निगमानंद माऊली : द अनटोल्ड स्टोरी
भाग :१
स्वामी निगमानंद महाराज |
महाराष्ट्र संतांची भूमी म्हणून अखंड भारतात परिचित आहे. या भूमीत अनेक संत महात्म्याची जडण-घडण झाली .थोर महात्म्यांच्या कार्याची आत्म उन्नती सिद्धीची सत्वपरीक्षा. यातून जे तावून सुलाखून निघाले , किंबहुना चित्ताची शुद्ध बीजे भरली , तीच शुद्ध बिजे , या भूमीचे पवित्र राखण्यात, यशाची यशोशिखरे काबीज करण्यात , अध्यात्माची कारणमीमांसा व यथोचित परिपाक , फलनिष्पत्ती पर्यंत पोहोचली . आत्मशुद्धीसाठी निरागस चिंतन , मनन आणि सत्याची पारख यांचा संयोग व मनोमिलन यासाठी ही भूमी सदोदित अग्रेसर राहिली . महाराष्ट्राच्या सर्व विभागातून अतुलनीय व्यक्तिमत्व उदयास आली . 'उद्याला' घडवण्यात सु संस्कारक्षम बनवण्यात व मानवहीत जोपासण्यात आपला उभा जन्म झिजवला. मानव एक साधन नसून जीवनाचे अंतिम फलप्राप्ती अर्थात मोक्षप्राप्तीचे साध्य बनवले. माणसाच्या मनातील अनेक पैलूंचे विविध रंग समोर आणले. विज्ञानवादी सिद्धांतानुसार -' अनाकलनीय गोष्टींगोष्टींचा शोध म्हणजे विज्ञान, आणि त्या शोधाचा मानव जातीच्या कल्याणासाठी किंवा भौतिक सुखासाठी चा उपयोग म्हणजे तंत्रज्ञानतंत्रज्ञान'. अगदी त्याच पद्धतीने या थोर महात्म्यांनी मानवी दुःखाचा शोध अध्यात्मिक शक्ती व ध्यानधारणेतुन घेतला. दुःखाचे मूळ कारण शोधून ते दुःख होऊ नये म्हणून उपाय सुचवले. वास्तविक पाहता सात्विक आचरण व शील अबाधित ठेवणे , ही स्वयंशिस्त बंधनकारक ठेवली.
अशाच एका थोर विभूती ची महती व त्यांच्या या आध्यात्मिक ज्ञानाचा उपयोग समाज कल्याणासाठी होतो आहे वास्तव मानवरूपी देहामध्ये साक्षात ईश्वराचा अंश आहे हे अनुभवातून प्रत्येकालाच अनुभूती येते आहे याचे साक्षीदार आपणास परिसरात भेटतीलही एका शुद्ध चित्ताच्या महात्म्याची मानव कल्याणाचा वसा घेतलेल्या वंदनीय हनुमंताची गाथा मच्छिंद्रगड निवासी
गुरुवर्य श्री ह.भ.प. स्वामी निगमानंद माऊली!
एक गाव देवदैठण ,जिल्हा अहमदनगर . गाव तसं छोटं . पण सार्वभौम , परिपूर्ण असलेल. माणसेही प्रेमळ सुस्वभावी एकमेकांच्या अडीअडचणींना धावून जाणारे. देश पारतंत्र्यात होता,.परंतु , स्वयंपूर्ण खेडे होते . तत्कालीन परिस्थितीत आवश्यक गरजा गावांमध्ये हे पूर्ण होत असत. सर्व लोक गुण्यागोविंदाने राहत होती . याच गावात एक सद्गृहस्थ राहत होते .ते म्हणजे, श्री विठोबा देवगुंडे . गावात त्यांना खास माण असे. त्यांचा लोक आदर करत असत . गावामध्ये एक मोठा वाडा होता, बैल , बारदाना , शेतात मोठी आंबराई होती. विठोबाचे कुटुंब एक सुसंस्कृत व गुणीजन सदस्य सोबतीला , चतुर्भुज असणारे चार बंधू.
श्री विठोबा देवगुंडे म्हणजे निगमानंद माऊलींचे आजोबा . आर्थिक सुबत्ता होती. परंतु , नियतीने वेगळेच या कुटुंबाविषयी डाव आखले होते. भयावह दुष्काळ पडला. दुष्काळामुळे पुर्ण गावावर स्थलांतराचे सावट कोसळले . भयावह प्रसंगाला तोंड देण्यासाठी प्रत्येक गावकरी स्थलांतर करू लागला. हाच प्रसंग देवगुंडे परिवारावर सुद्धा आला . विठोबा देवगुंडे यांचे चार बंधूचा, विठोबा यांच्या जीवनात कायमचा दुष्काळ पडला . दुष्काळामुळे विद्यार्थ्यांचे चार बंधू स्थलांतरित झाले ते परत आलेच नाही.
बंधू विरहाने विठोबा खचून गेले. त्यांना काय करावं? ते सुचत नव्हतं . या न सोसणाऱ्या या दुःखात सोबतीला सद्गुणी असणारी सौभाग्यवती पार्वतीबाई होत्या. या भयावह प्रसंगाला कसं सामोरं जायचं? हा यक्षप्रश्न त्यांना सारखा सतावत होता . तरीही पार्वतीबाई त्यांना धीर देत होत्या . पण विठोबाच मन एवढ्या मोठ्या वाड्यात लागत नव्हतं . त्यामध्ये स्वतःला मूलबाळ होत नाही . एवढ्या मोठ्या समस्या होत्या. मग एवढ्या मोठ्या संपत्तीचा उपयोग काय? काय करावं? कुठे जावं? आता कोणासाठी जगाव ? अशी नाना तर्हेची प्रश्न त्यांना जाब विचारत होती . उत्तर शोधूनही मिळत नव्हत.
अण. .या दांपत्याला त्यावर उपाय सुचला . विठोबा नी सौ पार्वतीबाईंना बोलून दाखवलं , गाव सोडायच. पार्वतीबाईंनी तो उपायाला , कसलेही आढेवेढे न घेता होकार दिला. या दांपत्याला एवढ्या मोठ्या संपत्तीचा मोह वाटला नाही .पती परमेश्वर यानुसार पतीची आज्ञा पाळली. नवीन गावाचा शोध घेत हे दांपत्य शेवटी शिरूर तालुक्यातील नांदेवली या गावी पोहोचले.
नांदेवाली गावात त्यांना मिळेल ते काम करू लागले. उदर निर्वाह सुरू झाला. गावात सर्वांशी चांगले राहू लागले . मनमिळावू स्वभाव , सरळ साधी राहणी, मोहमाया या गोष्टी कोसोदूर. सर्वांचे हितचिंतक व प्रांजल वाणी मुळे हे दांपत्य लोकप्रिय झाले . एवढ्यात जवळच असणाऱ्या मायंबाची महत्ती या दांपत्याला कळली. श्री विठोबा व सौ पार्वती यांच्यामध्ये मायंबा ला शरण जाण्याची तयारी झाली. सात्विक विचाराचे विठोबा मायमबा च्या दर्शनाला जाऊ लागले.
भारतावर मोगलांचे आक्रमण त्यांची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी केलेली अन्याय-अत्याचार व हिंदू मंदिरावर ची आक्रमणे याची जाणीव सर्वांनाच आहे . भारतातील सर्वात मोठा संप्रदाय म्हणून नाथ संप्रदाय ओळखला जातो. नाथ संप्रदायाची महती ही लोककल्याणाची होती . त्यांनी ज्या ज्या ठिकाणी आपली कार्य पार पाडली, ते ठिकाण त्यांची वसतिस्थाने मंदिराच्या स्वरूपात उभारली. मंदिराच्या स्वरूपात उभारली . अशा मंदिरावर मुघलांनी आक्रमण करून त्या ठिकाणी मुस्लिम दर्गाह निर्माण केले होते.
मुघलांच्या आक्रमणाला बळी पडलेली मच्छिंद्रनाथ निवास करत होते . ते ठिकाण म्हणजे , तत्कालीन 'मायंबा' होय. मायंबा चे पुजारी बाबाजी महाराज देवकर , तद्नंतर लुंडमुंड बाबा , बागुजी बाबा, आणि वैकुंठवासी धोंडीराम महाराज हे होते . जेव्हा विठोबा पार्वती वंशाला दिवा हवा म्हणून , लुंडमुंड बाबा पुजारी असताना मायंबा ची सेवा करू लागले . लुंडमुंड बाबांची सेवा मनोभावे केली. देवगुंडे दांपत्याला आशा होती . वंशाला दिवा हवा .बंधू विरह आणि वंश याच कारणासाठी त्यांनी देवदैठण सोडले होते . सलग बारा वर्षे सेवा मायंबा ची केली. वयही वाढत होत . बारा वर्षानंतर लुंडमुंड बाबांनी विठोबाना व पार्वतीबाईंना आशीर्वाद दिला, "तुमचे वय राहिले नाही मुलगा होण्याचे, परंतु, तुम्हाला मुलगा होईल. "
अखेरीस लुंडमुंड बाबांचा आशीर्वाद खरा ठरला. विठोबा पार्वतीबाईंना पुत्ररत्न प्राप्त झाले दोघांचा आनंद गगनात मावेनासा झाला आतापर्यंत झालेल्या असंख्य दुःखातून त्यांना अनेक वर्षानंतर सुखद अनुभव होता मायंबा च्या कृपेने पुत्ररत्न प्राप्त झाल्याने त्याचे नाव संतराम ठेवले. पुढे लोक त्यांना आदराने संतोबा असं म्हणत.
- राहुल डोंगरदिवे
श्रीमंत निगमानंद विद्यालय निमगाव,ता. शिरूर
क्रमशा:.....
Waiting for second part......
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवाGood
उत्तर द्याहटवाउत्तम
उत्तर द्याहटवाGreat thought... 👍
उत्तर द्याहटवा