज देत असताना, कोरोना नंतर निमोनिया सारख्या गंभीर आजारावर रामबाण उपाय म्हणून रेमडिसीवर या औषधाचा वापर केला जातो. या औषधाचा गैरवापर व साठेबाजी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. औरंगाबाद सारख्या ठिकाणी तर वापरलेल्या बाटल्यांमध्ये सलाईन चे पाणी भरून हजारो रुपयांना विकले जात आहे. रेमडीसिवीर या औषधाचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात आहे. आहे ते औषध, योग्य त्या किमतीला मिळत नाही. मूळ किमतीच्या दहापट पैसा वसूली दलालांमार्फत केली जाते. सामान्य माणसाला तर तो मिळतच नाही,आणि जर मिळालाच तर वरदहस्त लागतो. एक वेळच्या औषधाची किंमत जर तीस ते चाळीस हजार असेल तर, सात ते आठ दिवसानंतर येणारे बिल किती असेल? यामुळे लोकांना औषध मिळत नाही. अनेक संसार उद्ध्वस्त होताना दिसतात. रुग्णालयांमध्ये एवढा मोठा न परवडणारा उपचार करूनही रुग्ण दगावत असेल, यापेक्षा भयंकर शोकांतिका कोणती होता आसु शकते?
हॉस्पिटलच्या खर्चापोटी अनेक कुटुंबे उध्वस्त होताना पहायला मिळतात. कृत्रिम औषध तुटवडा गंभीर झालेल्या रुग्णासाठी मृत्यू ठरत आहे. चांगल्या गोष्टींचे श्रेष्ठत्व स्वतःच्या नावे घेण्यासाठी राजकीय मंडळी अग्रेसर असतात. अपयश मात्र कोणी माथी मारून घेत नाही. आज प्रत्येक पक्षाचे उत्कृष्ट हॉस्पिटल असायला हवे होते.श्रद्धे साठी मंदिर जशी हवी असतात, त्याचप्रमाणे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय अस्तित्वात असणे आवश्यक आहे. वास्तवातील ज्यावेळेला संसर्गजन्य किंवा इतर साथीचे रोग येतात तेव्हा, मात्र या रुग्णालयाची आपल्याला नितांत आवश्यकता आहे. भयंकर असणाऱ्या जागतिक साथीच्या रोगांमध्ये राज्यकर्ते, राजकारणी मंडळींनी रुग्णांसाठी अभय शिबिरे, त्याचबरोबर जनजागृती करणे आवश्यक ठरते. राजकारण करण्यासाठी आपल्याला आयुष्य पडलेल आहे. परंतु, ज्यांच्या जीवावर आपण राजकारण करतो, ती जनताच नसेल तर, राजकारण कोणासाठी करणारा? आणि कशासाठी? कोरोना सारख्या भयंकर संसर्गजन्य आजारात औषधोपचारा बरोबर मानसिक आधाराची सुद्धा गरज आहे. मानसिक आधार राजकारणी उत्कृष्टपणे देऊ शकतात. हे ज्याने त्याने ओळखले पाहिजे. सृजनशील समाजनिर्मितीसाठी आरोग्यसंपन्न, सुदृढ व्यक्ती टिकणे आणि निर्माण होणे आवश्यक आहे. समाजातील समज आणि गैरसमज दूर करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाने संयमाची भूमिका घेऊन उपाययोजना व नियोजन केले तर या संकटातून सर्वजण सुखरूप बाहेर पडू. रुग्णालयातील आगीचा प्रश्न असो अथवा कृत्रिम औषध तुटवडा या सर्व आरोपींवर योग्य ती कारवाई झाली तर भविष्यात अश्या गोष्टींची पुनरावृत्ती होणार नाही. परंतु हे प्रश्न जर असेच डोळ्याआड केले जातील , तर समाज आणि सरकार त्याबरोबर इतर राजकीय पक्ष यांच्यात समन्वय साधला जाणार नाही. परिणामतः भय इथले संपत नाही.!
Writer:-
#RAHUL R. DONGARDIVE
आजचा शिक्षक व गुरु यांची तुलना होणे शक्य जरी नसले, तरी त्यांचा दर्जा हा गुरुचा आहे. आई नंतरचे मोठे दैवत मानलं जातं, ते म्हणजे गुरु. शिक्षक हा त्या मुलांचा मार्गदर्शक असतो. गुरु व शिक्षक यांचा तुलनात्मक अभ्यास केला, तर पूर्वीची शिक्षण प्रक्रिया ही समाजापासून दूर राहून आश्रम व्यवस्थेतून पार पडायची. आजची शिक्षण प्रक्रिया ही समाजात राहून पूर्ण केली जाते. पूर्वी समाजापासून दूर राहून त्या शिष्याला समाजाचे परिपूर्ण शंज्ञान असायचे. आजच्या विद्यार्थ्याला समाजामध्ये राहून, शिक्षण पूर्ण करून, त्याला समाज ज्ञान असेलच याची खात्री देता येत नाही. शिस्त, गुणवत्ता, सदाचार आणि शील यांच्या आचार आचारसंहितेची अपेक्षा करणे व्यर्थ ठरेल. विद्यार्थी ज्ञानासाठी शिक्षण घेत नसून तो परीक्षार्थी बनला. शिक्षण हे साध्य न राहता साधन बनले. म्हणूनच त्याचा वापर एक व्यवसाय म्हणुन होऊ लागला.
शिक्षक शीलवान, क्षमाशील आणि कर्तव्यदक्ष या मर्यादांमध्ये बांधला गेला. परंतु या सीमा विद्यार्थी- पालक यांनाही लागू होतात. या बाबींचा कोणीही विचार करत नाही. सामाजिक दृष्टिकोनातून आणि राजकीय वर्तुळातून शिक्षकाला नोकर समजतात. कारण, शिकविण्याच्या मोबदल्यात त्याला पगार दिला जातो. प्राचीन काळी देखील गुरूला शिष्याकडुन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरुदक्षिणा द्यावी लागत असे. त्यांची अशी मर्यादित सीमांमध्ये बांधिलकी नव्हती किंवा त्यांना अपमानास्पद वागणूक ही दिली जात नव्हती. त्यांचं स्थान हे निर्विवाद,मग आजच्या शिक्षकांचे स्थान हे वादाचे का?
शिक्षक शासन आणि आजचे शैक्षणिक धोरण यांचा विचार केला तर खूप तफावत आपणास दिसून येईल. शाळेवर नियंत्रण व शाळेचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून ग्राम शिक्षण समितीची स्थापना, ही शासनाची भूमिका कौतुकास्पद असली, तरी तिची हुकूमशाही प्रवृत्ती आपणास प्रत्येक गावांमध्ये पहावयास मिळते. ग्रामशिक्षण समिती ही स्वतःचे वास्तव स्वरूप सोडून ती फक्त अधिकारांना महत्त्व देते. स्वतःचे कर्तव्य मात्र विसरते. ग्रामशिक्षण समिती म्हणजे केवळ शाळेच्या कार्यालयातील एक शोभनीय फलकच म्हणावा लागेल. ग्राम शिक्षण समिती चा आणि शाळेचा संबंध किंवा त्यांच्या सभांचा संबंध क्वचितप्रसंगी येताना दिसतो. विद्यार्थी पालक शिक्षक यांच्यातील दुवा साधतांना कुठेच दिसत नाही. ग्रामशिक्षण समिती म्हणजे कागदोपत्री, सही शिक्केनिशी चालणारी देखावाच झाली.
ग्रामशिक्षण समिती एक दुवा म्हणून चांगले काम करू शकत नसली, तरी ती अधिकाराची जाणीव असलेली एक जिवंत समिती आहे. जेव्हा-केव्हा शाळेला बांधकाम निधी आणि इतर निधी येतो, तेव्हा अध्यक्षांच्या सही शिवाय चेक मोडत नाही. अशा वेळेस अध्यक्षांची भूमिका ही खरोखरच पाहण्यासारखी असते.आलेल्या निधीचा कशाप्रकारे वापर होतो, हे पाहून निर्णय घेण्यापेक्षा त्यामधून चिरीमिरीची अपेक्षा करताना दिसतो. सलोखा झाला तर ठीक नसता गावकऱ्यांचा दबाव आणून मानसिक त्रास देऊन त्या शिक्षकाने एक प्रकारचा गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला जातो. निधीचा खर्च ग्रामशिक्षण समिती ने करायचा आणि निर्माण झालेल्या व्यत्ययास शिक्षकास शासनाने जबाबदार. मग याला ग्राम शिक्षण समितीस जबाबदार का धरू नये ?शिक्षक सर्व योजना हाताळतो का? अध्यक्ष व शिक्षक यांना शासनाने सारखेच जबाबदार धरल्यास दोघेही जिम्मेदारीने आपले काम पार पडतील. सतत वादाच्या भोवऱ्यात राहिलेल्या भांडणाचा मुद्दा घेतला, तर तो शालेय पोषण आहार, स्थलांतरित विद्यार्थ्यांची वसतीगृह या योजना. योजना राबवताना शिक्षकास, एका सत्वपरीक्षा तून जावे लागते. योजना कोणाच्या मार्फत चालवावी. गावातील गट-तट व राजकारणी शिक्षकास वेठीस धरताना दिसतात. स्थलांतरित विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी तर गावचा शिक्षण समितीने अक्षरशः शिक्षकाबरोबर भांडणे झालेली सर्वांनी ऐकली आणि पाहिली सुद्धा. शालेय पोषण आहार तयार करणारी स्वयंपाकी महिला नेमणूक ग्राम शिक्षण समिती करते. निवड करून वर्षाच्या आत फेर निवड ठराव मार्फत झालेल्या दिसतात. एवढे करूनही कोणाच्या ना कोणाच्या अहंकाराचा बळी शिक्षकाला स्वतःलाच व्हावे लागते. नोकरी ही त्याच गावात करायची असते. चांगल्यानाही तोंड द्यावे लागते आणि वाईटालाही. हितचिंतक भेटला तर दोन घोट चहाचे पाणी किंवा कर्णसुख आणि विरोधक भेटला तर घृणाच....घृणा.
असं म्हटलं जातं, 'राबणारे हात सुंदर असतात' शासनाचे शैक्षणिक धोरण चुकीचे आहे असे म्हणता येणार नाही. शासनाची कोणतीही भूमिका ही समाजाच्या हिताचीच असते. परंतु तिला राबवणारी धूर्त असतात. शैक्षणिक धोरण राबवताना सुविधांचा अभाव व अपेक्षा मात्र उच्चकोटीच्या करणं, ही शासनाची भूमिका पूर्णपणे योग्य आहे असे म्हणता येणार नाही. गुणवत्ता वाढली पाहिजे, मुलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे,या गोष्टीवर भर दिला जातो. शाळेची जेव्हा तपासणी होते, तेव्हा तपासणी अधिकारी यांच्याकडून लेखी स्वरूपातील गुणवत्तेला प्राधान्य दिले जाते. वर्गातील वास्तव गुणवत्तेस अधांतरीच लटकवतात. लेखी स्वरूपातील गुणवत्ता ही शिक्षकांचा आरसा समजला जातो. गुणवत्ता तपासणी विद्यार्थ्यांची असते की शिक्षकांची एक वादग्रस्त ठरू शकते. त्याचबरोबर अनावश्यक शैक्षणिक कामे सांगितली जातात. गावाचे सर्वेक्षण, जनगणना अनावश्यकता टपालामध्ये प्रामुख्याने एस एल एफ नेहमीच असते. अनेक प्रकारची जात निहाय गुणवत्ता विभागणी केली जाते. त्याचबरोबर अनावश्यक 74 रेकॉर्ड रजिस्टर तयार करावे लागतात. एवढं करूनही एखाद्या शिक्षकाचा कुकर्म सर्व शिक्षकी पेशाच्या माथी मारून समाज मोकळा होतो. त्यात बळी जातो तो सर्व शिक्षकी पेशाचा. हाती येते ती बदनामी.
समाजातील बदलत चाललेली मानसिकता ही वेळीच सुधारायला हवी. नाण्याच्या दोन बाजूंच्या विचार करायचे सोडून तिसरी बाजू असते याचा विचार करायला समाजाने शिकले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या उत्तम गुणवत्तेसाठी शिक्षकाला शिकविण्यासाठी पाहिजे तेवढा वेळ मिळत नाही.वेळ खूप महत्त्वाचा आहे. समाजात दुसरा तिसरा कोणी नसून, त्या समाजाची सुरुवात, समाजघटक आपणच असतो. शिक्षक पूर्वीचा नसून तो आधुनिक भारताचा आधारस्तंभ घडवणारा शिल्पकार आहे. माता-पिता, गुरु- शिष्य,बहिण- भाऊ आणि अतिथी यांचा आदर करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. 'उपदेश करणं सोपं असतं, ते अंगीकार करणं खूप अवघड असतं.' अर्थात "बाप बननं सोप असतं, पालक बनन कठीण " नाण्याची तिसरी बाजू न समजल्यास समाजाचे विध्वंसक स्वरूप निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली घटना समितीने मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. घटना निर्मिती प्रक्रियेमध्ये सुरुवातीला मसुदा समिती अध्यक्ष व इतर सदस्यांमध्ये मतभेद निर्माण झाले बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. सरदार वल्लभाई पटेल यांना मात्र त्यांच्यावर खूप विश्वास होता. सरदार वल्लभाई पटेल, महात्मा गांधीजींनी बाबासाहेबांना विनंती केली. घटनेचा मसुदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. घटना निर्मिती प्रक्रिया 2 वर्ष 11 महिने 18 दिवस चालली. या काळामध्ये एकूण 7353 तक्रारी आल्या त्यापैकी 2473 तक्रारीवर विचार करण्यात आला. जगातील जवळपास पन्नास ते साठ राज्यघटनांचा अभ्यास करून एक परिपूर्ण राज्यघटना निर्माण झाली. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व,आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य यांना महत्त्वाचे स्थान देण्यात आले. राज्यघटनेमध्ये मूळ प्रस्ताविक 22 भाग 395 कलमे व आठ अनुसूची असा समावेश होता. संविधान सभा अध्यक्ष यांच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक परिपूर्ण राज्यघटना सुपूर्द केली, तो दिवस होता 26 नोव्हेंबर 1949. राज्यघटना घटना समितीकडे सुपूर्द केल्यानंतर राज्यघटनेविषयी
26 नोव्हेंबर 2015 पासून हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कालानुरूप आजची घटना 452 कलम, 26 भाग , आणि 12 परिशिष्टे अशी आहे. राज्यघटनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली. कारण , 26 जानेवारी 1930 ला पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली भारत स्वतंत्र करण्यात आला होता. ध्वजारोहन करण्यात आले होते. 26 जानेवारी1950 पासून भारतामध्ये संसदीय शासन पद्धति चा अंमल सुरू झाला.
Discrimination is diverse in the world. In Europe, there is black and white intolerance. In the world, there are several types of racism. From historical eternity, controversy getting on. Asian countries are not exceptional for that. Unity in diversity is a speciality of India. Before the independence of India, India has four class, Brahmin, Kshatriya, Vaishnav and Shudra. Brahman appeared as one of the most powerful class. ' Brahman is not a God, but not less than God', it's the unique style of classism. It has Supreme Power to do or not to do, in the Hindu religion. Their expressed words are so auspicious and fearful. If someone tries to oppose them that's the bad Omen for Hinduism. All fellow is tried to annihilate that person, who is known about the mythology. On the other hand, the first thing that appears at the same period? Upcoming improvement divided by the orthodox people because they will know that. If the improvement movement is increased the Supreme Power will be destroyed.
Now the issue of racism is moving through an authority. A different kind of authority does not belong to the government but belongs to the orthodox community. They have plenty of strength governed by religion. Those persons are being suppressed by this bad thing. Small things are shown casual but the intention survives hidden in cruel belief. Narrow-minded persons play different tricks. The persons, who belong to untouchables. In Europe 'the black'. Those person doesn't have any rights, social values and social status. They are far away from this, because of untouchables. The ground report is very cruel and inhuman. In the ancient period, it's a depressed class from Indian society. Daily works were different from each other. Untouchables had low-quality work. They did that silently because they were born in that class(-untouchables). They didn't know their rights and responsibilities. Just they know the duty imposed by the religious beliefs. They were unknown about religion and the good path.
That inhuman governance was very dangerous & injustice. A class had full of facilities and prosperous life, one of them a class, that had no facility, social rights and social status. Simply known as the trampled and untouchables. This horror condition was going through thousands of year. Generations had been demolished by this critical situation. A lot of social reformers awareness about this and they're tried to develop this position. Like Mahatma Jyotiba Phule, Maharshi Dhondo Keshav Karve, Vitthal Ramji Shinde, Justice Ranade, M.K. Gandhi also gave their good contribution. One of the most powerful humans, who had dedicated his entire life to the society and gave the powerful constitution of India. To make new history in the world. The worlds most popular figure a thinker, philosopher, jurist, architect of the Constitution, the father of modern India was - Dr Bhimrao Ramji Ambedkar. known as Babasaheb Ambedkar, a superhero.
Dr Babasaheb Ambedkar was born in an untouchable family. He endured all type of discriminations and their side effects. when he was little not allowed to take education. Satara's orthodox people are opposed to him. His educational desire continuously increase and tried to chess new challenges. The main support of his father, Ramji. Ramji was great and outstanding. In that adverse circumstances, Dr Babasaheb's perseverance, hard work, and consistency completed his education. During his education, he learnt many more things from society. When he compared Indian society and western society. He found the difference between equality, fraternity and social structure. He also investigated a unique principle in Europe black and white racism. It was compared with Indian classism. India's other remaining three classes were so comfortable, rich and wealthy. They didn't have any complaint about their life. The major problems had with the IV class of Hinduism- Shudra. Western countries allowed black in other areas. Touchables and untouchables influence is no more there, but discrimination is so deep in their light minds. When compared those conditions, Dr Babasaheb worried about the Indian Hinduism class 4th. Every time he thought about his follower's futures and their happy life.
That was the grief hidden in Dr Babasaheb's heart. Several problems and obstacles ahead but Dr Babasaheb beat all of them. Through their wisdom and the concept of modern India. He thought modern India will be casteless and without racism. His all concepts, theory and equality were unique to the next level. It's reflected throughout the constitution of India. Through the constitution, he gave his followers rights, responsibilities and duties. For Cast annihilation, he made powerful rules and regulation just like atrocity law. All are not dependent on their caste and Creed or religion. India is the first, and then others. Unity in diversity is the principle of the Indian Constitution. World's largest democracy exist in India, given by Dr Babasaheb. Human values are important, not its religion, caste, Creed. All are equal.
Nowadays we are celebrating Republic Day or Independence Day proudly. Dr Babasaheb gave everyone right, responsibility and duties. Orthodox people's are taking advantage of the method of racism. These assumptions could not away from their minds. Many more cases registered in police station concern about atrocities and other laws. Upper classes always tried to play unique tricks with them. such type of cases is not registered in the police station. Conspiracy cases are registered and taken quick action through the prosecution. And it is a critical issue for the future.
Racism and discrimination go hand-in-hand. None can divide it. If you are considered a past event of World War first and second. The reason was racism. 'We are great', and 'we have the right to rule the entire world'. A Lot of people and soldiers were died and handicapped. Some countries were developed and some become poor and poverty. India also participates in the world war and demand freedom from British rule. After World War II, India got independence. Indian first Prime Minister Pandit Jawaharlal Nehru gave a speech at Red Fort Delhi, on Tryst with Destiny. All citizens were listened to carefully and follow seriously. The basic reason, where India lost its dignity and liberation. That feedback continued to sustain. The reasons for War and slavery, That's the deficiency of thoughts. Till now we are a developing country, not developed. We are free from British rule but does not free from orthodox tendencies. Yes, there must be changed open criticized by the upper-class.
Many laws for untouchables and their improvement. Their implementation is on the paper not on the ground. Scam tendency and intention are shown by the government. At this stage, many leaders delivered a Jumbo speech on equality, brotherhood and Justice but follow nothing. Superheroes reminiscences on their birth celebration. After all are artificial to show the public, not in fact.
If you want to let it be, but the new castism running on. That is not pastime castism. This new strategy is getting on in all civilized sectors, in every field it's going on and going on. Open intolerance no more. it's all over. I would like to say that standard discrimination. It's in literate people. The thinking style about minor caste is similar. Who belongs to SC or ST ( means untouchables) doesn't have any social significance. They are secured by the constitution of India. the reality, their implementation is not very well.