मंगळवार, १६ मे, २०२३

The Kerala story - A conspiracy

 


स्त्री एक उपभोगाची वस्तू म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. संकुचित प्रवृत्तीने अशा प्रकारचा दृष्टिकोन ठेवणे आधुनिक युगा नुसार जरी अयोग्य असले, तरीही आजच्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये त्या प्रकारचा विचार, मानव प्रवृत्ती मध्ये दिसून येतो.  यामध्ये तीळ मात्र शंका नाही. कारण, प्रस्तुत प्रकरणांमध्ये जेव्हा जेव्हा मानवी अस्मितेची भावना निर्माण होते, तेव्हा..तेव्हा, मानव म्हणून मानवतावाद आणि मानवता याचा विहंगम दृश्य रंगवताना आजचे सुधारणावादी लोक आपण पाहतो.   तेव्हा मात्र वास्तव हे वेगळेच आहे.कारण  बोलणे आणि कृती करणे यात जमीन आसमानचा फरक आहे. स्त्री विषय असणाऱ्या मानव विकृती , ही जेवढी गंभीर तेवढीच भयंकर आहे . सुधारणावादी विचार मांडत असताना किंवा करत असताना समाजाकडे आपण सहज अंगुली निर्देश करतो. पण आपणही त्या समाजाचा एक बिंदू आहोत हे विसरतो. स्त्री विषयी हीन भावना आजही बदलत नाहीये. तिचे स्वरूप समाज व्यवस्था ,जातीय व्यवस्था, धर्म व्यवस्थापन व्यवस्था यामध्ये रुजलेले आपण पाहतो. फरक एवढाच आहे प्रत्येक जण आपली भूमिका आणि इतरांची भूमिका यात भेद करतो आहे. त्यानुसार आपण कसे वेगळे आहोत . असा ससे मीरा मिरवताना आपण पाहतो किंबहुना भ्रमनिरासपणे मृगजळ दाखवतो. याचाच परिपाक आणि पक्व हेतू म्हणजे, 'द केरला स्टोरी होय.'

प्रस्तुत चित्रपटांमध्ये ही कथा पूर्णपणे एक 'कट 'आहे. चित्रपट एका नर्सिंग कॉलेजमध्ये सुरू होतो. त्या ठिकाणी त्यांना समाजसेवा , समाजाप्रती आपली बांधिलकी आणि कर्तव्य शिकवले जाते. त्यानुसार त्या मुली कार्यही करतात अर्थात शिक्षणात सुरू होते.  नरसिंग चे शिक्षण घेत असताना तीन मैत्रिणी त्याचबरोबर एक चौथी मैत्रीण सुद्धा त्यांना मिळते. शालिनी उन्नीकृष्णन  अर्थात फातिमा, निमा ,असिफा, गीतांजली या चार मैत्रिणी. नर्सिंग चे शिक्षण घेण्यासाठी एकत्र आलेल्या, एकाच रूम मध्ये राहतात. चौघींचीही कॉलेजमध्ये एन्ट्री होते . शालिनी,  निमा आणि गीतांजली या नवख्या मैत्रिणी एकत्र राहत असताना त्यांच्यासोबत असणारी 'असिफा' ही देखील नर्सिंग शिक्षण घेत होती. चित्रपटांमध्ये असिफाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची होती. कारण ,यांच्या सर्व गोष्टी प्रत्यक्षात राबवणारी आणि त्या गोष्टींना योग्य प्रकारे वळण देणारी, कट रचनारी व इस्लाम धर्म विषयीचा सकारात्मक ब्रेन वॉश करून 'अल्ला' कसा मोठा आहे. याविषयी आपली भूमिका आणि सकारात्मक पाऊल पुढे उचलताना  इसिसचे संबंधित दाखवली आहे. आय. एस. आय. एस. म्हणजेच, 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया' या ठिकाणी अशा बळी पाडून आणलेल्या स्त्रियांना भरती केले जात असायचे. तेव्हा इसिसचे महत्त्व  आणि इतर धर्म कसे तुच्छ आहेत . 'अल्लाह' एकमेव महान आहे. याची व्याख्याने देताना असिफा  चित्रपटात दिसते.

शालिनी असिफाच्या चर्चेने आणि दिलेल्या व्याख्यानाने एवढी प्रभावित होताना दिसते की, आशिफाचे बोलणे शालिनीच्या गळी लवकर उतरते. आसिबाच्या प्रत्येक बोलण्यावर ती लक्ष देऊन ऐकते . शरीयत कानून जाणून घेण्याचा प्रयत्न करते, काही दिवसाच्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत होते. दिवाळीच्या सुट्टी असतील किंवा इतर सुट्ट्यांमध्ये शालिनीचे गाव दूर असल्यामुळे ती जास्त करून गावी जात नसायची. असिफा  मात्र तिला आपल्या घरी घेऊन जात होती. ईद असेल किंवा इतर सणांच्या दिवशी आसिफा- शालिनी, निमा, गीतांजली एकत्र येऊन सर्व परिवारासोबत सण उत्सव साजरा करत असत. जेव्हा संधी भेटेल तेव्हा असे असिफा मात्र मुस्लिम धर्म कसा श्रेष्ठ! आणि अल्लाह कसा महान आहे.  याची एकही संधी सोडत नव्हती. दोन हिंदू आणि एक ख्रिश्चन मैत्रीण असणारी फक्त असिफाच बोलणं ऐकून घेतात. मुस्लिम धर्माच्या अनुकरणाचा किंवा त्यानुसार बदल करण्याचा त्यांच्यामध्ये कोणताही लवलेश दिसत नाही. तेव्हा मात्र या तिघी जनीची पूर्वनियोजित कटकारस्थानानुसार एका दुकानांमध्ये वस्त्रे फाडली जातात. त्यांना खुलेआम- चेतावणी दिली जाते. एवढ्या मोठ्या दुकानांमध्ये कोणीही त्यांच्या मदतीला येत नाही. त्यामुळे तिघेही खचून जातात. तेव्हा ही गोष्ट असिफाला कळते .  तेव्हा मात्र  ती हिजाब अर्थात बुरखा महत्त्व समजावून सांगते . बुरखा तुम्ही घातला असता तर , तुम्हाला कोणीही छेडले नसते. तेव्हापासून तिघी हिजाब घालायला सुरुवात करतात. 


हिजाब जेव्हापासून या तीन मुली घालायला सुरुवात करतात, तेव्हापासून त्यांची कोणीही छेड काढत नाही.तेव्हा मात्र शालिनी पूर्णपणे इस्लाम  धर्माकडे झुकलेली दिसून येते . तिची ओळख  संबंधित असणाऱ्या कथित डॉक्टर भावाबरोबर होते. याच ठिकाणी आपल्याला ' लव्ह जिहाद',  दिसून येतो . कारण , घडणारी स्टोरी ही पूर्वनियोजित कटकारस्थान दिसून येते . त्या मुलींना आपल्या जाळ्यात ओढून घेण्यासाठी त्या मुलांना हवे ती रक्कम व नको ते स्वातंत्र्य दिले गेलेले असते . त्यावरच पुढील पैसा त्यांना ठरलेला असतो .  पूर्णपणे एक धर्म मोठा आणि बाकीचे सगळे छोटे कसे आहेत? त्याची विचारधारा कशी अचूक आहे ? हे त्यांच्या मनात बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो. इथे एक प्रश्न पडतो, एवढ्या सुशिक्षित असणाऱ्या मुली, चांगल्या घराण्यातील मुली यांच्या विरोधात एखादं कटकारस्थान केलं जातं. तरीही त्यांच्या लक्षात येत नाही . ही गोष्ट मात्र थोडी विरोधाभासात्मक वाटते.

परत एकदा एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, जी मुलगी आपल्या प्रियकरापासून गरोदर राहते , तोच प्रियकर अचानक गायब होतो. शालिनी अर्थात फातीमाच्या अब्रूची लुटा लुट करून इज्जतीची लक्तरे वेशीला टांगतो. काही दिवसानंतर आपला प्रियकर आपल्याला सोडून गेला, तेव्हा मात्र ती अत्यंत खचून जाते. जीवन संपवावेसे वाटते ,आपण फसलो याची तिला जाणीवही होते . घरचे आपणास स्वीकारणार नाही , दोष द्यायचा कुणाला? आणि याच्यावर उपाय काय? या प्रश्नाचे उत्तर मात्र तिला शोधूनही मिळत नाही. शेवटचा पर्याय म्हणून  मौलवींचे मार्गदर्शन घ्यावे . यासाठी ती मुलगी जाते . इज्जत जाऊ नये म्हणून मौलवींच्या सांगण्यानुसार दुसऱ्या तरुणाला आपला पती मानते . मौलवींचे  शब्दही तितकेच प्रखर आणि करारी असतात , ' निकाह  अगोदर प्रियकरा बरोबर आलेल्या संबंधातून जे आपत्य पोटात वाढत आहे हे पाप आहे.  हे पाप धुऊन काढण्यासाठी एका नवीन पुरुषाबरोबर निकाह करणे आणि त्याच्याबरोबर भारतात बाहेर सीरीयाला जाणे हा एकमेव पर्याय मौलवी देतात. याला अंधश्रद्धा म्हणावे की धर्मांधता ? 



जो 'अल्लाहशी' काफीर होतो, जो काफीर असतो तो पापी असतो त्याच्यातून जर मुक्ती मिळवायचे असेल तर काफीर झालेल्या व्यक्तीला दगडाने मारावे किंवा त्याच्या तोंडावर थुंकावे तरच अल्ला नाराज होत नाही तो खुश होतो अशी दाहक प्रतिमा गीतांजलीच्या समोर उभी करून मृत्यूच्या दारावर उभा असणाऱ्या पित्याच्या तोंडावर गीतांजली थुंकते आणि काल्पनिक असणाऱ्या पापातून मुक्ती पाण्याचा केविलवाणा प्रयत्न करते. ही तिची आपल्या धर्माविषयी अर्थात नवीन धर्माविषयी आपुलकी आणि ओढ होती, हे इथे निश्चित होते. ज्याच्यावर जीवापाड प्रेम करावे ,त्याच्यासाठी माता, भगिनी, वडील यांचा त्याग करून मुस्लिम धर्म स्वीकारावा . इसिसमध्ये समाविष्ट व्हावे. यासाठीचे प्रयत्न जेव्हा तिच्या लक्षात येतात, तेव्हा मात्र तिची नग्न चित्रे सोशल मीडियावर व्हायरल करून तिच्या घराची, तिची इज्जत चव्हाट्यावर आणली जाते ..तेव्हा मात्र आपण या कटामध्ये प्रत्यक्ष सहभागी झालो आणि आपला मार्ग चुकला याची जेव्हा तिला जाणीव होते.तेव्हा मात्र, जग संपलेला असतं.कारण , समाज काय म्हणेल ? आपल्या इज्जतीचा चोळामेळा आपल्या प्रियकराने असे सार्वजनिक करावा.. त्याचा तिला एवढा पश्चाताप होतो की, जवळच असलेल्या हिजाबने गळफास घेऊन आत्महत्या करते. शेवटी पर्याय उरलेला नसतो.

चित्रपट हा वस्तुस्थितीशी संबंधित आहे  किंवा जवळीकता आहे. असे असले तरीही चित्रपटात पूर्ण राजकारण दिसते आहे. कम्युनिस्ट कार्यकर्ता व्यक्ती स्वातंत्र्य या गोष्टीचा विचार करताना स्वतःच्या मुलीला धर्माचे शिक्षण देत नाही ही बाब प्रकर्षाने दाखवली आहे. त्यामुळे तिच्यावर संस्कार रुजले नव्हते. म्हणूनच तिच्यावर इस्लामी धर्माचा प्रभाव पडला, अशी झलक पाहायला भेटते.



वरील तीनही मुली जेव्हा धर्म शिक्षण घेतात तेव्हा त्या ठिकाणी इतरही मुली असतात. त्यांचेही तीच काम असते, त्यांनाही असंच फसवलेलं असतं,अशी भाग्यलक्ष्मी सांगते. असं निष्पाप मुस्लिम मुलावर प्रेम करणाऱ्या हिंदू आणि ख्रिश्चन मुलींची अशीच फसवणूक झालेली या चित्रपटातून दिसते. सुरुवातीला ह्या मुलींना लव जिहादच्या नावाखाली आणि  इसिसच्या  भरती करिता कसे ब्रेनवॉश केले जाते. याचीसुद्धा एक कूटनीती आणि पूर्वनियोजित षडयंत्र पावलो पावली दिसून येते. सुरुवातीच्या प्रेमलीला मात्र जेवढ्या सुखद आणि आल्हाददायी चित्रित केलेले आहेत, त्यापेक्षा भयंकर त्या मुलींची भरती  इसिस मध्ये होते.तेव्हा मात्र, त्यांच्यावर एका वेळेला अनेक जण बलात्कार करताना दिसतात. हवस भागवण्याची ती एक मशीन म्हणूनच तिचा वापर केला गेला. जिन विरोध केला किंवा पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेला तिच्या डोक्यात गोळीच दिसली! !आधुनिक युगामध्ये मोबाईल बंदी आहे , हा आश्चर्यचकित करणारा  विषय . त्याचबरोबर ज्यांनी वापरला ,त्या महिलेची गोळी घालून हत्या करण्यात आलेली आहे . ही एक अत्यंत निंदनीय बाब असून स्त्री स्वातंत्र्यावर मोठा घाला आहे. शालिनी गरोदर असताना तिच्यावर केलेला बलात्कार  अत्यंत निंदनीय वाटतो. मानवतावादी दृष्टिकोनाला एक मोठी चपराक  आहे. असे दुष्कृत्य होत असेल तर मग 'अल्लाह'चा अनुयायी तो खरच आहे  का? 

चिंतन... 

 वरील सर्व गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर एक गोष्ट मात्र लक्षात येते, प्रत्येक समस्या ही निर्माण होत असते. पण....ती समस्या अंतिम असू शकत नाही. सुशिक्षित असणाऱ्या मुली छोटीशी कट रचना त्यांच्या लक्षात येत नाही आणि जेव्हा लक्ष देते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. मग आत्महत्या  शिवाय दुसरा पर्याय उरत नाही . म्हणून ,सर्व सुजाण मुलींनी प्रलोभनाच्या पाठीमागे किंवा दिखाउ सौंदर्याच्या पाठीमागे न लागता ,आई-बाबांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासावर विश्वास ठेवून त्यांच्या विश्वासांना तडा जाता कामा नये असे वर्तन करावे. ज्यामुळे आई-बाबांना गर्व वाटेल, देशसेवा ,समाजसेवा आणि समाजाप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी आलेल्या संधीचे सोने करावे  अशी शिकवण मनी बाळगावी . शंभर लोक म्हणतात म्हणून, ते सत्य आहे . ही गोष्ट टाळावी . स्वतःच्या मनपटलावर उमटणाऱ्या छटा चांगल्या किंवा वाईट सत्याची सचोटीवर त्या उतरतात किंवा नाही. दूरदृष्टीचा विचार ठेवून पावले उचलली तर, ती व्यर्थ जाणार नाही असा विश्वास वाटतो . जगातील असा कोणताही धर्म नाही जो वाईट शिकवण देतो. प्रत्येक धर्म हा प्रेम शिकवतो, दया , करुणा, माया- ममता या सर्व धर्मामध्ये नीती पाहायला मिळतात . फक्त मांडणी आणि संरचना वेगळे असू शकते . पण प्रत्येक धर्माचे हित आणि सार मानव कल्याण हेच आहे. यावरून स्पष्ट होते . कोणताही धर्म मानवहिताशी किंवा मानव देहाची खेळत नाही . तो फक्त 'मानव कल्याण ' समर्पित आहे. हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही.

अशा घडलेल्या, मानव कल्याणाच्या मार्गात अडथळा आणणाऱ्या घटना  निंदनीय आणि कलंकित जरी असल्या तरी, त्याचे योग्य मार्गदर्शन करून उपाय शोधणे काळाची गरज आहे. पण जेव्हा जेव्हा राजकीय पक्ष चित्रपट प्रमोट करतात.  काही राज्यांमध्ये बंदी होते तर, काही राज्यांमध्ये टॅक्स फ्री साठी मागणी केली जाते . एवढेच काय तर राजकीय लोक चित्रपट  गृहे बुक करतात. म्हणजेच प्रेक्षकांना फुकट सिनेमा दाखवतात आणि तेही कुठेतरी राजकारण , प्रचार, प्रसार आणि निवडणुका  तोंडावर , असं होतं. निश्चितच ही  लांच्छनास्पद बाब आहे.


# 📝डोंगरदिवे राहुल






गुरुवार, ११ मे, २०२३

इम्रान खान अटक,गृहयुद्ध ,सुटका !

इम्रान खान अटक - गृहयुद्ध - सुटका



पाकिस्तानातील सद्यस्थिती व श्रीलंकेतील राजसत्तेच्या विरोधात घडलेली घटना यावरून एक गोष्ट लक्षात येते, "सत्ते पुढे शहाणपण चालत नाही." अशी एक प्रचलित म्हण आपल्याकडे आहे. असणारी म्हण ही निश्चितच योग्य आहे . एखादी विनाअंकुश  सत्ता स्वैराचारी  कारभार करत असेल तर उलथवून टाकण्याची क्षमता जनतेमध्ये असते जगामध्ये जेव्हा जेव्हा राजसत्ता अनाचार करते दुराचार करते सत्तेचा गलथान कारभार सुरू होतो तेव्हा तेव्हा जनतेने राज सत्तेला जागेवर आणण्यासाठी सत्तेची सूत्रे मोर्चा आणि आंदोलनाच्या माध्यमातून स्वतःच्या हाती घेऊन लोकशाहीवादी मार्गाने आगे कूच करण्याचा प्रयत्न केला आहे मोठमोठ्या क्रांत्या झाल्या क्रांती होऊन शतकोन व शतके गेली. क्रांतीतून निर्माण झालेली गोड बीज आजही जगाने जोपासताना पाहिली इथून पुढे कित्येक वर्ष मानव जातीच्या अस्तित्वापर्यंत राहतील यात शंका नाही.

पाकिस्तान हे एक छोटसं राष्ट्र .  विकासासाठी धडपडणारा देश म्हणून जगाच्या पाठीवर त्याची ओळख. आतापर्यंत पाकिस्तानमध्ये अनेक सत्ता आल्या गेल्या . सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे , जी सत्ता अस्तित्वात येते, ती सत्ता उद्या संपणार आहे. हे शाश्वत सत्य जरी असलं, तरीही निर्माण होणारच सरकार पहिल्या सरकार प्रमुखाला एक तर देश सोडायला भाग पाडतोय किंवा पूर्व पंतप्रधानांची हत्या होते. अशी पाकिस्तानची व नेतृत्वाची कहाणी सर्व जगाने पाहिले. एखादा मोठा नेता मृत पावतो किंवा त्याची हत्या होते? मीडियाच्या माध्यमातून किंवा सत्तेच्या माध्यमातून एकमेकावर आरोप आणि प्रत्यारोप केले जातात. त्यामध्ये कितपत शाश्वत सत्यता आहे हे पडताळून किंवा संशोधन करण्यापेक्षा पंतप्रधान होणारा नेता मात्र गमावला जातो हे दुर्दैव.


पाकिस्तानच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी नुसार नवोदित पंतप्रधान म्हणून  शहबाज शरीफ यांची 11 एप्रिल 2022 ला निवड झाली. नवीन पंतप्रधान म्हणून शहबाज शरीफ यांची सत्ता सुरू झाली.
पाकिस्तानच्या हिताचा किंवा विकासात्मक विचार करण्यापेक्षा ' गतवैमानस्य'  त्या एका गोष्टीने ग्रासलेल्या सर्वच पंतप्रधानांना सूडबुद्धी सुचते आणि तो सुडाने पेटून उठून पायउतार झालेल्या माजी पंतप्रधानांवर नको ते आरोप करून अथवा कोणत्याही भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्याला सिद्ध करून सोयीनुसार कायदेशीर प्रक्रिया राबवली जाते व त्यानुसार त्याला एक तर देश सोडून जाणे भाग पाडले जाते. हीच ऐतिहासिक परंपरा पुढे सध्याचे असणारे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी राबवलेली दिसते

23 वे पंतप्रधान म्हणून आपली नावलौकिकता मिळवण्यापेक्षा त्यांनी सूडबुद्धीचे राजकारण सुरू केले आणि पूर्व पंतप्रधान इम्रान खान यांना 'अल कादिर ट्रस्ट ' साठ अरब रुपये भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कायदेशीर पद्धतीने 9 मे 2023 रोजी दुपारी तीन वाजता पाकिस्तानी रेंजर्स करून अटक करण्यात आली. त्यांना पकडून पोलीस पथकाच्या गाड्यांमध्ये बसवताना सर्व जगाने पाहिले. इम्रान खान जेलमध्ये गेले खरे पण पाकिस्तानच्या आतापर्यंतच्या 75 वर्षाच्या कालखंडामध्ये जेवढे नुकसान झाले नसेल तेवढे नुकसान इमरान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानला आपल्या घरातूनच सोसावे लागले. पाकिस्तानच्या इतिहासामध्ये याची 'काळा दिवस' म्हणून नोंद केली जाईल. परकीय आक्रमणांपेक्षा घरगुती आक्रमणाने पाकिस्तान होरपळतो आहे, जळतो आहे, रस्त्यावरती अग्नि तांडव सुरू आहे. अगोदरच  अनेक समस्याने बळी ठरलेला पाकिस्तान काही दिवसापूर्वी रेशन साहित्य पळवताना आपण पाहिला. महागाईचा उच्चांकही पाहिला. सर्वसामान्यांचे जीवन अत्यंत दयनीय झालेले सर्व जगाला दिसत आहे. श्रीलंके पेक्षाही भयंकर परिस्थिती पाकिस्तान मध्ये आज पाहताना सर्वजण अवाक होतात .  पर्याय हा तेथील जनताच करू शकते. लोकशाही पद्धतीचे सरकार या देशाला उन्नतीकडे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. ही परिस्थिती जोपर्यंत तेथील मिल्ट्री च्या लक्षात येत नाही. तोपर्यंत ते अशक्य आहे. कारण आज पर्यंत कोणाचेही सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही. ही दाहक वास्तविकता कोणीही नाकारू शकत नाही.

पूर्व पंतप्रधान इम्रान खान यांना अटक झाली. ते चूक आहेत की बरोबर आहे हे तेथील न्यायव्यवस्था पाहिल. परंतु, राजकीय सुडापोटी पाकिस्तानातील येणारा सत्ताधीश कोणत्याही मार्गाने निरंकुश सत्ता हकतो. आतापर्यंत त्यांना यशही येत होते. जनता हे पूर्वीपासून पाहत होती. इमरान खान यांच्या अटकेनंतर मात्र पाकिस्तान मध्ये अराजकता, अनागोंदी ,स्वेराचार याची परिसीमा ओलांडली गेली. पाकिस्तान मध्ये प्रथम वेळ असेल जनतेने मिल्ट्री वर आक्रमण केले. बहुतेक ठिकाणी प्रत्येक सैनिकांना मारहाण करण्यात आली. आगीचे लोट, अग्नी तांडव करत होते. देशातील अंतर्गत कलह विकोपाला गेले होते. त्याचे पडसाद आजही तीन दिवसापासून जगाला दिसत आहे. प्रत्येक देशाने आपल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी अर्थात पाकिस्तान सोडण्यास सांगितले आहे. पेशावर, कराची, लाहोर रावळपिंडी अशा प्रमुख शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही जनता रस्त्यावर उतरलेले आणि जाळपोळ करणारी पाहतो. यावरून पाकिस्तानला योग्य तो धडा स्वतःहून शिकला पाहिजे अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

पाकिस्तान मध्ये हा हा कार... 



पंतप्रधान इमरान खान यांना अटक केल्यानंतर पाकिस्तानमधील अनागोंदी निर्माण झाली होती. ती हाताबाहेर बाहेर गेली होती. शहबाज शरीफ सरकारला त्यामध्ये अपयश येत होते . इम्रान समर्थकांनी पूर्ण यंत्रणा हातात घेतली होती. सैनिकांना ते कसलेही प्रकारचे भीत नव्हते, उलट पक्षी त्यांच्यावर आक्रमण करत होते. अटक करण्याच्या अगोदर इमरान खान यांनी दिलेले कारमधील बाईट हे त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे होते. रावळपिंडी, पेशावर, कराची, लाहोर, पंजाब प्रांत पूर्णपणे आटोक्याबाहेर होता. रस्त्या रस्त्यावरील अग्नितांडव होते. लोक कोणाचेही ऐकत नव्हते. बेधुंदपणे मरणालाही भित नव्हते. सरकारी कार्यालय, सेना, रेडिओ टावर यांना टार्गेट करत होते. जिना हाऊस तर राख करून टाकले होते. इस्लामाबाद मध्ये तर गोळी आणि पेट्रोल बॉम्ब चे गोळे खुलेआम रस्त्यावर फेकताना लोक दिसत होते. रावळपिंडीमध्ये कोर कमांडर ची तोडफोड करण्यात आली. टोल नाके तोडण्यात आले. लाहोर मधील ऑडी शोरूम ला आग लावण्यात आली. पेशावर मधील रेडिओ टॉवर व बिल्डिंग आग लावण्यात आली. पेशावर ते इस्लामाबाद पूर्णपणे  आगीचे लोळ रस्त्या रस्त्यावर दिसत होते . त्यामध्येच पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी जनतेला संबोधन करत असताना, अल  कादिर ट्रस्टच्या साठ अरब रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचे सांगितले. न्यायालयीन कोठडी मध्ये आठ दिवसाची रिमांड देण्यात आली. ह्या संवेदनशील घटना एकापाठोपाठ एक घडत होत्या. तसा पाकिस्तान पेटत होता. नियंत्रणाच्या बाहेर जात होता. रस्त्यावरील अनेकांच्या गाड्या जाळल्या जात होत्या आणि सरकारी कार्यालयांना जनतेकडून लक्ष केले जात होते. सत्ताधारी पक्षाने कारवाईची सीमा ओलांडली होती. अनेक निरपराध लोकांचे बळीही गेले.



अल्पायुषी पंतप्रधान... 

पाकिस्तानच्या प्रारंभिक पासून ते आजपर्यंत कोणत्याही पंतप्रधानाला आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. त्याला इतिहास साक्षी आहे. देशाच्या सर्वोच्च पदावर बसणारा व्यक्ती हा सुरक्षित आहे का असुरक्षित ? हा मोठा प्रश्न भेडसावताना दिसतो. कारण, पंतप्रधान या पदावर बसणारा माणूस ज्या दिवशी बसला त्या दिवसापासून त्याच्या विरोधामध्ये विश्वासघात सारखा त्याचा पाठलाग करत असतो. एक पक्ष असो किंवा दुसरा पक्ष असो, पक्षांतर्गत सुद्धा बंडाळी झालेली आपल्याला पाहायला मिळते पूर्वाश्रमीचा  तो मुस्लिम लीग हा पक्ष सुद्धा असो अनेक प्रकारची विश्वासघाताची किस्से पाकिस्तानच्या राजकीय सत्तापटलावर उमटलेली आपण पाहतो. सैन्य , सरकार हा पाकिस्तानचा सर्वात मोठा दुवा आहे.सैन्य ज्याप्रमाणे ठरवेल त्याप्रमाणे सत्ता बनते. त्यामुळे सैन्याचे प्राबल्य सत्तेवर जास्त प्रमाणात दिसते. पंतप्रधान हा लोकशाही मार्गाचा असल्यावर त्याला बाजूला सारण्याचे काम ही सैन्याद्वारे केले जाते. नवीन येणारा पंतप्रधान हा थोडाही लोकशाहीवादी निर्णय घेत असल्यास त्याला बाजूला सारण्याचे काम सैन्य करताना दिसत. परंतु देशाच्या विकासासाठी सर्वांनीच एक  भावना ठेवल्यास विश्वासघात आणि हत्या हे शब्द खूप दूर जातील अशी आशा बघायला हरकत नाही.

पन्नास तासानंतर इम्रानची सुटका... 



9 मे 2023 रोजी पाकिस्तानी पूर्व पंतप्रधान इम्रान खानला अटक केल्यानंतर 75 वर्षाच्या काळामध्ये जेवढे नुकसान अंतर्गत बंडाळीमुळे किंवा गृहयुद्धामुळे झाले नसेल तेवढे नुकसान पाकिस्तानला सोसावे लागले . तरीही सद्यस्थितीमध्ये असणारे पंतप्रधानांनी सैन्याच्या बळावर आरोपीला कठोर सजा झाली पाहिजे . असा पवित्रा घेतला होता. अटकेनंतर देशाची स्थिती अत्यंत  दयनीय बनली होती. यावर सैन्य आणि पंतप्रधान विचार करत नव्हते. यावर विचार शेवटी सर्वोच्च न्यायालयाला विचार करावा  लागला. सर्वोच्च न्यायालयाने जनतेच्या हिताचे रक्षण करण्यासाठी निरपराध लोकांचा बळी जाऊ नये. म्हणून, आज 11 मे २०२३ इमरान खानची सुटका केली. पाकिस्तान इतिहासामध्ये पहिली वेळ आहे , त्या ठिकाणी आतापर्यंतच्या विश्वासघात सत्रामध्ये इमरान खानला यश आले. त्याची सुटका करण्यात आली. आतापर्यंत पाकिस्तानच्या सत्तेने कोणालाही माफ केले नाही. मानव कल्याण, समाज हित यासाठी सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय हा त्या देशासाठी योग्य असेल.

सर्व जगाचे कल्याण होवो हीच अपेक्षा.







सोमवार, ८ मे, २०२३

भूकंप - Earthquake

भूकंप - राजकीय अस्थिरतेचा


 

नैसर्गिक संतुलन ही निसर्गाने संतुलित ठेवण्यासाठी स्वनिर्मित स्वरचना आहे . या ठिकाणी कोणत्याही एका गोष्टीचा उद्रेक झाल्यास तिला नियंत्रित ठेवण्यासाठी निसर्गाने त्यावर उपायही निसर्गनिर्मित करून ठेवले आहेत . पृथ्वीच्या अंतरंगाचा विचार करताना भूकवच, मध्यावरण आणि गाभा अशी रचना आहे . पृथ्वीच्या पृष्ठभागावर निसर्गनिर्मित सजीव सृष्टी आहे. यामध्ये कोणी कोणावर आक्रमण जर करत असेल तर, त्या ठिकाणी निसर्गाचे संतुलन बिघडायला लागते आणि त्यानुसार निसर्गर त्याच्यावर उपाय योजना करतो.याचाच परिणाम म्हणून पृथ्वीवर येणारी सुनामी ही भूगर्भातील हालचाली अर्थातच भूकंपामुळे येतात.. भूकंपाची तीव्रता आणि दाहकता जशी पृथ्वीवर असणाऱ्या सजीवांना जाणवते ,त्यापेक्षाही तीव्र असे होणारे मानवनिर्मित भूकंप भयंकर असतात. एक भाग म्हणून आपण संवेदनशील या विषयाचा विचार करत असताना मानवनिर्मित अणुबॉम्ब त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. अशा सहारक्षस्त्राने जीवित हानी तर होतेच , त्याचबरोबर त्याचे दुष्परिणाम शतकानू शतके भोगावे लागतात . गेल्या दोन वर्षापासून अशा प्रकारची दाहकता आपण पाहत आहोत . युक्रेन युद्धापासून जागतिक राजकारण ते प्रत्येक देशाचे राजकारण आणि त्याचा झालेला जगावर दूर गंभीर परिणाम सर्व जग अनुभवत आहे . जगाच्या बाबतीत अशा गोष्टी घडतात की,त्याचा प्रत्येक देशावर परिणाम होतो . परंतु भारत या देशांमध्ये जागतिक वातावरणाबरोबरच प्रादेशिक वातावरण व राजकारण, केंद्र व राज्य संबंध, राजकारणातील कूटनीती व त्यासाठी आखली गेलेली रणनीती ही काही आगळी वेगळीच आहे.

भारतातील एकंदरीत एकूण राजकारणाचा विचार केला असता, आपले एक गोष्ट सहज लक्षात येते की, चालू असलेली परिस्थिती पक्ष व विरोधी पक्ष यांच्यामध्ये एक प्रकारची एकमेकांची कुरघोडी करण्याचा प्रयत्न. अंतिम विचार हा कोणत्याही मार्गाने सत्ता प्रस्थापित करणे व ती सत्ता टिकवण्यासाठी आणि भविष्यात पुनरसत्ता प्राप्त करण्यासाठी नको त्या स्थराचे राजकारण गलिच्छ पद्धतीने कसे राबवले जाते, याची सीमा ओलांडताना आपण पाहतो. प्रत्येक जण माझंच खरं, पण खरं ते माझं कोणीही म्हणत नाही. लोकशाहीचा आधारस्तंभ असलेला मीडिया मात्र 'गोदी मीडिया' म्हणून नावारूपास येत आहे . एखाद्या पत्रकारांना जर त्या विरोधात आवाज उठवला तर तो देशद्रोही संबोधला जातो . त्याच्यावर नको त्या एजन्सी वापर करून त्याला चांगलीच अक्कल घडवली जाते. असा सर्व विरोधी पक्षाचा सूर आहे..हे आपण दररोज भारतीय न्यूज चैनल वरून पाहत असतो . प्रत्येक राज्यामध्ये आपल्या पक्षाची सत्ता कशी आणायची व ती कशी टिकवायची याचा अत्यंत लेखाजोखा राजकीय पक्ष ठेवतात विचारसरणी व नैतिक मूल्य पायदळी तुडवतानाही कोणाला काहीही वाटत नाही. दोन्हीही बातम्या आपल्या मीडियातून दाखवल्या जातात . परंतु ,कोणत्या बातमीला किती महत्त्व द्यायचं? हे आपली मीडिया ठरवते. राष्ट्रहितापेक्षा व्यक्ति हित जास्त महत्त्वाचे वाटू लागले आहे. मान्य आहे प्रखर राष्ट्रवाद असू नये कारण त्यामुळे साम्राज्यवाद वाढ वाढतो . यातून सत्ता संघर्ष विकोपाला जातो हा सत्ता संघर्ष देशाच्या सीमा व इतर जागतिक मुद्द्यांशी संबंधित असतात. हाच सत्ता संघर्ष केंद्र आणि राज्य यांच्यात सत्ता स्थापनेसाठी रस्सीखेच सुरू असते. 

भारतामध्ये बहुपक्ष पद्धती असल्यामुळे ,राष्ट्रीय राजकारणापासून प्रादेशिक राजकारणापर्यंत आपणाला अनेक प्रकारची राष्ट्रीय पक्ष ते प्रादेशिक पक्ष पहावयास मिळतात . त्यामुळे राष्ट्रीय पक्ष हा प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा किंबहुना कोठे कोठे निर्माण करण्याचा प्रयत्न परिस्थितीनुरूप केला जातो. असं म्हटलं जातं, केंद्राचे सरकार आहे ते राज्यात असलं म्हणजे, त्या त्या राज्याचा विकास होतो. या उलट जर विचार केला . केंद्रातील एक सरकारने राज्यातील विरोधी गटातील सरकार असल्यास त्या राज्याला मात्र त्रास होताना दिसतो आहे.

गत दोन वर्षाचा लेखाजोखा जर घेतला तर , सर्व न्यूज चॅनल वाल्यांनी महाराष्ट्रातील भूकंपाचा मोठा कांगावा केला होता. त्यानुसार सत्ता परिवर्तन ही झाले . राजकारणामध्ये डावपेच, कूटनीती आणि रस्सीखेच ही रणनीती जरी असली तरी , त्यानुरूप कार्य करणे मर्यादा ओलांडून नसावे . अशी ही धारणा असावी . याउलट राज्यातील वातावरण अस्थिर करून लोकांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण करणे आणि आमच्या शिवाय कोणत्याही राज्याला पर्याय नाही अशी सबब पुढे करणे . त्यानुसार जर परिवर्तन होत नसेल तर मात्र केंद्राच्या यंत्रणेतील असणारे एजन्सी याचा गैरवापर किंबहुना चांगला वापर कसा करायचा हे जो तो राजकीय पक्ष ठरवतो. कोणत्याही एका पक्षावर बोलायचं नाही. परंतु सरकार कोणाचेही असो त्यातील कमतरता शोधून जनतेसमोर मांडणे हा गुन्हा असू शकतो काय ? समाज हिताचे आणि राष्ट्रहिताची निर्णय सत्ताधारी पक्षांनी घ्यावे व त्यानुसार कृतीयुक्त कार्य पार पाडावे. ही त्या पक्षाची नैतिकता आहे. भारताच्या अखंडतेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आणि त्यानुरूप पावले उचलणे ही भारतातील प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. निव्वळ टीका करायची म्हणून टीका करू नये. विरोधी आहात म्हणून विरोध करू नये. हा साधा सरळ नियम सर्वांनी पाळला तर , भारत विकसित झाल्याशिवाय राहणार नाही . 'विकसनशील ' शब्दातून आपण बाहेर पडू आणि हीच आपली खरी श्रद्धा आणि राष्ट्रवाद होय.

महाराष्ट्रातील राजकारणामध्ये आणि सत्ता समीकरणांमध्ये जे काही बदल होत आहेत, हे अनपेक्षित जरी असले तरीही त्या त्या पक्षाच्या विचारसरणीच्या विरोधात आहेत. असं मतदान करणारी जनता चर्चा करत आहे . निवडणुका  होतात तेव्हा सर्वच पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध होतात , वचननामा प्रसिद्ध होतो . त्यानुसार जनता त्यांना निवडून देते. हेच लोकप्रतिनिधी जेव्हा निवडून येतात तेव्हा मात्र जनतेच्या मताला कसलीही किंमत राहत नाही . त्यांना हवे तसे ते वागतात कटपुतलीच्या खेळाप्रमाणे ते खेळ करून दाखवतात. त्यांना खेळवणारा दुसराच कोणीतरी असतो. अशा पद्धतीची ही लोकप्रतिनिधी काम करतात. कधी कधी पहाटच्या प्रहरीच शपथविधी होतो... आठ दिवसाच्या आत पुन्हा सरकार पडते . नंतर काही दिवसांमध्ये नवीन सरकार तयार होते. दोन अडीच वर्षानंतर पुन्हा तोच खेळ खेळला जातो . ज्या खेळामध्ये केंद्र सरकारच्या बाजूने पारडे  झुकलेले असते. वर उल्लेख केल्याप्रमाणे प्रादेशिक पक्षांना फोडले जाते, हे कामही प्रादेशिक पक्षातील इतर नेतेच करत असतात. त्यानुसार ते सत्ता हस्तगत करतात आणि राज्यकारभार सांभाळतात. भारतीय न्यायपालिका स्वतंत्र जरी असली, निर्णयाला मात्र वेळ लागतो. ही वस्तुस्थिती ! कारण, प्रत्येक पक्षाला  आपले हक्क आणि कर्तव्याची जबाबदारी पार पाडत असताना , न्याय मागण्याचा अधिकार हा आहेच . म्हणून दोन्हीही पक्ष न्यायालयात धाव घेतात आणि प्रकरण न्याय प्रविष्ट बनते. पक्षांतर बंदी कायदा हा सुद्धा न्यायप्रविष्ट बनतो. निर्माण झालेल्या संवेदनशील मुद्द्यांवरती, प्रविष्ट प्रकरणावरती निर्णयास विलंब लागतो . त्यामुळे राजकीय पक्षांची बाजू तात्पुरती का होईना पुढे जाण्यास अनुकूल बनते.

न्यायप्रविष्ट प्रकरण जेव्हा बॉर्डरवर येते तेव्हा, मात्र दुसरा पर्याय  शोधण्यास प्रारंभ होतो. इतर पक्षांची बहुमताचा आकडा काढण्यासाठी मदत घेण्यासाठी नेत्यांमध्ये  चढाओढ लागली असते. त्यामुळे नको त्या गोष्टींचा अवलंब राजकीय नेते करत असताना आपण महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे. हा भूकंप मात्र रिश्टर स्केलवर मोजता येत नाही , या भूकंपाची दाहकता सहजासहजी लक्षातही येत नाही . पण ..त्याचे दूर गंभीर परिणाम येणाऱ्या काळावर पडणार असतात. याची गंभीर  दखल कोणीही घेत नाही. नंतर निवडणुका लागतील. पुन्हा तोच वचननामा जाहीरनामा यांची आश्वासने नवीन पद्धतीने मांडण्यात येतील. निसर्गाने सर्व मानवांना दिलेली 'विसरण्याची देणगी'  ही राजकीय लोकांच्या कामाला येईल.  पुन्हा नवीन राजकीय भूकंपाचे धक्के बसतील आणि पुढे कसे धक्के द्यायचे याचा विचार ही राजकीय लोक करून ठेवतात. नीती मूल्यांचा ऱ्हास होणारी राजकीय भूकंप आपल्याला नको आहेत.   "व्यक्ती पेक्षा देश श्रेष्ठ! " ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजल पाहिजे. प्रथम 'राष्ट्र' आणि नंतर  'आपण' अशी सकस विचाराची भावना प्रत्येकाच्या मनात असल्यास, राष्ट्रहितासाठी योग्य निर्णय प्रत्येक जण घेतील. मतदानाचा अधिकार हा 'दान' म्हणूनच केला जावा. योग्य उमेदवारास योग्य मतदान दिल्यास देशाचे भले झाल्याशिवाय राहणार नाही.



चला संकल्प करूया , 

विकसनशील या शब्दातून बाहेर पडूया ,

विकसित भारत घडवूया !!! 

जय हिंद!!जय भारत!!! 

Writer :- 🖊🖊🖊Rahul Dongardive 




Bhangar

Bhangar



वास्तविक पाहता शब्दरचना जरी अनोखी किंवा अज्ञात असली तरी जीवनाचे वास्तविक दाहकता खालील काव्यपंक्ती मधून होते.



वरवर बघता वाटत असेल,

याचा धंदा केवळ भंगार!

उपेक्षेच्या जगण्यालाही,

याने केला आहे शृंगार!


वजन कमी करण्यासाठी,

पाणी ओततो मुळावर!

आतमधे सजली माणसं,

अतृप्तीच्या सुळावर!


भंगारवाला नसेल तर,

बकाल होईल सगळं जग!

ए.सी.ची तर वृत्ती अशीच,

आत गारवा,बाहेर धग!


ओझं कमी करण्यासाठी,

ओतलं नाही वाटेल तिथं!

त्याचा सद् भाव ओतत गेला,

तहानलेली झाडं जिथं!


सावलीवरती हक्क सांगत,

झाडाजवळ थांबत नाही!

माझ्यामुळेच जगलंय असं,

स्वतःलाही सांगत नाही!


"निष्काम कर्म!"गीतेमधलं,

कळलेला हा पार्थ आहे!

"जीवन"देऊन,भंगार घ्यायचं,

केवढा उंच स्वार्थ आहे!


पाणी विकत घ्यायचं आणि,

अर्ध पिऊन फेकून द्यायचं!

कृतज्ञता/कृतघ्नता,

याचं भान केव्हा कसं यायचं?


डिग्री पेक्षा नेहमीच तर,

दृष्टी हवी अशी साक्षर!

भंगारवाला अंतर्धान नि,

अवतीर्ण होतो ईश्वर!


🙏🏻🙏🏻

Writer : unknown

सोमवार, १ मे, २०२३

विकृती - Distortion

 


माणसं माणसासाठी जगतात , माणसं माणसासाठी मरतात आणि तीच माणसं एकमेकांच्या सहवासातून निर्माण होणाऱ्या कृती आणि प्रतिकृती यावर आधारित असणारी मानसिकता कशी निर्माण होते , त्यानुसार वर्तन करतात. माणसाला माणूसपण शिकवणारी ही माणसंच आणि त्याच माणसाला माणसातून उठवणारी ही माणसाच ! समाजातील सजग आणि सृजनशील कृतीयुक्त कार्यातून सुदृढ समाज निर्माण होणे, ही झाली सद्बुद्धी. परंतु ,याच सुदृढ समाजाला एक अमान्य गोष्टी किंवा विरोधी असणारी वाईट करणारी कृती म्हणजे, विकृती होय ! सर्वांनाच असे वाटते की आपण एका चांगल्या प्रतिष्ठित पदावर विराजमान व्हावं. मग ते राजकारण, समाजकारण  , नोकरी , उद्योग असो. प्रत्येक ठिकाणी स्पर्धा आणि प्रतिस्पर्धा ही असतेच. स्व विकास करत असताना, माणूस कोणत्याच थराला जाईल हे सांगता येत नाही. प्रत्येक ठिकाणी तो नको त्या गोष्टीची स्पर्धा करत असताना कळत नकळतपणे तो इतरांची ईर्षा करतो . इतरांवर जळतो आणि स्व प्रगतीच्या नावाखाली संपूर्णपणे विरोधाला विरोध करत राहतो. त्यामध्ये सत्य काय असत ? याची त्याला काही घेणे देणे असते ? तो फक्त स्पर्धा आणि स्पर्धाच करत राहतो त्या स्पर्धेमध्ये तो नीती मूल्य याचा कसलाही विचार करत नाही. फोडा आणि राज्य करा, या प्रवृत्ती प्रमाणे तो स्वतःचे साम्राज्य निर्माण करण्यासाठी नको त्या थराला जातो.. 

समाजातील कोण्यातरी एका व्यक्तीची समाजाप्रती असणारी  घृणा  त्या समाजालाच विनाकारण त्रास देत असते. हा झाला एक भाग आणि दुसरा भाग असा बहुसंख्य समाज अल्पसंख्याक समाजावर वैयक्तिक मतभेद पोटी एकंदरीत समाजाला दोष देतो ( आंतरजातीय). प्रतिष्ठित समाजाची प्रतिष्ठा लाभलेल्या समाजातील कोणत्याही एका व्यक्तीने केलेले वाईट कृत्य ही त्याची गलती असते, शेकडो वर अनेक चांगली काम किंवा वर्तन करून सुद्धा एखाद्याच्या चुकीवर बोट ठेवून समाजा च्या पारंपरिक पद्धतीने त्याला दोषी ठरवणे किंवा पारंपारिक दूषण लावणे , अशा प्रकारची मानसिकता सहजासहजी बदलणे शक्य तर नाहीच . ही मानसिकता एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहज पसरते. हिला ही रोखणे वाटते तितके सोपे नाही . कारण ,एका विशिष्ट वर्गाने एका विशिष्ट वर्गाला कमी लेखणे ही त्या पाठीमागची मानसिकता अत्यंत गंभीर आहे. तीच मानसिकता विकृती म्हणून उदयास येत आहे . तिला रोखणे कोठेतरी आवश्यक आहे . पण पुढाकार कोण घेणार ? आधुनिक भारतामध्ये आपण राहत असलो तरीही उचनीचितीची मानसिकता सहजासहजी नष्ट होत नाही , ही शोकांतिकाच म्हणावी लागेल . यालाही कारण तसेच आहे जे की , विकसनशील देशाच्या दिशेने प्रगती करत असणारा आपला देश राजकीय अस्थिरतेमुळे उदासीनतेमुळे आणि राजकीय जिवंतपणा ठेवण्यासाठी राजकीय पक्ष नको त्या थराला जाताना आपण पाहत आहोत . सत्तेच्या हव्यासापोटी ही विकृत मानसिकता नवीन पिढी घडवू पहाते आहे. पुरोगामी भारताचे अथवा महाराष्ट्राची संकल्पना ही व्यासपीठापूर्तीच मर्यादित झाली आहे. बोलणारा वक्ता बोलून जातो नको ती स्वप्ने दाखवून जातो राज्य किंवा देश यापैकी कोणतीही सत्ता मिळवल्यानंतर व्यासपीठावरील नेता कार्यकर्ता नंतर मात्र जातीय समीकरणांमध्ये अडकून बसतो. समाजातील घडत असणाऱ्या निंदनीय गोष्टींना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खत पाणी घालतो ही सत्यता नाकारता येणे एवढे सोपे नाही. 

इज्जती वर बोलू काही. . . . 

बहुतेक ठिकाणी आपण असे पाहतो. गावपातळीपासून ते देशपातळीपर्यंत ज्याच्या हातात सत्तेच्या चाव्या असतात, त्याच चाव्या आपल्या संबंधित लोकांच्या बाजूनेच असतात. एवढेच नाही तर तशा त्या फिरवल्याही जातात . साहजिकच आहे बहुसंख्याकांच्या हातातच सत्तेच्या चाव्या असतात मग अल्पसंख्यांकाच्या बाजूने कधी न्याय मिळेल काय ? हा मोठा एक प्रश्न आहे .आज कालच्या परिस्थितीचा आढावा जर घेतला तर प्रत्येक गाव पातळीवरील चा निर्णय हा ज्या पक्षाची अथवा पार्टीची सत्ता असते . त्याच बाजूने सर्व निर्णय घेतले जातात . प्रश्न विकासात्मक असेल किंवा एखाद्याच्या चारित्र्याविषयी असेल, गंभीर आणि महत्त्वाची बाब म्हणजे अल्पसंख्यांक समाजातील लोकांवर आरोप करणे तेवढेच सोपे आहे जेवढे एखाद्या रस्त्यावरील जनावरांना दगड मारणे . पण एखादा बहुसंख्यांक समाजातील व्यक्ती कितीही वाईट अथवा चरित्रहीन असेल त्यावर आरोप करणे तर सोडाच पण एक ब्र काढणे सुद्धा  शक्यच नाही. बहुसंख्याकातील एकमेकावर आरोप करतील , शांत बसतील आणि समझोता सुद्धा होतो. त्यावर कोणीही काही बोलणार नाही.  अल्पसंख्यांकातील एखाद्या काल्पनिक गोष्टीवर सुद्धा  एवढे मोठे अग्नि तांडव केले जाते. त्याची कल्पना करणे तर शक्यच नाही. पण त्यांना सहजासहजी इज्जतीतून उठवणे अगदी सहज सोपे आहे. कोणतीही गोष्ट झाली बस त्याचा अल्पसंख्यांक दर्जा किंबहुना जातीय दर्जा काढून अवमान करणे ही सुशिक्षित लोकांमध्ये नवीन रीत पुढे येऊ पाहते आहे. सुशिक्षित समाजातून लोकांमधून नाविन्य निर्माण होण्याची आशा वाटते , तेथेच अशी जर खिळ बसत असेल, आपण नवनिर्माण काय करणार .हा झाला गाव पातळी ते देशपातळीवरचा विषय .


सुशिक्षित लोकांमधील आपण द्वेष कसे असतात याविषयी  सांगायचे झाल्यास , सुशिक्षित लोकांमध्ये जास्त जातीय समीकरणे दिसून येतात . सुशिक्षित लोकांमध्ये सुद्धा ही मानसिकता विकोपाला गेली आहे. कारण नोकरी क्षेत्रामध्ये नोकरी करत असताना कार्यालयामध्ये जातीय समीकरणे दिसतात ठीक आहे. नातेसंबंध असतील, सामाजिक जबाबदारी असतील किंवा रक्त संबंध असतील यावर आपल्याला काहीही भाष्य करायचं नाही. परंतु ,या सर्वांनी मिळून इतर वर्गवारी मधून आलेल्या लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सुद्धा वेगळा आहे. नोकरी क्षेत्रांमध्ये सामान्यतः सर्वसाधारण मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय अशी वर्गवारी आहे. त्यानुसार त्यांची निवड होते. सर्वसाधारण मधून येणारे उमेदवार नोकरीच्या अगोदर वेगळेच असतात. एवढेच काय सगळ्याच  कार्यालयांमध्ये हे वेगळे असतात.  जेव्हा नोकरी म्हणून एकत्र येतात , तेव्हा मात्र त्यांच्यामध्ये काम करत असताना एकमेकाकडे बघण्याची भावना ही उदारमतवादी नसून संकुचित प्रवृत्तीची होते. याला कोणीही अपवाद असू शकत नाही. सर्व सारखेच सर्वसाधारण गटातील लोकांना असे वाटते की, मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय गटातील लोक हे त्यांच्या पारंपरिक प्रथा व आचरण यानुसार ते तसेच आहेत. जे की सर्वसाधारण लोकांची मानसिकता ही त्यांच्याविषयी अकारण नको ते गैरसमज करून त्या गैरसमजांना बळी पडतात आणि त्यानुसारच त्यांच्याशी ते वर्तन करतात. वास्तविक परिस्थितीची जाण काय असते किंवा भूतकाळ आणि वर्तमान काळ यातील फरक जाणून घ्यायला ते तयारच नाही. मग प्रश्न येतो , ही माणसं म्हणजे कधीही न सुधारणारी आणि त्यातूनही जर कामांमध्ये एखादी कमतरता असेल किंवा चूक घडली  असेल तर बस त्याच्या जातीच्या माथी मारायची आणि जर का तीच चूक सर्वसाधारण गटाकडून झाली तर चुका होत असतात. माणूस हा चुकीचा पुतळा आहे. अशी सबक पुढे देऊन मार्ग काढायचा हा कोणता नियम आहे? का रीत आहे ? ही झाली एक बाजू आता दुसऱ्या बाजूचा विचार करू एखादा इतर मागासवर्गीय किंवा मागासवर्गीय कर्मचारी अत्यंत हुशार असेल किंवा तो त्या क्षेत्रासाठी योग्य काम करत असेल , तेही जमत नाही. प्रत्येक वेळेला त्याच्या चांगुलपणाचा विचार तर करत नाहीत. परंतु एका थोर महापुरुषाच्या नावानं त्याला हिनवणे किंवा त्याच्या पाठी नको त्या थराच्या टीका करणे, उपहासाने बोलणे , त्याचे मनोबल खच्ची करण्यासाठी नको नको त्या ट्रिक्स वापरणे, यावरही न थांबता तोंडावर गोड बोलून त्याच्या पाठी नवनवीन प्रकारचे षडयंत्र रचने, त्यानुसार कृती करणे, तरी त्यांना यश आले नाही. त्यांनी षडयंत्र करायचे , डावपेच खेळायचे मागासवर्गीय किंवा इतर मागासवर्गीय आणि मात्र चुपचाप ते सहन करायचे. तर तो चांगला आणि त्या विरोधात आवाज उठवला किंवा साधं बोललं तरीही त्याच्या जातीच्या नावावर त्याची अवकात काढणे, ही मानसिकता कोठे बंद पडणार आहे. ही मानसिकता कधी सुधारणार आहे . मग या मानसिकतेला विकृत का म्हणू नये ? शैक्षणिक क्षेत्रामध्ये गुणवत्ता विकासासाठी प्रयत्न करत राहण्यापेक्षा या विकृत मानसिकतेने विद्यार्थ्यांचाच नाही तर वैयक्तिक त्या लोकांचा सुद्धा तोटा आहे. ज्यामध्ये विकृत मानसिकता असणारे लोक अहोरात्र झटत असतात हे बोटावर मोजणे इतकेच असतात परंतु हजारोंना वेठीस धरतात . हे दुर्दैव...! शैक्षणिक पवित्र क्षेत्रात अशा प्रकारच्या विकृत मानसिकता असतील आणि अशाच प्रकारची विकृत मानसिकता जर अधिकारी पदाच्या मनात असेल, तर त्या कार्यालयाचा किंवा त्या विभागाचा इतर लोकांशी व्यवहार कसा असेल याची कल्पना करणे अशक्य आहे. म्हणूनच शेक्सपियरने म्हटले असावे, " गोड बोलणारी माणसं धोकादायक असतात. "

गैरसमज कसा निर्माण केला जातो ? 


एखादा विचार किंवा सदगृहस्थ किती चांगला आहे किंवा किती वाईट आहे. प्रथमतः याचा कोणीही विचार करत नाही. चांगला असेल त्याला चांगलं म्हणावं, वाईट असेल त्याला वाईट म्हणावं. अशी शिकवण प्रत्यक्ष अचरणात असते . मग मोठा विचार असेल तर, मोठ्या विचारानुसार आपण आहोत. त्यानुसार त्याचे अनुकरण करतो आहोत, त्याचे आपण अनुयायी बनतो . पण ..तो व्यक्ती किंवा तो विचार जेव्हा इतरांकडून किंवा इतर मार्गाने त्या विचाराची जात कळते. तेव्हा मात्र तो विचार ती व्यक्ती तुच्छ वाटू लागते.  तोच विचार एखाद्या सदगृहस्थणे( बहुसंख्यांक)  मांडला तर,  मात्र त्याला डोक्यावर घेऊन त्याची वाह वाह केली जाते . चांगल्या विचाराची वाह वाह झालीच पाहिजे . तो  सदगृहस्थ कोणीही असो . त्याच्या चरणावरती नतमस्तक होण्याची प्रत्येकाचीच तयारी असावी. जेव्हा तो विचार विज्ञानवादी दृष्टिकोनातून सत्य असेल. 

विचार श्रेष्ठ आहे का कनिष्ठ आहे यापेक्षा, तो मांडणारा किंवा व्यक्त करणारा त्याचा दर्जा अर्थात सामाजिक दर्जा कसा आहे ? याच्यावर अवलंबून आहे. मग सामाजिक श्रेणीनुसार तो कोणत्या श्रेणीतून येतो. यावरती अवलंबून असते. आजच्या आधुनिक श्रेणीनुसार अ , ब , क, ड ,असा असेल . जर  तो 'ड 'या श्रेणी मधील असला तर, त्याच्या विचारांना आजही भारतीय समाज व्यवस्थेमध्ये पाहिजे तेवढे महत्त्व आहे ? विचारवंत त्यांना मानतात पण त्या विचारवंतांचे विचार कोणीही सामान्य स्थळापर्यंत मानत नाही. कारण , सामाजिक विचारसरणीनुसार 'अ'  श्रेणीतील लोकांनाच आजही महत्त्व . हे महत्त्व प्राचीन काळापासून आहे. शेवटच्या श्रेणीतील एखाद्या सदगृहस्थाने चांगली कृती, चांगला विचार, चांगले संस्करण,  उत्कृष्ट चारित्र्य किंवा कर्तव्य पार पाडत आचरण करीत असेल तर त्याला कोणत्या मार्गाने बदनाम करण्यात येईल. अशा प्रकारचा विकृत विचार मनात घेऊन वरील श्रेणीतील लोक सारखेच चिंतेत असतात.  त्यातूनच ते अनेक प्रकारच्या युक्ती आणि प्रत्युत्त्या करत असतात. यामध्ये त्यांच्या आयुष्यातील बराचसा काळ खर्च करतात . त्यानुसार त्यांना कधीही यश येतही नाही.  जर  का आलेच ,तर ते चिरकाल नसते . त्यांची अघोरी मानसिकता त्यांना अशी दुष्कृत्य करायला भाग पाडतात. त्यानुसार ते वर्तन करत असतात.  चांगला विचार कधीही मरत नसतो किंवा तो संपुष्टात येत नसतो. तो चिरकालपणे तेवत राहतो . हे या विकृत मानसिकता पाळणाऱ्यांनी लक्षात घ्यावे. जित्याची खोड मेल्याने जात नसेल तर शेवटी मात्र हाती धुपाटणे. याचा विसर पडू नये. धर्माच्या गोष्टी सांगायला असू नयेत त्या आचरणात असाव्यात. 

थोर महापुरुषांनी कधीही कोणाचा द्वेष केला नाही. प्रत्येकांना आपल्या सोबत घेऊन चांगली कामे केली सर्व समाजाचा तळागाळातील लोकांचा विचार करूनच मोठमोठ्या क्रांती या भूमीवर झाल्या. बदलाची क्रांती घडल्या, घडतील ,परंतु ,बदल झालेला कायमस्वरूपी टिकतो किंवा नाही का इतिहास जमा होतो यासाठी प्रतिक्रांती सुरू आहे. या प्रतिक्रांती रोखायच्या असतील शिक्षित लोकांनी सुशिक्षित होणे गरजेचे आहे. सामाजिक व्यासपीठावरून फक्त बोल घेवडा करण्यापेक्षा कृतीयुक्त कार्यामध्ये सहभागी व्हावे. जे चांगले आहे त्याला चांगलेच म्हणावे, जे वाईट आहे त्याला वाईट म्हणावे. न्यायव्यवस्थेचा विचार करत असताना सत्तेच्या बाजूने सामाजिक न्याय असावा. या ठिकाणी पुराव्याची गरज असू नये. पुराव्याचा विचार जर केला गेलाच, पुरावा हा सुद्धा  सत्याचा असावा. पुरावा जर खोटा निघाला किंवा बनाव निघाला. तर मात्र सत्याला कधीही न्याय मिळणार नाही . समाजातील सुप्त विकृती वाढायला वेळ येईल आणि अन्याय अत्याचार झालेल्या व्यक्तीला न्याय मिळेल ही अपेक्षा करणे चुकीचे आहे. कारण , समाजातील हजारो अनेक प्रकरण आहेत, जी न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचतील याची शाश्वती देता येत नाही. म्हणून समाजातील न्यायदेवता जिवंत राहिली पाहिजे. एवढी अपेक्षा करूयात.

घातक प्रवृत्ती विकृत कृती... 



जगातील सगळेच लोक चांगले आहेत शहाणे आहेत हे निर्विवाद सत्य, आपण जाणतो आहोत.  त्यांची प्रवृत्ती जर चांगली असेल तर ते कधीही वाईट गोष्टीचा विचार करणार नाही. जर का त्यांची प्रवृत्ती विघातक असेल तर ते कधीही आयुष्यामध्ये चांगला विचार किंवा चांगली कृती करू शकत नाहीत . त्यांनाही रोखता येऊ शकते . पण...पुढाकार कोणी घ्यावा? यावर अवलंबून आहे. प्रवृत्ती कोणतीही असो चांगली असो अथवा वाईट असो. परंतु पुन्हा तोच प्रश्न निर्माण होतो ती व्यक्ती कोणत्या श्रेणीतील आहे? त्याची श्रेणी जर 'अ' श्रेणीतील असेल तर मात्र त्याला कोणीही बोलू शकत नाही. ना विरोध करू शकत नाही. पण 'ड' श्रेणीतल्या व्यक्तीला  कृती चांगली असो अथवा वाईट कोणीही बोलू शकते. कोणीही आरोप करू शकते. चांगल्या कृतीला तर कोणी शाब्बासकी किंवा प्रोत्साहन देणार नाही. पण का जर कृती वाईट असेल ना, तर मात्र त्या व्यक्तीची गय होत नाही. घातक प्रवृत्ती अ, ब ,क ,ड या श्रेणीतील कोणाचीही असेल त्याला सजा मिळालीच पाहिजे. ही बाब कौतुकास्पद आहे . तीच नंदनीय घटना कृती अ  श्रेणीतील लोकांनी केली आणि त्याच्या विरोधात कोणतीही कार्यवाही होत नाही. त्याला क्षमा केली जाते ही बाब मात्र गंभीर असून अशा प्रकारची मानसिकता ही सुद्धा विकृती आहे. 


लेखक: 📝🖋डोंगरदिवे राहुल



मंगळवार, २५ एप्रिल, २०२३

जयंती एक निराळी

 

भारतात नव्हे तर जगभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते .भारतातील दिन दुबळ्यांचा , वंचित घटकाचा , शोषित त्याचबरोबर अन्याय -अत्याचार यांना बळी पडलेल्या  समाजाचा मूकनायक म्हणून डॉ.बाबासाहेबांची प्रतिभा जगाच्या मनपटलावर उमटली आहे. वास्तविक पाहता जगातील एकमेव असा समाज आहे , जो डॉक्टर बाबासाहेबांना आपला बाप समजतो. जन्मदात्या बापानंतर जीवनाला खरा अर्थ देणाऱ्या आणि वैयक्तिक उन्नती बरोबर सामाजिक उन्नतीचा समावेश करणारा मार्गदाता तो म्हणजे बाप ! समाजामध्ये अनेक मत मतांतर, प्रवाह वेगवेगळ्या पद्धतीने मांडले जातात . तेव्हा, सिद्धतेसाठी अनेक पुराव्यांचा संदर्भ दिला जातो.   डॉ बाबासाहेब असं रसायन आहे जे की सामाजिक कोणत्याही समस्येवर खात्रीशीर इलाज करणारी अभिक्रिया करते कोणत्याही दुष्परिणामांशिवाय.

डॉक्टर बाबासाहेबांची विद्वत्ता पाहता सर्वजण त्यांना शरण येतात . त्यांच्या ज्ञानाच्या अथांग सागरासमोर कोणीही टिकाव करू शकत नाही ,ही वस्तुस्थिती . म्हणूनच त्यांची ओळख विश्वभूषण, बोधिसत्व ,महानायक, मूकनायक,  भारतरत्न रतीय राज्यघटनेचे शिल्पकार अशी आहे.
14 एप्रिल 2023 या दिवशी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी कोणताही गाजावाजा न करता किंवा प्रसिद्धीच्या झोतात असणारी जाहिरात न करता भारतातील 125 फूट सर्वात उंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ब्राझ  पुतळा हैदराबाद येथे उभा केला. घटनाकारांविषयी ही असणारी त्यांची निस्सिम भक्ती व ज्ञानाच्या अथांग सागराचा गौरवच होता त्यामध्ये कोणताही स्वार्थचा लवलेश दिसून येत नव्हता. बाबासाहेबांचे क्रांतिकारी विचार ही तर प्रेरणा आहेच लोकशाही लोकांसाठी असावी त्याचबरोबर औद्योगिक विकास होणे ही महत्त्वाचे आहे औद्योगिक विकासासाठी ध्येय धोरणे त्यांनी आखली होती कृषी क्षेत्रामध्ये सिंचनाला महत्त्व किती आहे यासाठी भाकरा नांगल सारखे सिंचन प्रकल्प त्यांनी राबवले त्यातून बाबासाहेब आधुनिक भारताचे जनकच . हेच विचार त्यांना जगभर नावलौकिक किंबहुना जगाला आदर्शवत आहेत.

अमेरिकेमध्ये याच वर्षी दुसरी एक महत्त्वाची घटना घडली. अमेरिकेच्या जर्सी या शहरांमध्ये सिटी कौन्सिल हॉल या ठिकाणी अमेरिकन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व भारतीय दूतावास यांच्या उपस्थितीमध्ये अमेरिकेच्या ध्वजाबरोबर अशोक चक्र असलेला बाबासाहेबांचा निळा झेंडा फडकवण्यात आला  निळा झेंडा म्हणजे जातीयतेच्या विरोधातील आणि असमानताच्या विरोधातील ध्वज होय न्यू जर्सी या ठिकाणी 14 एप्रिल हा दिवस इक्वलिटी डे म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येणार आहे असे जाहीर करण्यात आले बाबासाहेबांना खरोखरच एक आगळी वेगळी मानवंदना होती.

डॉ   बाबासाहेबांची जयंती म्हटलं की,  सर्व तळागाळातील समाज मोठ्या आनंदाने यात सहभागी होतो बाबासाहेबांची जयंती ही सण म्हणूनही साजरी केली जाते. नवे कपडे, खायला गोड पदार्थ, एक आगळावेगळा सण साजरा केला जातो . आपणावर केलेला या मोठ्या परोपकाराने हा समाज बाबासाहेबांच्या चरणावरती नतमस्तक होतो . बाबासाहेबांचं नातं हे समाजाशी घट्ट आहे . त्यांना त्यामध्ये सूर्य चंद्र आहे तोपर्यंत दरार पडणार नाही ही वास्तविकता कोणीही नाकारू शकत नाही किंबहुना शंका उपस्थित करू शकत नाही हे वास्तव सत्य! तरीही हा समाज विखुरलेला आपण पाहतो आहोत. राजकीय पक्षांनी यामध्ये अनेक गट पाडले. तत्कालीन परिस्थिती मधील बाबासाहेबांचा समाज अन्यायाच्या विरोधात पेटून उठलेला होता . बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली हक्कासाठी भांडत होता .  येवला परिषद,  काळाराम मंदिर प्रवेश  किंवा महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह असेल बाबासाहेबांनी दिलेले हे लढे सामाजिक हक्क आणि निसर्गतः निसर्गाने दिलेले हक्क यासाठीचा होता हजारो वर्षापासून चालत आलेली गुलामी अर्थात मनुवादी विचारसरणी नेस्तनाबूत केली. दोन वर्ष 11 महिने 18 दिवस अहोरात्र प्रयत्न करून भारतातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ निर्मिती केली . ते म्हणजे भारतीय संविधान होय . सर्व समाजाला, सर्व धर्माला, सर्व पंथांना एकत्रित आणले. जगातील सर्वात मोठी लोकशाहीची देन बाबासाहेबांनी या भारताला दिली.
डॉक्टर आंबेडकर यांनी भारताला संविधान दिले . 73 वर्षापासून या संविधानानुसार भारताचा राज्यकारभार चालतो . जगातील सर्वोत्कृष्ट संविधान म्हणून भारतीय राज्यघटने कडे पाहिले जाते . बाबासाहेबांना अपेक्षित असणारी समाज रचना आणि  भारतातील प्रत्येक नागरिकांची हक्क  कर्तव्य  आणि जबाबदारी त्यांनी संविधानाच्या माध्यमातून मांडले व सर्वच जनतेस स्वतःच्या धर्मपंथानुसार वागण्याचे आणि विचार मांडण्याचे स्वातंत्र्य दिले. ही बाबासाहेबांची आपल्या समाजाप्रती व भारताप्रती असणारे आदराची भावना आणि प्रगतशील भारत कसा असावा याविषयीची ध्येय धोरणे होती. परंतु समाजाविषयीची त्यांचे विचार वेगळे होते . तळागाळात खिचपत पडलेला समाज आदर्श जीवन कसा जगेल . यासाठी त्यांनी सर्व समान वागणूक असणारा धर्म या समाजाला दिला तो म्हणजे बौद्ध धम्म होय.
 जर बौद्ध धर्म प्रमाणे आचरण समाजाने केले तर, त्यांच्याकडे पाहून उच्चवर्णीय सुद्धा कुतूहलाने तोंडात बोट घालतील.एवढी अपेक्षा त्यांनी ठेवली असावी धम्मानुसार पंचशीला प्रमाणे  समाजातील सर्व लोक वर्तन करतील, बौद्ध धर्माचे सच्चे अनुयायी बनतील , शिक्षणाच्या माध्यमातून मोठमोठ्या पदावर विराजमान होतील ,जे मोठे होतील ते इतर आपल्या बांधवांना आधार देतील, आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करतील . एवढा विचार करत असताना असे विचार केलेला असेल की, 
हे सर्व स्व प्रयत्नाने आणि स्वकष्टाने करतील . त्यामध्ये कोणाच्याही उपकार आणि उपकाराची सहानुभूती नसावी. केलेल्या कष्टाचा पूर्ण मोबदला मात्र असावा.

रायटर : - डोंगरदिवे राहुल

गुरुवार, १३ एप्रिल, २०२३

Destiny

Everyone asks one question himself, 

Why does destiny take a crucial trial? 

Destiny replied , 

 "Without me you can't become a good and an ideal  person in the world!.. "

📝Rahul R Dongardive

शनिवार, १ एप्रिल, २०२३

प्रमाणिकपना - HONESTY



'माणसाने चांगले राहिले पाहिजे', असा सल्ला प्रत्येक जण देतो. पण..चांगलं राहिलं पाहिजे म्हणजे, कसं राहिलं पाहिजे ? याच सविस्तर विवेचन किंबहुना फोड करून स्पष्टीकरण कोणीही देत नाही. प्रत्येक जण भाषण देणे आणि उदाहरणासह स्पष्टीकरण देणे, अपरिपक्व मनाला परिपक्व मनाने दिलेली ही समजूत असेच म्हणावे लागेल. मानवी मनाचा अंतर्मनातील ठेवा कधी कोणाजवळ उलगडेल हेही सांगता येत नाही. गरज असेल, तेव्हा विनंती, मान, सन्मान या गोष्टी कशा घडतात, हे ही कळत नाही. एक गोष्ट मात्र निश्चित या ठिकाणी निष्पन्न होते. 'गरज सरो आणि वैद्य मरो', या लोभापायी माणूस कोणत्या थराला जाईल याची शाश्वती कोणी देऊ शकत नाही. प्रत्येक जण हा परिस्थितीचे आपत्य असतो. ही वस्तुस्थिती असली तरीही, संघर्ष आणि अपयश या दोन गोष्टी सदैव हातात हात घालून पुढे जात असतात. बिकट परिस्थिती मधून आपणास 'साध्य' आणि 'साधन' यातील फरक कळणे खूप मोलाचे आहे. वास्तविक पाहता विवेचन  करण्या पाठीमागचा अट्टाहास असा आहे. नम्रपणे एखाद्याच्या बाबतीत सद विवेकाने विचार करून, त्याच्या भल्यासाठी प्रयत्न करणे. ही व्यक्तीची नीतिमत्ता असते. निष्पाप नीतिमत्ते वरती विनाकारण शंका उपस्थित करून एखाद्याच्या कार्यकुशलता आणि प्रामाणिकपणावर शंकेचे ताशेरे ओढणे व पूर्णपणे अविश्वास दाखवणे, काम झाल्यानंतर त्यातून संधिसधूपणा साधने. हा कुठला आहे सभ्यपणा? लोकांच्या नजरेमध्ये मी किती निष्कलंक आहे? हे दाखवून प्रत्यक्ष आभासी जीवन जगण्यात साध्य ते काय होईल?
आपल्या कोणी कामाला आले नाही म्हणून आपण लोकांचा तिरस्कार न करता वेळ आणि संधी मिळाल्यावर त्यांच्या कामी यायला हवे. हा मानवतावादी दृष्टिकोन ठेवून आपण जगण्याचा प्रयत्न  केल्यास तो मानव कल्याणासाठी कळीचा मुद्दा ठरू शकतो. अगदी त्याचप्रमाणे निष्पाप, निरागस, प्रामाणिक माणसं हे सदैव स्वतःमध्ये परिवर्तन करत राहतात. परिवर्तन हे निस्वार्थपणे असते.कारण,कोणतेही काम करत असताना त्यातली सुधारणा, ही पुढील कामासाठी त्याची प्रेरणा असते. अशी ही माणसं असतात जी की फक्त लोकांच्या कल्याणाचा विचार करतात. कोठे ना कोठे एखाद्याच्या कामी यावे, कोणालातरी आपण मदतीचा हात द्यावा अशी निस्वार्थपणे सेवा किंवा मदतीचा हात देत असताना तो व्यक्ती कोणाकडूनही कसलीही अपेक्षा करत नाही. अपेक्षा एकच असते, आपण आपण जगत असताना हे जीवन सत्कार्यास लावण्यासाठी, 'एकमेकांसह करू अवघे धरू सुपंथ' हा मार्ग उत्तम आहे, याची जाण त्याला असते. म्हणूनच तो सदैव या मार्गावर चाललेला असतो. नव्हे त्याचा तो स्वभावच असतो. 

प्रामाणिकपणा हा माणसाच्या मूळ स्वभावात असतो तो अगदी हृदयापासून असतो तो ओढून आणता येत नाही ताणून दाखवता येत नाही त्यासाठी शुद्ध अंतकरण असावे लागते तो मार्केटिंगचा एक फंडा सुद्धा नाही तो प्रत्येकाच्या कार्यामध्ये वर्तनामध्ये तर चालण्या बोलण्यातून व्यक्त होत असतो त्याला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज लागत नाही तो जसा असतो तसाच काल आज आणि उद्या असतो

शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्याप्रती पोट तिडकीने चिकाटीने आणि जिद्दीने ,आहे ते ज्ञान,  वर्गातील अत्यंत पाठीमागच्या  विद्यार्थ्याला समजून घेऊन, अभ्यासामध्ये त्याला गोडी निर्माण करणे . त्याचबरोबर त्याच्या सभोवताली परिस्थिती, सामाजिक स्थान आणि त्याची समस्या जाणून घेऊन त्याला समरूप असे शिक्षण देणे, की जो आहे त्या परिस्थितीवर मात करून स्वतःमधील 'स्व' ओळखून शिक्षण घेऊन पुढे जाईल. तो जगातील आपला वेगळा विद्यार्थी असेल, ही किमया फक्त त्याला लाभलेला गुरुच करू शकतो. विद्यार्थ्यातील सुप्त गुणांना वाव देणे हे शिक्षकाचे कर्तव्य आहे. त्याच्या गुणवत्तेनुसार त्या विद्यार्थ्याला संधी देणे, हा जरी नियम असला, तरी त्यातील गुण ओळखून त्याला प्रेरित करणे, हा शिक्षकाचा धर्म झाला. अशा प्रकारची नवीन प्रणाली विकसित झाली तर उद्याचा सुशिक्षित तरुण  विकसित भारत देशाचा तरुण असेल हा त्या, शिक्षकाचा विद्यार्थ्याप्रती प्रमाणिकपणा होय. गुरु- शिष्य परंपरा ही प्राचीन काळापासून अशी चालत आलेली आहे. निस्वार्थ सेवा वृत्ती व निष्पाप-निष्कलंक त्यात असणारा भाव, असाच पुढेही पिढ्यान पिढ्या टिकून राहील. ही सत्यता कोणीही लपवू शकत नाही. 

एखाद्या अभियंत्याने निर्माण केलेली वास्तुशिल्प. त्यातील त्या गुणवत्तेवर अवलंबून असते. ती गुणवत्ता म्हणजेच, त्याचा तो आपल्या व्यवसायाशी असलेला शुद्ध भाव होय. आजच्या  सुशिक्षित अभियंता हा खरोखरच एक निष्णात व्यक्ती आहे . ग्रीस वास्तू पासून ते आपल्या भारतापर्यंतच्या वास्तूंचा विचार केला. निर्माण झालेल्या ऐतिहासिक वास्तू जर पाहिल्या तर तो एक उत्तम स्थापत्यशास्त्राचा आदर्शवत कलेचा अविष्कार आहे. आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगातील माहिती तंत्रज्ञानामध्ये झालेली दैदिप्यमान प्रगती, ही त्या प्रत्येक अभियंत्याची ओळख आहे.

आदिमानव ते आजच्या आधुनिक युगातील मानव यात झालेला अविश्वसनीय बदल एक उत्क्रांतीचा भाग आहे. परंतु ही उत्क्रांती होत असताना क्रांती - प्रतिक्रांती होत होत्या. तेव्हा सुद्धा मानव कल्याणासाठी काम करणारी ही माणसं होती. गरजेनुसार घेतले जाणारे शोध आणि त्या शोधांचा मानव कल्याणासाठीचा उपयोग म्हणजेच आजचे विज्ञान आणि तंत्रज्ञान होय! त्यावेळेला सुद्धा अशा लोकांना विरोध करणाऱ्या आणि नाव ठेवणारी माणसं होती ना . पण त्यांनी त्यांचा तो छंद जोपासला आणि आज आपण त्याचा उपभोग घेत आहोत .. हे शाश्वत सत्य कोणी नाकारू शकते का ?  

प्रत्येक देशातील नागरिक हा सुखाने झोपू शकतो , प्रगती करू शकतो, निर्भीडपणे संचार करू शकतो, स्वतःसाठी आणि देशासाठी ही काहीतरी करू शकतो . एवढी सुरक्षितता येते कशी? या सर्व गोष्टींचा विचार जर केल्यास आपल्यासमोर एका सैनिकाची प्रतिमा उभे राहते. पूर्वीपासूनच चालत आलेला राष्ट्रवाद , प्रखर राष्ट्रवाद आणि साम्राज्य विस्तार या मोहापायी अनेक युद्ध झाली, होत आहेत आणि होत राहणार.  त्याचीच एक परिभाषा म्हणून सध्या चालू असलेले पश्चिमात्य देशातील युद्ध. आपण सगळेच जाणता आहात, देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्याचे काम आपला जवान करत असतो. अत्यंत 0°c च्या खाली असलेल्या तापमानामध्ये सुद्धा सैनिक देशाची सेवा करतो . वेळप्रसंगी प्राणाची कसलीही परवा न करता बलिदान या देशासाठी देतो. मग तो सैनिक कोणत्याही देशाचा असो. त्या देशासाठीची त्याची देशसेवा, बलिदान हे त्या देशासाठीचे त्याचे प्रामाणिक कार्यच.

जगाचा पोशिंदा शेतकरी , शेती करतो. स्वतःसाठी कमी पण इतरांसाठी जास्त त्याची कष्ट असतात. जगातील सर्व लोक या शेतकऱ्याच्या जीवावर आपला उदरनिर्वाह भागवतात .  मग तो कोणीही असो. आपल्या व्यवसायाशी सलग्न अशा सर्व सुविधांशी पारदर्शक पद्धतीने काम करतो . त्याचे ते कर्तव्य आहे . त्यासाठी असणारी त्याची व्यापक भावनाही खूप महत्त्वाची असते. यातून त्याचे असणारे समाजाविषयीचे ऋण हे तितकेच महत्त्वाचे आहे. समाजाची ही शेतकऱ्या विषयी असणारी संकुचित भावना बदलून त्याच्या धन्याला योग्य मोबदला मिळाला पाहिजे. मॉलमध्ये गेल्यानंतर डोळे झाकून भाजीपाला किंवा इतर धान्याची जी किंमत मोजतो. त्याचप्रमाणे बाजारामध्ये बसलेल्या शेतकऱ्याची अवहेलना व्हायला नको , ही  एक आपली त्याप्रति निष्ठाच असायला हवी. अशाप्रकारे समाज व्यवस्थेचे हे अनेक पैलू आपल्यासमोर उलगडले जाऊ शकतात. सर्वांनी मात्र एकमेकांशी असलेल नातं अबाधित ठेवण्यासाठी निरहेतुकपणे काम व इमानदारीने आपलेपणा जोपासल्यास कोणाच्याही भावनांना ठेच पोहचणार नाही.

देशाचे समाजकारण आणि राजकारण करणारा एकमेव दुवा म्हणजे राजकारणी. राजकारणी लोक एक आगळीवेगळी भूमिका बजावताना पाहतो . या लोकांनी ठरवलं तर देशाची प्रगती होते. नाहीतर, अधोगती होते. देश विकसित व्हायचा असेल तर, हे राजकारणी लाचार नसले पाहिजेत  किंवा सत्तेचा हव्यास नसला पाहिजे. निस्वार्थपणे सेवा हाच त्यांचा धर्म असला पाहिजे. मानवसेवा- देशसेवा हीच ईश्वर सेवा ! अशी सेवाधारी वृत्ती असणारे समाजकारणी जर निर्माण झाले तर, तो देश विकसित झाल्याशिवाय राहणार नाही. समाज बांधणीमध्ये ही त्यांचा खूप मोलाच वाटा आहे. त्यांची वृत्ती जर निकोप असेल तर त्या देशाचा समाज सुद्धा सुदृढ आणि सशक्त निर्माण होईल, तो मानसिकतेने आणि सार्वभौमतवाने!  मग मतदाराने ही आपले अमूल्य असे 'मत' दान करावे. जनतेने दिलेल्या दानाचा वापर राजकारणी लोकांनी देश विकासासाठी करावा. हा त्यांचा प्रामाणिकपणा विकसित राष्ट्राची पायाभरणी केल्याशिवाय राहणार नाही.

#📝Rahul Dongardive
 







गुरुवार, ३० मार्च, २०२३

संवेदना - sensibility

 


संवेदना - आपण सदैव म्हणतो आधुनिक युग आणि प्राचीन युगामध्ये खूप फरक आहे.पूर्वीची संस्कृती सांस्कृतिक वारसा त्याचबरोबर आचार विचार दळणवळणाची साधने काळानुरूप बदलत गेली. याचाच परिणाम म्हणून आजचे आधुनिक युग हे खूपच गतिमान त्याचबरोबर संवेदनशील आहे .प्राचीन काळामध्ये एखादा संदेश सहजासहजी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत नसायचा.परंतु , आज मात्र काही क्षणांमध्ये जगामध्ये एखादा संदेश मिनिटांमध्ये पसरतो. वास्तविक पाहता संदेश तोच पसरतो, ज्यामध्ये फक्त आणि फक्त मायावी विचार किंबहुना विघातककृती, वाऱ्यापेक्षाही दुप्पट वेगाने पसरतात . धकाधकीच्या जीवनामध्ये माणूस, माणसाचं माणूस पण पूर्णपणे गमावून बसला आहे. ऐकायला बोलायला आणि लिहायला सुद्धा हा वेगळा विषय आहे. अनेक वैचारिक लेख, निबंध संशोधन पर विषय सविस्तरपणे मांडताना आपण पाहतो आहोत. परंतु शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे कोणीही लक्ष देत नाही. आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वांचाच बदलला आहे. यांची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला तर, भौतिक सुख सुविधांच्या पाठीमागे लागलेला हा मानव!!! निसर्ग ,आकाश व पृथ्वी अंतर्गत आक्रमण करता करता स्वतःवर सुद्धा आक्रमण करायला मागे पुढे पहात नाही. परिणाम असा झाला, प्रत्येक जण अतिरेकी वर्तन करू लागला. त्यासाठी तो वाटेल ती किंमत चुकवण्यासाठी तयार आहे. तो नाती पाहत नाही , सामाजिक भान ही राखत नाही, अर्थात तो आत्मभान हरून बसला आहे.

विषय मांडताना एक गोष्ट या ठिकाणी प्रखरपणे मांडावीशी वाटते की, पूर्वीच्या काळी असणारी एकत्र कुटुंब पद्धती ही पोषक होती. प्रत्येकाचा मानसन्मान राखला जायचा, प्रत्येक जण आपल्याशी इतरांशी आदराने वागायचा. ज्येष्ठ कनिष्ठ हा आत्मीयतेचा धागा सर्व नाती सांभाळत होता.  कालांतराने एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास झाला आणि विभक्त कुटुंब पद्धती आली. गाव खेड्यांचे शहरीकरण झाले. शहरीकरणातून कारखानदारी उद्योगधंदे वाढले आणि माणसाचे स्थलांतर सुरू झाले. स्थलांतराबरोबर माणसे माणसापासून दुरावली जाऊ लागली. उद्योगधंद्यांच्या स्पर्धात्मक जीवनाने सर्व जीवनच पालटले. प्रत्येक व्यवहारिक झालेला आणि माणसाची माणुसकी यातच नेस्तनाबूत झाली. हे त्रिवार सत्य कोणीही नाकारू शकत नाही. प्रत्येकाची साधन आणि साध्य बदलली. माणुसकीच्या आत्मीयतेचा लवलेश उरला नाही.

आधुनिक जगामध्ये स्पर्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात बळवलेली आहे की, प्रत्येक जण जगाबरोबर चालण्याचा प्रयत्न करतो. कारण , 'थांबला तो संपला'  हे ब्रीद वाक्य जगाने स्वीकारले आहे. वस्तुस्थिती ही तशीच आहे. कारण जो याबरोबर चालणार नाही, त्याला कोणीही विचारणार नाही. त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल आणि अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येक जण धडपडतो आहे. या धावपळीमध्ये माणसाचे आरोग्य मात्र धोक्यात आले. कोणालाही शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ राहिला नाही. जो तो फक्त पैसा..पैसा..पैसा...एवढाच विचार करतो. कोणाची फसवणूक कशी करायची? कोणाच्या सात्विक वृत्तीचा गैरफायदा कसा घ्यायचा? रडून ऐकायचे आणि हसून सांगायची ही प्रवृत्ती एवढी बळावली आहे. त्यामुळे एक जण पैसा कमावतो आहे. तर, दुसरा हा मानसिक आरोग्याबरोबर शारीरिक आरोग्यानुसार खचून चालला आहे.

शारीरिक आरोग्य औषधोपचाराने बरे होऊ शकते. पण  मानसिक आरोग्य मात्र बरे होण्यास कालावधी लागतो, हे वास्तव सत्य  स्वीकारायला आजही समाज तयार नाही. कारण, जो चिंताग्रस्त बनतो त्याची चिंता घालवण्यासाठी औषध उपचार आहेत. परंतु, त्याचे परिणाम मात्र खूप गंभीर होऊ शकतात. त्यालाच हा समाज  मनोरुग्ण म्हणून संबोधतो. मग प्रश्न असा आहे ...यावर उपाय काय आहे ? यावरील उपाय सर्वात उत्तम असा आहे. की, प्रत्येकानं उत्पन्नाच्या साधनावर जेवढा भर आणि वेळ दिला, त्यापेक्षा दैनंदिन जीवनातील काही तास आपल्या कुटुंबासाठी देणे आवश्यक आहे. कारण आपण प्रत्येक वेळेला समाजाला दृष्टी देत असतो. ही दृष्टी स्वतःपासूनच सुरू होते. समाज वाईट आहे. असं सहज म्हणून जातो. परंतु त्याच समाजाचे आपण सुद्धा एक घटक आहोत. हे विसरून जातो. त्यासाठी आपल्याला आपल्या कुटुंबाकडे लक्ष देणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. प्रत्येकाचे आदर्श वेगवेगळ्या मानसिकता व सभोवतालच्या परिस्थितीतून असू शकतात, मान्य आहे. परंतु आपणही या समाजाचे आदर्श घटक असू शकतो. आपण रोल मॉडेल जरी नाही होऊ शकलो. तरीही आपण आपल्या कुटुंबाच्या रोल मॉडेलच असतो. कारण , खरे संस्कार हे आपल्या मुलांमधून प्रकट होत असतात. ते टिकवण्यासाठी आपली आदर्श आचारसंहिता असणे आवश्यक आहे. त्यासाठी लिखित स्वरूपाची संहिता असणे आवश्यक नाही, ती आपल्या दैनंदिन व्यवहारातून आपल्या मुलांवर परिणाम करत असते. हीच मुलं समाजात जातात त्यांचा व्यवहार आणि वर्तन ही त्या कुटुंबाची सांस्कृतिक व वैचारिक जडणघडण असते . यातूनच ते कुटुंब कसे आहे? याची ओळख समाजाला होत असते. यालाच आपण कौटुंबिक वैचारिक वारसा असे म्हणतो. मग हा वारसा कोणत्या स्वरूपातून बाहेर पडतो. स्वतःच्या आचरणातून त्याचबरोबर निर्माण होणाऱ्या संवेदन लहरीतून . संवेदना ह्या शिकवल्या जात नसतात. तर त्या अनुकरणाने आपोआप आत्मसात होत असतात. यालाच आपण सदसद  विवेक बुद्धी असे म्हणतो.

मानसिक आरोग्य हे उत्तम आरोग्य असते, हा या पाठीमागचा प्रथम आणि अंतिम उद्देश होता. आपला संस्कृतिक वारसा अथवा वैचारिक अधिष्ठान टिकवायचे असेल तर कुटुंब ही संज्ञा , आदर , मान -सन्मान या गोष्टी जपाव्याच लागतील . मान्य आहे , पैसा खूप मोठा आहे! त्याची गरज पण आहे. खूप पैसा  कमवायलाही काही हरकत नाही. तो कमवत असताना लोकांच्या भावभावना पायदळी तुडवून अघोरी संपत्ती कमावण्यापेक्षा स्वतःच्या हिमतीवर आणि कष्टावर प्रामाणिकपणे मिळवलेली संपत्ती पिढ्यान पिढ्या टिकणारी असते, ही भावना लोकांच्या मनामध्ये रुजली पाहिजे. व्यक्ती पेक्षा देश श्रेष्ठ! असे संस्कार ही पुढील पिढ्यांना मिळणे काळाची गरज आहे. कोणत्याही निकोप देशासाठी सुसंस्कृत आणि सुपीक मानसिकता निर्माण होणे अपेक्षित आहे.



या गोष्टी फक्त संवेदना निर्माण कशा होतात यावर अवलंबून आहेत. त्यासाठी संवेदनशील असणे महत्त्वाचा आहे आणि या सकारात्मक संवेदना सकारात्मक विचारातून आणि आचरणातून निर्माण होतात. कोणतीही संवेदना निर्माण होत असताना, वास्तववादी परिस्थिती काय म्हणते? त्या परिस्थितीचे होणारे परिणाम कोणत्या स्वरूपाचे आहेत ? त्यापेक्षा ती परिस्थिती कोणत्या प्रकारे हाताळली जाते ? ही महत्त्वाची गोष्ट .ज्या वेळेला अशी बिकट परिस्थिती कोणत्याही व्यक्तीवर येते, त्यावेळेला सामाजिक दृष्टिकोन आणि सभोवतालचा परिसर त्यावर खूप मोठा परिणाम करत असतो  अशा स्वरूपातील व्यक्तीला जर योग्य मार्गदर्शन आणि निर्णय क्षमता सर्वस्वी सकारात्मक घडत गेली तर, निश्चितच येणारा निर्णय हा विलक्षण असतो. याव्यतिरिक्त अशा संवेदनशील परिस्थितीमध्ये नकारात्मक विचार त्याचबरोबर होणारा विरोध हा निश्चितच त्या व्यक्तीचे मानसिक आरोग्य खच्चीकरण केल्याशिवाय राहत नाही. यातून दोन गोष्टी निर्माण होत असतात किंवा घडत असतात एक तर अति उच्च कोटीचा सकारात्मक बदल झालेला असतो किंबहुना रसातळाला गेलेला हतबल माणूस पाहायला मिळतो. मग प्रश्न पडतो, दोष कोणाचा ? 

म्हणून प्रत्येक गोष्टीची चिकित्सा होणे आवश्यक आहे चिकित्सात्मक परीक्षण झाल्यावर सर्वांचा अंतिम सार ही संवेदनाच असते संवेदनाही दोन प्रकारच्या असतात एखाद्याबद्दल किंवा एखाद्या स्थितीबद्दल सकारात्मक विचारातून मदतीचा हात देण्याची संवेदना ही वेगळी. दुसरी संवेदना  अनपेक्षित आहे. आहे त्या परिस्थितीचा फायदा उठवून समोरच्या व्यक्तीला संपुष्ट करण्याची संवेदना. 

संवेदना कोणत्याही प्रकारची असो, त्यामध्ये जर मानव हित, समाज हित, राष्ट्रहित जोपासणारी असेल. तर, ती संवेदना प्रेरणादायी- 


"बहुजन हिताय, बहुजन सुखाय राहील"

# RAHUL_ DONGARDIVE. 




रविवार, १२ मार्च, २०२३

Problem - An opportunity

 If someone always try to keep away from problem, but problem tries  to follow them without lose any moment. Actually that fellow confused, because he always think everytime he follow the true path and didn't think any bad thing or bad omen. Why problem's raised front of him? He memorised his good or bad works. Then he  find out no any mistake done by himself. He tried  come out from the critical condition. 

Generally a simple man ignore the way, And forward to get new idea. But a unique man in search of the  base root of the problem then he reconciliation of bad patch and finding new ways to achieve new goal. Means a unique man always find the new opportunity from the critical puzzle. 

So keep fit man. . . Keep fit. 

Opportunity knocks your door... Just face it... Success waiting for you. 

#Rahul Dongardive



मंगळवार, ७ मार्च, २०२३

तडप


" बुलंदी को शायद शिकायत है हमसे,

क्युंकी, उसे शक है हमारी हुनर से|

 बाद मे पता चला...

हुनर भी खामोश है हमसे, 

क्योंकि, बुलंदी क्यू आसान है उनसे "

सत्यमेव जयते


#R R DONGARDIVE

Power of Vote



𝙔𝙊𝙐 𝘼𝙍𝙀 𝙏𝙃𝙀 𝙆𝙄𝙉𝙂 𝙊𝙁 𝙔𝙊𝙐𝙍 𝙑𝙊𝙏𝙀. 

𝙔𝙊𝙐 𝘾𝘼𝙉 𝘾𝙃𝘼𝙉𝙂𝙀 𝙏𝙃𝙀 𝙍𝙐𝙇𝙄𝙉𝙂 𝙋𝘼𝙍𝙏𝙔. 

𝙄𝙁 𝙔𝙊𝙐 𝘿𝙊𝙉𝘼𝙏𝙀 𝙎𝙐𝘾𝙃 𝙏𝙔𝙋𝙀 𝙊𝙁 𝘾𝘼𝙉𝘿𝙄𝘿𝘼𝙏𝙀. 

𝙏𝙃𝙀𝙉 𝙎𝙀𝙀 𝙏𝙃𝙀 𝙈𝘼𝙂𝙄𝘾 𝙊𝙁 𝙔𝙊𝙐𝙍 𝙑𝙊𝙏𝙀.

𝚂𝚘 𝚍𝚘𝚗𝚝 𝚠𝚊𝚜𝚝𝚎 𝚢𝚘𝚞𝚛 𝚟𝚘𝚝𝚎 𝚊𝚗𝚍 𝚝𝚒𝚖𝚎 𝚝𝚑𝚛𝚘𝚞𝚐𝚑𝚘𝚞𝚝 𝚋𝚊𝚛𝚐𝚊𝚒𝚗𝚒𝚗𝚐 

Vote is the Right. So don't judge by someone's influence. Judge those candidate by their moral values and ground work. Always keep in mind it's not favour of a slected  candidate but it's the constitutional right , duty and responsibility to implement on such type of candidate. Who saves  the world's largest Democracy and give full support to serve the people. 

So 

be alert.. 

Be a part of world compassion. 

Be a real hero of  Democracy. 

Be a INDIAN firstly and lastly

#R R DONGARDIVE


गुरुवार, १९ मे, २०२२

वेदातील आनंद ब्रह्मलीन निगमानंद

           

                               ब्रह्मलीन निगमानंद महाराज यांची मूर्ती


        "दु:ख में सुमिरन सब करे सुख में करें न कोय |

             जो सुख में सुमिरन करे तो दुख काहे होए ||"

अध्यात्मातील ज्ञानाची गोडी निर्माण झाल्यानंतर भक्तीत तल्लीन होऊन नवीन  शोधाच्या मार्गाने मार्गक्रमण करत असताना, तहानभूक हरवून दुःखाचे कारण शोधत आत्मशक्ती जागृत होते. तिलाच आपण दैवी शक्ती असे म्हणतो. या दैवी शक्तीला प्राप्त करून घेण्यासाठी योग साधना अत्यंत महत्वाची असते. चित्त शुद्ध,  एकाग्र झाले. अर्थातच सर्व विकारी गोष्टीवर नियंत्रण होते. या गोष्टीची परिपूर्ण जान ब्रह्मलीन स्वामी निगमानंद महाराजांना होती. सदैव त्यांनी प्रभू नामाच्या चिंतनाची आस सोडली नाही. संकटसमयी भगवंताचा धावा तर सगळेच करतात. परंतु , सुखांमध्ये हि प्रभू नामाची आवड आणि निवड करता आली म्हणजे, त्याला कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. ही विशेष बाब भक्तजनांना बाबा सांगत असत. सर्व भक्तां प्रति बाबांची आशीर्वाद रुपी दया एक आगळेवेगळे विलक्षण देवत्व सिद्ध करते. प्रत्येकाची समस्या समजून  व त्यावर योग्य असा उपाय सुचवणे किंबहुना संकट मुक्ति चे मार्गदर्शन बाबा करत असायचे. जीवन प्रवास खूप खडतर होता. या संघर्षमय जीवनात आत्मशुद्धी साठी शिक्षणाची आस कधी सोडली नाही. शिक्षण हे शैक्षणिक अथवा अध्यात्मिक असो ते परिपूर्ण असले पाहिजे . त्याविषयी सखोल ज्ञान असणे ही त्या विद्यार्थ्याची तळमळ असली पाहिजे.


मायंबा च्या सेवेसाठी निघालेले सिताराम महाराज अर्थातच आजचे निगमानंद बाबा! ज्ञानासाठी प्रथमता आळंदी नंतर पंढरपूर.  आध्यात्मिक शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी - उच्चशिक्षणासाठी ऋषिकेश कडे बाबा वळू लागले. जिद्दीच्या जोरावर त्यांनी ऋषिकेश गाठले . बारा वर्षाच्या खडतर तपश्चर्येनंतर त्यांनी वेद, उपनिषदे यांचा सखोल अभ्यास केला. या अभ्यासातून त्यांचे गुरू बाबां वरती एवढे खुश झाले की, त्यांनी बाबांना "निगमानंद" ही पदवी दिली. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास वेदातील आनंद असा त्यांचा अर्थ होतो. एवढंच नाहीतर भगवद्गीतेवरील त्यांचे प्रभुत्व एवढे होते की, एका पाश्चात्त्य व्यक्तीला भारतीय अध्यात्माने वेड लावावे. भगवद्गीता इंग्रजीतून शिकण्यासाठी बाबांच्या गुरुंकडे त्यांनी अट्टाहास धरला. बाबांच्या गुरूंनी मात्र निगमानंद इंग्रजीतून भगवद्गीता शिकवतील असा आदेश बाबांना दिला. इंग्रजीचे कसलेही ज्ञान नसताना त्या परकीय नागरिकाकडून इंग्रजी शिकून भगवद्गीतेचे भाषांतर इंग्रजीमध्ये सांगावे, ही एवढीच सरळ आणि साधी गोष्ट नव्हती. नंतर बाबांचे इंग्रजीवरील प्रभुत्व परिसरातील सर्व नागरिकांनी अनुभवले. एवढेच नाही तर बाबांनी या अंधकार मय परिसरामध्ये ज्ञानरूपी वटवृक्ष लावण्याचे कामही केले. श्री निगमानंद विद्यालय निमगाव येथे 1986 च्या नंतर विद्यार्थ्यांना इंग्रजी सुद्धा शिकवली ही वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. हे वास्तव चित्र तत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी अनुभवणे, हे त्या विद्यार्थ्यांचे भाग्य!


हिमालयातील योग साधनेनंतर  शिक्षण पूर्ण करून बाबा आपल्या मायभूमीकडे परतले. प्रथम  त्यांचे आगमन सिंदफणा आणि किंवा नदीच्या संगमेश्वर मंदिरामध्ये झाले .  जटाधारी साधकाला भेटण्यासाठी सर्व परिसर उन्मळून पडला. गावातील प्रतिष्ठित आणि जुन्या लोकांनी बाबांची ओळख पटवली गेली." अरे हे तर आपले सिताराम बुवा!" बाबांचे आगमन हे त्या परिसरासाठी एक परिवर्तनशील स्थित्यंतर होते. एका भक्ताचे मायंबा वरती आगमन हे सर्वांसाठी आनंददायी आणि प्रेरणादायी होते.  बाबांच्या मनामध्ये चाललेली मनाची घुसमट मात्र थांबता थांबत नव्हती. मायंबा वरची पशुहत्या त्यांना सहन होत नव्हती. म्हणून त्यांनी या पशुहत्या वरती आपले अस्त्र उगारले. मायंबा वरची पशुहत्या ही सर्व परिसरातील लोकांना पचनी पडायला खूप वेळ लागला. परिसरातील बहुतांश विनाशकारी लोकांना पशुहत्या बंदी आवडली नाही .  बाबा मधील इच्छा शक्तीपुढे कोणतीही अघोरी शक्ती टिकू शकली नाही . शेवटी मात्र मायंबा वर पशुहत्या बंद केली आणि बाबांनी त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाच्या निवासस्थान म्हणून भीमसिंह महाराजांच्या हस्ते दत्त आणि मच्छिंद्रनाथ मंदिराची उभारणी केली. अध्यात्मिक शक्ती द्वारे बाबांनी कबीर पंथी एकतारी भजन याद्वारे निर्व्यसनी आणि माळकरी भक्तगण निर्माण केला. त्याकाळी ,"वाजेल टाळ तर पडेल काळ."  अशा अंधश्रद्धा विरोधी मोहिमा त्यांनी खंडित केल्या. बाबा प्रत्येक वाईट गोष्टींना विरोध करून चांगल्या सवयी समाजामध्ये रुजविण्याचा प्रयत्न करत होते. परंतु काही चांडाळ चौकटी करणारे लोक बाबांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष विरोध करत होते. कधी कधी बाबा एवढे हतबल होत असत की, त्यांना असे वाटे," परत आपण हिमालया मध्ये जावे. " गुरु असणारे वामनभाऊ महाराज त्यांना आठवत वामन भाऊ महाराज म्हणत ,"आपणास असे करून कसे चालेल, आपले आगमन या परिसर उद्धारासाठी झालेले आहे . त्यामुळे आपण परत जाऊ शकत नाही." तेव्हा मात्र बाबांमध्ये एक वेगळीच स्फूर्ती निर्माण व्हायची आणि बाबा पुन्हा नेटाने धार्मिक कार्याच्या कामाला लागत. शेवटी देवाचा अंश ना ते !कधीही थकले नाहीत. अविरतपणे भजनाच्या माध्यमातून एक- एक भक्त जोडत गेले. पुढे चालून  वारकरी संप्रदायाची पताका त्यांनी हाती घेतली पंढरपूर ,आळंदी आणि पैठण अशा दिंड्या सुद्धा जाऊ लागल्या. हजारो लाखो, वारकरी, वारकरी संप्रदायामध्ये जोडला गेला. पंढरपूर आळंदी आणि पैठण या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून , त्याठिकाणी मोठमोठे भक्तनिवास उभारले. या फक्त निवासामधून सर्व वारकरी संप्रदायाला धार्मिक ठिकाणी गेल्यानंतर आश्रय मिळाला ही बाबांची पुण्याई.


संत ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्यांसाठी अर्थात बहुजनांसाठी ज्ञानाची द्वारे ज्ञानेश्वरी द्वारे खुली  केली.  तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची निर्मिती झाली . संत तुकाराम महाराजांनी तर त्यामध्ये एक नावीन्य आणि नवचैतन्य निर्माण केले. जवळपास आपल्या 5000 अभंगांमध्ये सर्व जनतेला ज्ञानदान केले आणि तोच ज्ञानदानाचा मार्ग बाबांनी  आपल्या कार्यातून समर्थपणे पेलला. सर्व परिसरातील लोकांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. आज मच्छिंद्रनाथ गड येथे बाबांच्या हातून निर्माण झालेले स्वर्ग रुपी स्थान या ठिकाणी उभारले गेले आहे. बाबांच्या वैकुंठ गमनानंतर गडाची यशस्वी परंपरा स्वामी जनार्दन महाराज पार पाडत आहेत.  ब्रह्मलीन निगमानंद महाराजांनी गडावर आलेल्या प्रत्येक भक्ताची विचारपूस करावी त्याची अडचण समजून घ्यावी आणि त्या समस्येची निरूपण करावे ही भक्त गणांसाठी एक आगळीवेगळी नांदी ठरत होती. बाबांनी या गडाच्या माध्यमातून लाखो वारकरी निर्माण तर केलेच परंतु , महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजलेले  ख्यातनाम गायक व कीर्तनकार सुद्धा निर्माण केले. 


आज बाबा आपल्यात नाहीत. पण त्यांनी निर्माण केलेल्या धार्मिक वारकरी गड व शिक्षण संस्थांच्या माध्यमातून ते आपल्यात सदैव विचाराने आणि आशीर्वादाने सोबतच आहेत . याची जाणीव प्रत्येक क्षणी होते .त्यांनी निर्माण केलेल्या शिक्षण संस्थेतून हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत .मोठ्या पदापर्यंत पोहोचलेले आहेत. मुलींचे शिक्षण हे बारावीपर्यंत होत आहे. काही मुली सुद्धा नोकरी करताना दिसत आहेत. हे फक्त बाबांच्या दूर दृष्टिकोनातून सिद्ध होत आहे . समाजाला विकसित करण्यासाठी, शिक्षण किती महत्त्वाचे आहे?  हे बाबांना माहित होते. म्हणून, त्यांनी शिक्षण गंगा दारोदारी पोहोचवली. ती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून. शैक्षणिक क्षेत्राबरोबर आध्यात्मिक क्षेत्राकडे ही त्यांनी आपला भर दिला. आळंदी सारख्या पवित्र ठिकाणाहून संस्कृत शिक्षण दिले जात आहे. भरकटलेल्या मनाला एकाग्र करण्यासाठी अध्यात्माची आवश्यकता आहे. हे बाबांनी ओळखले होते. म्हणून त्यांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच आध्यात्मिक क्षेत्राकडे सुद्धा खूप लक्ष दिले.

देव म्हणजे आहे तरी काय ? एखाद्याचा पाठीवरती हात असणे, आणि एखाद्या संकटावर मात करणे. तोही देवच ! एखाद्याचा पाठीवरती हात नसणे आणि बिकट परिस्थितीतून मार्गक्रमण करणे. अर्थात स्वयंस्फूर्तीने स्वतःतील चेतना जागृत करणे, तोही देवच ! एखाद्याच्या शाब्दिक आधाराने अस्थिर मनाला स्थिर करणे, तोही देवाच ! या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी मिळणे त्यालाच संत म्हणतात. या संतांचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे, तोही देवाच!  देवाचा अनुभव आणि अनुभूती ही वेगवेगळी असू शकते .सार मात्र' यश' हाच आहे.  हाच अनुभव बाबांच्या सानिध्यातील भक्तगण घेत असावेत. म्हणूनच नांदेवाली याठिकाणी ब्रह्मलीन निगमानंद महाराजांचे भव्य मंदिर उभारले गेले आहे. त्यामध्ये मनाला मोहीत करणारी मूर्ती एक आगळेवेगळे आश्चर्य. गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथे सुद्धा मोठ्या आनंदी उत्साहाने तळणेवाडीकर बाबांची मूर्ती प्रतिष्ठापना व मंदिर उभारणी करत आहेत. ही बाबांवर असणारी त्यांची श्रद्धा आणि भक्ती होय . मंदिरातील मुर्त्या पाहिल्यावर आपल्या असे लक्षात येतं, त्या मूर्तींची कीर्ती खूप असते . समाज विकासित व्हावा, त्याचे भले व्हावे ही प्रांजळ भावना त्या संतांच्या ठायी असते.  त्यासाठी त्यांना अनेक समाज कंटक यांच्याशी लढा उभा करावा लागतो. तोही अहिंसा ,अध्यात्मिक शक्ती द्वारे .परंतु, हे परिवर्तन इथे सहज आणि सरळ सोपे नसते. त्यासाठी त्यांना अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. समाजाकडून होणारा त्रास सहन करावा लागतो. तोही समाजाच्या भल्यासाठी! हे विशेष . तेव्हा कुठे त्यांना देवत्व प्राप्त होते. अशा या महान संतांच्या चरणी नतमस्तक होतो .जय निगमानंद!

लेखक :: डोंगरदिवे राहुल रामकिसन