बुधवार, २४ मार्च, २०२१

Covid-19 एक दु:खांतिका

 Covid-19 एक दु:खांतिका 



भविष्यातील येणाऱ्या आपत्तीमुळे शास्त्रज्ञ चिंतातुर होताना दिसतात,काही शास्त्रज्ञ तर भाकितही करतात, भविष्यवेत्ते भविष्याचा शोध घेताना अकल्पनीय भविष्य केली जातात, याचा अर्थ भविष्यात खूप मोठे संकट येणार असाच होतो. पृथ्वीतलावर निर्मितीपासून ते आजपर्यंत अनेक प्रकारचे बदल झाले. एखादी सजीवसृष्टी निर्माण होणे आणि ती समूळ नष्ट होणे, हा पृथ्वीचा नैसर्गिक नियम आहे. हा निसर्ग नियम सर्वांना मान्य असेल किंवा नसेल , परंतु बदल हा निश्चित आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 

जगाच्या पाठीवर अशा प्रकारच्या अनेक आपत्ती आल्या. तिचे स्वरूपही भिन्न होते, भयंकर  सुद्धा होते. पूर्वी नैसर्गिक आपत्ती ही सर्वश्रेष्ठ किंवा अंतिम मानली जायची. कारण ,जेव्हा कुठे  नैसर्गिक वैभवावर पृथ्वीवरील सजीवांनी आक्रमण केल्यास प्रलय किंवा प्रकोप हा होतो. असे अंदाज आज आहेत. तत्कालीन परिस्थितीमध्ये जी सजीव सृष्टी निर्माण झाली ती प्रत्येक युगामध्ये बदलत गेली याचे उत्तम उदाहरण आपल्याला डायनासोरचा काळ देता येइल. 

आज मानव या पृथ्वीवर अधिराज्य गाजवत आहे. मानव ठरवतो, पृथ्वीवरील या नैसर्गिक संपत्तीचा वापर आपल्या गरजांनुसार करायचा. मग पृथ्वीची नैसर्गिक साधन संपत्ती नष्ट झाली, तरी चालेल. हा आहे मानव! जगातील प्रत्येक राष्ट्राचा विचार केल्यास आपल्या असे लक्षात येते,जगाच्या पूर्व ते पश्चिम आणि दक्षिण ते उत्तर या सर्व देशांमध्ये मानव आपली बहुतेक सुविधा पूर्ण करण्यासाठी निसर्गावर आक्रमण करतोय किंबहुनां निसर्ग नष्ट करण्याची त्याची सवय आज घातक बनत चालली आहे.अर्थातच ,भविष्यातील मानव जातीचा विनाश होईल की काय? ही शंका मनात येते. 

यातूनच या नैसर्गिक शक्तीला देव संज्ञा प्राप्त झाली. नैसर्गिक शक्ति वरती मानवाकडून मोठमोठी आघात होऊ लागलेले आहेत. यातूनच मानवाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ लागलेली आहेत आणि आज हाच मानव भविष्यातील भाकीत करतो आहे. 

 आपत्तीची सुद्धा दोन प्रकार करण्यात येऊ लागले. एक नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती. नैसर्गिक आपत्ती सजीवांचा समूळ नाश करते किंवा विशिष्ट भागावर भागांवर कोपते.  मानवनिर्मित आपत्ती मात्र स्वतःच स्वतः नष्ट करायला तयार झाली आहे. मानव निर्मित आपत्ती ही भविष्यातील भयंकर संकट आहे. 

मानवनिर्मित आपत्ती, आजची covid-19 जागतिक समस्या बनली आहे. इतिहासामध्ये अनेक प्रकारच्या युद्धांची नोंद केली गेली आहे. पण..असे युद्ध जे आभासी आहे, पण प्रत्यक्षात खरे आहे, याची नोंद इतिहासामध्ये निश्चित केली जाईल. ते म्हणजेच जैविक किंवा विषाणूयुक्त युद्ध ! याच विषाणूचा सामना करण्यासाठी आज सर्व जग नवनवीन औषधांचा शोध घेऊन त्याचा अस्त्र म्हणून वापर करताना दिसत आहे. 

युद्ध म्हटल्यावर सैन्य लागतं पण सैन्य विना युद्ध खेळली जाऊ शकते काय? असा प्रश्न पडणं साहजिक आहे.परंतु, सैन्य विना युद्ध खेळले जाऊ शकते. तेही न दिसणाऱ्या शत्रूवर आघात करण्यासाठी. याची कल्पना जरा कल्पने बाहेरची वाटते नाही का? या शत्रूचा सामना करण्यासाठी उच्चशिक्षित वेल क्वालीफाईड सैन्या लढतांना दिसते आहे. या सैन्याला नावही देण्यात आलं, "कोरोना वारीयर! "

आजची प्रगत -अप्रगत राष्ट्र  न दिसणार्‍या शत्रूशी लढताना, व्याकूळ होताना दिसते. परंतु, 'माणुसकीच्या  शत्रुसंगे युद्ध आमचे सुरु' हा करारीपणा कोणतेही राष्ट्र सोडत नाही.  युद्धामध्ये फ्रंट वॉरियर म्हणून डॉक्टर, नर्स ,पोलीस ,शिक्षक आणि यांच्याकडून काम करून घेणाऱ्या शासकीय यंत्रणा, अहोरात्र झटत आहेत. आपत्ती व्यवस्थापनामध्ये विशेषाधिकारांचा वापर करताना शासन स्तरावर योग्य ती कारवाई केली जात आहे. याशिवाय त्याच्यावर नियंत्रण करणं शक्य नाही.  निर्णय कठोर जरी असले तरी घ्यावे लागतात. कारण,त्याशिवाय मानव जिवंत राहणार नाही. याची कल्पना सर्व जगाला आहे. म्हणूनच अख्ख जग थांबेल,अशी सुविधा या शत्रूनं करून ठेवली आहे. बातम्यांमधील आकडेवारी पाहता भारतच काय सर्व जग चिंतातूर होताना दिसते आहे. यावर एकमेव उपाय आणि तो म्हणजे लॉकडाउन. 

डिसेंबर 2019 पासून जगात अनेक प्रकारे लोक डाऊन करण्यात आले. कधी पूर्ण कडक  लॉक डाऊन ,तर कधी वीकेण्ड लॉकडाउन. पाश्चिमात्य राष्ट्रांची अवस्था तर  पाहण्यासारखी नाही. तेथील मनाला हेलावून टाकणारी दृश्य,आजही डोळ्यासमोर तरळतात. त्यानंतर जगभर पसरलेली भयावह भीती, किती क्रूर?  याचा अनुभव आज जगत असलेल्या सर्वांनीच घेतला, यामध्ये लाखो लोकांचा बळी  गेला, घरातील कर्ता माणूस गेल्यावर त्या संसाराची वाताहत कशी होते. याची अनेक उदाहरणे  जगात यावरून  पाहायला मिळाली. अगोदर युरोप,आफ्रिका,अशिया खंडांमध्ये लॉकडाउन पडत गेले . जगभर हा हा कार मजला. सर्वजण जीव मुठीत घेऊन बसले. जगाला कळून चुकले होते, धनदौलत काही कामाची नाही जीव महत्त्वाचा आहे. यावर उपाय म्हणून प्रत्येक देशाच्या शासनकर्त्यांनी उपाययोजना म्हणून आपत्ती व्यवस्थापनाचे नियम लागू केले. 

जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा भारत लॉकडाऊन नंतर  नंतर पूर्णपणे शांत झाला. पंतप्रधानाच्या हाकेला साथ  देत भारत बंद झाला.आर्थिक चक्रे तर थांबले. लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला . स्वयंसेवी संस्था सामाजिक कार्यकर्ते लॉकडाउन डाउन शिथील नंतर राज्यांतर्गत होणारे स्थलांतर आणि या स्थलांतरितांना अन्नदानाचे काम मोठ्या जोमाने सुरू झाले. पण यामध्ये एखादा  कोरोनाचा रुग्ण  निघाला तर त्याची ब्रेकिंग न्यूज नॅशनल चैनल वरती  झळकायचे. त्यानंतर ते गाव,तो परिसर , ती गल्ली , तो मोहल्ला शील केला जायचा.  रुग्ण निघालेल्य आसपासचा परिसर ग्रामीण भागात पाच किलोमीटर पर्यंत  झोन म्हणून प्रवेश निषेध केला जाई.एखादा व्यक्ती स्वॅब तपासायला दिल्यानंतर त्याचा रिझल्ट येईपर्यंत अनेकांनी हृदय विकाराच्या झटक्याने जीव गमावला रिजल्ट निगेटिव होता.यावरूनच आपल्या लक्षात येते कोरोना किती भयंकर होता,आहे.

सोशल डिस्टंसिंग हा एक नवीन नियम सुरू झाला. भारतातील चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे आठवण आणि उजाळा सर्व जगाने अनुभवला. एखाद्या एरियामध्ये एखादा पेशंट निघाल्यानंतर त्याबरोबर ज्या पद्धतीने वर्तन केले जायचे त्याच पद्धतीने भारतातील शूद्रादी अतिशूद्र यांच्याशी व्यवहार केला जात होता किंबहुना आजही तो सुशिक्षित वर्गात दिसून येतो. एक वेगळीच शोकांतिका भारतात आहे. जातिव्यवस्थेची प्रखर सोशल डिस्टंसिंग बंद झाले असले तरी प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी तर होतच नाही. चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा किडा उच्चवर्णीयांच्या डोक्यात आजही कुठेतरी वळवळ करत असताना दिसतो आहे.  कोरोनाने या व्यवस्थेची जाणीव सर्व जगाला झाली,हे विशेष.

आजही आठवतात सुन्न झालेले रस्ते लॉकडाउनला एक वर्ष पूर्ण झाले.आता दुसरी लॉकडाउन लागण्याची शक्यता किंवा चिन्हे दिसत आहेत. कोरोना चा विळखा दिवसेंदिवस कमी होताना दिसला, परंतु आज त्याची अवस्था खूप गंभीर झाली आहे. शासनाने खाजगी दवाखाने ताब्यात घेण्याची परिपत्रक सुद्धा काढले. आपत्ती व्यवस्थापनाचे विशेषाधिकार शासन वापरत आहे. त्याची आवश्यकता सुद्धा आहे. याच  कोरोनाच्या नावाखाली अनेक डॉक्टरांनी पेशंटला लुटले सुद्धा. मुंबईतील एका रिक्षावाल्याचे कोरोनाचे चे बिल अनेक लाखांमध्ये सुद्धा पाहिले. एका प्रतिष्ठित हॉस्पिटलमध्ये अशी अवस्था असेल, तर सामान्य हॉस्पिटलमध्ये रुग्णांची काय अवस्था असेल ? कोरोना पॉझिटिव रिपोर्ट घेऊन एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटल ला गेल्यानंतर डिपॉझिट नावाचा प्रकार हा आलाच लाख - लाख, दोन दोन लाखापर्यंत डिपॉझिट जमा करून घेतात. सर्वसामान्य माणसांनी जीवन तरी जगावे कसे? एवढे पैसे आणायचे तरी कुठून? अशा प्रकारचे अनेक प्रश्न, मंजूर , कामगार यांच्या मनात निर्माण होतात. खर्चापोटी अनेक लोकांचा जीव गेला.तीन-तीन,चार-चार लाख रुपये खर्च करून सुद्धा पेशंट जातो, याच्यासारखं दुर्दैव आणि अपयश ते कोणते? 

कोरोनाला बळी ठरलेल्या रुग्णांची अशी अवस्था आहे. पण या  कोरोनामुळे स्थलांतरित झालेल्या कामगारांचे काय ?अनेक कामगार रस्त्यावरती अपघाताने दगावले, रेल्वेच्या पटरी वरती अपघाताने दगावले,कोणी उपाशी पोटी दगावले, तर कोणी चिंतेने वाटेतच अटॅक येऊन दगावले. याला जबाबदार कोण? तर मानवच ना! कारण ,सत्तासंघर्ष पोटी किंवा या जगावर निर्विवाद वर्चस्व,हे आपलेच असावे,ही अघोरी भावना मनात निर्माण झाली. म्हणूनच  कोरोनाचा उदय झाला. एक शाश्वत सत्य! 

                                #RAHUL DONGARDIVE






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा