बुधवार, ३१ मार्च, २०२१

Covid-19 : Man made calamity


  Covid-19 : Man made calamity


Calamity has two types natural calamity and man-made calamity. Natural calamity everyone can understand and no more question on that. Because everyone knows about the reasons for the natural calamity. Things to do that opposite of nature, a lot of Times nature gives us instructions happening known and unknown things that are not comfortable with existence. That's scare we could not compare any other disaster. Natural calamity has no mercy, no excuse and no substitute only the scare where only death & death & death!... 

According to this pandemic disease, the whole world worried about unique disease. That is related to the human being. It's from Wuhan City in China. Micro size virus comes up and spread all over the world. At first from Wuhan to  Europe that was a huge threat. Western countries were under pressure of unique virus disease. During this pandemic disease, many more questions arose in scientists and doctors mind. No one can dare to treat them, because a lot of rumours spread out do's and don'ts. Everyone confused and think about, what to do? a lot of questions, how to treat and cure the patient? During this pandemic disease breaking news coming up. A lot of videos viral all over, understanding -misunderstanding and some mistakes made it hard to chase it. Unique illusion all world going to deep consideration on the unknown scare. In those days none can do that, how to identify the unique symptoms? similar to regular cold flu. Everyone is afraid about the common cold flu too. Many more patients were taking full of burden and passed away. It was happening just seeing the news, precautions,  new research and spreading rumours. 

Nowadays this scare completed 1 year and more, but the perfect solution is no more.  because scientists Researchers  find out many more covid-19 strains, that's why it becomes critical to get the final solution. the covid-19 virus changes its shapes in everybody. It is attacked on those human bodies, where already ruled chronic disease. And that patients condition becomes more critical. Covid-19 capture the whole world but that threat is not present. Everyone's mentality becomes bold and faces the disease. No more rumours, that set. 

This condition comes up from the ego of human being and the desire for dominance. From the ancient period imperialism grown up like a banyan tree. Western countries have forwarded this step, that's why many more historical incidents happened in the world. This situation got the worst effect on the ground. Competition grows and grows now it becomes, who is the Great? To prove itself that everyone making unique weapons. Just like an atom bomb, bacteria and virus. This is the new method of weapons to attack enemies. If we think that is the reality that is essential for those countries. who are interested in world peace to support good things and avoid bad things. 

Today this competition gets disaster and worried about the future. We are great!....this is not significant but we are the same and we have the right to live freely with peace. This is the essence of human beings. This young generation dream of flying cars, habitats on the Mangal planet. To research on such type of unique study to develop with new criteria they don't know Where are they going? I think they are going to finish themselves. Because of the competition of making some unique weapons to beat others.  This type of thinking and implementation of on the ground made horror. 

Through this condition, man made a lot of unique weapons to show the strategy status. Developed countries also made this type of dangerous weapon a covid-19 kind of that weapon. Some countries are also fingered at Wuhan City China but China denies that claim. This is the new issue of international political drama, let it be but this making new viruses are declining the human being and its existence. World's every Nation Wanted to peace but none can try to do for that. This is just like that a good orator delivered a good speech following nothing. So I think every Nation wanted to be a good orator implementation and the follower are empty mind. And all of you  know, "Empty mind is satans house." That satan plays bloody tricks.

After the Second World War side effect of the used atom bomb on Nagasaki and Hiroshima was so dreadful. That event was so dangerous and harmful for a human being. United Nations made some rules and regulations worked for stop  Atom Bam. The permanent members are trying to dominance that Institute. This strategic point convert into a cold war convert into a bacteria and virus war futuristic war would be bacteria or virus it's hundred times dangerous than the atom bomb. Some scientists predict about the world, the whole world would be demolished itself. Behind that, the reason is not nature but man will make the reason himself.

After all, Consequences are not good.  Weapons of mass destruction are not safe to us because one day will become this Weapons of mass destruction will be demolished ourselves this is nature's law. Stop the research and making some type of Weapons of mass destruction just like an atom bomb, bacteria( war), and Virus (war). This is not today's need. In the world, a lot of countries and human beings are worried about their bread and butter. A lot of children have many more problems they are going through blindness handicapped and physical problems so we must solve their problems try to do something about them. Many more little children are stuck in the terrorist moment. A lot of countries are struggling with Naxalites. Come together discuss do for that with trust and then see the magic of National and international integration then see the magic of sympathy and love problems may be created creating problem has some solutions try to find out the best and the solution must be ahead after solution there is no problem. 

If each and everyone wanted to peace in their life or worldwide, can't do anything it doesn't matter, but you do it just, 'live and let live!'


        Writer#Rahul Dongardive. 




मंगळवार, ३० मार्च, २०२१

कोरोनामुळे शैक्षणिक नुकसान

कोरोनामुळे शैक्षणिक नुकसान



 एक वर्ष उलटून गेले. कोरोनाच्या संकटावर पाहिजे तितकं नियंत्रण मिळवता आलं नाही. जगातील प्रत्येक राष्ट्र  कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडत आहे. प्रत्येक राष्ट्राने याच्यावर वेगवेगळ्या लस निर्माण केल्या. त्याचे लसीकरण  अत्यंत जलद गतीने जगभर सुरू आहे. भारतासारख्या देशाने तर लस निर्माण करून इतर देशांना वितरितही केली. प्रत्येक  राष्ट्रने या लसी वर विश्वास ठेवून, त्याचे लसीकरण सुरू केले. धावपळीच्या काळात लॉकडाऊन मुळे अनेक संसार उघड्यावर पडले, भुकेने भुकबळी गेले, अपघाताने रस्त्यावरती मजूर मेले. मोठमोठ्या शहरांमध्ये तर मृत  लोकांचे आकडे सुद्धा बाहेर आले नाही. अशा प्रकारची दयनीय अवस्था कोरोनाने करून ठेवली. गोरगरिबांचे जिने तर सोडाच त्यांना जीवन जगणे सुद्धा अवघड झाले. दोन वेळचे जेवण सुद्धा त्यांना मिळत नाही. अशा अनेक प्रकारच्या व्हिडीओ क्लिप सुद्धा व्हायरल होताना आपण पाहिल्या. लाखो लोक आपल्या दैनंदिन समस्यांशी लढत आहेत. वैयक्तिक दुःख कोणाला सांगावे? कोणाला नाही? दुःख ऐकणारा परमेश्वरच कुठे जाऊन बसला? असे नानातर्‍हेचे प्रश्न लोकांच्या मनामध्ये आज रेंगाळताना दिसतात. सर्वधर्म किंबहुना श्रद्धास्थाने पोकळ आशेने आशावाद जागवताना दिसत आहे. प्रत्येकाची  श्रद्धा मात्र अपार आहे. श्रद्धेपोटी माणूसच सकारात्मक दृष्टिकोनातून जीवन जगताना दिसतो आहे. 

कोरोना आला जगामध्ये हाहाकार ही माजवला, सर्वांना वेठीस पकडून कासावीस करून सोडले. भयंकर असणारी ही महामारी मानवाच्या जीवावर बेतली. पण ..ज्यांचं आयुष्य सुरू व्हायचं होतं, त्यांच्या जीवावर सुद्धा बेसुमार पणे आग ओकत आहे. पूर्व प्राथमिक , प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी, पदवीत्तर इत्यादी शिक्षणावर मात्र गदा टाकली गेली. शैक्षणिक नुकसान कधीही न भरून निघणारे आहे. मोठ्या मुलांचा प्रश्न थोडा निराळा आहे,ते समजूनही घेतील- आपत्ती सुरक्षितता. परंतु, जी बालवयातील मुले आहेत,त्यांचा प्रश्‍न थोडा गंभीर होतो आहे. छोटी छोटी मुलं शाळेमध्ये जाण्यासाठी उत्सुक होती. तिच आज शाळेत जायला नको म्हणून भितात. शाळा म्हटलं की कोरोना रोग त्यांना भयंकर वाटतो. शाळेच्या बाबतीत त्यांची अवस्था एखाद्या लाजाळू वनस्पती प्रमाणे झाली आहे. शाळेच्या बाबतीत घोर निराशा त्यांच्या मनात निर्माण होत आहे. ज्या ठिकाणी सुसंस्कार आणि त्याचे संगोपन पाहिजे, त्या  ठिकाणी मात्र भीतीने जागा घेतली. जगातील सर्व शिक्षण व्यवस्था अडखळली. 


भारतासारख्या विशाल लोकशाही शासन व्यवस्था असणाऱ्या देशात, दहावी-बारावी आणि पदवी-पदव्युत्तर शेवटच्या वर्षाच्या परीक्षा होऊ घातल्या. पूर्व प्राथमिक, प्राथमिक,माध्यमिक व इतर वर्गातील विद्यार्थ्यांना प्रमोशन देऊन, आर.टी. ई. अँक्ट 2009 कलम 16 नुसार पुढील वर्गात प्रवेश देण्यात आला. कोणताही अभ्यास न करता विद्यार्थी पास होऊ लागले. हा या समस्येवर तोडगा असला तरी, तो समस्येवरील उपाय नाही. तंत्रज्ञानाच्या मदतीचा वापर करायचा ठरवल्यास प्रत्येक ठिकाणी तंत्रज्ञान पोहोचलेले आहे असे नाही.जर पोहोचलेले असले,तर त्याचा वापर प्रत्येकालाच करता येईल, असे नाही. ही एक शोकांतिकाच आहे. यावर उपाय एकच,  कोरोनाचा  कहर कधी संपेल ? आणि सर्व काही सुरळीत होईल. 

 शैक्षणिक नुकसानीचा अलेख पाहिला तर हा चढता आहे.  संख्यात्मक शिक्षणाला महत्व देण्यात येत आहे. कारण त्याशिवाय गत्यंतर नव्हते. संख्यात्मक वाढ झाली. परंतु गुणात्मक वाढ कधी होणार? गुणात्मक वाढही कायमस्वरूपी त्याठिकाणी संपली. असेच म्हणावे लागेल. ऑनलाइन शिक्षणाची सुविधा आणि त्या सुविधेचे परिणाम कसे झाले ? हे सर्व जगाने पाहिले. शहरी भागात ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम हा चांगला दिसून आला. परंतु, हा परिणाम ग्रामीण भागात चांगला नव्हता. आपला निर्णय काही ठिकाणी योग्य असू शकतो, पण..परिपूर्ण नाही. 



पूर्वप्राथमिक किंवा प्राथमिक  शिक्षणाच्या पहिल्या वर्गात जाणारे विद्यार्थी परत त्या वर्गात जाऊ शकतील, अशी शाश्वती देता येत नाही. एखाद्या वर्गात कॉम्प्रोमाईज करण्याचा प्रयत्न केला, तर आयुष्यातील पुढील एक वर्ष कायमचे गेले. आपल्या आयुष्याचं गणित जरी असलं, तरी पुढील येणारी परिस्थिती कशी राहील ? याची शाश्‍वती कोणीही देऊ शकणार नाही. आयुष्याच्या या गणितामध्ये आयुष्य राहील किंवा नाही याची हमी कोण देईल ? सकारात्मक पाहिले तर, उज्वल भविष्य असेल. हा गंभीर विषय थोडासा बाजूला ठेवून विचार करूयात. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना प्रमोशन दिल्याने त्याचा वर्ग पुढे जाईल. परंतु, त्या इयत्तेतील अभ्यास अधूराच राहिल. पहिली ला फक्त ॲडमिशन झालेला विद्यार्थी डायरेक्ट दुसरीत चालला त्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार काय असेल? पाचवी पर्यंतचे शिक्षण किती अमूल्य असते ? याची जाण सर्व शिक्षण तज्ञांना आहे. यावर निर्णय कोणता होईल हेही सध्या तरी सांगता येत नाही. पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रमोशन द्यावे की नाही ? या प्रश्नाचे उत्तर मात्र अनुत्तरीतच. 

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाची तीच बोंब. फक्त दहावी आणि बारावीच्या परीक्षा घ्यायच्या नववी अकरावी वर्गाचे काय? अशा प्रश्नांची विचार विमर्श होत असताना, केंद्र सरकारने, केंद्रीय स्तरावरील दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. केंद्राच्या या निर्णयाचा विचार करून,  इतर राज्याबरोबर  दहावीपर्यंत परीक्षाच नको, अशी भूमिका घेऊन  दहावीच्या परीक्षा महाराष्ट्र सरकारनेही रद्द केल्या .अशा अनेक समस्या निर्माण होत आहेत. परीक्षेशिवाय प्रमोशन हे विद्यार्थ्याला स्वतः पचनी पडत नाही. याचे गंभीर परिणाम आपणास निट, जी, आय टी, आयआयटी किंवा तत्सम इतर परीक्षा यामध्ये सामान्य वर्गातील मुले पास होताना दिसली नाही. मार्गदर्शनाअभावी त्यांच्या जीवनक्रमाचा क्रम बदलून गेला. परीक्षा शिवाय मी पास होऊ शकतो, ही संकल्पना म्हणजे गतकाळातील विद्यार्थ्याचे दिवास्वप्नच! आज कोरोना आपत्तीने साक्षात उतरवले आहे.विद्यार्थ्याचे ज्ञानार्जनाचे काम अपूर्णच आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनातील टर्निंग पॉईंट म्हणून या वर्गाकडे पाहिलं जातं. जीवनातील हा टर्न जर पूर्णतः ब्रेक होत असेल, तर यां नुकसानीस कारणीभूत फक्त कोरोना महामारी. आजचा असणारा विद्यार्थी, भविष्यातील त्यांच्या पाल्यांना  सांगण्यासाठी कथाच होईल. यापेक्षा वेगळं काय असू शकतं. 

पदवी , पदव्युत्तर पर्यंत विद्यार्थी उच्च माध्यमिक शिक्षणाचा टर्निंग पॉईंट  चुकल्यानंतर उच्च शिक्षण आणि मोठ्या पदावर जाण्याची स्वप्न पाहत असतो. हजारो लाखो विद्यार्थी त्यामध्ये यशस्वी होतात. कोऱोनाने येथेही घात केला. गतवर्षी अक्षरशः पदवी आणि पदव्युत्तर च्या शेवटच्या वर्षाचे परीक्षा विद्यापीठाकडून ऑनलाइन घेण्यात आल्या. यामध्ये अनेक विद्यार्थी 'ए प्लस' श्रेणी पास झाले. गोष्ट अभिनंदनीय आहे.पण..खरंच गुणात्मक आहे का? असा प्रश्न निर्माण होतो . उच्च शिक्षण घेऊन मोठमोठी पदे धारण  करत असताना, खरोखरच न्याय मिळेल काय?  अर्थातच शैक्षणिक क्षेत्राला मोठी खीळ कोरोनामुळे बसली. कोरोना चा फटका शैक्षणिक क्षेत्राला जबरदस्त बसला. 

स्पर्धा परीक्षा मध्ये एज बार होत असताना विद्यार्थी निराशेने आपल्या भविष्यामध्ये डोकावत आहेत. आयुष्यभर केलेल्या यशाची तयारी covid-19 ने संपवून टाकली. गत वर्षापासून अनेक विद्यार्थी या परीक्षेची वाट पाहत होते . शासनाने सुद्धा या परीक्षा मागे पुढे ढकलत आजपर्यंत आणल्या. मार्च 2021 मध्ये मुहूर्त सापडला. परीक्षा घेण्यात आल्या . पोस्टिंग कधी मिळणार यासाठी, त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये किती दिवस जातील? याचीही हमी नाही. यूपीएससी च्या  क्षेत्रातही तेच झाले. एकही क्षेत्र नाही ज्या ठिकाणी शिक्षण क्षेत्राचे नुकसान झाले नाही. शतकातील सगळ्यात मोठा घात शिक्षण क्षेत्रावर झाला. अर्थातच भविष्यातील तज्ञ, सुज्ञ,शिल्पकारांवर घात झाला, हे कधीही न भरून येणारे नुकसान.

कोरोना ही मानव निर्मित जागतिक आपत्ती जरी असली, तिचा सामना तर करावाच लागेल. सामना करत असताना फायदे आणि तोटे दोन्ही बाजू आपण लक्षात ठेवायला हव्यात. झालेली शैक्षणिक नुकसान हे एक प्रकारे  मानवी विकासातील सगळ्यात मोठी हानी आहे. याचा पश्चाताप करत न बसता वास्तविक जीवनातील समस्या  समजुन घेऊन भविष्यातील यशोशिखरे काबीज करण्यासाठी प्रयत्नशील राहायला काहीच हरकत नाही . वास्तवातील जटिल परिस्थितीतून अनेक मोठ्या विभूती निर्माण होणार नाहीत कशावरून. सातत्य चिकाटी आणि कठीण परिश्रम करण्याची जिद्द आपल्यात असल्यास, कोणतेही शिखर पादाक्रांत केल्याशिवाय ही पिढी स्वस्त बसणार नाही. असा अटळ आत्मविश्वास मनामध्ये निर्माण होतो. समस्येवरही खात्रीशीर इलाज शास्त्रज्ञ शोधतील आणि हा विषाणू समूळ संपुष्टात येईल ही शक्यताही नाकारता येत नाही किंबहुना निर्माण करण्यात आलेली लस याचे सर्वश्रेष्ठ फलित आहे. शिक्षण प्रक्रिया अखंडित राहने ही काळाची गरज आहे. त्याशिवाय प्रगती करणे अशक्य आहे. 

                 WRITER #RAHUL DONGARDIVE

शनिवार, २७ मार्च, २०२१

कोरोना योद्धा

कोरोना योद्धा



कोरोनाचा प्रसार एवढा भयानक होता की,  अख्ख जग थांबलं. याचा अति प्रसार होऊ नये म्हणून प्रत्येक राष्ट्रांनी काही उपाय योजना आखल्या. त्यालाच आपण आपत्ती व्यवस्थापन असे म्हणतो. आपत्ती व्यवस्थापन अंमलबजावणीसाठी ज्या-त्या राष्ट्र प्रमुखांनी सर्व देश लॉकडाऊन करण्यात आला. विमान सेवा  सुरूअसल्यामुळे कोरोना एवढा पसरला. त्याची जाणीव,  तीव्रता आणि भयानक स्वरूप, समोर येण्याअगोदर त्याने सर्व जग व्यापून टाकले. एवढ्या तीव्र स्वरूपाचा विषाणू जगाला भांबावून सोडतो. अशा घटना जगात क्वचितच घडतात. याचे नियोजन आणि प्रसार थांबवण्यासाठी संपूर्ण जग किंबहुना जगातील मानव जात मेटाकुटीला आली. हे सांगणे नवं नाही.covid-19 येऊन एक वर्षे उलटूनही गेले. पण, त्याची दाहकता आणि त्याचे भयानक स्वरूप जगाला या विळख्यातून बाहेर काढेल, असे  स्पष्ट होत नाही. कारण, त्याचे विविध रूपं शास्त्रज्ञाने बाहेर काढली. प्रत्येक रुपाचं स्वरूपही वेगळं, त्यामुळे त्याच्यावर उपचार करणही सध्या तरी  शास्त्रज्ञाच्या आवाक्याच्या बाहेर आहे. असे चित्र स्पष्ट दिसत. जागतिक संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक देशाचे लाखो कोरोना योद्धे जीवाची बाजी लावून अदृश्य असणाऱ्या शत्रूशी लढताहेत, म्हणूनच भयावह असणाऱ्या विषाणूला लगाम लागला आहे. 

 आपत्ती व्यवस्थापन म्हणून शासनाने आरोग्य विभाग, पोलीस विभाग आणि शिक्षण विभाग यांना कोरणा योद्धा म्हणून बाहेर काढले. डॉक्टर्स, नर्स, इतर स्टाफ यांनी स्वतःला मृत्युच्या दाढेत ढकलून कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले. पंधरा-पंधरा दिवस महिना-महिना घरदार सोडून दवाखान्यातच मुक्काम ठोकला. दवाखान्याची ड्युटी करून पुन्हा पंधरा दिवस विलगीकरण कक्षामध्ये राहिले. डॉक्टर्स नर्स त्यांच्या राहण्याची सोय सुद्धा दवाखान्यामध्ये व्यवस्थित नव्हती. त्यांच्या व्यथा आपण सर्वांनी ऐकल्या आहेत. ज्यांची मुलं मोठी होती त्यांचा काही प्रश्न नव्हता. काही मुलं तर खूपच लहान होती .  डॉक्टर्स नर्स यांचे काय हाल झाले असतील? त्याचा विचार करणं खूपच कष्टदायक आहे. अशीही एक नर्स पाहिली की, तिच्या मुलीला बाहेरुनच आई दाखवण्यात आली . तिचा टाहो डोळ्यासमोर तरळत आहे. ड्युटी करूनही पंधरा-पंधरा दिवस भेट होत नाही. याचे दुःख त्या मातेपेक्षा- वडिलांपेक्षा त्या लहान मुलांना विचारलेले बरे . कारण त्याची कल्पना आपण नाही करू शकत. 

कोरोना वॉर्डमध्ये शक्यतो कोणी ड्युटी करायला तयार होत नसे, शेवटी शासन आदेशही सक्तीचे होते.त्यामुळे ड्युटी करणं तर भागच होते. काही डॉक्टर्स,नर्स ने स्वच्छेने पुढाकार घेतला. त्याच शासन स्तरावरच सामाजिक स्तरापर्यंत  कौतुकही करण्यात आलं. त्यांचा मान सन्मान ही राखण्यात आला. मीडियानही त्यांना चांगली प्रसिद्धी दिली. पण..एखाद्या  डॉक्टर किंवा नर्स चा मृत्यू झाल्यानंतर मात्र त्या कुटुंबाची दखल घेण्यात आली का ? असा प्रश्न मनाला सतावतो.नामवंत डॉक्टर, नर्स यांचा बळी गेलेला आपण सर्वांनी पाहिले. एवढंच काय तर अनेक पत्रकारांचा कोरोनामुळे  बळी गेला .त्यानंतर त्या कुटुंबाची काय वाताहत झाली,हे शब्दात सांगणे तर कठीणच आहे. परंतु, त्या भावना ही व्यक्त करता येत नाहीत. कारण ,त्यांना विमा मिळालाही असेल,समोर ते कुटुंब उध्वस्त झाली.ते कुणीही नाकारू  शकत नाही. 

Covid-19 चा पेशंट सापडल्यानंतर त्याचं ट्रेसिंग केलं जायचं,सापडलेल्या त्या रुग्णावर  लक्ष ठेवण्याचे काम  नर्स आणि डॉक्टर यांनी केल. सुरुवातीला यावर उपचार हे नव्हते. डॉक्टर जीवाची बाजी लावून लक्षणांवरून औषध उपचार करत होते. कुठे यश येत होतं तर कुठे अपयश यायचं. covid-19 मे अनेक लोकांचे बळी घेतले. लाखो लोकांचे संसार उघड्यावर आले. घरातील कर्ता गेल्यावर त्या कुटुंबाची कशी अवस्था होते? त्या कुटुंबाला सामाजिक कोणकोणत्या अडचणी येतात? एकेकाळचे सदन कुटुंब आज तुटपुंज्या  मदती वरती जीवन जगत आहे. वैभवाच्या फक्त आठवणी त्यांच्या डोळ्यासमोर येतात आणि तेच डोळे आज पाणवताना दिसतात. कोणा एक पहिला रुग्ण बरा झाला त्याला डिस्चार्ज देताना, एखाद्या सासुरवाशिणीला माहेरी जाताना जो आनंद होतो, तो आनंद देण्याचा प्रयत्न याच डॉक्टर आणि नर्स यांनी दिला. हातात गुलाबाचे फुल, वाजत गाजत त्याची रवानगी त्याच्या घरी करताना या लोकांनी कधीही जिवाची पर्वा केली नाही. टाळ्या वाजून त्याला घरी पाठवले. आनंद आपल्याला दिसत होता.परंतु, तो आनंद व्यक्त करत असताना त्यांच्या आनंदावर विरजन होतं. हेही आपल्या लक्षात ठेवायला हवे. रुग्णालयातील या लोकांची कोणीतरी घरी वाट पाहत होतं. ती त्याची बायको होती, पती होता ,आई वडील होते, लहान लहान मुलं होती, हा त्याग त्या पाठीमागे होता. म्हणून,रुग्णालयातील रुग्ण उपचाराने बरा होत होता. रुग्णा वरती उपचार करत असताना अनेकांचा बळी गेला. त्या घरात कधी आनंद दिसलाच नाही, ही करून काहिनी आपल्या स्मरणात राहील काय? 

हॉस्पिटल मधील लोकांचे कार्य अविश्वसनीय, अतुलनीय, अकल्पनिया आहे. यावरती विचार करताना या लोकांचा बळी आणि त्या लोकांचे योगदान वाखानण्याजोगे आहे. याला साथ देण्यासाठी पोलीस विभाग कोठेही पाठीमागे नव्हता.भर रस्त्यावर ती जनसंपर्कात जाऊन लोकांना त्यांच्या जीवाचे महत्त्व अनेक पोलीस दादांच्या गाण्यातून आपण ऐकले आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे नियम कडक असतात . नियमांची पायमल्ली झाल्यास पोलीस प्रशासन सतर्क होते.कधी कधी त्यांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. यात ते काही दुश्मनीचा बदला घेत नव्हते.परंतु, आपल्या जिवाच्या रक्षणासाठी  तुम्ही घरात राहा हा संदेश देत होत. पोलिसांनी विनवण्या केलेले सुद्धा व्हिडीओ खूप व्हायरल झाले.मग वर्दीतील सगळेच वाईट किंवा चांगले तर्कवितर्क कशाला. त्यांची भूमिका रस्ता आणि कायदेशीर होती. शेवटी विनंतीला मान न दिल्यास प्रशासनातील योग्य त्या कलांचा अविष्कार होता ना तुम्ही आम्ही सर्वांनीच पाहिलं.भारत बंद झाला . राज्य बंद झाली.जिल्हा तालुके गाव खेडी सर्व बंद झालं. हे बंद करण्यासाठी पोलीस प्रशासनाचे पाहिजे तेवढे धन्यवाद द्यायला कमीच पडतील. 

मोठमोठ्या शहरांमध्ये पोलीस विभागाचे अनेक पोलीस कोरणा युद्धामध्ये बळी गेले. परंतु,पोलीस दादा कधीही डगमगला नाही.  त्याने सदैव जनसेवे मध्ये समाधान मानले. ह्या न दिसणाऱ्या covid-19 शी मोठ्या जोमाने लढा दिला. आपत्ती व्यवस्थापनामध्ये अशी कल्पना केली की, जर पोलिसदादा नसता तर लॉक डाऊन शक्य होते का ? त्याची उत्तरे सहज मिळेल ना! यावरून पोलिसांचे महत्त्व किती आहे, हे लक्षात येते. असं म्हणतातना,सगळेच वाईट नसतात आणि सगळेच चांगले ही नसतात . म्हणजे चांगले आहे ते घ्यायला काय हरकत आहे. पोलीस दादा एक रक्षकच म्हणावा लागेल. 

आरोग्य विभाग आणि पोलीस विभाग यांचे कर्मचारी जेव्हा कमी पडू लागले. तेव्हा, या लढ्यात शिक्षण विभागानेही उडी घेतली. हा लढा चालू ठेवण्याचे काम केले. अनेक प्राध्यापक शिक्षक यांनी आरोग्य कर्मचारी आणि पोलीस विभाग यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम केले. डॉक्टर बरोबर शिक्षक टिकला आणि पोलिसांबरोबर ही टिकला दोन्ही विभागाकडून या शिक्षकांना प्राध्यापकांना मानाची वागणूक मिळाली. दोघांमधील दुवा साधण्याचं काम या शिक्षकांनी केलं. हे काम करत असताना ड्युटीवर असताना शिक्षकांचे प्राण तर गेलेच. ड्युटी च्या अगोदर किंवा नंतर घरी पोहोचत असताना किंवा ड्युटीवर पोहोचताना एक्सीडेंट मध्ये गेलेल्या शिक्षकांची नोंद जरा शासनाने उशीरा घेतली. असं ऐकायला मिळालं, ड्युटीवर गेला नाही अर्थात मृत पावला नाही. म्हणून तो विमा धारक होऊ शकत नाही. हा अजब कारभार शासनाने दाखवला. आजच कूटप्रश्न दिसतो आणि कूटनीति दिसते. त्या कुटुंबावर  शोककळा पसरली. त्यापेक्षा भयानक, शासनाने दुर्लक्ष केले , हे सर्वात मोठे दुर्भाग्य! 

दोन विभागाशी शासनाचा व्यवहार आणि शिक्षण विभागाशी अलग व्‍यवहार विचलित करणारा ठरतो. कामामध्ये कसूर करणार, यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. आपत्ती व्यवस्थापनाचा  नियम आहे . पण कर्तव्य बजावत असताना जाताना किंवा येताना तो मृत पावला तर त्यावर प्रश्न चिन्ह निर्माण करणे हा कोणता नियम आहे? 

शिक्षकांचे योगदान कशाप्रकारे होते याची साक्ष देण्यासाठी आरोग्य विभाग आणि पोलीस विभाग आहेच ना! या तिघांनी मिळून लोक डॉन मधील परिस्थिती  योग्यरित्या हाताळली. तिघांच्या समन्वयाने आलेल्या प्रत्येक नागरिकांची नोंद घेण्यात आली. जिल्हयात येणाऱ्यांना जिल्हा बाहेर जाणारे, यांचा तपशील शासनाला योग्य वेळी पोहोचवला. प्रत्येक नागरिकाची कसून चौकशी करण्यात आली. कुठून आला ? कुठे चालला? याचीही नोंद करण्यात आली. आलेल्या covid-19  बाधित प्रवाशांकडून शिक्षक पोलीस आणि आरोग्य कर्मचारी यांना कोरोना झाला. यामध्ये अनेक शिक्षकही मृत पावले. संपर्कात आल्यानंतर या  विभागातील कर्मचाऱ्यांना पंधरा-पंधरा दिवस विलगीकरण कक्षामध्ये राहावे लागले. या ठिकाणी कुसुमाग्रज सहज आठवतात," मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा , पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा" अशी शिक्षकांची किमया. 

डॉक्टर, नर्स ,प्राध्यापक, शिक्षक, अधिकारी या सर्वांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन आहे. वास्तविक पाहता मैदानावर फ्रंट वारियर म्हणून या तीन विभागानं काम पाहिले आहे,पाहत आहे, आणि पाहत राहणार. कारण ,मानव निर्मित आपत्ती टाळण्यासाठी किंबहुना प्रतिरोध करण्यासाठी या मानवालाच उभे रहावे लागेल ,त्याशिवाय गत्यंतर नाही. 

समाज निर्मितीमध्ये शिक्षकांची कार्य अवर्णनीय आहे. कोणत्याही समाजाची निर्मिती करण्यासाठी त्याला योग्य आकार देण्यासाठी शिक्षकांची नितांत आवश्यकता आहे. एक सृजनशील समाज कसा घडवायचा? हे शिक्षकांच्या हातातच आहे. शिक्षकांनी ठरवले तर समाजनिर्मिती सृजनशील होते. आई-वडिलांच्या संस्कारानंतर मुलावर अमूल्य असे संस्कार शिक्षकच करतात. शिक्षण ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये फक्त शिक्षकच नाही, तो घरून निघाल्यापासून शाळेत येई पर्यंत शिक्षण घेत असतो. शिक्षक फक्त त्याच्या स्वप्नांना मार्ग दाखवतात. त्या मार्गाने जायचे किंवा नाही जायचे, हे सर्वस्वी विद्यार्थ्यांच्या हातात असते. विचार प्रभावी असले तर, सर्व विद्यार्थी त्याकडे आकर्षित होतात . आपल्या भविष्याचा वेध घेण्यासाठी तत्पर असतात. याची अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील. सामान्य परिस्थितीतून असामान्य काम करणारे विद्यार्थी आपण पाहतो. 

Covid-19 च्या विषाणू संदर्भात समाजामध्ये समज गैरसमज आहेत. सुरुवातीला बाधित रुग्णांना संबंधी अनेक तक्रारी आल्या. त्याच्याशी गैरवर्तन करण्यात आले.  समज गैरसमज पसरवू नये, हा आजार पूर्णपणे बरा होतो. हे सांगण्यासारखे राहिले नव्हते. सोशल डिस्टंसिंग च्या नावाखाली त्यांच्याशी गैरवर्तणूक होती. पेशंट सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरत होती. नातेवाईकही त्या कुटुंबाशी चांगले वागत नव्हते. कारणही तसेच होते. संपर्कात आल्याने हा रोग होतोच होतो .परंतु , त्यांच्या संपर्कात आलेल्या वस्तूंपासूनही हा रोग पसरतो. यामुळे कोणीही मृत्यूला आव्हान देऊ शकत नव्हते. आपत्ती व्यवस्थापनामध्ये चेकपोस्टवर ड्युटी पडलेल्या कर्मचाऱ्यांचे तर हाल विचाराय सारखेच नव्हते. हात  सॅनीटाईज करून हाताचे सालटेही जात होते. महानगर आणि उपनगरातील गावाकडे आलेल्या प्रवाशांची शहानिशा  झाल्यावर त्याची नोंद करणे आणि लगेचच सॅनीटाईज करणे.  हा नित्यक्रम ठरलेला असायचा. मनामध्ये अनेक तर्क आणि वितरकांचे थैमान घोंगावत असायचं. ड्युटी करून आल्यावर घरात प्रवेश नसायचा. खळखळ  उकळलेल्या पाण्यामध्ये अंगावरील कपडे टाकायचे . चप्पल किंवा बूट ही दुसऱ्या पाण्यात टाकायचे. स्वच्छ आंघोळ करायची, तीही दोन तीन वेळा साबण लावून. नंतर कुठे घरात प्रवेश करायचा.एवढे होईपर्यंत,लहान मुलांनी वाट बघायची. त्यांना सुद्धा या  कोरोना ची जाणीव झाली होती. हा भयंकर विषाणू आहे. जवळ जाण्याने सुद्धा होतो. त्यामुळे बिचारी दुरूनच आपल्या वडिलांचा प्रताप पहायची परंतु बाहेरून आल्यानंतर सहज लाडाने गळ्यात मिठी मारण्याची त्यांची उत्कंठा मनातच मारून टाकत असत , कारण कोरोनाविषाणू. 

असे हे असणारे  कोरोना योद्धे कोरोणाशी लढताहेत.  त्यांच्यामुळेच आज सर्व भारत व जगातील सर्वच कोरोना योद्धे जीव धोक्यात घालून या समाजाचे रक्षण करत आहे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला मदत नको, किमान त्या  कुटुंबाची उपेक्षा करू नका! 


                WRITER #RAHUL DONGARDIVE


बुधवार, २४ मार्च, २०२१

Covid-19 एक दु:खांतिका

 Covid-19 एक दु:खांतिका 



भविष्यातील येणाऱ्या आपत्तीमुळे शास्त्रज्ञ चिंतातुर होताना दिसतात,काही शास्त्रज्ञ तर भाकितही करतात, भविष्यवेत्ते भविष्याचा शोध घेताना अकल्पनीय भविष्य केली जातात, याचा अर्थ भविष्यात खूप मोठे संकट येणार असाच होतो. पृथ्वीतलावर निर्मितीपासून ते आजपर्यंत अनेक प्रकारचे बदल झाले. एखादी सजीवसृष्टी निर्माण होणे आणि ती समूळ नष्ट होणे, हा पृथ्वीचा नैसर्गिक नियम आहे. हा निसर्ग नियम सर्वांना मान्य असेल किंवा नसेल , परंतु बदल हा निश्चित आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 

जगाच्या पाठीवर अशा प्रकारच्या अनेक आपत्ती आल्या. तिचे स्वरूपही भिन्न होते, भयंकर  सुद्धा होते. पूर्वी नैसर्गिक आपत्ती ही सर्वश्रेष्ठ किंवा अंतिम मानली जायची. कारण ,जेव्हा कुठे  नैसर्गिक वैभवावर पृथ्वीवरील सजीवांनी आक्रमण केल्यास प्रलय किंवा प्रकोप हा होतो. असे अंदाज आज आहेत. तत्कालीन परिस्थितीमध्ये जी सजीव सृष्टी निर्माण झाली ती प्रत्येक युगामध्ये बदलत गेली याचे उत्तम उदाहरण आपल्याला डायनासोरचा काळ देता येइल. 

आज मानव या पृथ्वीवर अधिराज्य गाजवत आहे. मानव ठरवतो, पृथ्वीवरील या नैसर्गिक संपत्तीचा वापर आपल्या गरजांनुसार करायचा. मग पृथ्वीची नैसर्गिक साधन संपत्ती नष्ट झाली, तरी चालेल. हा आहे मानव! जगातील प्रत्येक राष्ट्राचा विचार केल्यास आपल्या असे लक्षात येते,जगाच्या पूर्व ते पश्चिम आणि दक्षिण ते उत्तर या सर्व देशांमध्ये मानव आपली बहुतेक सुविधा पूर्ण करण्यासाठी निसर्गावर आक्रमण करतोय किंबहुनां निसर्ग नष्ट करण्याची त्याची सवय आज घातक बनत चालली आहे.अर्थातच ,भविष्यातील मानव जातीचा विनाश होईल की काय? ही शंका मनात येते. 

यातूनच या नैसर्गिक शक्तीला देव संज्ञा प्राप्त झाली. नैसर्गिक शक्ति वरती मानवाकडून मोठमोठी आघात होऊ लागलेले आहेत. यातूनच मानवाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ लागलेली आहेत आणि आज हाच मानव भविष्यातील भाकीत करतो आहे. 

 आपत्तीची सुद्धा दोन प्रकार करण्यात येऊ लागले. एक नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती. नैसर्गिक आपत्ती सजीवांचा समूळ नाश करते किंवा विशिष्ट भागावर भागांवर कोपते.  मानवनिर्मित आपत्ती मात्र स्वतःच स्वतः नष्ट करायला तयार झाली आहे. मानव निर्मित आपत्ती ही भविष्यातील भयंकर संकट आहे. 

मानवनिर्मित आपत्ती, आजची covid-19 जागतिक समस्या बनली आहे. इतिहासामध्ये अनेक प्रकारच्या युद्धांची नोंद केली गेली आहे. पण..असे युद्ध जे आभासी आहे, पण प्रत्यक्षात खरे आहे, याची नोंद इतिहासामध्ये निश्चित केली जाईल. ते म्हणजेच जैविक किंवा विषाणूयुक्त युद्ध ! याच विषाणूचा सामना करण्यासाठी आज सर्व जग नवनवीन औषधांचा शोध घेऊन त्याचा अस्त्र म्हणून वापर करताना दिसत आहे. 

युद्ध म्हटल्यावर सैन्य लागतं पण सैन्य विना युद्ध खेळली जाऊ शकते काय? असा प्रश्न पडणं साहजिक आहे.परंतु, सैन्य विना युद्ध खेळले जाऊ शकते. तेही न दिसणाऱ्या शत्रूवर आघात करण्यासाठी. याची कल्पना जरा कल्पने बाहेरची वाटते नाही का? या शत्रूचा सामना करण्यासाठी उच्चशिक्षित वेल क्वालीफाईड सैन्या लढतांना दिसते आहे. या सैन्याला नावही देण्यात आलं, "कोरोना वारीयर! "

आजची प्रगत -अप्रगत राष्ट्र  न दिसणार्‍या शत्रूशी लढताना, व्याकूळ होताना दिसते. परंतु, 'माणुसकीच्या  शत्रुसंगे युद्ध आमचे सुरु' हा करारीपणा कोणतेही राष्ट्र सोडत नाही.  युद्धामध्ये फ्रंट वॉरियर म्हणून डॉक्टर, नर्स ,पोलीस ,शिक्षक आणि यांच्याकडून काम करून घेणाऱ्या शासकीय यंत्रणा, अहोरात्र झटत आहेत. आपत्ती व्यवस्थापनामध्ये विशेषाधिकारांचा वापर करताना शासन स्तरावर योग्य ती कारवाई केली जात आहे. याशिवाय त्याच्यावर नियंत्रण करणं शक्य नाही.  निर्णय कठोर जरी असले तरी घ्यावे लागतात. कारण,त्याशिवाय मानव जिवंत राहणार नाही. याची कल्पना सर्व जगाला आहे. म्हणूनच अख्ख जग थांबेल,अशी सुविधा या शत्रूनं करून ठेवली आहे. बातम्यांमधील आकडेवारी पाहता भारतच काय सर्व जग चिंतातूर होताना दिसते आहे. यावर एकमेव उपाय आणि तो म्हणजे लॉकडाउन. 

डिसेंबर 2019 पासून जगात अनेक प्रकारे लोक डाऊन करण्यात आले. कधी पूर्ण कडक  लॉक डाऊन ,तर कधी वीकेण्ड लॉकडाउन. पाश्चिमात्य राष्ट्रांची अवस्था तर  पाहण्यासारखी नाही. तेथील मनाला हेलावून टाकणारी दृश्य,आजही डोळ्यासमोर तरळतात. त्यानंतर जगभर पसरलेली भयावह भीती, किती क्रूर?  याचा अनुभव आज जगत असलेल्या सर्वांनीच घेतला, यामध्ये लाखो लोकांचा बळी  गेला, घरातील कर्ता माणूस गेल्यावर त्या संसाराची वाताहत कशी होते. याची अनेक उदाहरणे  जगात यावरून  पाहायला मिळाली. अगोदर युरोप,आफ्रिका,अशिया खंडांमध्ये लॉकडाउन पडत गेले . जगभर हा हा कार मजला. सर्वजण जीव मुठीत घेऊन बसले. जगाला कळून चुकले होते, धनदौलत काही कामाची नाही जीव महत्त्वाचा आहे. यावर उपाय म्हणून प्रत्येक देशाच्या शासनकर्त्यांनी उपाययोजना म्हणून आपत्ती व्यवस्थापनाचे नियम लागू केले. 

जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा भारत लॉकडाऊन नंतर  नंतर पूर्णपणे शांत झाला. पंतप्रधानाच्या हाकेला साथ  देत भारत बंद झाला.आर्थिक चक्रे तर थांबले. लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला . स्वयंसेवी संस्था सामाजिक कार्यकर्ते लॉकडाउन डाउन शिथील नंतर राज्यांतर्गत होणारे स्थलांतर आणि या स्थलांतरितांना अन्नदानाचे काम मोठ्या जोमाने सुरू झाले. पण यामध्ये एखादा  कोरोनाचा रुग्ण  निघाला तर त्याची ब्रेकिंग न्यूज नॅशनल चैनल वरती  झळकायचे. त्यानंतर ते गाव,तो परिसर , ती गल्ली , तो मोहल्ला शील केला जायचा.  रुग्ण निघालेल्य आसपासचा परिसर ग्रामीण भागात पाच किलोमीटर पर्यंत  झोन म्हणून प्रवेश निषेध केला जाई.एखादा व्यक्ती स्वॅब तपासायला दिल्यानंतर त्याचा रिझल्ट येईपर्यंत अनेकांनी हृदय विकाराच्या झटक्याने जीव गमावला रिजल्ट निगेटिव होता.यावरूनच आपल्या लक्षात येते कोरोना किती भयंकर होता,आहे.

सोशल डिस्टंसिंग हा एक नवीन नियम सुरू झाला. भारतातील चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे आठवण आणि उजाळा सर्व जगाने अनुभवला. एखाद्या एरियामध्ये एखादा पेशंट निघाल्यानंतर त्याबरोबर ज्या पद्धतीने वर्तन केले जायचे त्याच पद्धतीने भारतातील शूद्रादी अतिशूद्र यांच्याशी व्यवहार केला जात होता किंबहुना आजही तो सुशिक्षित वर्गात दिसून येतो. एक वेगळीच शोकांतिका भारतात आहे. जातिव्यवस्थेची प्रखर सोशल डिस्टंसिंग बंद झाले असले तरी प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी तर होतच नाही. चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा किडा उच्चवर्णीयांच्या डोक्यात आजही कुठेतरी वळवळ करत असताना दिसतो आहे.  कोरोनाने या व्यवस्थेची जाणीव सर्व जगाला झाली,हे विशेष.

आजही आठवतात सुन्न झालेले रस्ते लॉकडाउनला एक वर्ष पूर्ण झाले.आता दुसरी लॉकडाउन लागण्याची शक्यता किंवा चिन्हे दिसत आहेत. कोरोना चा विळखा दिवसेंदिवस कमी होताना दिसला, परंतु आज त्याची अवस्था खूप गंभीर झाली आहे. शासनाने खाजगी दवाखाने ताब्यात घेण्याची परिपत्रक सुद्धा काढले. आपत्ती व्यवस्थापनाचे विशेषाधिकार शासन वापरत आहे. त्याची आवश्यकता सुद्धा आहे. याच  कोरोनाच्या नावाखाली अनेक डॉक्टरांनी पेशंटला लुटले सुद्धा. मुंबईतील एका रिक्षावाल्याचे कोरोनाचे चे बिल अनेक लाखांमध्ये सुद्धा पाहिले. एका प्रतिष्ठित हॉस्पिटलमध्ये अशी अवस्था असेल, तर सामान्य हॉस्पिटलमध्ये रुग्णांची काय अवस्था असेल ? कोरोना पॉझिटिव रिपोर्ट घेऊन एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटल ला गेल्यानंतर डिपॉझिट नावाचा प्रकार हा आलाच लाख - लाख, दोन दोन लाखापर्यंत डिपॉझिट जमा करून घेतात. सर्वसामान्य माणसांनी जीवन तरी जगावे कसे? एवढे पैसे आणायचे तरी कुठून? अशा प्रकारचे अनेक प्रश्न, मंजूर , कामगार यांच्या मनात निर्माण होतात. खर्चापोटी अनेक लोकांचा जीव गेला.तीन-तीन,चार-चार लाख रुपये खर्च करून सुद्धा पेशंट जातो, याच्यासारखं दुर्दैव आणि अपयश ते कोणते? 

कोरोनाला बळी ठरलेल्या रुग्णांची अशी अवस्था आहे. पण या  कोरोनामुळे स्थलांतरित झालेल्या कामगारांचे काय ?अनेक कामगार रस्त्यावरती अपघाताने दगावले, रेल्वेच्या पटरी वरती अपघाताने दगावले,कोणी उपाशी पोटी दगावले, तर कोणी चिंतेने वाटेतच अटॅक येऊन दगावले. याला जबाबदार कोण? तर मानवच ना! कारण ,सत्तासंघर्ष पोटी किंवा या जगावर निर्विवाद वर्चस्व,हे आपलेच असावे,ही अघोरी भावना मनात निर्माण झाली. म्हणूनच  कोरोनाचा उदय झाला. एक शाश्वत सत्य! 

                                #RAHUL DONGARDIVE






शनिवार, २० मार्च, २०२१

Covid 19 ; एक जागतिक समस्या



प्राचीन कालापासून मध्य युग ते आज पर्यंत राजेशाही, सम्राट, भांडवलशाही, साम्राज्यवाद आणि साम्राज्यविस्तार  प्रत्यक्ष,  अप्रत्यक्ष स्वरूपाने, घडत असताना आपण पाहत आहोत. यातून यातून निर्माण होत असणारा सत्तासंघर्ष , प्रत्यक्षात राबवता न आल्यामुळे, निर्माण झालेले शीतयुद्ध आज सर्व जगास परिचित आहे. परंतु आजही एखाद्या भू-भागाविषयी असणारी लालसा लपून राहत नाही. हे वास्तव सत्य कोणीही नाकारू शकत नाही. त्याची परिणती अशी झाली, प्रत्येक जण आपला भूभाग वाचवणे आणि त्याचे जतन करण्यासाठी नवनवीन क्षेत्रांचा शोध लावणे हे सर्वच राष्ट्राची लक्ष  ठरले. आज प्रत्येक राष्ट्र नवनवीन शोध आणि त्याचा उपयोग कसा करता येईल, मग तो भौतिक सुखासाठी असेल किंवा राष्ट्रीय संरक्षणासाठी  कोणीही मागे पुढे पाहत नाही. आज जगात दृष्टिकोन आणि नियम एवढी शिल्लक आहे प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होतांना कोठेही दिसत नाही. हे कटू सत्य. लपवून ठेवता येणार नाही. 

भविष्यातील हा सत्ता संघर्ष विकोपाला जाईल याची कल्पना, दुसऱ्या महायुद्धातील अनुभव किती संहारक आहे. तत्कालीन राजकीय नेत्यांना, त्याचबरोबर तत्वज्ञाना होती. म्हणूनच संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना करण्यात आली. 1918 नंतर जे संयुक्त राष्ट्र संघाचे काम होते,त्यापेक्षा अधिक प्रभावी काम करण्यासाठी नवीन राष्ट्रसंघाची नियुक्ती करण्यात आली. आंतरराष्ट्रीय न्यायालय सुद्धा स्थापन करण्यात आले. जगातील सर्व राष्ट्रांनी झालेल्या अन्यायाच्या बाबतीत या न्यायालयात धाव घेता आली, आणि याला पाठिंबा देण्याचे काम 5 अस्थाई सदस्य असलेल्या राष्ट्रांनी करावे. पुढे हेच संयुक्त राष्ट्रसंघ आपल्या हातात कसे येईल. शीत युद्ध सदस्य राष्ट्र मध्ये आहे, हे लपून राहत नाही. भविष्यातील संहार प्रवृत्तीची आता त्यांना जाण होती. म्हणून एक काळ, "युद्ध नको, बुद्ध हवा" हा संदेश सुद्धा जगभर पसरला. प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणी व कार्यकुशलता याचा अभाव दिसून येतो.सत्तासंघर्ष हा घरचा असो,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय  असो ,त्यामध्ये नीती व कूटनीति खच्चून भरलेली असते. अणुबॉम्ब किती संहारक आहे. हे जगाने  ओळखले, म्हणूनच युद्ध नकोच. अशी  भूमिका सर्व जगाची झाली. 

व्यासपीठावरील भाषण देणारा स्वतः वक्ता त्या  बोलण्याचे किती अनुसरण करतो. हा एक अनुत्तरित प्रश्न ? तरीही जनता त्यावरच विश्वास ठेवते,ही त्यांची श्रद्धा समजावी की अंधश्रद्धा ? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अगदी याच पद्धतीने संयुक्त राष्ट्राची अवस्था पाहताना आपल्याला दुःख होते. एवढ्या मोठ्या शक्तीपुढे सामान्य माणसांनी बोलावे तरी काय ? सामान्य माणसाचा ऐकणार कोण ? याची अनुभूती प्रत्येक जगातील राष्ट्राला येते आहे. संयुक्त राष्ट्राचे अपयश म्हणावे की दुर्दैव !   अनु बॉम चा पुनर्वापर होऊ नये म्हणून प्रगत राष्ट्रांनी इतर संहारक शास्त्रांचा शोध लावण्यास सुरुवात केली. संहारक शस्त्रांपैकी 'जैविक' आणि 'विषाणू' यांचा वापर करून नवीन शस्त्रे निर्माण केली आहेत.  अगोदर अॅथरॅक्स सारखा जिवाणू जगात येऊन प्रचंड खळबळ उडाली होती. 90 च्या दशकातील ही बाब. आज पूर्ण जगाला एकाच चक्रव्यूह मध्ये अडकून टाकलं , प्रगत राष्ट्र, अप्रगत राष्ट्रांना, सर्वांनाच वेठीस धरून ठेवलं. जगामध्ये   मृत्यूचा हाहाकार माजवला. एवढंच काय अख्ख जग थांबलं ! पण..काळ कोणासाठी थांबत नाही. अशा प्रकारचा एक विलक्षण विषाणू, जगामध्ये थैमान माजवत आहे. तो म्‍हणजे कोरोना- COVID -19  !!! 

चीनमधील वुहान या शहरांमध्ये  covid-19 चा पहिला रुग्ण आढळला. वुहान शहरामध्ये या रोगाने भयानक स्वरूप धारण केले.  लोकांचाा बळी घेतला. एका डॉक्टर कडून या रोगाची माहितीी मिळाली.  रोग वाऱ्या सारखा पसरला. पश्चिम राष्ट्रात तर या रोगाने भयानक स्वरूप  धारण केले. इटली या देशांमध्ये देशांमध्येे हजारो लोकांचे बळी गेलेे .अमेरिका रशिया या देशात सुद्धा या रोगांनी थैमान माजवले. विकसित राष्ट्रांच्या मेडिकल सुविधाा एवढ्या जबरदस्त असताना सुद्धा या राष्ट्रांना कोरोना पुढे हात टेकले. covid-19 चा प्रसार एवढा जबरदस्तत होता की, सर्व जग या रोगाने व्यापून टाकले. प्रत्येक देशांच्या बातम्यांमधूूूूूून चर्चा आणि विमर्श यामधून हा रोग किती भयंकर आहे याची जाणीव सर्व जगाला  कळली. 

चंद्रावर जाणारा माणूस आज मंगळावरची राहण्यासाठी जमीन शोधतो आहे.  अभ्यास करत आहे. पण अचानक आलेल्या covid-19 मुळे या जगातील शास्त्रज्ञ किंबहुना   विचारवंत सुद्धा ठप्प झाली. काय करावे ? आणि कोणते उपचार करावे? याविषयी सर्व अनभिज्ञ ! शेवटी लक्षणावरून औषध उपचार करणे. असाच पायंडा पडत गेला. भारतामध्ये तर एड्सवर जे उपचार केले गेले,त्याचे रिझल्ट ही योग्य रीतीने मिळाले. जगातील प्रत्येक राष्ट्र या रोगाने व्यापून टाकल्यामुळे जगाची आर्थिक प्रगती मंदावली. अनेक कामगारांचे, उद्योगपतींचे दिवाळे निघाले. आज पर्यंत आपण पाहिले असेल, प्रत्येक   जण पोटासाठी वणवण फिरत होता. वाटेल ती कामे करत होता. उच्चशिक्षित लोक सुद्धा या राष्ट्रातून  त्या राष्ट्रात नोकरीसाठी जात होते.  आपली गुणवत्ता सिद्ध करत होते . अनेक भौतिक सुविधा मिळवण्यासाठी वाटेल ते करत होते. पण या कोरोनाने, प्रत्येक व्यक्तीला भौतिक सुखापेक्षा जीव महत्त्वाचा, याची जाणीव झाली. जो तो जीव वाचविण्यासाठी सैरावैरा भटकू लागला. अनेक मजुरांचे रस्त्यावरती प्राण गेले, अनेक जणांनी माणुसकी दाखवली. अन्नदान कार्यक्रम राबवले,सेवाभावी संस्था पुढे सरसावल्या, सामाजिक कार्यकर्ते मदतीला धावून आले. अनेक नोकरदारांनी  अन्नदानाचे कार्यक्रम सुरू केले. खेड्यापाड्यांमध्ये भाकरी गोळा करून शहरातील मजुरांना वाटप करण्यात आल्या. कुठेही अधिकृत नसणारे कॅम्प संस्था निर्माण झाल्या आणि अधिकृत असणाऱ्या संस्थांपेक्षा निर्माण झालेल्या माणुसकीच्या भावनेतून गोरगरीब मजूर यांना अन्नदान केले. हे कोणालाही लपवता येणार नाही. रोग भयंकर आहे पण माणुसकी श्रेष्ठ आहे हेच यातून सिद्ध होते. 

माणूस हा समाजशील प्राणी आहे, तो एकमेकांशिवाय जगू शकत नाही आणि हाच माणूस एकमेकांना मारायला उठला आहे. विज्ञानाने केलेली प्रगती मानवी कल्याणासाठी तिचा वापर, हा दिवास्वप्न सारखा वाटू लागला. कारण विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्यातील भेद मात्र हा कायम दुरावा करणारा ठरला. होय "अनाकलनीय गोष्टींचा शोध म्हणजे, विज्ञान आणि त्या शोधाचा मानव कल्याणासाठी वापर करणे म्हणजे तंत्रज्ञान " मग या विज्ञानाचा वापर हा मानव कल्याणासाठी होता होता,  मानवाच्या जीवावर उठला. मग याला  तंत्रज्ञान म्हणावे काय? मी एक सामान्य माणूस जगातील शास्त्रज्ञांना आव्हान करतो,आपण या भविष्यातील  येणाऱ्या नवीन पिढीचे मार्गदर्शक आहात. तुम्ही लावलेले शोध मानव कल्याण कारी आहेत. सत्य. पण त्याचा वापर कसा करावा हेही तुमच्या हातात. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, या शोधांचा वापर मानवी मूल्य आणि मानव यांच्यासाठी घातक होऊ नये याची काळजी घ्या! 

जगामध्ये सत्तासंघर्ष होत होता,आजही आहे आणि शास्त्रज्ञ निर्माण होतील, सत्ताधीश बदलतील, शोध लागले आहेत आणखी नवीन शोध लागतील, पण त्या शोधाचा वापर जर मानवी कल्याणासाठी होत नसेल, तर त्या शोधाचा उपयोग काय? जगामध्ये अनेक महान शास्त्रज्ञांनी अनेक शोध लावले. नवनवीन शोधांमुळे मानवी जीवन कल्याणकारी होऊ लागले, अनेक रोगांना आपणच मुळासकट उखडून टाकले. आपण थोर आहात. आपल्या शोधांचा उपयोग मानवी कल्याणासाठी जर होत असेल, तर आपण आदरणीय आहात. देव नाही पण देवा पेक्षा कमी नाही आहात. पण हेच शोध जर मानवासाठी घातक ठरत असतील तर आपण राक्षस आहात! असे म्हटल्यास वावगे ठरू नये. 

जगभर आज निरपराध लोकांची बळी जाण्याची पद्धत, खरोखरच त्या गोष्टीतील राक्षसा सारखी वाटते. हजारो लोक बेघर होतांना दिसत आहेत. लाखो लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. या सर्वांची आपण काळजी घ्यायला हवी. हे मृत्युमुखी पडू नयेत. भारतासारख्या देशाने यावरून लस विकसित केली आणि जगातील प्रभावी लस म्हणून उदयास आली. आज भारत सत्तर-ऐंशी देशाला लस पुरवतो आहे. अभिमानाची गोष्ट आहे. हा रोग झाला नसता तर, लाखो  लोकांचा बळी गेला नसता. बातम्यांमधून प्रसारित होणारी, हृदयाला पिळवटून टाकणारी, दाहक दृश्य सुन्न करतात. या सर्व एक होऊयात, आपल्या भूमीचा  आपल्या राष्ट्राचा, आपल्या मातीचा, आपल्या तत्त्ववेत्त्यांच्या ,आदर्शांचा, मान राखूयात. पण त्या भावनेपोटी इतरांना कमी लेखू नका. जसे तुमचे आदर्श, तसेच सर्व जगातील राष्ट्रांमधील थोर पुरुषांची आदर्श असतात. आपल्याला आपले पण, जेवढे असते. तसेच प्रत्येकाला प्रत्येक राष्ट्रांमध्ये निर्माण झालेले, योद्धे ,युगपुरुष, महानायक, अध्यात्मिक गुरु, आदरणीयअसतात. पूजनीय असतात. तर चला मग आपण सर्वांचाच आदर करूया, हा आदर मानव कल्याण समोर ठेवून  व्यक्त करूया. 

              WRITER #RAHUL DONGARDIVE

बुधवार, १७ मार्च, २०२१

दृष्टिकोन

 


नकारात्मक दृष्टीकोनातून जगलेले जीवन म्हणजे ,नुसते एक दिवास्वप्नच ! वास्तविक त्याने विचार केला असता ,किंवा मी विचार केला असता, अशा भ्रामक कल्पनेत न रमता ,सकारात्मक दृष्टिकोनातून जगले गेलेले जीवन .एक सार्थ पर्याय ठरू शकते. मानवी मनाच्या उत्कट भावना ही तितक्याच सहज असतात.जितक्या समुद्रातील प्रचंड लाटा! या महाकाय रूप धारण करतात आणि शेवटी मात्र किनाऱ्यावरती,शांत होतात.तसेच मानवी जीवनामध्ये सुद्धा अनंत समुद्र रुपी लाटा संकट म्हणून येतात .त्या दिसायला कितीही गंभीर असले तरी, त्या क्षणार्धात संपणार हे वास्तव नाकारून चालणार नाही. 

वास्तव आणि वस्तुस्थिती यात भेद करणे जितके अवघड, तितकेच माणसाच्या आयुष्यातील समाधान शोधणे!  देवाचे महात्म्य समजवण्यासाठी दुधाचे उदाहरण दिले जाते आणि यातून श्रद्धा आणि परम श्रद्धा याचा अर्थ बोध केला जातो. परंतु , जोपर्यंत आपला दृष्टिकोन बदलत नाही तोपर्यंत आपली दृष्टी बदलणार नाही ही वास्तवता नाकारून चालणार नाही .त्यानुरूप पावले उचलली नाही तर  वस्तुस्थितीही कळणार नाही. 


                  

              WRITER #RAHUL DONGARDIVE

 

शनिवार, १३ मार्च, २०२१

निगमानंद माऊली : द अनटोल्ड स्टोरी ( भाग-7)

भाग -07

आधुनिक युगातील थोर संत!

संत वामनभाऊच्या सल्ल्याने आणि महंत भीमसिंह महाराज यांच्या ,"मायंबा वर निवासी व्हा", या विनंती ने बाबा प्रेरित झाले. त्यांच्यामध्ये पुन्हा नवचैतन्य संचारले. बाबांनी निश्चय केला, आता आपण हिमालयात जाणार नाही.सर्वांनी याची खात्री पटली, बाबांचा  मायंबा वरती आपल्या कार्याचा परिणाम सुरू झाला.

वै. संत वामनभाऊ महाराज

वामनभाऊंच्या सांगण्यावरून बाबांनी भगवे कपडे त्यागले, त्याचबरोबर डोक्यावरील जटा, दाढी विधिवत काढली. वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन भजन, कीर्तन, प्रवचने यामधून समाज सुधारण्यास सुरुवात केली. पशुहत्या बंद करा. नमसकीर्तन करून त्यांचे उद्बोधन सुरू झाले. तमाशे, जलसे, अंदाधुंद व्यवहार, यावर बाबा प्रखरतेने बोलत. त्यांना बहुतांश चैन विलासात रमनाऱ्याचा राग येई, बाबांच्या विरोधात 'ते' षडयंत्र सुद्धा करून पहात. पण निगमानंद यांच्यात एका माऊलींचा सुद्धा वास होता. बाबा आपल्या लेकरांची सर्व खोडी ओळखून होते. आलेल्या सर्व प्रसंगांना तोंड देणे आता सहज शक्य झाले

        "असाध्य ते साध्य करि सायास, 
              कारण अभ्यास, तुका म्हणे । "

तुकाराम महाराजांच्या युक्ती प्रमाणे, समाजातील सर्वात विघातक प्रवृत्ती होती, पशुहत्या. मायंबावर पशुहत्या, ही सामान्य गोष्ट होती. मुळात या प्रथेचा, बाबांना खूप त्रास होत होता. निगमानंद माऊली ध्यानस्थ बसले, त्यांना उपाय सुचला.  मायंबाचा 'मच्छिंद्रनाथगड' करायचा. आजचा मायंबा हा पूर्वीचा नाथ संप्रदाय होता. मायंबा वरती त्यांचे निवासस्थान होते , ही गोष्ट , त्यांनी भगवानगड निवासी संत भिमसिंह महाराजांना  बोलून दाखवली. निगमानंद माऊलींचे हे कार्य, समाजातील सर्वात मोठा बदल आहे. यातील गमक, भीमसिंह महाराजांनी ओळखले. निगमानंद माऊलींना त्यांनी शब्द दिला, "'मी स्वतः मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेला उपस्थित राहील".ते स्वतः त्या रात्री उपस्थित राहिले. 

1971 सली संत शिरोमणी वैकुंठवासी गुरुवर्यय भगवान बाबा यांनी चालू केलेल्याा नारळी सप्ताह चे नियोजन निमगाव मध्येे केले. याच सप्ताहामध्ये मच्छिंद्रगड स्थापना झाली. विठ्ठल -रुक्माई, शिव, आणि श्री गुुरु मच्छिंद्रनाथाची मूर्ती, प्राणप्रतिष्ठापना महंत भीमसिंह महाराज यांच्या अधिपत्याखाली करण्यात आली. नारळी सप्ताहाची सांगता एका परिवर्तनाने झाली होती. हा 'काला' सर्वांच्या आजही लक्षात आहे. मायंबावरची पशुहत्या बंद होणार, हे तेथीील विघ्नसंतोषी लोकांना आवडले नाही.त्यांचे बाबांच्या विरोधात कट कारस्थान सुरूच ठेवले. मूर्ती् प्राणप्रतिष्ठापना विरोधात त्यांनी निगमानंद माऊली विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे निनावी फोन करून माहिती दिली. 

बीड हुन निघालेला पोलीस फोर्स रात्री निघाला , पाडळसिंगी , तिंतरवणी ला आला. तिंतरवणी हुन निघालेला पोलीस फोर्स वरंगलवाडी ला पोहोचला.परंतु, त्यांना मायंबा वर रात्रभर येता आले नाही. याची साक्ष देणारे शेकडो लोक आजही आहेत.सकाळी निगमानंद माऊलींना पोलीस घेऊन गेवराई ला गेले. मोठ्या आदर सत्कार आणि  सन्मानाने त्यांना सोडून देण्यात आले. निगमानंद माऊलींचा आगळावेगळा साक्षात्कार परिसरातील लोकांनी अनुभवला. 

स्वामी निगमानंद महाराज


निगमानंद माऊली ने मनातील पहिला संकल्प पूर्ण केला. आता त्यांच्या अमृततुल्य वाणीने समाज प्रबोधन सुरू केले. जे वाईट आहे, त्यावर प्रत्यक्ष प्रहार केला. करारी स्वभाव , अध्यात्माची सांगड या गोष्टींमुळे सत्कार्याचा प्रभाव समाजावर दिसून येऊ लागला. सद्गृहस्थाने त्यांना आत्मसात केले. त्यांच्या मार्गावर चालण्यास सुरुवात केली, "टाळ वाजल्यावर काळ पडेल" हा विघ्नसंतोषी लोकांचा अपप्रचार आपोआप थांबला. लोक तुळशी माळ घालू लागले. मांसाहार सोडून शाकाहार स्वीकारला. धावपळीच्या या बिकट स्थितीत मायंबा चे भक्त  वै. गुरुवर्य धोंडीराम महाराज यांचा मोलाचा वाटा आहे. 

 "एकमेका साह्य करू । अवघे धरू सुपंथ।। "

असा एक वारकरी संप्रदाय बाबांसमोर एकत्र येत होता. निगमानंद माऊली स्वतःला संतांच्या मेळ्यात हरवून बसले होते, हा बदल माऊली साठी एक  अग्निदिव्यच! 

अग्निदिव्य पाडत असताना, हे  समाजप्रबोधनचा अखंड वसा सदोदित  तेवत ठेवण्यासाठी, त्यांनी  'हरिनाम सप्ताहाची' संकल्पना जनतेला बोलून दाखवली. जनतेनेही त्यांना सहज होकार दिला. अखंड हरिनाम सप्ताह, हाच मच्छिंद्रगडाचा नारळी सप्ताह म्हणून ओळखला जातो. पहिला नारळी सप्ताह हा मौजे नांदिवली येथे मोठ्या थाटात संपन्न झाला.  ज्या गावाला हे नारळी सप्ताह चे, 'नारळ' दिले जाईल, त्या गावात त्या  नारळाची वाजत गाजत मिरवणूक काढली जात असायची. नारळ घेतल्यापासून सप्ताह पार पडेपर्यंत निर्व्यसनी शाकाहारी राहणे, हे नियम सर्व गावकऱ्यांसाठी बंधनकारक असत. हा नियमा सर्व जण आजही काटेकोरपणे  पाळतात. नारळी सप्ताह चे नारळ घेण्यासाठी गाव गावची रांग लागलेली आहे.

1979 ला पहिला सप्ताह नांदिवली येथे सुरू झाला आजही तो अखंडपणे सुरू आहे 2019 चा 10 एप्रिल पासून सुरु होणारा सप्ताह मौजे निमगाव येथे संपन्न होणार आहे. सुरुवातीला जो पहिला सप्ताह सुरू झाला होता, त्याचे आज विशाल वटवृक्ष तयार झाले आहे. याची साक्ष आपण हे होऊ शकता. भव्य दिव्य असा महाकाय मंडप, स्टेज,आरंभीच्या दिवशी विद्यार्थी कलागुणांचे संस्कृतीक दर्शन, असं दर्शन कोणत्याच नारळी सप्ताह दिसणार नाही. भव्य असे निगमानंद माऊलींचे स्वागत, वारकरी संप्रदायाच्या पताका,टाळ,मृदंग,वीणा ,भक्तगणांच्या रांगाच रांगा, एक निराळीच शिस्त! ही शिस्त लावताना कोणी दिसते, ना कोणाचे बंधन.परंतु, यातील शिस्तही निगमानंद माऊलींच्या नैतिकतेची, श्रद्धेची आणि अपार भक्तीचीच! प्रत्यक्षात स्वर्गसुख काय असते? याची प्रत्येक भक्ताला अनुभूती येते.स्वतःला ते धन्य मानतात.  

भूतकाळामध्ये डोकावण्याचा प्रयत्न केल्यास, मायंबाचा , 'मच्छिंद्रनाथगड' झाला. परंतु,तत्कालीन समाजव्यवस्था आणि विघातक प्रवृत्तीकडे झुकलेला समाज, आज पूर्णपणे बदलला आहे. भूतकाळातील एकही वाईट प्रथा, अनाचार, दुराचार या गोष्टी कोसोदूर गेल्या आहेत. एक सृजनशील समाज निर्मिती माऊलींच्या रूपाने साकारली आहे. मच्छिंद्रनाथ गडावर भव्य असे प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे.हनुमान मंदिर, कामधेनु मंदिर, भव्य असेे राधाकृष्ण मंदिर प्रवेशद्वाराजवळच आहे. 

 निगमानंद माऊली ज्याठिकाणी सदैव बसलेले असतात. तेथे दत्ताचे मंदिर असून,त्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व संतांच्या मूर्ती साकारल्या आहेत.



संत भीमसिंह महाराज

शांतीब्रह्म संत भगवान बाबा

नारद मुनी

संत नरहरी महाराज 

अत्रीऋषी

महर्षि वशिष्ठ

संत ज्ञानेश्वर

संत तुकाराम


श्री संत एकनाथ महाराज

व्यास महर्षी 

गोपाल श्रीकृष्ण

वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज

संत सावता महाराज

साईबाबा

मच्छिंद्रनाथ मंदिरातून एक प्रदक्षिणा म्हणजे,  सर्व देव व महात्म्यांचे दर्शन होते. मच्छिंद्रनाथाचे मंदिर हे विशाल, भव्य  आहेच,परंतु, यावर सर्व नक्षीकाम हे दाक्षिणात्य कलाकुसर आहे. विठ्ठल रुक्माई,शिव मंदिराचा , जीर्णोद्धार केला आहे. मोठमोठी सभामंडप, हे सर्वांचेे लक्ष वेधून घेतात. बाजूला साई मंदिर( आजचे बाबांचे समाधी मंदिर)  तर विलक्षण कलेचा नमुना आहे. आलेेेेला प्रत्येक भक्त ही कलाकुुुुसर पाहण्यात दंग होऊन जातो. जगातील आश्चर्य म्हटल्याास वावगे ठरणार नाही, याच मच्छिंद्रनाथ गडावर बाबांच्या कृपाशीर्वादाने वर्धमान महावीर महावीरांचे आगळेवेगळे मंदिरी हे साकारत आहे. साई मंदिराच्या समोरच शाळेची  सर्व सोयींनी युक्त तीन मजली इमारत आहे.  खरंच  सर्वांनी एकदा भेट द्यावी असा ठिकाण, 'मच्छिंद्रनाथगड'.
ब्रह्मलीन स्वामी निगमानंद महाराज समाधी मंदिर

मच्छिंद्रनाथ मुख्य मंदिर

दत्त मंदिर

मच्छिंद्रनाथ जन्म देखावा

प्रांगणातील मंदिरे

विशाल प्रवेशद्वार

राधाकृष्ण मंदिर

हनुमान मंदिर

कामधेनु मंदिर

पूर्वमुखी प्रवेशद्वार मच्छिंद्रनाथगड

आळंदी- पंढरपुर- पैठण,याठिकाणी गडाच्या दिंड्या जातात. दिंडीतील भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून निगमानंद माऊलीने आळंदी येथे तीन मजली भक्तनिवास निर्माण केले आहे. पंढरपूरला देखील दोन मजली भक्त निवास बांधले आहे. पंढरपूरला आगळा-वेगळा भक्तनिवास बांधण्याचा बाबांचा माणूस आहे. पैठणला ही तीन मजली भक्तनिवास आहे. वारकरी संप्रदायाला आवश्यक असणारे पोषक वातावरण बाबा करत आहेत. या वातावरणातून निगमानंद माऊलींच्या कृपाशीर्वादाने महाराष्ट्रात नावलौकिक गायनाचार्य निर्माण झाले आहेत. मृदंग वादक आणि इतर कलेत निपुण असे कलाकार ही तयार झाले. हेच गायनाचार्य , मृदंगाचार्य, बाबांचा  'गुरुपूजन सोहळा' मोठ्या आनंदाने दरवर्षी साजरा करतात. 

निगमानंद माऊलीने वयाची 97 वर्षे पार केली आहेत. आजही तोच उत्साह, तीच उमेद त्यांच्याकडे पाहून होते. भगवान परमात्म्याचा अंश आहे, हे निर्विवाद सत्य दिसते. सदोदित मानव सेवा  व त्यांचे दुःख निवारण, बाबांचे अहोरात्र प्रयत्न आजही चालू आहेत. खरंच समाज परिवर्तनाचा ध्यास, मानव सेवेची आस, प्राणीमात्रावर दया, हे त्यांच्याजवळ अत्यंत विलक्षण आहे. त्यांचे वर्णन माझ्यासारख्या पामराने काय करावे? असे असणारे थोर संत म्हणून त्यांची ओळख आहे . 

परिवर्तन रूपी मच्छिंद्रनाथ गड स्थापनेनंतर समाजातील असणाऱ्या वाईट चालीरीती, अंधश्रद्धा, असाह्य वेदना, आणि समाज  विघातक प्रथा, ह्या दुःखास कारणीभूत आहेत. बरबटलेल्या  या अवस्थेतून समाजाला बाहेर काढायचे झाल्यास उपाययोजना आवश्यक आहे. तेंव्हा त्यांची  सिंदफणा नदीवर गेली. एवढा पूर येऊनही येथील शेतकरी पाण्यापासून वंचित आहे, ही बाब त्यांच्या   मनात घर करू लागली. होतकरू व शेतात काम करण्याची इच्छा असणाऱ्या शेतकऱ्यांशी निगमानंद माऊली संवाद साधू लागले. प्रत्येकाच्या शेतात जाऊन विहिरी खोदण्यास प्रोत्साहन दिले. स्वतःच्या हाताने विहिरीचे मार्किंग करत असत,त्यांनी सुचवलेल्या परिसरात शेकडो विहिरी आजही अस्तित्वात आहेत,त्यांचे पाणी आजही जिवंत आहे. 

ओसाड माळरान असलेल्या बहुतांश परिसर,पण..बाबांच्या माऊली अंतकरणाने,परिसरामध्ये या सिंचन योजनेमुळे सर्व परिसर भरून गेला. विशेष करून माळेवाडीचे क्षेत्र, आज शेकडो एकर वाढलेले आहे. सर्व लोक सदन झाले आहेत. आजही श्रद्धा, माऊलींच्या कृपाशीर्वादाने दिलेल्या नारळ रुपी प्रसादातून प्रत्येकाच्या विहीर- बोरला पाणी येते, हे भक्तावर  बाबांचे कृपाछत्र आहे. 'सर्वांचे भले व्हावे'..ही त्यांची अंतरात्म्याची साद प्रत्यक्षात साकारली  आहे . 

सक्षम होण्यासाठी शिक्षण -
श्री निगमानंद माध्य.व उच्च माध्य.विद्यालय

निगमानंद माऊलींचे परिवर्तनवादी कार्य अत्यंत जोमाने चालले होते. दळणवळणाची साधने उपलब्ध नव्हती. बाबांचा प्रवास सुद्धा टांग्यातून असायचा. सभोवतालची मुले-मुली शिक्षण संस्था दूर दूर असल्यामुळे शिक्षणापासून कोसो दूर होती. जास्तीत जास्त  चौथीपर्यंतचे शिक्षण, ते ही इच्छा  असणारे पालकच- पाल्यांना देत असत. सर्वसमावेशक, सर्वांना शिक्षण मिळेल अशी सुविधा उपलब्ध नव्हती. ही 'सल' मनात होतीच. 

निगमानंद माऊलींनी आता अधिकृतरित्या संस्थान उभारले होते. एवढ्यात औरंगाबाद हुन आयुक्तांचे पत्र आले. पत्रामध्ये आपण एखादी शिक्षण संस्था उभारून, शिक्षणाचे कार्य कराल का? असे विचारले. बाबांनी त्या पत्राला हो म्हणून उत्तर पाठवले. 1985 ला श्री मच्छिंद्रनाथ शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली.  इसवी सन 1986 ताबडतोप परवानगी मिळाली,आणि बाबांनी माऊलींच्या स्वरूपात, श्री निगमानंद विद्यालय, निमगाव, येथे आठवीचा वर्ग सुरू केला. पुढे  विद्यालयाची प्रगती वाढत गेली.  ज्ञानासाठी शिक्षक मोठ्या प्रयासाने मिळवले तत्कालीन परिस्थितीत शिक्षकांना शासनाचा पगार नसताना, स्वतः पगार दिले. शिक्षणाची गंगा अखंडपणे प्रवाहित आहे. आज विद्यालयातून शेकडो विद्यार्थी ज्ञान ग्रहण करून बाहेर पडत आहेत. या जोडीला या संस्थेची दुसरी शाळा, श्री निगमानंद विद्यालय तळणेवाडी तालुका गेवराई येथे कार्यरत आहे. दोन्ही शाळांची यशाची परंपरा उत्तम आहे. आज या शाळेतून अनेक डॉक्टर्स, इंजिनियर्स,शिक्षक, प्रशासकीय सेवेत, विद्यार्थी कार्यरत आहेत. ही माऊलींची  दूरदृष्टीता फळास येताना दिसते आहे. दोन्ही शाळांना विशाल अशा इमारती आहेत. स्वतंत्र सर्व सोयींनी युक्त प्रयोगशाळा, प्रांगण,शौचालय आहेत. आज श्री निगमानंद विद्यालय आयएसओ प्रमाणित आहे.


 WRITER #RAHUL DONGARDIVE


वाचकांना नम्र निवेदन आहे की, "निगमानंद माऊली : द अनटोल्ड स्टोरी"  मधील सर्व लेख हे, निगमानंद माऊली हयात असतानाचे आहेत. त्यामुळे बाबा हयात असताना जी परिस्थिती होती, ती लिखाणातून साकारण्याचा प्रयत्न केला आहे.हे सर्व लेख, "दै. झुंजार नेता", मध्ये प्रकाशित झालेले आहेत. 


गुरुवार, ११ मार्च, २०२१

निगमानंद माऊली : द अनटोल्ड स्टोरी ( भाग - 6)

 भाग : ०६

अलौकिक शक्ती : विज्ञानाला                 आव्हान! 

प्रत्येक निर्माण होणाऱ्या मार्गदर्शक संताला, महंताला,युगपुरुषाला, कोणत्या ना कोणत्या अग्निदिव्यातून जावे लागते. सामान्य


माणसाला असामान्य प्रसंगांना भिडताना परिणामांची चिंता मुळात नसतेच. अशा काही घटना असतात की, प्रत्येक विचारवंताला तार्किक सिद्धांतांना, सिद्धांताच्या बाहेर जाऊन विचार करायला लावतात. आपण या गोष्टींना स्पर्शुन जाण्याचा प्रयत्न  करूयात. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील सर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराजांची 'व्यथा' आणि 'गाथा' हे जीवनाचे दोन्ही अंग विचार करायला लावतात. 


संपूर्ण महाराष्ट्रातील कीर्तनकार हे , तुकाराम महाराजांच्या अभंगावर विश्वाचे ज्ञान सांगतात. संत तुकाराम महाराजांना, मंबाजी कडून असाह्य वेदना झाल्या. आवलीला एवढा राग येऊनही, त्या रागावर   सौहर्दतापूर्ण  शांती मिळवून, तिची समज काढणे आणि मंबाजी यांना प्रेमपूर्वक समज, ही अनन्यसाधारण गोष्ट आहे का ? संत तुकाराम कधीही डगमगले नाहीत. त्यांना हवा तो सद्विचार व समाजातील अज्ञान यावर प्रहार करणे सोडले नाही. संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत एकनाथ, संत निवृत्ती या सर्व त्यागी व्यक्ती, नव्हे देवरूपी अंशच! या संत महात्म्यांनी किती त्रास सहन केला, हे सर्व जग जाणते आहे. पण ,त्यांनी त्यांचा मार्ग कधीही बदलला नाही, ना विचार बदलले. 'खरं ते माझं', परंतु 'माझंच खरं ' हा युक्तिवाद कधी त्यांनी केला नाही. हीच संत परंपरा मच्छिंद्रनाथ गड निवासी निगमानंद माऊली आपल्या खांद्यावर घेऊन साकारताहेत. 


सकारात्मक दृष्टिकोन आणि बहुजन सुखासाठीचा कठीण जीवन प्रवास. अंगावर शहारा आणतो. बहुदा माणसास असे आजार होतात की, पूर्वीच्या काळी जडि-बुटी वर बरे होत असायचे. एकदा का असा गंभीर आजार,एखाद्या व्यक्तीला झाला, तर , ती व्यक्ती बरी होत नसे,आणि बरी झाली तर तो आजार पुन्हा होत नसे. दुर्धर आजाराने ग्रासलेल्या व्यक्ती  तर, पुन्हा कधीच दुरुस्त होत नसत. विशेषतः सर्पदंश किंवा जंगली प्राण्यांकडून होणाऱ्या आजारावर त्या काळात औषधोपचाराचा शोध बोध नव्हता. यातूनच संक्रमित आजार, माणसांना होत असत. अशा आजाराला बळी पडलेल्या व्यक्ती कोणत्याच औषधानं दुरुस्त होत नसे. एखाद्याला जर का पिसाळलेला कुत्रा किंवा कोल्हा चावला, तर भारत स्वातंत्र्याच्या  अगोदर प्रभावी औषधोपचार नव्हता पिसाळलेल्या प्राण्यांपासून हा आजार (आजचा रेबीज) माणसाला होई . तो माणूस शेवटचा प्रवास करायचा ,हे निश्चित. कल्पनेच्या बाहेरील हा प्रसंग बाबांवर  आला होता. 


बालपणी निगमानंद माऊली एकदा आपल्या मातोश्री बरोबर शेतात जात होते. गावातून आई शेताकडे निघाल्या होत्या. बाळ सीताराम आईच्या पाठोपाठ आनंदाने बागडत, बंधू नरहरी यांच्यासोबत पाऊलवाटेने चालले. दोघांमध्ये एक  स्पर्धाच होती. शिवनापाणीचा जनु आईबरोबर खेळ खेळत होते. आईला थोडं दूर जाऊ द्यायचं, पुन्हा दोन्ही बंधूंनी आईला पकडण्यासाठी धावायचं,आईचं काळीज मोठ व्हायचं! आईच्या पाठी मागून ही भावंडं शेताकडे पोहोचता होती. तोच नियतीने त्या माते बरोबर क्रूर चेष्टा केली. 

 पाठशिवणीच्या या खेळाला रंग आला होता. आनंदाने हास्याच्या ललकारी निघत होत्या.प्रत्यक्षात आनंदाला एक सीमा असते, ती सीमा या बालकांनी ओलांडली की काय ?कारण, नियतीला हा खेळ येथे संपवायचा होता. बंधू नरहरी सोबत बाबा निघाले होते. तेवढ्यात शेतातून एका पिसाळलेल्या कोल्ह्याने बालसीताराम वरती झडप घातली. आनंदाच्या हास्य ललकारींची जागा, क्षणात मरणोपरांत किंचाळ्या मध्ये रुपांतरीत झाली.आईचे तर काळीज फाटले, काय करावे? ते सुचत नव्हत .फक्त मोठमोठ्यानं रडण्याचा त्यांचा असफल प्रयत्न होता. बंधूंनी किंचाळत आई कडे धाव घेतली. दोघेही एका भयंकर क्षणाला सामोरे जात होते. आईच्या हृदयाची ठोके वाढली होती. बंधू नरहरी हतबल होते. आजूबाजूला कोणी दिसत नव्हते. आता काय होईल ? एवढाच त्या भेदरलेल्या जीवांना प्रश्न सतावत होता.अशी दयनीय अवस्था माता शेवंता व बंधू नरहरींची होती. 


मग त्या बालसीतारामांची अवस्था कशी असेल? याचा विचार करणे, वाटते तेवढे सोपे नाही. बंधू आईबरोबर  पाठशिवणीच्या खेळ, एका पिसाळलेल्या कोल्ह्याने बाल सीतारामाना,   पाठी ऐवजी गालावर आक्रमण केले. पिसाळलेल्या कोल्ह्याने बाबां वरती हल्ला केला होता. हल्ल्यामध्ये बाल सितारामांच्या गालाला कोल्ह्याने,आपल्या जबड्यात पकडले. बऱ्याच  अंतरावरती फरफटत ओढत नेहले. काय अवस्था झाली असेल ? काय वाटलं असेल ?माता व बंधू यांची मनाची अवस्था कशी झाली असेल? हा भयावह भयंकर प्रसंग, कसा गेला असेल? 

कोल्हा  बालसीतारामाना पुढे ओढत होता. आई व बंधू ओरडत होते, रडत होते, कोल्हा मात्र त्यांना सोडायला तयार नव्हता. क्षणक्षण मृत्यू समान वाटत होता. पण.. बाल सितारामानी त्या कोल्ह्याचा  सामना असा केला की, त्या पिसाळलेल्या कोल्ह्याचा नाईलाज झाला. मेंदू वरती नियंत्रण नसलेल्या कोल्ह्याच्या, अनियंत्रित बुद्धीवर बाल सितारामांनी विजय मिळवला होता. कोल्ह्याने हार मानली होती. शेवटी, गालाला घट्ट पकडलेल्या जबड्याने आपली सैल सोडली व तेथून पळ काढला. गालातून रक्त बाहेर येत होते. आई - बंधू व स्वतःच्या डोळ्यातून आसवं येत होती. आईने बाल सतारामास   कडाडून मिठी मारली, उचलून घेतल. 

शेतात निघालेली आई  कोल्ह्याने घायाळ केलेल्या बालसीतारामास कडेवरती घेऊन गावात आल्या. सर्व गावभर चर्चा सुरू झाली. मायंबाच्या प्रसादवर  कोल्ह्यनं  हल्ला केला. सिताराम आता वाचणार नाहीत. कोल्हा आणि तोही पिसाळलेला! आता कसं होणार ? गालाला बांधलेला कपडा पूर्ण रक्ताने माखला होता. जो तो अनेक प्रश्न निर्माण करत होता. शंका उपस्थित करत होता. परंतु त्या प्रश्नाचे, शंकाचे निरसन करण्याचा कोणी प्रयत्न करत नव्हते. फक्त शंका हाच मूळ विषय बाल सिताराम यांच्याबाबतीत राहिला होता. 

गावातील असं एक कुटुंब नव्हतं ,की त्याने संतोबा च्या घरी भेट दिली नसेल . त्या काळात  प्रगतशील औषधोपचारही नव्हता. जो येई तो कुठला ना कुठला पर्याय किंवा मार्ग दाखवीत. संतोबा सर्वांचे ऐकून घेत. झाडपाल्याचे, आजचे आयुर्वेद. औषध उपचार सुरू झाला.गालावर सूज आली होती.एक डोळा उघडा होता. एक डोळा  सुज आल्यामुळे, जवळपास दिसेनासा झाला. संतोबा व शेवंता आपल्या बाळाच्या जखमेवरती सांगेल तो उपचार करत होते. हळूहळू बाल सीताराम यांना औषधोपचाराने बरे वाटू लागले. सुज पूर्ण कमी झाली. जखमांच्या खुणा राहिल्या. पण ..जखमा भरून निघाल्या. सर्वजण स्वतःच्या मनाला समज देत होते. आई वडिलांच्या मनातील शंकेने काहूर माजवलं होतं. जखमा बऱ्या झाल्या, पण ? ..पिसाळलेल्या कोल्ह्याने बाल  सतारामांना चावा घेतला. आपल्या मुलाला सुद्धा  कोल्ह्याचा आजार होणार. आता या बाळाचं कसं होईल? आपला बाळ व्यवस्थित आयुष्य जगू शकेल का ?आणि दोघांच्या मनात थरररर.. व्हायचं. ते अनपेक्षित सत्य डोळ्यासमोर उभं राहायचं दोघेही अंतर्मुख होत असत. 


आजच्या विज्ञान युगातील आधुनिक डॉक्टर्सना असा चावा घेतलेला व्यक्ती बिना औषधोपचाराने जगू शकेल काय ? या प्रश्नाचे त्यांच्याकडे उत्तर 'नाही' असेच असेल. पण..या आजच्या थोर संताकडे अंगुलीनिर्देश - महंत स्वामी निगमानंद महाराज यांच्याकडे जातो. होय,पिसाळलेल्या कोल्ह्याने जबरदस्त चावा घेऊन सुद्धा, बाबांना काहीच झाले नाही. आज समाजसेवा, समाज कल्याणाच्या ध्यासापोटी, अहोरात्र कार्य करणाऱ्या बाबांच्या शरीरात दैवी अंश! असल्याचा दावा वावगा ठरणार नाही .म्हणजे, विज्ञानवादी दावे खोटे, अस नाही. परंतु , विज्ञानालाही हा विलक्षण अपवाद विचार करायला लावणारा आहे. असे आहेत, तुमचे आमचे श्रद्धास्थान श्री ह भ प स्वामी गुरुवर्य निगमानंद महाराज ! आपणास आजही बाबांच्या चेहऱ्यावरती कोल्ह्याने चावा घेतलेल्या दातांच्या वृंन छटा दिसतील. हीच या योगी साधूची आहे,अलौकिक शक्ती! 

                                                           क्रमशः.... 

               Writer :- RAHUL DONGARDIVE