इम्रान खान अटक - गृहयुद्ध - सुटका!
पाकिस्तानातील सद्यस्थिती व श्रीलंकेतील राजसत्तेच्या विरोधात घडलेली घटना यावरून एक गोष्ट लक्षात येते, "सत्ते पुढे शहाणपण चालत नाही." अशी एक प्रचलित म्हण आपल्याकडे आहे. असणारी म्हण ही निश्चितच योग्य आहे . एखादी विनाअंकुश सत्ता स्वैराचारी कारभार करत असेल तर उलथवून टाकण्याची क्षमता जनतेमध्ये असते जगामध्ये जेव्हा जेव्हा राजसत्ता अनाचार करते दुराचार करते सत्तेचा गलथान कारभार सुरू होतो तेव्हा तेव्हा जनतेने राज सत्तेला जागेवर आणण्यासाठी सत्तेची सूत्रे मोर्चा आणि आंदोलनाच्या माध्यमातून स्वतःच्या हाती घेऊन लोकशाहीवादी मार्गाने आगे कूच करण्याचा प्रयत्न केला आहे मोठमोठ्या क्रांत्या झाल्या क्रांती होऊन शतकोन व शतके गेली. क्रांतीतून निर्माण झालेली गोड बीज आजही जगाने जोपासताना पाहिली इथून पुढे कित्येक वर्ष मानव जातीच्या अस्तित्वापर्यंत राहतील यात शंका नाही.
पाकिस्तान हे एक छोटसं राष्ट्र . विकासासाठी धडपडणारा देश म्हणून जगाच्या पाठीवर त्याची ओळख. आतापर्यंत पाकिस्तानमध्ये अनेक सत्ता आल्या गेल्या . सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे , जी सत्ता अस्तित्वात येते, ती सत्ता उद्या संपणार आहे. हे शाश्वत सत्य जरी असलं, तरीही निर्माण होणारच सरकार पहिल्या सरकार प्रमुखाला एक तर देश सोडायला भाग पाडतोय किंवा पूर्व पंतप्रधानांची हत्या होते. अशी पाकिस्तानची व नेतृत्वाची कहाणी सर्व जगाने पाहिले. एखादा मोठा नेता मृत पावतो किंवा त्याची हत्या होते? मीडियाच्या माध्यमातून किंवा सत्तेच्या माध्यमातून एकमेकावर आरोप आणि प्रत्यारोप केले जातात. त्यामध्ये कितपत शाश्वत सत्यता आहे हे पडताळून किंवा संशोधन करण्यापेक्षा पंतप्रधान होणारा नेता मात्र गमावला जातो हे दुर्दैव.
पाकिस्तानच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी नुसार नवोदित पंतप्रधान म्हणून शहबाज शरीफ यांची 11 एप्रिल 2022 ला निवड झाली. नवीन पंतप्रधान म्हणून शहबाज शरीफ यांची सत्ता सुरू झाली.पाकिस्तानच्या हिताचा किंवा विकासात्मक विचार करण्यापेक्षा ' गतवैमानस्य' त्या एका गोष्टीने ग्रासलेल्या सर्वच पंतप्रधानांना सूडबुद्धी सुचते आणि तो सुडाने पेटून उठून पायउतार झालेल्या माजी पंतप्रधानांवर नको ते आरोप करून अथवा कोणत्याही भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्याला सिद्ध करून सोयीनुसार कायदेशीर प्रक्रिया राबवली जाते व त्यानुसार त्याला एक तर देश सोडून जाणे भाग पाडले जाते. हीच ऐतिहासिक परंपरा पुढे सध्याचे असणारे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी राबवलेली दिसते
23 वे पंतप्रधान म्हणून आपली नावलौकिकता मिळवण्यापेक्षा त्यांनी सूडबुद्धीचे राजकारण सुरू केले आणि पूर्व पंतप्रधान इम्रान खान यांना 'अल कादिर ट्रस्ट ' साठ अरब रुपये भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कायदेशीर पद्धतीने 9 मे 2023 रोजी दुपारी तीन वाजता पाकिस्तानी रेंजर्स करून अटक करण्यात आली. त्यांना पकडून पोलीस पथकाच्या गाड्यांमध्ये बसवताना सर्व जगाने पाहिले. इम्रान खान जेलमध्ये गेले खरे पण पाकिस्तानच्या आतापर्यंतच्या 75 वर्षाच्या कालखंडामध्ये जेवढे नुकसान झाले नसेल तेवढे नुकसान इमरान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानला आपल्या घरातूनच सोसावे लागले. पाकिस्तानच्या इतिहासामध्ये याची 'काळा दिवस' म्हणून नोंद केली जाईल. परकीय आक्रमणांपेक्षा घरगुती आक्रमणाने पाकिस्तान होरपळतो आहे, जळतो आहे, रस्त्यावरती अग्नि तांडव सुरू आहे. अगोदरच अनेक समस्याने बळी ठरलेला पाकिस्तान काही दिवसापूर्वी रेशन साहित्य पळवताना आपण पाहिला. महागाईचा उच्चांकही पाहिला. सर्वसामान्यांचे जीवन अत्यंत दयनीय झालेले सर्व जगाला दिसत आहे. श्रीलंके पेक्षाही भयंकर परिस्थिती पाकिस्तान मध्ये आज पाहताना सर्वजण अवाक होतात . पर्याय हा तेथील जनताच करू शकते. लोकशाही पद्धतीचे सरकार या देशाला उन्नतीकडे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. ही परिस्थिती जोपर्यंत तेथील मिल्ट्री च्या लक्षात येत नाही. तोपर्यंत ते अशक्य आहे. कारण आज पर्यंत कोणाचेही सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही. ही दाहक वास्तविकता कोणीही नाकारू शकत नाही.
पूर्व पंतप्रधान इम्रान खान यांना अटक झाली. ते चूक आहेत की बरोबर आहे हे तेथील न्यायव्यवस्था पाहिल. परंतु, राजकीय सुडापोटी पाकिस्तानातील येणारा सत्ताधीश कोणत्याही मार्गाने निरंकुश सत्ता हकतो. आतापर्यंत त्यांना यशही येत होते. जनता हे पूर्वीपासून पाहत होती. इमरान खान यांच्या अटकेनंतर मात्र पाकिस्तान मध्ये अराजकता, अनागोंदी ,स्वेराचार याची परिसीमा ओलांडली गेली. पाकिस्तान मध्ये प्रथम वेळ असेल जनतेने मिल्ट्री वर आक्रमण केले. बहुतेक ठिकाणी प्रत्येक सैनिकांना मारहाण करण्यात आली. आगीचे लोट, अग्नी तांडव करत होते. देशातील अंतर्गत कलह विकोपाला गेले होते. त्याचे पडसाद आजही तीन दिवसापासून जगाला दिसत आहे. प्रत्येक देशाने आपल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी अर्थात पाकिस्तान सोडण्यास सांगितले आहे. पेशावर, कराची, लाहोर रावळपिंडी अशा प्रमुख शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही जनता रस्त्यावर उतरलेले आणि जाळपोळ करणारी पाहतो. यावरून पाकिस्तानला योग्य तो धडा स्वतःहून शिकला पाहिजे अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
पाकिस्तान मध्ये हा हा कार...
पंतप्रधान इमरान खान यांना अटक केल्यानंतर पाकिस्तानमधील अनागोंदी निर्माण झाली होती. ती हाताबाहेर बाहेर गेली होती. शहबाज शरीफ सरकारला त्यामध्ये अपयश येत होते . इम्रान समर्थकांनी पूर्ण यंत्रणा हातात घेतली होती. सैनिकांना ते कसलेही प्रकारचे भीत नव्हते, उलट पक्षी त्यांच्यावर आक्रमण करत होते. अटक करण्याच्या अगोदर इमरान खान यांनी दिलेले कारमधील बाईट हे त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे होते. रावळपिंडी, पेशावर, कराची, लाहोर, पंजाब प्रांत पूर्णपणे आटोक्याबाहेर होता. रस्त्या रस्त्यावरील अग्नितांडव होते. लोक कोणाचेही ऐकत नव्हते. बेधुंदपणे मरणालाही भित नव्हते. सरकारी कार्यालय, सेना, रेडिओ टावर यांना टार्गेट करत होते. जिना हाऊस तर राख करून टाकले होते. इस्लामाबाद मध्ये तर गोळी आणि पेट्रोल बॉम्ब चे गोळे खुलेआम रस्त्यावर फेकताना लोक दिसत होते. रावळपिंडीमध्ये कोर कमांडर ची तोडफोड करण्यात आली. टोल नाके तोडण्यात आले. लाहोर मधील ऑडी शोरूम ला आग लावण्यात आली. पेशावर मधील रेडिओ टॉवर व बिल्डिंग आग लावण्यात आली. पेशावर ते इस्लामाबाद पूर्णपणे आगीचे लोळ रस्त्या रस्त्यावर दिसत होते . त्यामध्येच पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी जनतेला संबोधन करत असताना, अल कादिर ट्रस्टच्या साठ अरब रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचे सांगितले. न्यायालयीन कोठडी मध्ये आठ दिवसाची रिमांड देण्यात आली. ह्या संवेदनशील घटना एकापाठोपाठ एक घडत होत्या. तसा पाकिस्तान पेटत होता. नियंत्रणाच्या बाहेर जात होता. रस्त्यावरील अनेकांच्या गाड्या जाळल्या जात होत्या आणि सरकारी कार्यालयांना जनतेकडून लक्ष केले जात होते. सत्ताधारी पक्षाने कारवाईची सीमा ओलांडली होती. अनेक निरपराध लोकांचे बळीही गेले.
अल्पायुषी पंतप्रधान...
पाकिस्तानच्या प्रारंभिक पासून ते आजपर्यंत कोणत्याही पंतप्रधानाला आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. त्याला इतिहास साक्षी आहे. देशाच्या सर्वोच्च पदावर बसणारा व्यक्ती हा सुरक्षित आहे का असुरक्षित ? हा मोठा प्रश्न भेडसावताना दिसतो. कारण, पंतप्रधान या पदावर बसणारा माणूस ज्या दिवशी बसला त्या दिवसापासून त्याच्या विरोधामध्ये विश्वासघात सारखा त्याचा पाठलाग करत असतो. एक पक्ष असो किंवा दुसरा पक्ष असो, पक्षांतर्गत सुद्धा बंडाळी झालेली आपल्याला पाहायला मिळते पूर्वाश्रमीचा तो मुस्लिम लीग हा पक्ष सुद्धा असो अनेक प्रकारची विश्वासघाताची किस्से पाकिस्तानच्या राजकीय सत्तापटलावर उमटलेली आपण पाहतो. सैन्य , सरकार हा पाकिस्तानचा सर्वात मोठा दुवा आहे.सैन्य ज्याप्रमाणे ठरवेल त्याप्रमाणे सत्ता बनते. त्यामुळे सैन्याचे प्राबल्य सत्तेवर जास्त प्रमाणात दिसते. पंतप्रधान हा लोकशाही मार्गाचा असल्यावर त्याला बाजूला सारण्याचे काम ही सैन्याद्वारे केले जाते. नवीन येणारा पंतप्रधान हा थोडाही लोकशाहीवादी निर्णय घेत असल्यास त्याला बाजूला सारण्याचे काम सैन्य करताना दिसत. परंतु देशाच्या विकासासाठी सर्वांनीच एक भावना ठेवल्यास विश्वासघात आणि हत्या हे शब्द खूप दूर जातील अशी आशा बघायला हरकत नाही.
पन्नास तासानंतर इम्रानची सुटका...
9 मे 2023 रोजी पाकिस्तानी पूर्व पंतप्रधान इम्रान खानला अटक केल्यानंतर 75 वर्षाच्या काळामध्ये जेवढे नुकसान अंतर्गत बंडाळीमुळे किंवा गृहयुद्धामुळे झाले नसेल तेवढे नुकसान पाकिस्तानला सोसावे लागले . तरीही सद्यस्थितीमध्ये असणारे पंतप्रधानांनी सैन्याच्या बळावर आरोपीला कठोर सजा झाली पाहिजे . असा पवित्रा घेतला होता. अटकेनंतर देशाची स्थिती अत्यंत दयनीय बनली होती. यावर सैन्य आणि पंतप्रधान विचार करत नव्हते. यावर विचार शेवटी सर्वोच्च न्यायालयाला विचार करावा लागला. सर्वोच्च न्यायालयाने जनतेच्या हिताचे रक्षण करण्यासाठी निरपराध लोकांचा बळी जाऊ नये. म्हणून, आज 11 मे २०२३ इमरान खानची सुटका केली. पाकिस्तान इतिहासामध्ये पहिली वेळ आहे , त्या ठिकाणी आतापर्यंतच्या विश्वासघात सत्रामध्ये इमरान खानला यश आले. त्याची सुटका करण्यात आली. आतापर्यंत पाकिस्तानच्या सत्तेने कोणालाही माफ केले नाही. मानव कल्याण, समाज हित यासाठी सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय हा त्या देशासाठी योग्य असेल.
सर्व जगाचे कल्याण होवो हीच अपेक्षा.
👍
उत्तर द्याहटवाAll.point.rial...very.nice
हटवाThank u
हटवा👌👌🙏🙏यालाच कालचक्र म्हणतात समय बडा बलवान होता है....🌹🌹🌹🌹
उत्तर द्याहटवाWelcome sir
हटवाThanks u all my friends
उत्तर द्याहटवा