भाग : 3
आत्मशुद्धीसाठी शिक्षण
स्वामी निगमानंद महाराज |
देवाचा आशीर्वाद आणि त्यावरची अपार श्रद्धा , यामुळे सिताराम बुवांना, मायंबा च्या सेवेला अर्पण केले . सिताराम बुवांना लोक अदरांनी बाबा , बुवा किंवा मायंबा म्हणत असत. सिताराम बुवा मात्र आपल्या वैयक्तिक ज्ञानग्रहणच्या छंदात रममाण झाले .तसं , प्राथमिक शिक्षण हे त्यांन खालापूरीच्या खाजगी शिक्षकाकडून मिळालं . त्यांच्या असणाऱ्या विलक्षण क्षमतेने ते शिक्षकही अचंबित होत . परंतु, एकदा त्यांनी केलेल्या शिक्षेमुळे त्या शिक्षकांना अपचनाचा त्रास सुरू झाला . मायंबा चा प्रसाद आहे 'सिताराम!' मायंबा ला शरण जा ,असे सांगितले गेले. तेव्हा कुठे शिक्षक बरे झाले. पुढे सीताराम बुवा त्या शिक्षकाचे आवडते झाले.
सिताराम बुवा श्रद्धावान होतेच, परंतु ते वास्तवाचे भान राखत . त्यांना कळून चुकले होते की , ज्ञानाशिवाय पर्याय नाही . ज्ञान मिळवायचे झाल्यास आपणाला आळंदी शिवाय पर्याय नाही . प्राथमिक असणाऱ्या भजन, गाथा यावर सिताराम बुवा समाधानी झाले नाहीत. ज्ञान हे शिक्षणाशिवाय मिळत नाही . त्यांनी आळंदी ला जाण्याचा निर्णय घेतला . 1951साली त्यांनी आध्यात्मिक शिक्षणासाठी अत्यंत बिकट परिस्थितीतून आळंदी ला प्रयाण केले.
आळंदीला बुवा पोहोचले . तेथे त्यांनी ज्ञानार्जनासाठी श्री सद्गुरू ब्रह्मभूत तात्या महाराज साखरे, यांच्याकडून गीता आणि ज्ञानेश्वरी यांचे शिक्षण घेतले . शिक्षण घेत असताना आपली उपजीविका भागविण्यासाठी चे नियम आश्रमामध्ये अत्यंत कठोर व कडक होते. दैनंदिन दिनचर्या चालवण्यासाठी आश्रमामध्ये प्रत्येक साधकाला स्वतः प्रयत्न करावे लागत असंत . त्याचाच एक भाग म्हणजे पूर्ण आश्रम हा मधुकरी वर चालत असे. मधुकरी साठी आळंदी परिसरामध्ये चार पाच किलोमीटर पर्यंत जावे लागत असे. मधुकरी मधून मिळालेल्या भाकरीवर ती आश्रम व्यवस्था चालायची. त्याकाळी परिसरातील लोकही एवढे सदन नसल्याने मधुकरी समाधानकारक नव्हती. मिळेल ती भाकरी सर्व साधकांमध्ये वाटून खायची ,असा आश्रमाचा नित्यक्रम असे . कधी कधी तर मधुकरी व्यवस्थित समाधानकारक न मिळाल्यास आश्रमातील शिळे तुकडे भुगा करून साधकांना दिला जाई . या प्रसंगांना तोंड देऊन ज्ञानार्जन करणे ही मोठी तारेवरची कसरत किंबहुना एक खडतर प्रवास होता.
आश्रमातील नियम व ज्ञानार्जन यात खूप सायास होते. या परिस्थितीचा बाबांवर गंभीर परिणाम झाला. त्यांना अपचनाचा त्रास होऊ लागला . त्यातून त्यांना अतिसार सारखा गंभीर आजार जडला. तब्येतीत सुधारणा मात्र होत नव्हती . नाईलाजास्तव त्यांना आळंदी सोडावी लागली. शरीर अतीक्षीण झाले होते रेल्वेने पुण्याहून ते अहमदनगर ला आले . एकेक पाऊल टाकने बाबांना शक्य होत नव्हते . कसेबसे ते एका झाडाखाली आश्रयासाठी पहुडले. प्रत्येक रेल्वे स्टेशनला येजा करणारा , त्यांची विचारपूस करत होता. पोटात अन्नाचा कण नाही .खिशात पैसा सुद्धा नाही. नगरहून नांदेवालीला -निमगाव मायंबाला येणे तर शक्यच नव्हत . काय करावे ? सुचत नाही .शेवटी कोणीतरी तेथील एका व्यक्तीचे नाव सुचवले की ,जो तुम्हाला मदत करेल . बाबा मोठ्या प्रयत्नानेे त्या व्यक्तीकडे पोहोचले सायंकाळ झाली होती . सुचवलेल्या व्यक्तीने बाबांना मयांबा वर पोहोचता येईल अशी तजवीज केली. मुक्काम करून बाबा अत्यंत दयनीय अवस्थेत दुसऱ्या दिवशी मायंबावर पोहोचले.
बाबांची ही अवस्था पाहून सर्वांनीच हळहळ व्यक्त केली. बाबा मायंबावर राहू लागले. आळंदीची मधुकरी प्रथा येथेही सुरू केली. दिवसेंदिवस बाबांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. बाबांची प्रकृती सुधारली . पुन्हा बाबांच्या ज्ञानाच्या भुकेने आळंदी खुणावत होती .बाबा आळंदी ला रवाना झाले. आश्रमातील वातावरण आता बाबांना साथ देत होते. ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते हे बाबांचे परममित्र झाले . दोघांची जोडी ज्ञानार्जनात अग्रेसर होती. गुरु साखरे महाराजांचे ती अत्यंत आवडीचे साधक बनले. तेथे त्यांनी गीता , ज्ञानेश्वरी, विचारसागर ,वृत्तीप्रभाकर वेद - वेदांत आणि न्यायमीमांसा हा अभ्यास आळंदीत पूर्ण केला. परंतु, ज्ञानाची भूक शमली नव्हती. प्रत्येक अभ्यासात विशेष प्राविण्य मिळवणे व त्याचा जनकल्याणासाठी उपयोग कसा करता येईल ? हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या निवासस्थानी जेवढे घेता येईल , तेवढे घेतले. माऊलींच्या समाधीवर माथा ठेवून पुढील शिक्षणासाठी पंढरपूरला गेले. विठूमाऊलीच्या दर्शनाने लीन होऊन ' ते' रूप डोळ्यांमध्ये साठवले , अंतकरणात ठेवले. पुढील शिक्षण पंढरपूरच्या अनेक मठामधून तर , मदन महाराजांच्या कडे - भागवत, एकादशस्कंद , श्रीमद्भागवत, आद्वैतामोह , तुकाराम गाथा शिकले. त्याचबरोबर , विश्राम महाराजांकडे तर्कसंग्रह,न्यायबोधिनी , निळकंठी, सिद्धांतबिंदू, ग्रंथ शिकले. प्रत्येक मठातुन कोणत्या ना कोणत्या ग्रंथाचे नामस्मरण, चिंतन-मनन ,श्रवणाने ते स्वतःमध्ये वेगळीच अनुभूती घेत होते. भगवान परमात्म्याचा प्रत्यक्ष अनुभव मात्र त्यांना आला नाही. प्रत्येक ग्रंथ व त्यातील त्याच्या ज्ञानाचा उपयोग स्वयं आत्मबोधासाठी करत. परंतु, त्यांचे फलित प्राप्त होत नाही ,ही 'सल', मनामध्ये सारखी नव चैतन्याचा चा बोध घेण्यासाठी खुणावत होती. बाबांचा आशावाद वाखाण्याजोगा होता. ज्ञानार्जनाची अंतिम भुख भागत नव्हती . त्यांना अपेक्षित असणारे ज्ञान मिळत नव्हते. म्हणून, त्यांनी पंढरपूर सोडण्याचा निर्धार केला. वेद - वेदान्ताचा, उपनिषदांचा अभ्यास अर्थात उच्चशिक्षणासाठी ऋषिकेश डोळ्यासमोर आले. शेवटी विठू माऊलींचे दर्शन घेऊन पुढील अध्यात्माचा कळस प्राप्त करण्यासाठी ऋषिकेश ला रवाना झाले.
वेद वेदांताचा , उपनिषदांचा अभ्यास करण्यासाठी बाबा ऋषिकेश ला आले होते. अध्ययनाला सुरुवात झाली . अभ्यास प्रवृत्ती उत्तम असल्याने, त्यांना तेथील अभ्यास रुची वाढत गेली. सर्व विषयात विशेष प्राविण्य मिळवणे हा त्यांचा हातखंडा आगळा वेगळा होता. एवढेच न करता त्यांनी आंतरराष्ट्रीय भाषा इंग्रजी, राष्ट्रीय भाषा हिंदी , अध्यात्मिक भाषा संस्कृत वर विशेष प्रभुत्व, त्यांनी मिळवले होते. आजही त्यांचा हा हातखंडा मच्छिंद्र गडावर अनुभवास येतो. प्रवास जरी खडतर होता तरी ,बाबानी श्रीगुरुंच्या आश्रमात अव्वल स्थान मिळवले होते. सिताराम बाबा आता सिताराम राहिले नव्हते. वेदशास्त्रात विषेश नैपुण्य मिळवले होते . श्री गुरु त्यांच्यावर प्रसन्न होते.
14 वर्षाच्या तपश्चर्येचा खडतर प्रवासाचा मार्ग संपला होता. हा मार्ग त्यांनी अगदी सहजपणे पार केला होता. ज्ञानार्जनाच्या भुकेचा परिणाम होता. ही आवड पाहून त्यांची विशेषता, परिपक्वता होती. आज पर्यंतचे सिताराम बाबा आता श्रीगुरुंच्या नजरेत एक 'आनंद' होते. 'निगम' म्हणजे 'वेद' . श्रीगुरुंनी सिताराम मध्ये वेदांचा झुळझुळणारा आनंदी झरा पाहिला. या आनंदी झर्याला त्यांनी "निगमानंद" या नावाने संबोधन केले. 14 वर्षाच्या अभ्यास तपश्चर्येने, तर सिताराम बाबा आता निगमानंद झाले होते. आज सर्व परिसर, भक्तगण, महाराष्ट्रभर त्यांना हरिभक्त परायण श्री स्वामी निगमानंद महाराज म्हणून ओळखतात. मच्छिंद्रनाथ गड निवासी निगमानंद माऊली लोकांच्या समस्या सोडवण्यात व समुपदेशनात अहोरात्र व्यस्त असतात.
आचार्य पदाचे शिक्षण घ्यावे, ज्ञानदान करावे, हा विचार मनात आला नाही. त्यांनी या शिक्षणाचा उपयोग समाज कल्याण साठी करावा, हाच विचार सूचक होता. पुढे भारत-भ्रमण ,तीर्थयात्रा, करताना अनेक खडतर प्रवासातील आठवणी, अंगावर शहारे आणल्याशिवाय राहत नाहीत. आपले आयुष्य मायंबा च्या सेवेसाठी आहे. 'अर्थ' हा आपल्यासाठी गौण आहे. रेल्वेतून विनातिकीट प्रवास हा भयाण असे. विनातिकीट प्रवास मध्ये टी.सी.ने त्यांना पकडल्यानंतर, दोन-तीन दिवस तिथेच काढत. भगवा वेश
व 'साधू' खात्री पटल्यानंतर त्यांना सोडून देण्यात येई . अत्यंत वाईट प्रसंगांना तोंड द्यावे लागले, सोबतीला मात्र ग्रंथ होते!
वृंदावन गोकुळ पाई प्रवासातला गाजरांचा प्रसंग, प्रत्यक्षात त्यांच्या तोंडून ऐकताना अक्षरशः डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. रखरखत्या उन्हात बाबा गोकुळ ला जात होते. पोटात आग पडली होती. आजूबाजूला एकही गाव नव्हते. चहूबाजूंनी फक्त शेतीच - शेती दिसत होती. चालून चालून शरीर थकले होते. एक पाऊल सुद्धा पुढे ओढत नव्हते. बाजूला एका शेतात एक शेतकरी, आपल्या भार्या सोबत गाजरे काढताना दिसले. बाबांनी त्यांना विचारले," गोकुळ किती दूर आहे ?" त्यांनी त्यांना सांगितले खूप दूर आहे. तेव्हा त्यांनी त्या माउलीला भिक्षा मागितली, त्या मातेने ओंजळ भरून गाजरे घेतली व बाबांना दिली. यमुनेच्या काठी येउन, स्नान करून,पूजाअर्चा करून गाजरे सेवन केली,आणि गोकूळा कडे मार्गस्थ झाले.
क्रमशा: ...
👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवा